मोहपा
गुरू विना ज्ञान नाही,
गुरूच्या ज्ञानाला अंत नाही.
गुरूने जिथे दिलं ज्ञान.
तेच खरं तीर्थस्थान.
बॅरिस्टर शेषराव वानखेडे महाविद्यालय येथे निरोप व सत्कार समारंभ साजरा
विद्यार्थ्या मध्ये अत्यंत लोकप्रिय असलेले सम्मानिय डॉ. संजय ठवळे सर यांचा आज दिनांक:- 17/03/2024 रोजी निरोप व सत्कार समारंभ चा कार्यक्रम बॅरिस्टर शेषराव वानखेडे महाविद्यालय मोहपा या ठिकाणी आयोजित करण्यात आला.
या ठिकाणीं कार्यक्रमाचे अध्यक्ष सोमंकुवर सर . उपस्थित मान्यवर श्री. श्रावण दादा भिंगारे जी उपसभापती कळमेश्वर पंचायत समिती, श्री. विजय जी वानखेडे माजी नगर सेवक नगर परिषद मोहपा. श्री.ज्ञानेश्वर जी काळे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती. एडवोकेट लंकेशजी गजभिये, डॉ. वडते सर. कार्यक्रमाचे आयोजन माजी विद्यार्थी महेंद्र खाटीक, उमेश भेलकर, सुनिल बनसोड, राहुल श्रीखंडे, अतुल चर्जन, गोलू टेकाडे,सचिन बनसोड, राहुल श्रीखंडे, प्रितम वाराडे, प्रगट सिंग बावरा, संगिता टुले, सुवर्णा तपासे, योगिता दहाट,प्रिती तभाने, कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ. छाया काळे मॅडम यांनी केले.
यावेळी पंचायत समिती कळमेश्वर चे उपसभापती श्री.श्रावण दादा भिंगारे जी, विजय जी वानखेडे, सोमंकुवर सर, डॉ.वडते सर,राहूल श्रीखंडे, प्रिती तभाने, महिंद्र खाटीक, प्रगट सिंग बावरा यांनी आपल्या लाडक्या गुरूजी विषयी भाषणाच्या माध्यमातून आप आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
यावेळी उपस्थित सर्वच विद्यार्थ्याने ठवळे सर यांचा गिफ्ट देऊन सत्कार केला. श्री. ठवळे सर हे इतिहास या विषयाचे प्राध्यापक होते. श्री. ठवळे सर यांनी संपुर्ण विद्याथ्र्यांचे आभार मानले. भाषना दरम्यान श्री. ठवळे सर विद्यार्थ्यांचं आपल्या विषयी प्रेम पाहून अत्यंत भाऊक झाले.
चंदू मडावी
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे कुलसचिव यांनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीता अध्यासन केंद्राच्या सल्लागार समितीवर चिमुर येथील प्रा. अशोक चरडे यांची नियुक्ती केली.
प्रा. अशोक चरडे यांनी नेहरू विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चिमुर येथे प्रदिर्घ व्याख्याता म्हणुन सेवा केली आहे. ते श्री गुरुदेव सेवा मंडळ चिमुरचे बरेच वर्षे ग्रामसेवाधिकारी होते. गुरुकुंज आश्रम मोझरीच्या कार्यकारणीत त्यांना घेण्यात आले होते. ते गुरुकुंज आश्रमचे आजीवन प्रचारक आहेत. संपुर्ण विदर्भात अनेक खेडे व शहरी भागात राष्ट्रसंताच्या ग्रामगीतेवर आधारीत समाजप्रबोधन, राष्ट्रीय एकात्मता, आदर्श गाव, सर्वधर्म समभाव, महिलोन्नती, व्यसनमुक्ती आदी विषयावर त्यांनी किर्तन व प्रवचनाचे कार्यक्रम केले व राष्ट्रसंताच्या साहित्याचा ते आजही प्रचार करीत आहे.
प्रा. अशोक चरडे यांच्या नियुक्तीबद्दल अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे, प्रचारसेवाधिकारी प्रकाशराव वाघ महाराज, उपसेवाधिकारी दामोधर (पाटील, प्रचार सचिव सुशील बनवे, ग्रामगीता परिक्षा प्रमुख गुलाबराव खवसे, गुरुदेव मासिकांचे प्रकाशक गोपाळराव कडु, सरचिटणीस जनार्धन बोथे, चिमुर गुरुदेव सेवा मंडळाचे ग्रामसेवाधिकारी वसंतराव कडु, सचिव परमानंद बोरकर, उपग्रामसेवाधिकारी बाबाराव दोहतरे, विठ्ठलराव सावरकर, नथ्थुजी भोयर, तालुका सेवाधिकारी अतकरे आदीने अभिनंदन केले आहे.