राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे भारताचे पंतप्रधान होणार आहे आणि ते गुण त्यांच्या अंगी आहेत,असं शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांचे भाकित आहे.पाहूया पुढे काय होतं ते.
शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार आणि स्वतःला बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक समजणारे संजय राऊत,काही ना काही वाचाळ वक्तव्य करण्यात तरबेज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैकी ते एक आहेत.जेव्हा संजय राऊत तुरुंगात गेले होते तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते,आता सकाळचा भोंगा बंद झालाय आणि ते सत्य होते.
संजय राऊत स्वतःला बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक समजतात पण शरद पवाराचा स्वतःला चेला सुद्धा समजतात असा दुटप्पी धोरणाचे आचरण करणारा बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक होऊच शकत नाही,ही वस्तुस्थिती आहे.
उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होऊ शकतात आणि ते गुण त्यांच्या अंगी आहेत,हे सच्चा शिवसैनिक संजय राऊत यांचे म्हणणं आहे.परंतु ते घातांत खोटे आहे.कारण उद्धव ठाकरे च्या शिवसेनेचे काहीही उरलं नाही आणि राज्यात सुद्धा उद्धव सेनेचे किती आमदार निवडून येतील यांचा अंदाज आजच्या घडीला उद्धव ठाकरे कडेच दिसत नाही.एवढे बेकार दिवस उद्धव सेनेचे आले आहेत.
कदाचित उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होणार हे जरी काही वेळापूर्ती आपण गृहीत धरलं तर इंडिया आघाडीत सत्राशे साठ पक्ष सहभागी झाले आहेत.त्यांना उद्धव ठाकरे मान्य होतील का ? हा प्रश्न न समजण्या पलीकडे आहे.
उद्धव ठाकरे इंडिया आघाडीत सहभागी न होता स्वतंत्रपणे निवडनुकिला समोर जायला पाहिजे होते.भलेही दोनच आमदार निवडून आले असते तरी चालले असते.कारण स्वतःचे अस्तित्व सिद्ध करता आले असते.कोण आपले अन कोन परखे याची शहानिशा करता आली असती.
उद्धव ठाकरे बद्दल राज्यातील जनतेला कळवळा आजही कायम आहे परंतु तो काँग्रेस पक्षाचा बाऊला बनलेला आहे आणि हे जनतेला कडून चुकलेल आहे.ते आता देशाचे पंतप्रधान तर होणार नाहीत कारण,दिल्ली बहुत दूर है परंतु राज्यात सुद्धा काय हाल होणार आहेत हे आता न सांगितलेले बरे.एवढी बिकट अवस्था उभाठा शिवसेनेची झालेली आहे.
उद्धव सेनेची एवढी बिकट अवस्था व्हायला फक्त संजय राऊत जबाबदार आहेत आणि शिवसेना संपवायला ते निघालेले आहेत. कारण ते शरद पवारांचे चेले आहेत.शरद पवार म्हटले तर संजय राऊत भूकणार आणि नाही म्हटले तर गुपचूप बसणार,अशी गत संजय रावतांची झाली आहे आणि सर्वात जास्त उद्धवचा विश्वास म्हणून संजय राऊत आहे
चंद्रपूर जिल्हा शिवसेना ( उबाठा ) ची मागणी
..........................................
तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत. सतत पाऊस, उन्ह व खराब वातावरणाने सोयाबीन पिकांवर विवीध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीला तक्रारी केल्या मात्र कंपनी कडून दाद मिळत नाही त्यामुळे शेतपिकांची पाहणी करून तात्काळ नुकसान भरपाई देन्याची मागणी चंद्रपूर जिल्हा शिवसेना ( उबाठा ) चे उपजिल्हा प्रमुख प्रशांत कोल्हे यांनी सोमवार ला चंद्रपूर जिल्हाधिकारी यांना उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे मार्फत पाठवीलेल्या निवेदनातून केली आहे.
शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत कापूस व सोयाबीन या पिकांचा पिक काढला. सोयाबीन पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याच्या तक्रारी पिक विमा कंपनीला केल्या मात्र दाद मिळत नाही. तसेच अनेक शेतकरी तांत्रीक अडचनीमूळे पिक विमा पासून वंचीत आहेत. अशा सर्व शेतकऱ्यांची परिस्थिती गृहीत धरुन तात्काळ पिक पाहणी करून शेतकऱ्यांना पिक विमा देन्यात यावा व ज्या शेतकर्यांचा विमा नाही अशांना शासन स्तरावरून पाठपुरावा करून मदत पुरवावी. पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या तक्रारी वाट न बघता स्वता पहाणी करून मदतीसाठी आश्वासीत करावे. सदर सोयाबीन पिकांची मुदत संपत येत आहे. त्यामुळे पिकांचे पंचनामे सात दिवसात होणे आवश्यक आहे. पिक विमा कंपनीव प्रशासनाच्या दुर्लक्षतामूळे शेतकरी मदती पासुन वंचीत राहील्यास शिवसेना स्टाईल ने आंदोलन करन्याचा इशारा शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रशांत कोल्हे यांनी दिला आहे.
निवेदणाच्या प्रतिलिपी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार बंटी भांगडीया, जिल्हा कृषी अधिकारी, उपविभागीय अधिकारी यांना पाठवील्या आहेत.
चिमूर प्रतिनिधी :-
दिनांक १६ ऑगस्ट २०२३ ला चिमुर येथील हुतात्मा स्मारक येथे १९४२ च्या चिमूर येथील स्वातंत्रलढ्यातील शहिदाना शिवसेना तालुका चिमुर तर्फे पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
देशाच्या कानाकोपऱ्यात चिमूर क्रांतीचे नाव गेले असून देश पारतंत्र्यात असतांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भजनाने चिमूरात क्रांती घडली अनं तीन दिवस चिमूर स्वतंत्र झालं. याबाबत बर्लिन रेडिओ वरून व्रूत प्रकाशित झाले कि देशात सर्वात आधी चिमूर स्वतंत्र झालं. यामुळं चिमूरचा इतिहास पुसला जात नाही. या चिमूरात क्रांती वीरांना नमन करण्यासाठी व शहीद स्मारक येथे श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी दरवर्षी मंत्री, खासदार, आमदार लोकप्रतिनिधी येत असतात व शहीद स्मारक येथे श्रध्दांजली अर्पण करीत असतात असे यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते व सरपंच प्रशांत कोल्हे यांनी सांगितले.
यावेळी वाहनगाव येथील सरपंच, शिवसैनिक सामजिक कार्यकर्ते प्रशांत कोल्हे, श्रीहरी सातपुते शिवसेना तालुका अध्यक्ष चिमुर, नितीन लोणारे, संजय वाकडे, मंगेश ठोंबरे, भैयाजी कारेकार, चेतन कोल्हे, रोहन नन्नावरे इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.
गडचिरोली विधानसभा संपर्क प्रमुख शिवाजी झोरे यांचे पुढाकार
गडचिरोली:- राज्यातील खालापुर येथील इर्शालवाडि दरड दुर्घटनेत शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मदतीचा हात पुढे केले असून मदत पोहचविन्यासाठी पुढे सरसावले आहेत.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेना कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर यांच्या सूचनेनुसार उपाध्यक्ष डॉ. जयवंत गाड़े व महाराष्ट्र समन्वयक जितेंद्र सकपाळ, शिव आरोग्य सेनेचे रायगड जिल्हा प्रमुख डॉ.परेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाचे गडचिरोली विधानसभा संपर्क प्रमुख शिवाजी झोरे यांनी रविवार 23 जुलै रोजी जीवनावश्यक साहित्याचे मदत करूण पीड़ित कुटुंबियाना हिंम्मत व धीर दिले. संकट व आपत्ति कालीन वेळेत शिवसेना पक्ष माणूसकीचा धर्म टिकवून मदतीसाठी तत्पर व सज्ज असतो म्हणून शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे )अहेरी विधानसभा क्षेत्राचे जिल्हा प्रमुख रियाज शेख व जिल्ह्यातील शिवसैनिकानी समाधान व्यक्त करून पक्षाचे वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले.
मानव सेवा हिच ईश्वर सेवा असल्याने शिव आरोग्य सेना व पनवेल रायगड जिल्ह्याच्या वतीने कपडे, चादर, साड्या, टॉवेल, सुके खाद्य पदार्थ, ओषधे, बिस्किट्स, धान्य, तेल, साबुन व अन्य संसारोपयोगी वस्तु पीड़ित कुटुंबियाना वितरित करण्यात आले व सोबतच वैद्यकिय चम्मूकडून वैद्यकीय तपासणी करण्यात आले.
यासाठी तेथील शिव आरोग्य सेनेने, शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी भरिव मदत केले असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मदतीसाठी पुढे सरसावल्याने आम्हाला सार्थ अभिमान असल्याची भावना व मत जिल्ह्यातील शिवसैनिकानी व्यक्त केले आहे