चामोर्शी. (ता. प्र.). तालुक्यातीलभेंडाळा येथील शेतामध्ये शेंगा तोडत असताना विषारी सापाने दंश केला. उपचारादरम्यान सदर महिलेचा शुक्रवारी, (दि.24) सकाळच्या सुमारास मृत्यू झाला. रोहिणी गणेश वासेकर (38) रा. भेंडाळा असे मृत महिलेचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार रोहिणी वासेकर या गुरुवारी नेहमीप्रमाणे आपल्या शेतात गेल्या.
शेतात शेंगा तोडित असतांना दुपारच्या सुमारास त्यांना विषारी सापाने दंश केला. लागलीच त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय उपचारार्थ हलविण्यात आले. दरम्यान शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अकाली निधनाने वासेकर कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.