संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
F
05-04-2025
रेती तस्करांनी महसूल कर्मचाऱ्यांना दिला का चोप?,परिसरात चर्चेला उधाण
देसाईगज (गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात सर्वत्रच मोठ्या प्रमाणावर अवैध रेतीचे उत्खनन करून वाहतूक केली जात असल्याने तसेच शासनाच्या महसूलास कोट्यवधी रुपयांचा चुना लागत असल्याने गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी अवैध रेती वाहतूक उत्खनाला आळा घालण्यासाठी चेकपोस्ट तयार केल्या असून सदरच्या चेकपोस्टवर ईटीपी न केल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट निर्देश दिल्याने काही कां असेना, जिल्ह्यात अवैध रेती उपसा व वाहतुकावर थोडाफार तरी आळा बसल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे. अशातच ज्यांना अवैध रेतीची चोरी केल्याशिवाय दुसरे पर्यायच उरलेले नाही, अश्या मुजोर रेती तस्करांचा कारनामा देसाईगंज तालुक्यात चर्चेचा विषय ठरू लागला आहे. रेती चोरीचा अन् शिवीगाळ करून झोडपल्याचा मामला पुढे आला असल्याने याची वाच्यता कुठेही झाली नसली तरीही 'चोर मचाये शोर' मुळे प्रकरणास वाचा फुटली आहे. वाचा तर फुटली, मात्र प्रकरणात अधिकाऱ्यांनी चुप्पी साधल्याने खालच्या कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात असल्याची चर्चा सर्वत्र दबक्या आवाजात सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देसाईगंज तालुक्या एका छोट्या गावातील रेती घाटावर बुधवार २ एप्रिलच्या मध्यरात्री १ ते १.३० वाजेच्या दरम्यान, चार ते पाच ट्रॅक्टर अवैध रेतीचा उपसा करून वाहतूक करीत असल्याची माहिती एका महसूल विभागातील काही कर्मचाऱ्यांना गुप्तरित्या मिळाली. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी सिने स्टाईलने अवैध रेती उपसा करणाऱ्या घाटावर धाड टाकली. धाड तर टाकली, पण रेती तस्करी करणारे 'या आणि आम्हाला पकडा' असे म्हणणार तर नाही ना ? त्यातच काही मुजोर रेती तस्करांनी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत झोडपले. मध्यरात्रीची घटना असल्याने याबाबत कुठेही वाच्यता झाली नाही. पण 'भिंतीलाही कान असतातच' या म्हणीप्रमाणे हळूहळू घडलेला प्रकार उघडकीस येऊ लागला आहे. अशातच सदर घटनेबाबत आज, शुक्रवार ४ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास देसाईगंज पोलीस ठाण्यात एका पत्रकाराने माहिती घेतली असता, अजून पर्यंत कुठल्याही प्रकारची तक्रार दाखल करण्यात आली नसल्याचे सांगितले याचे नवल वाटत आहे. त्यामुळे 'हम करेसो कायदा ' याची प्रचिती सदर प्रकारावरून स्पष्टपणे दिसून येत असल्याने रेती तस्करांची आणखीनच मुजोरी वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments