बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
F
03-01-2025
अहेरी : तालुक्यातील वेलगूर येथील काही मजूर कामासाठी तेलंगणात गेलेले आहेत. तेथे त्यांच्या जीपला अपघात झाला. यात एक महिला ठार झाली, तर १५ जण जखमी झाले. १ जानेवारीला तेलंगणातील सिरसिल्लाजवळ हा अपघात झाला.
कांताबाई सूर्यभान मराठे (वय ४५) असे मयत महिलेचे नाव आहे. त्या तेलंगणा राज्यातील करीमनगर येथे कापूस वेचणीसाठी गेल्या होत्या. नववर्षानिमित्त देवदर्शनासाठी मजूर वेमूलवाडा येथे जीपने जात होते. सिरसिल्लाजवळ जीपचा अपघात झाला. यात कांताबाई मराठे यांचा जागीच मृत्यू झाला.
आनंदराव मराठे, गंगुबाई मराठे, कविता पालोजवार, रेखा गाताडे, लक्ष्मी मंडरे, वनिता सातारे, भिकू सातारे, उषा मराठे, सुनंदा राऊत, माया मराठे, ज्योती मराठे, विमल मराठे, निर्मलामंडरे, सुधाकर गदेकर, सुरेखा गदेकर यांचा जखमींत समावेश आहे.सर्व जखमींना करीमनगर दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले आहे.
नातेवाईकांना मदतीचा हात
दरम्यान, कांताबाई मराठे यांच्या नातेवाईकांना तेलंगणाला जाण्यासाठी पैशांची अडचण होती. याबाबत माहिती मिळाल्यावर जि.प.चे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी नातेवाईकांना प्रवास खर्च तसेच उपचारासाठी आर्थिक साहाय्य केले. नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, मारपल्लीचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम, राकेश सडमेक, प्रमोद गोडसेलवार, प्रकाश दुर्गे आदी उपस्थित होते.
Your car is our responsibility
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Politics
No Comments