PostImage

Bahujnancha Buland Aawaj

June 6, 2024   

PostImage

वैदर्भीय जनतेने भाजपाला का झिडकारलं ? आत्मचिंतन करणे गरजेचे


2024 सालातील लोकसभेची निवडणूक भारतीय जनता पक्षाला आत्मचिंतन करण्याला भाग पडलेली आहे,आणि तेही खास विदर्भाची.आजपर्यंत विदर्भातील जनता भारतीय जनता पक्षाला भरभरून मतदान करताना दिसून येत होती परंतु 2024 साली वैदर्भीय जनतेने भाजपाला का झिडकारलं ? भाजपापासून का दूर गेली ? हा एक न उघडणारा कोड आहे.आज याची प्रचिती भाजपाला आलेली आहे पण वेळ आजच्या घडीला कोसोदूर गेलेले आहे.

भारतीय जनता पक्षाने आज पर्यंत विदर्भातील जनतेची घोर उपेक्षा केली.विदर्भातील शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळाला नाही ,सुशिक्षित बेरोजगाराच्या हाताला काम दिलं नाही,कामगार लोकांच्या हाताला काम शिल्लक राहिलं नाही आणि महत्त्वाचे विषय म्हणजे सतत वाढणारे महागाई आणि भारनियमनाच्या विळख्यात सापडलेला विदर्भाचा शेतकरी.

या वरील सर्व बाबींकडे सरकारने विदर्भाला सावत्रपणाची वागणूक दिली. विदर्भातील जनतेने आज पर्यंत भाजपावर विश्वास दाखवून भरभरून मदत करताना दिसत होती परंतु वेळोवेळी वैदर्भीय जनतेची घोर निराशास झाली.सहन करण्याची मर्यादा असते आणि आता ती संपली होती.ज्या पक्षाला वैदर्भीय जनतेने भरभरून दिलं तो पक्ष धनधाडग्यांच्या झाला,ही गोष्ट वैदर्भातील जनतेच्या पचनी पडलेली नाही.असंतोष उफाळून आला आणि जनतेच्या मनातील आक्रोश मतपेटींच्या रूपाने जनतेने दाखवून दिला.विरोधी पक्षांना नामी संधी मिळाली त्याचे त्यांनी सोनं केलं.

विदर्भातील जनतेने केलेला त्या भाजपाला आत्ताच ओळखणे गरजेचे आहे कारण अजूनही वेळ गेलेली नाही निवडणूक येतात जातात परंतु वेळीस सावध व्हा कारण विदर्भातील जनता गरीब आहे भोळी आहे त्यांच्यात निरंतर विचार करण्याची क्षमता आहे आणि असंच जर चालत राहिलं तर पुढे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा धोक्याची घंटा वाजू शकते आणि जनतेने दिलेला कौल राजकारण्यांना मान्य करावेच लागेल नाहीतर पश्चातापाशिवाय दुसरा काहीच हाती लागणार नाही परंतु आजच्या घडीला भाजपाला  विदर्भा विषयी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे.


PostImage

Chunnilal kudwe

Aug. 27, 2023   

PostImage

श्री संत जगनाडे महाराज यांच्या जिवण चरित्र विषयी नाट्या प्रयोगा …


विदर्भ तेली समाजाच्या वतीने चंद्रपूर येथे दिनांक ०९ सप्टेंबर २३ ला श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवन चारित्र्यावर आधारित होत असणाऱ्या नाट्यप्रयोगाविषयी सभा रविवार दिनांक २७ ऑगस्ट ला चिमूर येथील विश्राम गृह येथे घेण्यात आली. 

यावेळी डॉ. विश्वास झाडे चंद्रपूर, सोनल भरडकर घुग्गुस , अभय घटे चंद्रपूर, दिनेश बोरपे घुग्गुस, निलेश लांजेवार घुग्गुस, तालुका अध्यक्ष तेली समाज ईश्वर डुकरे, सहसचिव पितांबर पिसे, उपाध्यक्ष विलास बंडे , धनराज वंजारी, भास्कर बावनकर, अशोक चौधरी शंकरपूर तेली समाज अध्यक्ष, कवडू लोहकरे , अंकुश मेहरकुरे , दीपक रेवतकर, तेली समाज संघटक माधुरी दीपक रेवतकर, वैभव दांडेकर, रुपेश करकाडे, राकेश बावनकर आदी उपस्थित होते.