PostImage

सुपर फास्ट बातमी

Nov. 15, 2024   

PostImage

Vairagad news: बँकांसमोरील वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा रस्त्यावर वाहने : पार्किंगची …


 

वैरागड : येथील बँक ऑफ इंडिया व को-ऑपरेटिव्ह बँकेत येणाऱ्या खातेदारांची वाहने ठेवण्यासाठी पार्किंग व्यवस्था नसल्याने खातेदार बँकेच्या समोर रस्त्याच्या कडेला आपली वाहने उभी ठेवतात. या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

 

को-ऑपरेटिव्ह बँकेची स्वतःची सुसज्ज इमारत आहे. बँक ऑफ इंडिया भाडेतत्त्वावर घेतलेल्या एका इमारतीमध्ये आहे; पण या दोन्ही बँकेच्या इमारतींसमोर पार्किंग व्यवस्था नाही. या दोन्ही बँकेत येणारे खातेदार बँकेसमोर रस्त्यालगत आपली वाहने उभी ठेवतात. परिणामी, चारचाकी वाहनांना रस्ता पार करता येत नाही. या दोन्ही बँका मुख्य रस्त्यावर आहेत. या रस्त्यांवर वाहतुकीची वर्दळ असते त्यात या वाहनांची गर्दी राहतअसल्याने अनेकदा वाहतुकीची कोंडी निर्माण होते.

 

गावातील मुख्य रस्ते आधीच अरुंद असून, अनेकांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. रस्त्याच्या दुतर्फा असल्या सार्वजनिक नाल्यावर काही लोक बांधकाम करीत आहेत; पण ग्राम पंचायतचे अधिकारी, पदाधिकारी काही कारवाई करण्यास तयार नाही. स्थानिक प्रशासनाचा अतिक्रमणाबाबत कोणताही धाक नसल्याने गावाचे स्वरूप बकाल झाले आहे. रस्त्यावर शेतीचे साहित्य ठेवणे, गुरे बांधणे, अडगळीत पडलेले साहित्य ठेवणे या प्रकारामुळे गावातील अंतर्गतरस्त्यांचीदेखील दुरवस्था झाली आहे. वैरागड येथील दोन्ही बँकांना आपल्या खातेदारांसाठी पार्किंग व्यवस्था करावी तसेच ग्रामपंचायतीने गावातील अंतर्गत रस्त्यावर होणारे अतिक्रमण हटवावे, अशी मागणी आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Aug. 30, 2024   

PostImage

कढोली- मानापुर वळणावरील बोरवेल दोन महिन्यापासून बंद


कढोली- मानापुर वळणावरील बोरवेल दोन महिन्यापासून बंद वैरागड (वार्ता) येथील कढोली मानापूर वडणावर असलेला बोअरवेल मागील दोन महिन्यापासून बंद असल्याने परिसरात असलेले लहान- मोठ्या व्यवसायिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. याबाबत स्थानिक प्रशासनाला अर्ज देऊन देखील अजूनही या बोरवेलची दुरुस्ती झाली नाही. या वडणावर जड वाहनधारक सुद्धा थांबतात न त्यांना सुद्धा या पाण्याचा उपयोग होतो तरी हा बोरवेल त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी चिंतामण बावनकर व  परिसरातील हॉटेल व्यवसायिकाची मागणी आहे. 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Aug. 23, 2024   

PostImage

वैरागड: बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार


 

वैरागड जंगल परिसरातील घटना

वैरागड : सकाळच्या सुमारास गुरांच्या कळपासोबत जंगलात चराईसाठी गेलेल्या एका गायीवर जंगलात दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना २० ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास वैरागड येथील चुनबोडी परिसरात घडली. सुरेश मुखरू आकरे असे पशुपालकाचे नाव आहे.

 

नेहमीप्रमाणे सुरेश आकरे यांनी आपल्या मालकीची गाय चराईसाठी गुरांच्या कळपात सोडली. दिवसभर गुरे चराई केल्यानंतर सायंकाळच्या सुमारास परतीच्या मार्गावर असलेल्या गायीवर झुडपी जंगलात दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. यात गाय जागीच ठार झाली. दरम्यान, गुरांच्या कळपासोबत गाय न आल्याने पशुपालक आकरे यांनी गावाशेजारी गायीची शोधाशोध

 

केली. मात्र, गाय कुठेच दिसून आली नाही. दुसऱ्या दिवशी वैरागडपासून काही अंतरावर असलेल्या चुनबोडी जंगल परिसरात गाय मृतअवस्थेत आढळून आली. याबाबतची माहिती वनविभागाला देण्यात आली. त्यानुसार वैरागडचे क्षेत्र साहाय्यक कालिदास पिल्लारे, वनरक्षक सचिन शेडमाके यांनी मोका चौकशी करून पंचनामा केला. यात पशुपालकाचे मोठे नुकसान झाले असून त्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी पशुपालक सुरेश आकरे यांनी केली आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Aug. 1, 2024   

PostImage

वैरागड: खोब्रागडी नदीमध्ये वाहून आला अनोळखी मृतदेह


 

 

  आरमोरी : तालुक्याच्या वैरागडजवळच्या खोब्रागडी नदीपात्रातील एका झाडाच्या बुडाला अनोळखी अंदाजे ४५ वर्षे वयाच्या पुरुषाचा मृतदेह आढळला. पुराच्या पाण्यात मृतदेह वाहून आल्याचा संशय आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली.

 

 

 

वैरागड येथील शेतकरी आपल्या शेत परिसरात शेतीची कामे करीत असताना नदीपात्रात काही कामानिमित्त गेले असता त्यांना खोब्रागडी नदीपात्रातील एका झाडावर मृत अवस्थेत अनोळखी इसमाचे शव

 

 

 

अडकलेले दिसून आले. वेळीच या घटनेची माहिती आरमोरी पोलिस स्टेशनला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून शव गावकऱ्यांच्या मदतीने झाडावरून नदी काठावर काढले. विशेष म्हणजे, मृत व्यक्तीच्या अंगावर कुठलेही कपडे नव्हते. बहुतांश अवयव सडलेल्या स्थितीत दिसून आले. पोलिसांनी या इसमाबाबत विचारणा केली असता गावकऱ्यांनी या इसमाला ओळखत नसल्याचे सांगितले. त्यामुळे सदर इसम वाहून आले असावे, असा अंदाज आहे. आरमोरी ठाण्याचे पोलिस अधिक तपास करीत आहेत


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 27, 2024   

PostImage

वैरागड वासियांची ग्रामपंचायतीवर धडक


वैरागड:  मेंढेबोडी, पाठणवाडा गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या वैरागड ग्रामपंचायतीमध्ये भरमसाठ वाढीव घरकर करण्यात आले. वाढीव घरकर कमी करण्यासाठी शेकडो नागरिकांनी ग्रामपंचायतीवर धडक देऊन वैरागड ग्रामपंचायतीमध्ये निवेदन सादर केले.

सुरवातीला ग्रामपंचायत मार्फत १०० रुपये घरकर होता. सन- २०२२-२३ मध्ये कर वाढवून १५०० रुपये करण्यात आला. महानगर पालिका मुंबई येथील घरकर पेक्षा वैरागड येथील घरकर अवाढव्य वाढविण्यात आलेला आहे. घरकर समविचारपूर्वक नागरिक देऊ शकेल असा लावावा अशी मागणी वैरागड येथील नागरीकांनी केली.

 ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी ग्राम सभेत किंव्हा गावात कोणतीही माहिती न देता अवाढव्य घरकर वाढविले आहे

 

नागरिकांची आर्थिक परिस्थिती पाहून घराची योग्य चौकशी करून घरकर आकारणी करण्यात यावी अशी मागणी वैरागड, मेंढेबोडी आणि पाठणवाडा येथील नागरिकांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.