PostImage

pramod abhiman raut

Nov. 11, 2023   

PostImage

Nitin in uniform created a vision of humanity. ; वर्दीतल्या …


Nitin in uniform created a vision of humanity. ; वर्दीतल्या नितीनने घडविले माणुसकीचे दर्शन...

ट्रॅफिक पोलिसाची कौतुकास्पद कामगिरी ...

चिमूर प्रतिनिधी :-

          ट्रॅफिक पोलिस अधिकारी दिसला की अनेक दुचाकी स्वारास घाम फुटतो परंतु ट्रॅफिक पोलिस कर्मचाऱ्यांची कामगिरी ही कौतुकास्पद असून  जन सेवेकरिता रस्त्यावर उन, वारा, पाऊस अश्या अनेक संकटाचा सामना करीत आपले कर्तव्य बजावत असतात. जर छोटा मोठा अपघात झाल्यास जीवाची पर्वा न करता अपघातग्रस्तांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर इलाज करून त्यांचे प्राण वाचविण्याचे काम सुद्धा करीत असतात. इतकेच नव्हे तर पोलीस कर्मचारी सदैव जनसेवेसाठी सदैव तत्पर असतो.
           अशीच आज एक कौतूकास्पद असलेली बाब शेगाव येथील ट्राफिक पोलीस अधिकारी नितीन कुरेकार यांनी केली आहे. आज सकाळ पासून शेगाव परिसरात एक मनोरुग्ण महिला विवस्त्र फिरत होती. सर्व तिच्याकडे एक मनोरुग्ण म्हणून संकुचित नजरेने पाहण्याचे काम करीत होते. ही माहिती शेगाव पोलीस स्टेशन मध्ये ट्रॅफिक हवालदार या पदावर काम करीत असलेले नितीन कुरेकार यांना माहिती झाली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली. पण तिचा कुठेच पत्ता लागला नाही. अखेर २ तसा नंतर सदर मनोरुग्ण महिला वरोरा चिमूर रोड वर चालताना त्यांना दिसली असता त्यांनी ट्रॅफिक ची कामगिरी बजावत असतानाच ते काम बाजूला ठेऊन सर्वात आधी त्या महिलेला स्वखर्चाने शर्ट आणि पॅन्ट घेऊन दिला. व त्या महिलेला तो व्यवस्थित करुन दिला. त्या वेळी त्यांच्या सहकार्याला शेगाव पोलीस स्टेशन येथील होमगार्ड हेमंत पाटील हे सुद्धा होते. एरवी ट्रॅफिक पोलीस म्हंटल तर सर्वांच्या मनात एक वेगळीच प्रतिमा तयार होते. पण शेगाव चे नितीन कुरेकार यांनी वर्दीतल्या माणुसकीचे दर्शन शेगाव वासियांना घडवून दिले. त्यामुळे त्यांच्या या कार्याला व वर्दीतल्या या माणुसकीला एक सलाम.