PostImage

सुपर फास्ट बातमी

Aug. 20, 2024   

PostImage

घाबरणे म्हणजे काय ?


 

भय आणि प्राणीमात्र यांचा सोबतच जन्म झाला असावा. या भयामुळेच प्राणीमात्राने बचावाचे रस्ते शोधून काढले. तरी सुद्धा आज मानव भयभीत असतोच. तमाम दुनियेला नष्ट करु शकणारी आयुधं शोधणारा मानव त्यांच्या परिणामाच्या कल्पनेने भयभीत आहे. विश्वात कुठलाही जीवधारी भयमुक्त नाही. भीतीचे दोन प्रकार आहेत. १) सार्थक २) निरर्थक भिती.

 

सापावर पाय पडल्यावर वाटणारी भीती ही सार्थक भीती. कारण साप विषारी असतो. त्याच्या दंशाने माणूस मरु शकतो; पणअंधारात दोरीवर पाय पडला तर साप समजून घाबरणे ही निरर्थक भीती आहे. काही माणसे अशी असतात की जी गर्दीला घाबरतात. अशी माणसे गर्दीत जाणे टाळतात. गेलीच तर घाबरतात. घाम फुटतो. कधी एकदा बाहेर पडतो असे होते. या भीतीला शास्त्रीय भाषेत 'एगोरेफोबिया' वा 'कालस्ट्रोफालिगमा (निवृत्त स्थान भीती) असे म्हणतात. दुसऱ्या त-हेची भीती या विरुद्धअसते. ही माणसे एकटेपणाला घाबरतात. त्यांना गर्दीची ठिकाणे आवडतात. एकटेपणाच्या भीतीला 'क्लॅस्ट्रोफोबिया'असे म्हणतात.