आयुर्वेदिक पंचकर्म मल्टीस्पेशलिटी क्लिनिक
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
F
23-12-2024
अहेरी: अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना व्यंकटरावपेठा येथे सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. किशोर चंदुरसाई तलांडे (२५, रा. इंदाराम, तालुका अहेरी) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.
किशोर तलांडे हा इंदारामकडे जात असताना समोरून येणाऱ्या एका वाहनाने धडक दिली. त्यात किशोर याच्या डोक्याला जोरदार मार लागला. या घटनेत किशोर हा रस्त्यावर पडला तर दुचाकी दुसऱ्या बाजूला फेकली गेली. किशोरच्या डोक्याला जोरदार मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. किशोरच्या दुचाकीला कोणत्या वाहनाने धडक दिली याबाबत कळू शकले नाही. मात्र, त्याच्या दुचाकी ट्रॅक्टरने धडक दिली. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, जवळपास १ तास उशिराने पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अहेरी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. पोलिस अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत.
विशेष म्हणजे, मागील १० दिवसांत अहेरी उपविभागात जवळपास पाच ते सहा अपघात झाले. अपघाताचे हे सत्र सुरूच आहे.
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
National
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments