चिमूर प्रतिनिधी :-
७ जानेवारी रोज रविवार ला चंद्रपूर येथे तेली युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सव तसेच वर वधू परिचय मेळावा , गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केला होता प्रसंगी मार्गदर्शन करताना श्री . धनराज भाऊ मुंगले केंद्रीय उपाध्यक्ष विदर्भ तेली समाज तथा प्रदेश संघटक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी.
याप्रसंगी उपस्थित मान्यवर श्री . किशोर भाऊ जोरगेवार आमदार चंद्रपूर विधानसभा क्षेत्र, श्री रघुनाथ जी शेंडे केंद्रीय अध्यक्ष विदर्भ तेली समाज महासंघ, श्री देवराव भांडेकर माजी आमदार, श्री बबनराव फंड ज्येष्ठ नेते तेली समाज ,श्री सूर्यकांत जी खनके अध्यक्ष तेली युवक मंडळ चंद्रपूर जिल्हा ,श्री अनिल घुमरे शहर अभियंता , सौ .मीनाक्षीताई गुजरकर महिला अध्यक्ष , श्री गंगाधर कोकापडकर महासचिव तेली समाज महासंघ श्री विश्वास झाडे उपाध्यक्ष शेकडो समाज बांधव व समाजातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.