RUBY ENTERPRISES
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
F
17-12-2024
धाबा : छत्तीसगड राज्यातून हैदराबादकडे जात असताना भरधाव ट्रॅव्हल्स उलटल्याने २० मजूर जखमी झाले. यातील नऊ मजुरांची प्रकृती गंभीर असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना रविवारी (दि. १५) रात्री गोंडपिपरी तालुक्यातील दरूर येथे घडली. कविता मलगाम, माया चौधरी, निरंजन हुसवा, देवेंद्र उईके, गंजुराम मडावी, संगीता टेकाम, बिदेश मरकाम, फागेलाल धुर्वे, नरेंद्र उमरे अशी गंभीर जखमींची नावे आहेत.
छत्तीसगड राज्यातील बालाघाट जिल्ह्यातील लांजी येथील मजूर हैदराबाद येथील एका कंपनीत काम करण्यासाठी ट्रॅव्हल्सने जात होते. या ट्रॅव्हल्समध्ये ३० ते ३५ मजूर बसले होते. गोंडपिपरी तालुक्यातील दरूर येथे रात्री ही ट्रॅव्हल्स आली असता चालकाचे नियंत्रण सुटले. दरम्यान, ट्रॅव्हल्स उलटल्याने २० मजूर जखमी झाले. त्यातील विता मलगाम, माया चौधरी, निरंजन हुसवा, देंवेंद्र उईके, गंजुराम मडावी, संगीता टेकाम, बिदेश मरकाम, फागेलाल धुर्वे, नरेंद्र उमरे यांची प्रकृती गंभीर असल्याने रात्रीच जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातात ट्रॅव्हल्स चालकही जखमी झाला, अशी माहिती धाबा पोलिसांनी दिली.
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
National
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments