PostImage

सुपर फास्ट बातमी

Nov. 13, 2024   

PostImage

वैरागड येथील तरूणाने घेतला गळफास


 आरमोरी:

 तालुक्यापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या वैरागड येथे मास्तर कॉलनी येथे गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केल्याची घटना दिनांक 13 -- 2024 बुधवार ला सकाळी 8-30 वाजेच्या दरम्यान उघडकीस आली . मनीष ऊर्फ मुन्ना शंकर खोब्रागडे वय 38 वर्ष असे गळफास घेवून आत्महत्या केलेले युवकाचे नाव आहे .

 

 

मिळालेल्या माहितीनुसार आरमोरी तालुक्यातील काही किलोमीटर अंतरावर असलेल्या वैरागड येथे मास्तर कॉलनीमध्ये मनीष खोब्रागडे आपल्या परिवारासमेत राहत होता मात्र दिनांक 12 -11 -2 2024 मंगळवारच्या रात्री जेवण करून तो आपल्या घरी झोपी गेला होता. 13 -- 2024 ला कुटुंब सकाळी झोपेतून उठल्यानंतर खोलीमध्ये बघितले असता. तो झोपलेल्या रूममध्ये दिसला नाही .म्हणून घरच्यांनी खालच्या मजल्याच्या वरती असलेल्या रूम कडे जाऊन बघितले असता त्यांना मनीष हा खोलीच्या आड्याला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये दिसला. घरच्यांनी लगेच आरमोरी पोलिसांना घटनेची माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळावर दाखल होऊन घटनेचा पंचनामा करून उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे मृतकाचे शव पाठविले .मनीष हा एकांतामध्ये राहत होता आणि त्याचे राज्यशास्त्रीय विषयांमध्ये M .A .पर्यंत शिक्षण पूर्ण झाले होते आणि त्याला रोजगार नसल्याने नैराश्यपोटी टोकाचे पाऊल उचलले असावे अंदाज जनमानसाकडून वर्तवण्यात येत आहे.

मृतक मनीष यांच्या पश्चात तीन भाऊ आई वडील वहिनी दोन भाऊ सुना असा बराच मोठा आप्तपरिवार आहे .घटनेचा तपास पोलीस निरीक्षक गवते यांच्या मार्गदर्शनात पीएसआय दिलीप मोहुरले पोलीस हवालदार छंदक रामटेके पोलीस हवालदार वेस्कडे हे करीत आहेत .परिवारातील सुशिक्षित कर्तबगार तरुण गळफास घेऊन मृत पावल्याने परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे गाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Nov. 9, 2024   

PostImage

Vairagd news: दारूविक्रेत्यांनंतर गुटखा व्यावसायिकांवर कारवाई ,आरमोरी पोलिसांची धडक मोहीम …


 

 

वैरागड, (वा.). आरमोरी तालुक्यातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या वैरागडसह परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध धंद्याना ऊत आले आहे. दारूविक्रीसह इतर अवैध धंद्यांना या भागात जोम चढला असताना आरमोरी पोलिसांनी दारूविक्रेत्यांवर धडक कारवाई करीत दारूविक्रीवर काही प्रमाणात अंकुश लावले आहे. अशातच शुक्रवारी (दि. 8) आरमोरी पोलिसांनी वैरागड येथील पानटपरीवर धाड टाकून गुटखा विक्रेत्यांवर कारवाई केली. आरमोरी पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

 

वैरागडसह परिसरात दारूविक्रीसोबतच गुटखा विक्रीचे प्रमाण वाढले आहे वयस्का पासून महिला, लहान मुलेही गुटखा, खरांच्या आहारी गेले आहेत. यावर उपाय म्हणून आरमोरी पोलिसांनी शुक्रवारी गावातील प्रत्येक पानटपरीवर धाड टाकत सुपारी, तंबाखू (इंगल) आणि इतर साहित्य जप्त करीत संबंधितावर दंडात्मक कारवाई केली. त्याचप्रमाणे गावातील किराणा दुकानांमध्ये तंबाखू विक्रीबाबत चौकशी करण्यात आली. तंबाखू, गुटखा विक्रेत्यांविरोधातील या धडक कारवाईमुळे पानटपरी चालकांचे धाबे दणाणले असून गावातील अनेक पानटपऱ्या या कारवाईमुळे बंद ठेवण्यात येत आहेत. येथील ग्रामीण परिसर शेती, मजुरी आणि व्यवसायावर अवलंबून आहे. यावरच नागरिकांचा उदरनिर्वाह चालत असते. पानटपरीच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब व्यावसायिक पोलिस विभागाच्या या कारवाईमुळे हतबल झाले आहेत. शासन, प्रशासनाने छोट्या व्यावसायिकांवर कारवाई करण्यापेक्षा तंबाखू बनविणाऱ्या कंपन्यावर कारवाई करावी, अशी मागणी पानटपरी व्यावसायिकांकडून होत आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Oct. 24, 2024   

PostImage

ट्रकची दुचाकीला धडक; सरपंच गंभीर कढोली-वैरागड मार्गावरील घटना


कढोली, (वा.). दुचाकीस्वार सरपंच यांच्या दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि. 23) कढोली- वैरागड मार्गावरील सती नदीच्या पुलाजवळ घडली. अविनाश टेकम (37, रा. सावलखेडा, ता. कुरखेडा) असे जखमी सरपंचाचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार, सरपंच अविनाश टेकाम हे आपल्या दुचाकीने काही कामानिमित्त कढोली येथे आले होते.

 

काम आटोपून ते आपल्या स्वगावी कराडीला जात होते. दरम्यान, कढोली-वैरागड मार्गावरील सती नदीपुलावर दोन ट्रकांच्या मध्ये त्यांची दुचाकी आल्याने एका ट्रकचा हुक त्यांच्या दुचाकीला लागताच ते दुचाकीसह खाली कोसळले. घटनेची माहिती शेतावरून काम करून परत येत असलेल्या महिलांनी कढोलीचे माजी सरपंच चंद्रकांत चौके यांच्यासह पदाधिका-यांना दिली. त्यांनी घटनास्थळ गाठून जखमी सरपंचास उपचाराकरीता कढोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र तेथे एकही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हता. त्यानंतर सोनसरी येथील डॉ. विवेक आकरे यांनी जखमी सरपंचावर उपचार केले.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Sept. 15, 2024   

PostImage

शेतकऱ्यांचा 'घास' हत्तींनी हिरावला; कळप वैरागडात


 

वैरागड : कुरखेडा तालुक्याच्या सीमेलगत ठाण मांडून बसलेल्या रानटी हत्तींनी चार दिवसांपूर्वी आरमोरी तालुक्याकडे मोर्चा वळवला. पळसगाव, पाथरगोटा, कराडी जंगलातून हत्ती वैरागडच्या चुनबोडी परिसरात दाखल झाले आहेत. हत्तींनी पिकांमध्ये धुडगूस घालण्यास सुरुवात केल्याने येथील शेतकरी धास्तावले आहेत.

रानटी हत्तींचा कळप १३ सप्टेंबरला कराडीच्या डोंगरीच्या आसपास होता. त्यानंतर हा कळप कराडीच्या जंगलातून लगतच्या चुनबोडीच्या जंगलात आला. या भागातील शेतातील धानपिकांची नासधूस हत्ती करीत आहेत. हत्तीपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी वनविभागाने ठोस उपाययोजना कराव्या व हत्तींचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वैरागड येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

 

मोका पंचनामे करणार

 रानटी हत्तींमुळे ज्या शेतकऱ्यांच्या धानपिकांची नासधूस झाली आहे. त्या शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष पोहोचून मोका पंचनामे करून वनविभागातर्फे नुकसानभरपाई दिली जाईल, अशीमाहिती वनरक्षक सचिन शेडमाके यांनी दिली.