PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 28, 2024   

PostImage

आक्षेपार्ह हावभावामुळे रोनाल्डो अडचणीत


 

 

रियाध, वृत्तसंस्था. दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो सौदी प्रो लीगमध्ये प्रेक्षकांना आक्षेपार्ह हावभाव केल्याचा आरोपामुळे अडचणीत सापडला आहे. अहवालानुसार त्याच्या वर्तनाची चौकशी केली जात आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओत रोनाल्डोने आपले कान धरलेले आणि वारंवार हात त्याच्या श्रोणीजवळ फिरवताना दिसत आहे. असे आक्षेपार्ह हावभाव करून रोनाल्डो आपल्या संघ अल नासरचा प्रतिस्पर्धी संघ अल शबाबच्या समर्थकांना चिडवत असल्याचे दिसते. रविवारच्या सामन्यादरम्यान ही घटना घडली ज्यात अल नासरने अल शबाबचा 3-2 असा पराभव केला. व्हिडिओत प्रेक्षकांना 'मेस्सी eep

मेस्सी' म्हणताना ऐकू येत आहे. अर्जेटिनाचा सुपरस्टार लिओनेल मेस्सी हा अनेक दिवसांपासून पोर्तुगीज खेळाडू रोनाल्डोचा प्रतिस्पर्धी आहे. ही घटना टेलिव्हिजन कॅमेऱ्यात कैद झाली नसली तरी 39 वर्षीय रोनाल्डोवर जोरदार टीका होत आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, सौदी अरेबिया फुटबॉल फेडरेशन या घटनेची चौकशी करत आहे. रोनाल्डोवर निलंबनाची कारवाई होऊ शकते. अल नासरचा पुढील सामना गुरुवारी होणार आहे. रोनाल्डो डिसेंबर 2022 मध्ये या सौदी अरेबियाच्या क्लबमध्ये सामील झाला. त्याने आतापर्यंत लीगमध्ये सर्वाधिक 22 गोल केले आहेत. यामध्ये अल शबाबविरुद्ध पहिल्या हाफमध्ये पेनल्टीवर केलेल्या गोलचाही समावेश आहे