PostImage

Chunnilal kudwe

Sept. 24, 2023   

PostImage

Sport -सरस्वती कन्या विद्यालयांचा खो-खो चा संघ जिल्हास्तरावर प्रतिनिधीत्व करनार



  • १४ वर्षा आतील शालेय क्रिडा स्पर्धा
  •         तालुका स्तरीय १४ वर्षा आतील शालेय खो-खो क्रिडा स्पर्धा शुक्रवार ला जनता विद्यालय नेरी येथे घेन्यात आल्या. दरम्यान अत्यंत चुरशीच्या सामन्यात चिमूर येथील नेहरू विद्यालयाच्या संघाला पराजित करून सरस्वती कन्या विद्यालय नेरी च्या संघाने दणदणीत विजय प्राप्त केला. त्यामुळे नेरी येथील सरस्वती कन्या विद्यालयचा खो - खो चा संघ चिमूर तालुक्याचे जिल्हास्तरावर प्रतिनिधीत्व करनार आहे.

  •         चुरशीच्या सुंदर खेळाच कौतूक तालूका क्रिडाचे भास्कर बावणकर, जयंत गौरकर व क्रिडांगणावर प्रेक्षकांनी केल. स्पर्धेत सहभागी खेळाडूनी आपल्या यशाचे श्रेय मुख्याध्यापिका अर्चना डोंगरे, क्रिडा प्रशिक्षक सुनिल पोहनकर, सि एस ढोले, वर्ग शिक्षक सरोजा मांडवकर, हरणे, अजानी, पळवेकर तथा समस्त शिक्षक वृंद व आई वडीलांना दिले. दरम्यान संस्थेचे सचिव संजय डोंगरे यांनी स्पर्धेतील खेळाच्या यशाने विद्यार्थ्यांने सरस्वती कन्या विद्यालयाचे नाव लौकीक केले भविष्यातही अशीच प्रगती करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.