आयुर्वेदिक पंचकर्म मल्टीस्पेशलिटी क्लिनिक
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
F
05-04-2025
मोहफुल संकलन करीत असताना एका इसमाचा वाघाने घेतला नरडीचा घोट
बोडधा (हळदा) : ब्रम्हपुरी तालुक्यातील आवळगांव बिटात आवळगांव येथील वृद्ध सकाळी मोहफुल संकलनासाठी जंगलात गेला असता दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने त्या इसमाचा नरडीचा घोट घेत ठार केल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या वृद्धाचे नाव मनोहर सखाराम चौधरी रा. आवळगांव असे असुन पोटाची खळगी भरण्याकरीता हंगामी मोहफुल
वेचुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. त्यासाठी आवळगांव बिटातील कक्ष क्र. ११३८ मोहफुल मध्ये वेचण्याकरीता सकाळी जंगलात एकटाच गेला असता अचानकपणे वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ठार केले. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी आर. डी. शेन्डे व मेंडकी पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
या परिसरात वाघांची दहशत असुन भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिक भयभीत जिवन जगत आहेत. त्यामुळे वनविभागाने गस्त वाढवुन वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या मनोहरला पत्नी व मुलगा-मुलगी असा परिवार असुन दक्षिण वनपरिक्षेत्र अधिकारी आर. डी. शेन्डे यांच्या मार्गदर्शनाखाली मृतकाचा पंचनामा करून शव उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यांच्या कुटुंबाला तातडीची मदत म्हणून पन्नास हजार रूपये देण्यात आले आहे.
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments