सोलापूर : केंद्रातील मोदी सरकारने राबविलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी काढण्यात येत असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेला सोलापूर जिल्ह्यात दोन गावांतून तीव्र विरोध करून प्रवेश नाकारण्यात आला. बार्शी व करमाळा तालुक्यात हा प्रकार घडला. त्यावेळी गावक-यांचा रोष दिसून आला.
बार्शी तालुक्यातील पांढरी गावात विकसित भारत यात्रेचा रथ आला असता तेथे गावकरी एकत्र आले. यावेळी तरूण आणि वयोवृध्द शेतक-यांनी प्रथम मोदी सरकार या नावाच हरकत घेतली. कांदा व इतर पिकांचे दर गडगडले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केले ? व्यापा-यांचे भले करण्यासाठी शेतक-यांच्या पिकांवर गाढवाचा नांगर फिरविण्यात आला आहे. वाढत्या महागाईत आमचे जागणेच मुश्किल झाले आहे, आशा शब्दांत गावक-यांनी संताप व्यक्त केला. यावेळी काहीजणांनी हातात लाकडी दांडके घेऊन विकसित भारत संकल्प रथ गावातून हाकलून दिला.
करमाळा तालुक्यातील पुनवर गावातही विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ प्रवेश न देता परत पाठविण्यात आला. रथासोबत सरकारी कर्मचा-यांसोबात भाजपचे कार्यकर्ते होते. परंतु गावक-यांनी शेतीमालाच्या घसरलेल्या भावासह वाढलेली महागाई, मोदी सरकारची धोरणे, तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्यावर प्रश्नांची सरबत्ती करून विकसित भारत संकल्प रथाला गावात थांबू न देता परत पाठविला. यावेळी संबंधित सरकारी कर्मचारी व भाजप कार्यकर्त्यांची अडचण झाल्याचे पाहायला मिळाले.
सोलापूर दि.१० (जि.मा.का)- महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळामार्फत मध केंद्र योजनेसाठी ११ सप्टेंबर २०२३ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी ध्रुवकुमार बनसोडे यांनी केले आहे.
मध उद्योगांना मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरूपात ५० टक्के अनुदान व ५० टक्के स्वगुंतवणूक, शासनाच्या हमीभावाने मध खरेदी, विशेष छंद प्रशिक्षणाचे सुविधा, मधमाशा संरक्षण व संवर्धनाची जनजागृती अशी या योजनेचे वैशिष्ट्ये आहेत. वैयक्तिक मधपाळ योजनेसाठीअर्जदार साक्षर असावा. स्वतःची शेती असल्यास प्राधान्य राहील. वय १८ पेक्षा जास्त असावे. केंद्र चालक प्रगतशील मधपाळ योजनेसाठी अर्जदार दहावी पास असावा वय वर्ष २१ पेक्षा जास्त असावे . व्यक्तींच्या नावे अथवा त्या व्यक्तींच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तींच्या नावे किमान एक एकर शेत जमीन किंवा भाडे तत्त्वावर घेतलेली शेतजमीन असावी. तसेच लाभार्थीकडे मधमाशापालन प्रजनन व मध उत्पादनात बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. केंद्र चालक संस्थेसाठी संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेच्या मालकीची किंवा दहा वर्षासाठी भाडे तत्त्वावर घेतलेली किमान एक एकर शेत जमीन तसेच संस्थेच्या नावे किमान एक हजार चौरस फूट सुयोग्य इमारत असावी. मधमाशापालन प्रजनन व मध उत्पादनात बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी.