ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
28-07-2023
102 रुग्णवाहिका चालकांचे वेतन त्वरित द्या
कुणाल पेंदोरकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी संजय मीना यांना निवेदन
जिल्हाधिकारी यांनी विषयांचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा शक्य चिकित्सक यांना वेतन तात्काळ देण्याचे आदेश दिले.
गडचिरोली-
गडचिरोलीच जिल्हातील 102 रुग्णवाहिकांचे वाहन चालक यांचे मागील 4 महिन्यापासून वेतन मिळाले नाही. त्यांना स्वतःच उदरनिर्वाह करण्यात मोठ्या प्रमाणावर संकटांचा सामना करावा लागत आहे. सर्व वाहन चालक महिला बाल रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, येथे 24 तास निरंतर सेवा देत आहेत. मे. राजश्री शाहू नागरी सेवा संस्था पालघर जील्हा ठाणे या कंपनी मार्फत सण 2022 पासून कार्यरत आहेत. रुग्ण नेणे आणि आणणे या व्यतिरिक्त रुग्णालयातील कामे वाहन चालक पदावर असून सुद्धा करीत आहेत. परंतु कंपनी त्यांना वेतन वेळेवर देत नाही. त्यामुळे त्यांचे मुलांचे शिक्षण, आरोग्य , कुटुंब चालवणे कठीण झाले आहे याचा त्यांना मोठ्या प्रमाणावर मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. मागील 4 महिन्याचे वेतन कंपनी मार्फत केले नसून आज उपासमारीची वेळ वाहन चालकांवर आलेली आहे. शासकीय नियमानुसार कंपनीने वेतन इ,पी,एफ,वेळेवर देने भरणे अपेक्षित आहे पण असे कंपनी मार्फत होत नाही.कंपनी कडे भंडारा, वर्धा ठाणे व अकोला या पाच जिल्ह्यांचे टेंडर आहे. बाकी जिल्हातील वाहन चालकांचे वेतन 10 तारखेच्या आत होत आहेत. फक्त गडचिरोली येथील वाहन चालकांचे वेतन 4 महिन्यापासून होत नाही आहेत.
तरी गडचिरोली येथील वाहन चालकांवर होणारा अन्याय दूर करावा उद्या वाहन चालक संपावर गेल्यास रुग्णाची हेळसांड होईल. वेतन वेळेवर न मिळाल्यास काम बंद च इशारा वाहन चालकांनी दिलेले होते. परंतु जिल्हाधिकारी यांच्या मध्यस्थीने त्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. जिल्हाधिकारी संजय मीना यांनी विषयांचे गांभीर्य लक्ष्यात घेऊन जिल्हा शक्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते याना दूरध्वनी वरून वाहन चालकांचे तात्काळ वेतन देण्याचे आदेश दिले.
त्यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सहसचिव कुणाल पेंदोरकर, मोरेश्वर मंदिरकर, ब्रम्हानंद गोरडवार, एजाज शेख, मुकुंदा नागरे, महेश गडसुलवार, यांच्यासह इतर वाहन चालक उपस्थित होते.
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments