रोज ब्युटी पार्लर
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
28-07-2023
सिरोंचा तालुक्यातील 334 पूरपिडीत लोकांचे शेल्टर होममध्ये स्थलांतर
जिल्हा प्रशासनाद्वारे 58 शेल्टर होमची निर्मिती
निवास, अल्पोपहार व जेवणाची सुविधा
गडचिरोली, (जिमाका) दि.28 : दि. 27 जुलै 2023 रोजी जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने सिरोंचा तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गोदावरी नदीच्या पूरात अडकलेल्या व पुरामुळे धोका होऊ नये, अशा संभाव्य गावातील लोकांसाठी जिल्हा प्रशासनाने शेल्टर होम तयार केले आहे. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत जिल्हा प्रशासनाने पूरपिडीत 334 लोकांना या शेल्टर होममध्ये स्थलांतरीत केले असून त्यांच्यासाठी निवास, अल्पोपहार व जेवणाची सुविधा जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आली आहे.
सिरोंचा तालुक्यात एकूण 58 शेल्टर होम तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक शेल्टर होममध्ये तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, सरपंच व उपसरपंच याप्रमाणे 58 पथक तयार करण्यात आले आहेत. दिनांक 27 जुलै 2023 ला सिरोंचा तालुक्यातील नगरम, मुगापूर, जानमपल्ली व सिरोंचा (रै.) येथील पुरबाधित लोकांना शेल्टर होममध्ये हलविण्यात आले आहेत. त्यामध्ये नगरम येथील 240 लोकांना शासकीय आश्रम शाळा, सिरोंचा येथील शेल्टर होममध्ये, मुगापूर व जानमपल्ली येथील 90 लोकांना कॉरमेल हायस्कुल राजीवनगर, सिरोंचा येथे तर सिरोंचा (रै.) येथील 4 लोकांना जिल्हा परिषद हायस्कुल, सिरोंचा येथील शेल्टर होममध्ये आणण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाद्वारे नागरिकांच्या निवासाची, अल्पोपहार व भोजनाची व्यवस्था मोफत करण्यात येत आहे.
याशिवाय तालुक्यात एस.डी.आर.एफ. चे एक पथक आणि सी.आर.पी.एफ. चे 50 जवान मौक्यावर तैनात आहेत. तसेच लाइफ जॅकेट, लाईफ बोट, मेगाफोन व आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत लागणारे सर्व साहित्य मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. सर्व पूरबाधित गावांमध्ये आपदा मित्रांची नियुक्ती करण्यात आल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणने कळविले आहे.
०००००
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments