PostImage

सुपर फास्ट बातमी

Aug. 8, 2024   

PostImage

एक फोन अन् चहा थेट बांधावर चहावाल्याची राज्यभर चर्चा


 

धाराशिवः धाराशिवच्या ग्रामीण भागातील तेरमध्ये एका चहावाल्याने थेट बांधावरच्या चहाची भन्नाट आयडिया शोधून काढली आहे. एक कॉलवर थेट शेताच्या बांधावर चहा देण्याची ही सेवा पंचक्रोशीत नावाजली आहे. ग्रामीण भागात शेतावर चहा मिळणे दुरापास्तच, पण या चहामुळे अनेकांची तलफ थेट बांधावरच भागवली जात आहे. हा चहासुद्धा एकदम स्वस्त मिळतो. गरमागरम चहा ग्राहकांना अवघ्या ५ रुपयांत मिळतो.

 

धाराशिवच्या तेर येथील महादेव नाना माळी हे गेली २००४ पासून चहाचा व्यवसाय करतात, पण महादेव माळी यांनी हॉटेलात चहा विकणे ही संकल्पनाच बदलून टाकली आहे. तिसरी पास

 

असलेले महादेव माळी दिवसाकाठी दीड ते दोन हजार कप चहा फक्त फोनवर ऑर्डर घेऊन विक्री करतात. थेट शेतकऱ्यांच्या बांधावर चहा पोहचवतात. ऊन, वारा, पाऊस असला तरी ऑर्डर आल्यावर कशाची ही पर्वा न करता शेताच्या बांधावर जाऊन शेतकरी, मजूर, कामगार यांच्यापर्यंत माळी चहा पोहचवण्याचे काम करतात. तीन किलोमीटर परिसरात गरमागरम चहा ते देतात.