बौद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या अधिपत्याखाली देण्यात आले पाहिजे
आष्टी व अधखोडा येथील बौद्ध बांधवांची मागणी
गडचिरोली जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना पाठवले निवेदन
1949 चा ॲक्ट रद्द करा बौद्ध समाज बांधवांची मागणी
आष्टी :- बौद्धगया येथील महाबोधी महाविहराला मुक्तता मिळावी आणि 1949 चा बोधी टेंपल मॅनेजमेंट कमिटी (बीटीएमसी) ॲक्ट रद्द करण्यात यावा अशी मागणी करून भारताचे महामहीम राष्ट्रपती यांच्याकडे आष्टी व अनखोडा येथील बौद्ध बांधवांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले
निवेदनात नमूद केले आहे की, 12 फेब्रुवारी 2025 पासून महाबोधी महाविहारात बौद्ध भिक्षू संघांनी बेमुदत आमरण उपोषणाला बसले असून, त्यासाठी बौद्ध समाज समितीचा पाठींबा आहे, देशात विविध धर्माचे धार्मिक स्थळे आहेत व सर्व धर्मियांचे आप-आपले स्वतःचे ताबे आहेत. जागतिक स्तरावरचे महाबोधी महाविहाराचे बौद्ध धर्मीयांकडे ताबा नसल्याने 1949 चा बिटीएमसी ॲक्ट रद्द करून (कारण त्यात चार बौद्ध तर पाच गैरबौद्ध आहेत) पूर्णपणे ताबा बौद्ध धर्मीयांकडे देऊन व्यवस्थापनाची जबाबदारी बौद्ध भिक्षुंकडे सोपविण्याची एकमुखी मागणी केली आहे.
महाबोधी महाविहाराला जागतिक स्तरावरचा इतिहास असून यूनोस्कोने महाबोधी महाविहाराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे रेंगाळत असलेले व्यवस्थापनाचा जटिल प्रश्न निकाली काढून तात्काळ बौद्धगया येथील महाबोधी महाविहाराचा ताबा बौद्ध धर्मीयांकडे देण्याची मागणीचे निवेदन चामोर्शी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत भारताचे द्रोपदी मुर्मू राष्ट्रपती यांच्याकडे सोपविण्यात आले असून तात्काळ प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन बौद्ध समाज समितीने करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य धर्मप्रकाश कुकुडकर , सत्यफुला डोर्लीकर,उत्तमचंद बारसागडे, मंगलदास चापले,सोमा चांदेकर, कैलाश दुर्गे,धनराज बावने,हंसप्रीत राऊत, मंगला अवथरे,गौतमा फुलझेले,निकीता निमसरकार,सुजाता देव्हारे, वैशाली लेगला,गोपीका कुकुडकर, भीमाबाई निमसरकार,आकांक्षा झाडे,राखी मडावी,वर्षा मेश्राम,संध्या बावणे,साहील साखरकर, वैशाली लाकडे, यांच्या सह बहुसंख्य बौद्ध बांधव उपस्थित होते
दिं. १२ मार्च २०२५
गडचिरोली- शहीद क्रांतीवीर बाबुराव पुल्लेसुर सेडमाके यांच्या १९२व्या जयंतीनिमित्त गोंडीयन धर्मस्थळ, आय.टी.आय. चौक, गडचिरोली येथे भव्य आणि प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गोंडवाना गोटुल बहुउद्देशीय समिती, गोंडवाना महिला बचत गट, राणी दुर्गावती महिला बचत गट आणि जागतिक गोंड सगा मांदी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात शहीद बाबुराव सेडमाके यांच्या प्रतिमेचे पूजन आणि ध्वजारोहणाने करण्यात आली. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी शहीद क्रांतीवीरांना अभिवादन करत त्यांच्या बलिदानाचा गौरव केला.
कार्यक्रमाचे उद्घाटन माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या हस्ते पार पडले. त्यांनी आपल्या भाषणात आदिवासी संस्कृती आणि परंपरेच्या जतनाचे महत्त्व अधोरेखित केले.
"शहीद बाबुराव सेडमाके यांनी संपूर्ण आयुष्य आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी समर्पित केले. त्यांच्या विचारांचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे. समाजाने एकत्र येऊन आपल्या संस्कृतीचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी कटिबद्ध राहिले पाहिजे."
पुढे बोलत डॉ. अशोकजी नेते यांनी आपल्या भाषणात आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या थोर पुरुषांची आठवण करून दिली. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी वीर आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतीसाठी उभारण्यात येणाऱ्या स्मारकांचे महत्त्व अधोरेखित केले. भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा गौरव करताना, या जागेच्या सबंधित विषय मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमास प्रामुख्याने माजी आमदार डॉ. देवरावजी होळी,
माजी जि.प. उपाध्यक्ष मनोहरजी पा. पोरेटी,सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक चरणदासजी पेंदाम,प्रा. डॉ. नरेशजी मडावी,डॉ. निळकंठजी मसराम,नंदकिशोर नैताम,अँड. दिलीपजी मडावी, सदानंदजी ताराम,गोंडवाना गोटुल बहुउद्देशीय समितीचे अध्यक्ष सुरेश किरंगे,सचिव वसंत पेंदराम,उपाध्यक्ष गुलाब मडावी,
हरिभाऊ मडावी,याशिवाय, अनेक आदिवासी नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि महिला बचत गटांच्या प्रमुख सदस्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
या कार्यक्रमाने आदिवासी संस्कृतीच्या संवर्धनाचा ठाम संदेश दिला. सामाजिक एकतेचे प्रतीक म्हणून हा सोहळा प्रेरणादायी ठरला.
शहीद क्रांतीवीर बाबुराव सेडमाके यांच्या स्मृतीला वंदन करत, उपस्थितांनी त्यांच्या विचारांची जपणूक करण्याचा आणि त्यांचे कार्य पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.
बौद्धगया येथील महाबोधी महाविहारला मुक्तता द्या! 'बौद्ध अस्मिता रक्षण समिती' सर्कल येनापुर व बौद्ध समाज बांधवाची मागणी ....
1949 चा ॲक्ट रद्द करा बौद्ध समाज बांधवांची मागणी...
उपविभागीय अधिकारी चामोर्शी यांच्या मार्फत राष्ट्रपतीकडे निवेदन सोपविले ।
चामोर्शी :- बौद्धगया येथील महाबोधी महाविहराला मुक्तता मिळावी आणि 1949 चा बोधी टेंपल मॅनेजमेंट कमिटी (बीटीएमसी) ॲक्ट रद्द करण्यात यावी अशी मागणी करून भारताचे महामहीम राष्ट्रपती यांच्याकडे चामोर्शी उपविभागीय अधिकारी, यांच्या मार्फतीने बौद्ध अस्मिता रक्षण समिती येनापुर व बौद्ध समाज बांधवांनी आज दिनांक 28/02/2025 रोजी उपविभागीय अधिकारी चामोर्शी यांना निवेदन दिले.
निवेदनात नमूद केले आहे की, 12 फेब्रुवारी 2025 पासून महाबोधी महाविहारात बौद्ध भिक्षू संघांनी बेमुदत आमरण उपोषणाला बसले असून, त्यासाठी बौद्ध अस्मिता रक्षण समितीचा पाठींबा आहे, देशात विविध धर्माचे धार्मिक स्थळे आहेत व सर्व धर्मियांचे आप-आपले स्वतःचे ताबा आहेत. जागतिक स्तरावरचे महाबोधी महाविहाराचे बौद्ध धर्मीयांकडे ताबा नसल्याने 1949 चा बिटीएमसी ॲक्ट रद्द करून (कारण त्यात चार बौद्ध तर पाच गैरबौद्ध आहेत) पूर्णपणे ताबा बौद्ध धर्मीयांकडे देऊन व्यवस्थापनाची जबाबदारी बौद्ध भिक्षुंकडे सोपविण्याची एकमुखी मागणी केली आहे.
महाबोधी महाविहाराला जागतिक स्तरावरचा इतिहास असून यूनोस्कोने महाबोधी महाविहाराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे रेंगाळत असलेले व्यवस्थापनाचा जटिल प्रश्न निकाली काढून तात्काळ बौद्धगया येथील महाबोधी महाविहाराचा ताबा बौद्ध धर्मीयांकडे देण्याची मागणीचे निवेदन चामोर्शी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत भारताचे द्रोपदी मुर्मू राष्ट्रपती यांच्याकडे सोपविण्यात आले असून तात्काळ प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलनबौद्ध अस्मिता रक्षण समिती करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन देताना' बौद्ध अस्मिता रक्षण समितीचे अध्यक्ष काजल मेश्राम , उपाध्यक्ष .राजेंद्र रामटेके ,सचिव प्रितम घोनमोडे सचिव, महासचिव सुनिल गोर्वधन, . प्रमोद उमरे संघटक , मंगलदास चापले (प्रवक्ता ) . आनंद गोडबोले प्रवक्ता ,.अँन्ड. दिनेश राऊत सल्लागार . संतोष मेश्राम ,. परीजन दहिवले कोषाध्यक्ष , .संदेश देवतळे सहसचिव ,गिरीधर उंदिरवाडे,.उत्तमचंद बारसागडे पुरुषोत्तम उंदिरवाडे , अंकुश निमसरकार , जितु झाडे , चंद्रशेखर पेटकर ,.रोशन गेडाम .मोरोती अवथरे सौ.शोभाताई कुरखेडे , सौ. रजनी बारसागडे ,सौ. अल्का रामटेके , सौ. योगीता रामटेके , आदीहस बहुसंख्य बौद्ध उपासक व उपासीका बांधव उपस्थित होते.
पोलीस हवालदार मंथनवार यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू
गडचिरोली : कोरची तालुक्यातील गॅरापत्ती पोलिस मदत केंद्रात कार्यरत हवालदार संतोष मंथनवार (वय ४९) यांचे शुक्रवारी (दि. २८) हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
संतोष मंथनवार हे अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील रहिवासी होते. आज सकाळी ते गॅरापत्ती पोलिस मदत केंद्रात कर्तव्यावर होते. साडेनऊ वाजताच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना गॅरापत्ती येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यानंतर धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मंथनवार हे पूर्वी आलापल्ली येथे कार्यरत असताना विविध सामाजिक उपक्रमांमध्ये हिरीरीने भाग घ्यायचे. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
रखडलेले रस्ता बांधकाम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी कंकडालवारांच्या नेतृत्वात आंदोलन.
अहेरी : प्राणहीता पोलीस उपमुख्यालाय ते अहेरी व अहेरी ते वेंकटरावपेठा रस्त्याचे मंजूर काम बऱ्याच काळवाढीपासून रखडलेले आहे.सदरचे काम तात्काळ पूर्ण करण्याच्या मागणीसाठी आविसं, काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात रास्तारोखो आंदोलन केले आहे.
प्राणहिता पोलीस उपमुख्यालाय ते अहेरी व अहेरी ते वेंकटरावपेठा अशा दहा किमी अंतराच्या रस्त्याचे काम मंजूर झाल्यानंतर काही महिन्यांपूर्वी कंत्राटदारांने कामाची सुरुवात करून रस्ता खोदून ठेवलेला आहे.त्यामुळे रहदारी करणाऱ्या नागरिकांना खराब रस्त्यावरून दळणवळण करतांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
संबधित विभाग व अधिकाऱ्यांना सतत निवेदने देऊन रखडलेले रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.मात्र गेली बऱ्याच कालावधीपासून रस्त्याचे काम सुरू करण्यात आले नाही.त्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण करण्यास दिरंगाई करणारे कंत्राटदारांला काळ्या यादीत टाकावे व त्यांच्याकडून पुन्हा कामे सुरू असल्यास त्याची संपूर्ण चौकशी करून दोषीवर कार्यवाही करावी अशी मागणी जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार व आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांनी आंदोलन दरम्यान केली आहे.यापूर्वी कंकडालवार यांनी रस्त्याचे काम तात्काळ सुरु करण्याची मागणी करतांना अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा निवेदनातून दिला होता.
आज जनआंदोलनची रोष बघून समंधित अधिकाऱ्यांनी मा.तहसीलदार साहेबांना भेट घेऊन उद्या पासून काम सुरु करण्यात येईल अशी सांगितले होते.लवकरात लवकर समंधित कामाला सुरुवात होऊन गती न मिळाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याची इशारा सुद्धा त्यावेळी अजय कंकडालवार यांनी दिले आहे.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलन वेळी माजी जि.प.सदस्य सुनीता कुसनाके,अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,सुरेखा आलम,गीता चालूरकार,चायाताई पोरतेट,अशोक रापेल्लीवार,अशोक येलमुले,प्रमोद आत्राम,अज्जू पठाण,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,किशोर दुर्गे परिसरातील समस्त नागरिक तसेच स्थानिक आविसं,काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते,पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संविधान सन्मान महोत्सव : निबंध व प्रश्नमंजुषा स्पर्धांचे आयोजन
मुलचेरा :- नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय, मुलचेरा, वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी अंतर्गत, २४ आणि २५ फेब्रुवारी २०२५ रोजी संविधान सन्मान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाच्या निमित्ताने निबंध स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या, ज्यात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रणजीत मंडल होते. त्यांच्यासोबत डॉ. शनिवारी, डॉ. बाचार, डॉ. वाणी आणि शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते. या विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना संविधानाची महत्ता आणि त्याचे पालन याबाबत जागरूकता वाढवण्याचा उद्देश होता.
निबंध स्पर्धेत अंतिम वर्षाची कुमारी कामेश्वरी मराठे आणि कु. मेरी डिकोंडा यांनी अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय पारितोषिक पटकावले. प्रश्नमंजुषा स्पर्धेत कुमारी स्मिता बाला (प्रथम वर्ष) आणि कुमारी सोनाली मंडळ (तृतीय वर्ष) यांनी क्रमशः प्रथम आणि द्वितीय पारितोषिक मिळवले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध गोष्टींबद्दल आपले ज्ञान प्रदर्शित केले, आणि त्याच्या अभ्यासातून संविधानाच्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पिंपळ शेंडे यांनी केले, आणि प्रास्ताविक डॉ. सचिन शेंडे यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. राय यांनी केले. कार्यक्रमात महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
या संविधान सन्मान महोत्सव चर्चासत्रात विद्यार्थी, शिक्षक आणि महाविद्यालयाच्या संपूर्ण कुटुंबाने संविधानाच्या मूल्यांची पुन्हा एकदा महत्त्वाची ओळख करून घेतली आणि त्याच्या पालनासाठी प्रेरणा मिळवली.
पुणम कुथे "राज्यस्तरीय क्रांतिज्योती आदर्श महिला पुरस्कार-२०२५" ने सन्मानित
देसाईगंज :-
स्वच्छतेचे जनक, थोर समाजसेवी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून बुलढाणा जिल्ह्यातील "पहाट फाऊंडेशन" मार्फत दि.२३ फेब्रुवारी २०२५ रोजी रविवारला वर्धमान जैन भवन, शेगाव येथे "राज्यस्तरीय ग्रामविकास परिषद" आयोजित करण्यात आली होती. ह्या कार्यक्रमात आपल्या महाराष्ट्रातील क्रीडा, समाजसेवा, सांस्कृतिक, शिक्षण, कला,राजकीय, पर्यावरण अश्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेले व्यक्ती उपस्थित होते. त्या सर्वांना त्यांच्या उत्तम कामगिरी बध्दल मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्याचे आयोजक संस्थेने ठरविले होते.
यामध्ये, आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातील पोटगाव येथील रहिवासी, मागील १० वर्षांपासून पूर्व विदर्भातील चारही जिल्ह्यात विविध सामाजिक संस्थेसोबत मिळून, अनेक लहान मोठे समाजपयोगी उपक्रम राबवित असलेल्या, समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवा समाजसेविका - कुमारी.पुनम नानाजी कुथे यांना "राज्यस्तरीय क्रांतिज्योती आदर्श महिला पुरस्कार - २०२५" देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्काराच्या स्वरूपात सन्मानचिन्ह, शॉल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त असलेले भास्कर पेरे पाटील (ग्रा.पं.पाटोदा, छ.संभाजीनगर), श्वेता परदेशी ( मिसेस इंडिया विजेत्या) लातूर, आदी नामवंत व्यक्ती उपस्थित होते.
विषमतेला बाजूला सारत, समतेचा वसा घेऊन, मानवतेसाठी करीत असलेल्या समाजसेवेच्या कार्याला लक्षात घेत, देश -विदेशातील 50 पेक्षा जास्त नावाजलेल्या संस्थांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील विशेष पुरस्कार देऊन कु.पुनम कुथे यांना आजवर सन्मानित केलेले आहे. ह्यामध्ये विशेषतः राज्यस्तरीय आदर्श युवती पुरस्कार, सावित्रिज्योती राज्यस्तरीय पुरस्कार, जिनिअस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, महाराष्ट्र भूषण प्रेरणा पुरस्कार, युथ आयकॉन अवॉर्ड, नॅशनल बेस्ट युथ सोसियल अवॉर्ड, अश्या 50 पेक्षा जास्त जागतिक स्तरांवरील पुरस्कारांवर यांनी आपले नाव कोरून, गडचिरोली जिल्ह्याची व पोटगाव ह्या लहानशा गावची सामाजिक क्षेत्रात एक वेगळीच ओळख, संपूर्ण देशात निर्माण केलेली आहे.
मुलाचा गळा आवळून केला खून व वडीलाने स्वतःलाही संपविले
जळगाव:-
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे मुलाच्या छळाला कंटाळून एका माजी सैनिक वडिलांनी आपल्या मुलाचा गळा दाबून खून केला. यानंतर वडिलांनीही आत्महत्या केली. जळगावातील एरंडोलमध्ये गुरुवारी ही धक्कादायक घटना उघडकीस आली. येथे, वडिलांच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये असे लिहिले होते की त्यांनी त्यांच्या मुलाची हत्या करून त्याला पुरले आहे. तो मुलगा सोशल मीडियावर रील बनवायचा.
मृत वडिलांचे नाव विठ्ठल पाटील (५०) होते, तर मुलाचे नाव हितेश पाटील (२२) होते. माजी सैनिक विठ्ठल पाटील हे मूळचे भावरखेडा (एरंडोल) येथील रहिवासी आहेत. ते त्याच्या कुटुंबासह एरंडोल येथील वृंदावन नगर येथे राहत होते. त्यांचा मुलगा हितेश पाटील रील बनवण्याचे काम करायचा. तथापि, तो त्याच्या वडिलांपासून वेगळा राहत होता. तो त्याच्या वडिलांना छळायचा आणि मारहाणही करायचा असे सांगितले जात आहे. या गोष्टीला कंटाळून विठ्ठल पाटील यांनी त्यांच्या मुलाला मारले आणि नंतर आत्महत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल पाटील यांच्या खिशात एक सुसाईड नोट सापडली आहे. सुसाईड नोटमध्ये लिहिले होते की ते त्यांचा मुलगा हितेशला कंटाळले होते आणि त्याने त्याला भावरखेडा गावाजवळील एका नाल्याजवळ मारले आणि मृतदेह जमिनीत पुरला. गुरुवारी हितेश पाटील यांचा मृतदेह भवरखेडा येथील नाल्यात आढळला. त्याचा मृतदेह तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. हितेश पाटील यांचा मृतदेह ज्या ठिकाणी आढळला तिथून एक दोरीही सापडली आहे. हितेश पाटीलला या दोरीने फाशी देण्यात आली असावी, असा पोलिसांना संशय आहे. सध्या एरंडोल पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
वासल्याने केला पत्नीवर वार व स्वतःलाही केले गंभीर जखमी
आरमोरी:-
तालुक्यापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या कोजबी येथे दिनांक २७/०२/ २०२५ गुरुवार रोजी रात्रीचे अंदाजे १२ वाजताच्या
सुमारास पतीने पत्नीवर वासल्याने वार केला यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली. तर पतीने स्वतःलाही चाकुने भोकसल्याने पती सुद्धा गंभीर जखमी झाला. दोघेही पती पत्नी गंभीर अवस्थेत असल्याने त्यांना गडचिरोली येथील शासकीय रुग्णालयात हलवल्याची
माहिती मिळाली आहे. पत्नीवर वार केलेल्या पतीचे ताराचंद येळमे अंदाजे वय ५५ असे नाव आहे.. सदर घटनेची माहिती कोजबी येथील पोलीस पाटील माधुरी सहारे यांनी पोलीस स्टेशनला दिली पोलीस विभाग यांनी लागलीच घटनास्थळावर दाखल होऊन
घटनेच्या पंचनामा सुरू केला आहे. मात्र पतीने पत्नीवर हा एवढा जीवघेणा हल्ला कोणत्या कारणाने केला हे मात्र अद्याप कळु शकले नाही.
एका नायब तहसीलदाराला स्वतःच्या मुलाला कापी पुरविताना पकडले रंगेहाथ !
अहिल्यानगर :-
बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरवताना चक्क नायब तहसीलदाराला रंगेहाथ पकडण्यात आल्याची घटना अहिल्यानगर पाथर्डी तालुक्यातील परीक्षा केंद्रात घडली
या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. महत्वाचे म्हणजे कॉपी पुरवतानाचा नायब तहसीलदाराचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नायब तहसीलदार अनिल तोडमल यांना बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉपी देताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. बारावी पेपरमध्ये स्वतःच्याच मुलाला नायब तहसीलदार कॉपी पुरवत असल्याची बाब उघड झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तनपूरवाडी परीक्षा केंद्रावर ही घटना घडली. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आता संबंधित नायब तहसीलदारावर नेमकी काय कारवाई होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
डोळ्यात अश्रूंचा पाट वडीलाचे शव घरात, जड अंतःकरणाने ती पोहचली परीक्षा केंद्रात!
एका शेतकरी कन्येवर झाला आघात
कोठारी :- अचानक झालेल्या वडीलाच्या मृत्यूने मुलीच्या डोळ्यात अश्रूंचा पूर वाहत होता तरीही वडीलाचे शव घरात असताना तिने जड अंतःकरणाने बारावीचा पेपर सोडविला ही घटना कोठारी गावात घडली
बारावीचा पेपर असल्याने मुलगी रात्रभर अभ्यास करीत होती वडिलांची तब्येत अचानक बिघडली. बघताबघता विपरीत घडलं वडिलांनी शेवटचा निरोप घेतला. कुटुंबावर फार मोठ्या संकटाच आभाळ कोसळले. दुःख बाजूला ठेवले, वडिलांचा मृतदेह घरी असताना ती परीक्षा केंद्रावर पोहोचली. डोळ्यांत पाणी आणि थरथरत्या हाताने पेपर सोडविला. घरी पोहचली आणि हरबंडा फोडत दाटलेल्या अश्रृंना मोकळी वाट करून दिली. हे दृश्य बघून उपस्थितांचेही डोळे पाणावले.
बल्लारपूर तालुक्यातील कोठारी या गावात गुरुवारी हा वेदनादायी प्रसंग घडला. कोठारी येथील रहिवासी लक्ष्मण विरूटकर त्यांना तीन एकर शेती त्यावरच कुटुंबांचा उदरनिर्वाह चालवायचे. मोठ्या मुलीचे लग्न झाले. एक मुलगी आणि मुलाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. पण बुधवारची रात्र त्यांच्यासाठी काळरात्र ठरली.
मुलीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र राबणारा बाप कायमचा सोडून गेला. कुटुंबावर दुःखाचा अस्मानी डोंगर कोसळले. मुलगी परी हिचा बारावीचा जीवशास्त्राचा पेपर होता. अभ्यास करतानाच तिने वडिलांना अखेरचा श्वास घेताना तिने बघितले होते. वडिलांचा मृतदेह घरी आणि दुसरीकडे बारावीचा पेपर. ती द्विधा मनस्थितीत होती तेव्हा तीच्या आईने तीला हिंमत दिली म्हणून तीने परीक्षा केंद्रावर जाऊन पेपर दिले वडिलांनी जगाचा निरोप घेतला हे दुःख बाजूला ठेवून जड अंतःकरणाने न डगमगता थरथरत्या हाताने पेपर सोडवून पेपर सुटताच ती धावतच घरी पोहचली. वडिलांच्या मृतदेहाजवळ बसून तिने हंबरडा फोडला आणि लेकीचा आक्रोश बघून उपस्थितांचेही मन गहीवरुन आले लक्ष्मण विरूटकर यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. कर्ता वडील गेल्याने आता परीवरच घराची जबाबदारी आली आहे
ट्रकला दुचाकीची धडक, दुचाकीस्वार जागीच ठार
आष्टी मार्गावरील उमरीनजीकची घटना
आष्टी (वा.) कोनसरी वरून आष्टीकडे येणाऱ्या दुचाकीस्वाराने समोरुन येणाऱ्या ट्रकला धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी (दि.27) दुपारी 2 वाजताच्या सुमारास उमरी जवळील जिंनिंग फॅक्टरी जवळ घडली.
अमित एकनाथ चहाकाटे (23) रा. कोनसरी ता. चामोर्शी असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. मृत युवक अमित हा कोनसरी वरुन विठ्ठलवाडाकडे एमएच 33 वाय 5586 क्रमांकाच्या दुचाकीने जात होता. तर आष्टीकडून चामोर्शीकडे जाणाऱ्या एमएच 33 डब्ल्यू 5560 क्रमांकाच्या ट्रकला उमरी गावानजीक जिंनिंगच्याजवळ असलेल्या वळणावर समोरुन धडक दिली. यात त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला. मृतदेह आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात आणून शवविच्छेदनानंतर नातेवाईकांकडे दिला. पुढील तपास आष्टीचे पोलिस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे
बौद्धगया येथील महाबोधी महाविहारला मुक्तता द्या!
1949 चा ॲक्ट रद्द करा अहेरी बौद्ध समाज बांधवांची मागणी
तहसीलदार मार्फत राष्ट्रपती कडे निवेदन सोपविले
अहेरी:- बौद्धगया येथील महाबोधी महाविहराला मुक्तता मिळावी आणि 1949 चा बोधी टेंपल मॅनेजमेंट कमिटी (बीटीएमसी) ॲक्ट रद्द करण्यात यावी अशी मागणी करून भारताचे महामहीम राष्ट्रपती यांच्याकडे अहेरी तहसीलचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांच्या मार्फतीने बौद्ध समाज बांधवांनी गुरुवार 27 फेब्रुवारी रोजी निवेदन दिले.
निवेदनात नमूद केले आहे की, 12 फेब्रुवारी 2025 पासून महाबोधी महाविहारात बौद्ध भिक्षू संघांनी बेमुदत आमरण उपोषणाला बसले असून त्यासाठी आमचाही पाठींबा आहे, देशात विविध धर्माचे धार्मिक स्थळे आहेत व सर्व धर्मियांचे आप-आपले स्वतःचे ताबा आहेत. जागतिक स्तरावरचे महाबोधी महाविहाराचे बौद्ध धर्मीयांकडे ताबा नसल्याने 1949 चा बिटीएमसी ॲक्ट रद्द करून (कारण त्यात चार बौद्ध तर पाच गैरबौद्ध आहेत) पूर्णपणे ताबा बौद्ध धर्मीयांकडे देऊन व्यवस्थापनाची जबाबदारी बौद्ध भिक्षुंकडे सोपविण्याची एकमुखी मागणी केले आहे.
महाबोधी महाविहाराला जागतिक स्तरावरचा इतिहास असून यूनोस्कोने महाबोधी महाविहाराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे रेंगाळत असलेले व्यवस्थापनाचा जटिल प्रश्न निकाली काढून तात्काळ बौद्धगया येथील महाबोधी महाविहाराचा ताबा बौद्ध धर्मीयांकडे देण्याची मागणीचे निवेदन अहेरी तहसीलदार मार्फत भारताचे राष्ट्रपती, देशाचे पंतप्रधान , बिहार राज्याचे राज्यपाल, बिहारचे मुख्यमंत्री यांच्याकडे सोपविण्यात आले असून तात्काळ प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन देताना बोधीसत्व बहुउद्देशीय सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष रतन दुर्गे, ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव सुरेंद्र अलोणे, रामचंद्र ढोलगे , करन दहागावकर, आशिष सूनतकर, प्रकाश दहागावकर, शिवाजी ढोलगे, संदीप ढोलगे, किशोर बुरबुरे, महेंद्र मेश्राम, संजय ओंडरे, रामदास ओंडरे, कपिल झाडे, मलयाजी दुर्गे, कपिल ढोलगे आदी व असंख्य समाज बांधव उपस्थित होते.
नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालयात संविधान महोत्सवाचे आयोजन, संविधानावर व्याख्यान
मुलचेरा – नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय, मुलचेरा येथे संविधान महोत्सवाच्या निमित्ताने विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात संविधानाची महत्त्वपूर्ण माहिती आणि त्याचा इतिहास विद्यार्थ्यांना समजावून सांगितला गेला.
कार्यक्रमात राजे धर्मराव महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. वेस्कडे हे मुख्य वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी संविधानाच्या निर्मितीचा इतिहास, त्यातील मौलिक अधिकार, तसेच विविध अनुच्छेद याबाबत सविस्तर माहिती दिली. संविधान तयार करण्याच्या प्रक्रियेतील महत्वाच्या घटना आणि संविधानाच्या तत्त्वज्ञानावर सखोल चर्चा केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. रणजीत मंडल यांची उपस्थिती होती. त्यांनी संविधानापूर्वी आणि संविधानानंतरची परिस्थिती यावर भाष्य केले. तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान निर्मितीसाठी केलेल्या अविरत कष्ट आणि त्यांचे कौशल्य विशद केले.कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. मंडल, व्याख्याते डॉ. वेस्कडे , डॉ. शनिवारे , डॉ. पिंपळशेडे , डॉ. वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे संचालन पुसतोडे यांनी केले, तर प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन डॉ. सचिन शेंडे यांनी केले. विद्यार्थ्यांना संविधानाच्या महत्वाची आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम समजावून सांगितल्यामुळे या कार्यक्रमाचे महत्त्व अधिक वाढले.
संविधान महोत्सवाच्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना संविधानाची गहन माहिती मिळाली आणि त्यांनी आपल्या देशाच्या संवैधानिक संरचनेबद्दल अधिक जाणून घेतले.
टिसीओसी कालावाधी दरम्यान 02 जहाल माओवाद्यांनी केले गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ समोर आत्मसमर्पण
गडचिरोली:-
शासनाने जाहिर केले होते एकुण 18 लाख रूपयांचे बक्षिस
एक डीव्हीसीएम (Divisional Committee Member) व एकसदस्य पदावरील माओवाद्यांनी केले आत्मसमर्पण
शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 702 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. आज दिनांक 27 फेब्राुवारी 2025 रोजी 01 डी.व्हि.सी.एम. दर्जाच्या वरिष्ठ महिला माओवाद्यासह 01 सदस्य असे एकुण 02 जहाल माओवादी नामे 1) कांता ऊर्फ कांतक्का ऊर्फ मांडी गालु पल्लो, (डी.व्हि.सी.एम सप्लाय टीम), वय 56 वर्षे, रा. गुडंजुर (रिट), ता. भामरागड, जि. गडचिरोली व 2) सुरेश ऊर्फ वारलु ईरपा मज्जी (दलम सदस्य, भामरागड दलम), वय 30 वर्षे, रा. मिळदापल्ली ता. भामरागड, जि. गडचिरोली यांनी गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ समोर आत्मसमर्पण केले.
आत्मसमर्पित जहाल माओवादी सदस्यांबाबत माहिती
1) कांता ऊर्फ कांतक्का ऊर्फ मांडी गालु पल्लो
दलममधील कार्यकाळ
सन 1993 मध्ये मद्देड दलममध्ये भरती होवून 1995 पर्यंत काम केले.
सन 1995 ते 1998 पर्यंत उत्तर गडचिरोलीतील प्लाटुन क्र. 02 मध्ये सदस्य पदावर काम केले.
सन 1998 मध्ये भामरागड दलममध्ये बदली होऊन सन 2001 पर्यंत सदस्य पदावर काम केले.
सन 2001 मध्ये उप-कमांडर पदावर पदोन्नती होऊन पेरमिली दलममध्ये सन 2003 पर्यंत काम केले.
सन 2003 मध्ये चातगाव दलममध्ये बदली होऊन सन 2006 पर्यंत उप-कमांडर पदावर काम केले.
सन 2006 मध्ये एसीएम (Area Committee Member)पदावर पदोन्नती होऊन टिपागड दलममध्ये 2008 पर्यंत काम केले.
सन 2008 मध्ये डिव्हीसीएम (Divisional Committee Member) पदावर पदोन्नती होऊन टिपागड, चातगाव व कसनसुर दलममध्ये केएमएस (क्रांतिकारी महिला संघटन) संघटनेमध्ये 2015 पर्यंत काम केले.
सन 2015 मध्ये माड एरीयामध्ये स्टाफ/सप्लाय टिममध्ये बदली होऊन डिव्हीसीएम पदावर आजपावेतो काम केले.
कांता ऊर्फ कांतक्का ऊर्फ मांडी गालु पल्लो हिच्यावर आजपर्यंत एकुण 11 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 07 चकमक, 01 जाळपोळ व 03 इतर गुन्ह्रांचा समावेश आहे.
2) सुरेश ऊर्फ वारलु ईरपा मज्जी
दलममधील कार्यकाळ
सन 2021 मध्ये भामरागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन माहे सप्टेंबर 2024 पर्यंत काम केले.
माहे सप्टेंबर 2024 मध्ये डिव्हीसीएम राजु वेलादी ऊर्फ कलमसाय (भामरागड दलम) याचा अंगरक्षक म्हणून आजपावेतो काम केले.
सुरेश ऊर्फ वारलु ईरपा मज्जी याच्यावर 01 चकमकीचा गुन्हा दाखल असून इतर गुन्हयांत त्याच्या सहभागाची पडताळणी सुरु आहे.
आत्मसमर्पीत होण्याची कारणे.
गडचिरोली पोलीसांच्या सततच्या गस्तीमुळे जंगलात फिरणे कठिण झाले होते.
नक्षल दलममध्ये अहोरात्र भटकंतीचे जीवन असल्यामुळे स्वत:च्या आरोग्याविषयी समस्या उद्भवल्यास त्याकडे काळजीपुर्वक लक्ष दिल्या जात नाही.
चकमकीदरम्यान पुरुष माओवादी पळून जाण्यात यशस्वी होतात, मात्र महिला यात ठार मारल्या जातात.
खबरी असल्याच्या फक्त संशयावरून आमच्याच बांधवांना ठार मारायला सांगतात.
माओवादी दलममधील जेष्ठ माओवाद्यांकडून स्त्रीयांना भेदभावजनक वागणूक दिली जाते.
दलममधील वरिष्ठ कॅडरचे माओवादी सांगतात की, चळवळीकरीता/जनतेकरीता पैसे गोळा करावे. प्रत्यक्षात गोळा केलेला पैसा ते स्वत:साठीच वापरतात. जनतेच्या विकासासाठी हा पैसा कधीच वापरल्या जात नाही.
वरिष्ठ माओवादी नेते फक्त स्वत:च्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक-युवतींचा वापर करून घेतात.
महाराष्ट्र शासनाने कांता ऊर्फ कांतक्का ऊर्फ मांडी गालु पल्लो हिच्यावर 16 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते
महाराष्ट्र शासनाने सुरेश ऊर्फ वारलु ईरपा मज्जी याच्यावर 02 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होत
टेम्पोत घुसवून सासुला जीवंत जाळून,जावयाने स्वतःलाही टाकले जाळून
मुंबई : मुंबईच्या मुलुंड भागातून हादरवणारी बातमी समोर आल आहे. मुलुंडमध्ये जावयाने सासूला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली. यानंतर आरोपीने स्वतःलाही पेटवून दिले. १० वर्षांपूर्वी झालेल्या घटस्फोटासाठी सासूला जबाबदार धरत जावयाने तिला जिवंत जाळून आपला राग व्यक्त केला. सुरुवातीला पोलिसांना हा आत्महत्येचा प्रकार वाटला होता. मात्र चौकशीनंतर जावयानेच सासूची हत्या करुन स्वतःला पेटवून घेतल्याचे समोर आले. पोलिसांनी याप्रकरणाची नोंद करुन तपास सुरु केला आहे.
मुंबईच्या मुलुंड भागातील नाणेपाडा परिसरात १० वर्षांपूर्वी झालेल्या घटस्फोटाचा राग मनात धरून जावयाने आपल्या सासूला जिवंत जाळल्याची भयंकर घटना घडली. आरोपीने सासूला टेम्पोमध्ये कोंडले आणि तिच्यावर क्रूरपणे हल्ला करुन गाडी पेटवून दिली. या आगीत सासू आणि आरोपी जावई दोघांचाही मृत्यू झाला. नवघर पोलिसांनी मृत जावयाविरुद्ध खून आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसाना सुरुवातीच्या तपासात ही आत्महत्या वाटत होती. मात्र नंतर सासूमुळे घटस्फोट झाल्याचा रागातून त्याने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.
आरोपीचे नाव कृष्णा दाजी अष्टनकर (५६) असून मृत सासूचे नाव बाबी दाजी उसरे (७२) होते. दोघांमध्ये बऱ्याच काळापासून भांडण होते. बाबी उसरे या मुलुंड पूर्वेकडील नाणेपाडा येथे त्यांच्या घटस्फोटीत मुलगी आणि २२ वर्षांच्या नातवासह राहत होत्या. टेम्पो ड्रायव्हर असलेला कृष्णा गेल्या ७-८ वर्षांपासून त्याच्या पत्नी आणि मुलांपासून वेगळा राहत होता. त्याला दारूचे व्यसन होतं आणि त्याच्या टेम्पोमध्येच राहत होता.
बाबी उसरे यांनी पत्नीला मला सोडून द्यायला सांगितले असे कृष्णाला वाटते होते. त्यामुळे त्यांच्यात वारंवार वाद होत होता. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास कृष्णा उसरेंच्या घरी गेला आणि बाबी उसरे यांना रुग्णालयात घेऊन जातो असे सांगितले. तो अनेकदा त्यांच्या घरी जात होता त्यामुळे बाबी उसरे विश्वास ठेवून त्याच्यासोबत टेम्पोत बसल्या. त्याने घरापासून काही अंतरावर टेम्पो पार्क केला आणि त्याचे शटर ओढून घेत आतून कुलूप लावले. यानंतर त्याने बाबी उसरे यांच्या डोक्यात हातोड्याने वार करुन त्यांना बेशुद्ध केले.
वनौषधी आणायला जंगलात गेलेल्या इसमाचा वाघाने पाडला फडशा
चंद्रपूर : वनौषधी
आणायला जंगलात गेलेल्या इसमाचा वाघाने फडशा पाड्ल्याची घटना दि २६ ला उघडकीस आली. शामराव मगाम हे वनौषधी आण्याकरिता सिंदेवाही वन परिक्षेत्रातील सिंदेवाही नियत क्षेत्र उपवन परिक्षेत्रातील कारगटा जंगलात गेले असता, अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार केले.
शामराव अर्जुन मगम, जटलापूर (बाडा) असे मृताचे नाव असून, २५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता ते जंगलात गेले होते. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता त्यांचे प्रेत जंगलात मिळाले. पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आली.
पंचनामा करताना वन परिक्षेत्र अधिकारी विशाल साळकर, सिंदेवाहीचे क्षेत्र सहाय्यक नितीन गडपायले, वनरक्षक आर. व्ही. धनविजय, वनरक्षक स्वप्नील चौधरी यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे पाठविले.
मृताच्या कुटुंबीयांना वनविभागाकडून २५ हजार रुपयांची तात्काळ मदत देण्यात आली आहे. असून उर्वरित मदत २५ लाख रुपये असेल. अशी माहिती क्षेत्र सहाय्यक नितीन गडपायले यांनी दिली आहे
बुध्दगया येथील महाबोधी बुध्दविहारासाठी गडचिरोलीत 1 मार्चला धरणे आंदोलन
गडचिरोली दि.27: बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी बुद्धगया येथे सुरू असलेल्या पूज्य बौद्ध भिक्षूंच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी गडचिरोली येथे भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वात विविध आंबेडकरी व सामाजिक संघटनांच्या सहभागातून दिनांक 1 मार्च ला धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
देशातील विविध धार्मिक स्थळे त्या त्या धार्मिक संस्थांच्या ताब्यात देण्यात आलेली असून बुद्धगया येथील महाबोधी बुद्ध विहार हे अजूनही बौद्धांच्या ताब्यात देण्यात आले नाही. याकरिता गेली 50 पेक्षाही अधिक वर्षापासून भारतातील बौद्ध समाज आणि पूज्य बौद्ध भिक्षू यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन चालवलेले आहे. तरीही अजूनही शासनाने सदर महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात दिलेले नाही. ही अत्यंत चुकीची व संपूर्ण भारतातील बौद्धांवर अन्याय करणारी बाब आहे.
सदर महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, या मागणीसाठी भारतातील पूज्य बौद्ध भिक्षुनी गेली 12 फेब्रुवारी 2025 पासून बुद्धगया येथे भव्य असे आंदोलन सुरू केले असून सदर आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी गडचिरोली येथे दिनांक 1 मार्च 2025 ला भारतीय बौद्ध महासभा जिल्हा गडचिरोली यांचे नेतृत्वात विविध आंबेडकरी व सामाजिक संघटनांच्या सहभागातून भव्य धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
सदर धरणे आंदोलनात भारतीय संविधान व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आणि बौद्ध धम्मावर श्रद्धा असणाऱ्या सर्वांनी न चुकता दुपारी 11.30 वा. उपस्थित रहावे असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा जिल्हा गडचिरोली, संविधान फाउंडेशन जिल्हा गडचिरोली, सम्यक समाज समिती गोकुळ नगर गडचिरोली, पंचशील बौद्ध समाज मंडळ रामनगर गडचिरोली, प्रबुद्ध बुद्ध विहार विवेकानंद नगर गडचिरोली, प्रबुद्ध विचार मंच गडचिरोली, विशाखा महिला मंडळ गोकुळ नगर, बौद्ध समाज मंडळ नवेगाव, कॉम्प्लेक्स, इंदिरानगर, साईनगर, स्नेहनगर, फुले वार्ड, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक , गणेश कॉलनी, फुले वार्ड, विसापूर कॉम्प्लेक्स, कोटगल, त्रिशरण महिला मंडळ रामनगर, संबोधी बुद्ध विहार समिती गडचिरोली आदींच्या वतीने करण्यात येत आहे.
खूदीरामपली येथे नव निर्मित मार्कंडेश्वर देवस्थान यात्रा शुभारंभ, नवा किर्तन सभा मंडपाचे लोकार्पण
खूदीरामपली: 26 फेब्रुवारी 2025 रोजी खूदीरामपली येथील नव निर्मित मार्कंडेश्वर देवस्थानच्या यात्रेचा शुभारंभ उत्साहात पार पडला. या विशेष प्रसंगी, नवा किर्तन सभा मंडपाचे लोकार्पण सोहळा भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर)यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस ( श.प.गट)विभागीय अध्यक्ष शाहीन ताई हकीम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला
या सोहळ्याला मान्यवरांचा मोठा प्रतिसाद मिळाला. उपस्थितांमध्ये प्राचार्य निखुले सर माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञान कुमारी कौशी, संध्याताई मुगमोडे, गोबाटे ताई, माधुरीताई गोरकर, जयश्रीताई चिल्लरवार यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष हरिपद दास, सचिव बिजय विश्वास, कोषाध्यक्ष परेस विश्वास, उपाध्यक्ष प्रदीप मोहनदास आणि सहसचिव मनोज दास उपस्थित होते
लोकार्पण सोहळ्यात भाग्यश्रीताई आत्राम आणि शाहीनताई हकीम यांनी विशेष योगदान दिले, ज्यामध्ये नाम कीर्तन सभा मंडपाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी प्रदान केला. यामुळे या धार्मिक प्रकल्पाच्या पुन्हा एकदा महत्त्वाला वाव मिळाला आहे
मार्कंडेश्वर देवस्थानाच्या या नवनिर्मित सुविधेने स्थानिक आणि परिसरातील भक्तांना आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध करण्याची संधी दिली आहे. देवस्थानच्या यात्रेचा आरंभ अनेक भक्तांसाठी एक पवित्र आणि उत्साही क्षण ठरला
नवीन किर्तन सभा मंडपाच्या लोकार्पणाने स्थानिक समाजाच्या एकजुटीला आणखी बल मिळाला आहे. ही इमारत भक्तांची विविध धार्मिक उपासना आणि कीर्तनांसाठी वापरली जाणार आहे, जेणेकरून संप्रदायाच्या सर्व अनुयायांसाठी अधिक जागा आणि सुवधता उपलब्ध होईल
ही यात्रा आणि लोकार्पण सोहळा सुंदरतेने पार पडला आणि सर्व उपस्थितांनी यावेळी देवाच्या आशीर्वादांची प्राप्ती केली
मार्कंडा देव येथील वैनगंगा नदीत बुडून एका युवकाचा मृत्यू,
तर दोन जणांना वाचवण्यात यश
चामोर्शी :- मार्कंडा देव येथील महाशिवरात्री यात्रेनिमित्त आलेले 3 युवक वैनगंगा नदीपात्रात आंघोळीला गेले असता नदीत बुडून एका युवकाचा मृत्यू झाला तर दोघांना वाचवण्यात यश आले .
सदर घटना ही दिनांक 26 फेब्रुवारी 2025 ला दुपारी 12.30 दरम्यान घडली . सविस्तर असे की , अभिषेक संतोष मेश्राम वय 24 वर्षे , जितू राजेश्वर दुर्गे वय 20 वर्षे , खुशाल सुखराम सोनवने वय 18 वर्षे हे तीघेही रा. महाकाली वार्ड , लक्ष्मी बजाज शोरूम समोर चंद्रपूर, जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी आहेत . हे तिन्ही युवक यात्रेनिमित्त मार्कंडादेव येथे महाशिवरात्री यात्रेला आले होते आणि ते आंघोळीला राखीव क्षेत्र ठेवलेल्या भागात आंघोळ न करता दुसऱ्या बाजूला आंघोळीला गेले परंतु त्यांना पाण्याचा खोलीचा अंदाज आला नाही व अभिषेक संतोष मेश्राम वय 24 वर्षे याचा नदीत बुडून मृत्यू झाला . तर इतर लोकांच्या प्रयत्नांमुळे दोन युवकांना वाचविण्यात यश आले . सदर माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अतुल कातबाने आणि इतर पोलीस पथकांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन मृतकाला शवविच्छेदन साठी ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे पाठवण्यात आले .