PostImage

News mh33 live

Dec. 11, 2023   

PostImage

विकसित भारत संकल्प यात्रा या मोहिमेवर कोनसरी परिसरातील ग्रामपंचायतीचा बहिष्कार


विकसित भारत संकल्प यात्रा या मोहिमेवर ग्रा. पं. सोमनपल्ली, ग्रा. पं. कोनसरी, ग्रा.पं. जैरामपुर, ग्रा.पं. मुधोली तुकुम, ग्रा.पं. मुधोली चक नं.२.ग्रा.पं. दुर्गापुर, ग्रा. पं. अडयाळ, ग्रा. पं. गणपुर, या ग्रामपंचायतीचा बहिष्कार 

 

तहसीलदार यांना सरपंचांनी दिले निवेदन

भारत सरकारच्या योजनांचे लाभ लक्षीत लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी ग्राम स्वराज्य अभियान तसेच विस्तारीत ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन सरकारने केले आहे. संकल्प यात्रा विविध ग्रामपंचायत मध्ये येणार असुन त्याचे नियोजन करण्याचे पत्र शासनाने काढले आहे.

परंतु चामोर्शी तालुक्यातील ग्रा. पं. सोमनपल्ली, प्रा. पं. कोनसरी, ग्र. पं. जैरामपुर, ग्रा. पं. मुधलुो तुकुम, ग्रा.पं. मुधोली चक नं. २.ग्रा. पं. दुर्गापुर, ग्रा.पं. अडयाळ, ग्रा. पं. गणपुर, या ग्रामपंचायतीचे किंवा ग्रामस्थांचे कोणत्येही मत जाणून न घेता शेतक-यांची शेतजमिन औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित केले. जमीन अधिग्रहन करण्याबाबत शासन निर्णय पारित केला. यामुळे वरील ग्रामपंचायती मधील येणाऱ्या ग्रामपंचायत मधील ग्रामस्थांचे या शासन निर्णयाला विरोध आहे. या प्रकरणाबाबत शासन ग्रामपंचायतीचे म्हणणं ऐकुन घेण्यास तयार नाही. यामुळे शासन प्रतिनिधी किंवा शासनाच्या कोणत्याही कार्यक्रमात भाग घेणार नाही असा निर्णय घेत आहेत.

तरी येत्या १३ डिसेंबर २०२३ पासून परिसरात येत असलेल्या मुख्यमंत्री महिला संशक्तीकरण व विकसित भारत संकल्प यात्रेत सर्व ग्रामपंचायती मधील नागरीक सहभागी होणार नाही. स्वागत करणार नाही. तसेच कसल्याही प्रकारच्या कार्यक्रमात सहभागी होणार नाही, असे निवेदन 

निलकंठ निखाडे सरपंच ग्रा.पं. सौमनपल्ली,श्रीकांत पावडे सरपंच ग्रा. पं. कोनसरी यांच्यासह परिसरातील सरपंचांनी दिले आहे