PostImage

Pankaj Lanjewar

May 6, 2024   

PostImage

पत्रकारांची मुस्कुटदाबी, लोकशाहीचा खून


पत्रकारांची मुस्कुटदाबी, लोकशाहीचा खून.

निपक्ष,स्वच्छ निवडणूक प्रक्रियेत पत्रकारांच्या पासेस नाकारल्या.
दोशींचे निलंबन,पासेसचे वाटप करण्याची मागणी.

स्वच्छ आणि निपक्ष निवडणूक प्रक्रियेत पत्रकारांची मुस्कुटदाबी होत असल्याची गंभीर बाब बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे. असंख्य पत्रकारांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी, परवानगी पासेस नाकारण्यात आल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. तर या अनुषंगाने संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा माहिती अधिकारी यांच्याशी पत्रकारांच्या शिष्टमंडळाने चर्चा केली.निवेदन, तक्रार दिले. तरीही अद्याप कोणतेही पास वाटप वगळलेल्या पत्रकारांना केली नाही. तर पासेस नाकारणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई सूद्धा करण्यात आली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पत्रकारांनी नुकतीच एक ऑनलाइन बैठक घेतली. त्यामध्ये जिल्हा प्रशासनाच्या हुकूमशाहीचा निषेध नोंदविला. तर संबंधित दोषी अधिकारी यांना तत्काळ निलंबित करावे. शेवटच्या पत्रकाराला सुद्धा पासेस वाटप करावे.अशी भूमिका या ऑनलाइन बैठकीत घेण्यात आली.        
निपक्ष आणि स्वच्छ प्रशासनात पत्रकारांना माहिती मिळविण्यासाठी आणि देण्यासाठी कोणतेही प्रयत्न करावे लागत नाही. परंतु गलथाण आणि भ्रष्ट प्रशासनामध्ये पत्रकारांना माहिती मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते.तरीही माहिती मिळेल असे नाही. उलट पक्षी पत्रकारांची मुस्कुट दाबी करून त्यांना बदनाम केल्या  जाते. त्यांना बनावट गुन्ह्यात अटकविण्यात येते. परंतु पत्रकारांची एकताच अधिकारांचे सार्वभौमत्व आबाधीत ठेवत असते. याकडे काही पत्रकार बांधवांचे दुर्लक्ष झाले आहे.त्यामुळेच आपल्यावर ही वेळ आली आहे. लोकशाहीमध्ये पत्रकारांच्या अभिव्यक्ति स्वतंत्र्यावर गधा. ही हुकूमशाहीची नांदी आहे. जोपर्यंत पत्रकारांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. निर्भीड पत्रकार जिवंत आहे. तोपर्यंतच लोकशाही जिवंत आहे.तोपर्यंत समाजाच्या हितासाठी लिहिणारे, बोलणारे आणि लढणारे कोणीतरी आहे. अन्यथा सामान्य व्यक्ती या हुकूमशाही विरोधात, पुढे येण्यासही धजावत नाही. परंतु जनसामान्यांनी पत्रकारांच्या या अधिकारासाठी कमीत कमी आवाज उचलला पाहिजे. पत्रकार समाजासाठी आहे. त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी सुद्धा समाजाची आहे. स्वच्छ शासन प्रशासनासाठी जनहितार्थ लेखनी झिजवणाऱ्या पत्रकारांना आपण तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपलं पाहिजे.तरच लोकशाही जिवंत राहील, आणि हुकूमशाहीचा अंत होईल.
तर पत्रकारांनीही सौजन्यशीलतेने, आपल्या जबाबदारीचे भान ठेवत जनतेसाठी सर्वस्वपनाला लावले पाहिजे.जाहिराती मिळतील नाही मिळतील. परंतु आपल्यातील पत्रकार जिवंत राहिला पाहिजे. जाहिराती मिळाल्यावरही जर काही आक्षेपार्य चुकीचे आढळल्यास त्यावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे. आपल्यावरच भोळ्या भाबड्या सामान्य जनतेचा विश्वास आहे. या विश्वासाला तडा जाणार नाही. यासाठी पत्रकारांनी सदसदवेकबुद्धी जिवंत ठेवीत जनसामान्यांच्या हितासाठी लेखणी झिजवली पाहिजे. बुलढाणा जिल्ह्यातील पत्रकारिता आदर्श आहे. याच जिल्ह्यातील पत्रकारितेने सरकार सूद्धा पाडले आहे. सरकारचे मोठमोठे निर्णय बदलले. असंख्य योजना पत्रकारांच्या लेखणीतून उदयास आल्या. त्याच योजना नंतर संपूर्ण महाराष्ट्राने स्वीकारल्या. पत्रकारांनी या जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी ही निवडले आहे. तर भल्या भल्यांना जमीन दोस्त करण्याची ताकदही पत्रकारांच्या लेखणीने दाखवली आहे.ही क्षमता बुलढाणा जिल्ह्यातील पत्रकारांची आहे. बुलढाणा जिल्ह्यातील पत्रकारितेच्या इतिहासाची सद्यस्थितीतील हुकूमशाही सरकारला आणि जिल्हा प्रशासनाला आठवण करून देण्याची वेळ आली आहे.
जर निवडणूक प्रक्रिया निपक्ष आहे. स्वच्छ प्रशासनाचा कार्यभार आहे.तर मग पत्रकारांच्या उपस्थितीस मज्जाव का.❓त्यांची मुस्कुटदाबी का..?कोणाच्या सांगण्यावरून.         असे असंख्य प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे. जिल्हा प्रशासन सुज्ञ आहे. लवकर निर्णय घेईल, दोषींवर त्वरीत कारवाई करेल. हीच माफक अपेक्षा जिल्ह्यातील पत्रकार आणि नागरिकांची आहे.
        तूर्तास एवढेच.
पुढील विश्लेषणात.                                                     स्वच्छ निपक्ष निवडणूक प्रक्रिया.
10.03 टक्केवारी कोणाच्या पथ्यावर.
प्रतापराव तुपकर की, खेडेकर.
शेळके शाह कूणाला गारद करणार. 
_____________________

 


PostImage

Ujjwala kale

Feb. 12, 2024   

PostImage

वर्ध्यात महासांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले, परन्तु अवकाळी पावसाची हजेरी.


वर्ध्यात तीन दिवसीय महासांस्कृतिक महोत्सवाचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजन करण्यात आलं होतं. महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमाला कैलाश खेर यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.परंतु या कार्यक्रमात अवकाळी पावसाने हजेरी लावली, त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

 

या कार्यक्रमात नागरिक पावसापासून बचावाकरिता तेथील खुर्च्या डोक्यावर घेऊन काही वेळ उभे राहिले. पण पावसाचा जोर वाढल्याने अनेकांनी खुर्चीसह घरचा रस्ता पकडला. या घटनेत नागरिकांनी एक दोन नव्हे तर एक हजारच्या जवळपास खुर्च्या फुर्रर्रर्र केल्याचं समोर आलं आहे. (कैलाश खेर यांचा कार्यक्रम असल्याने नागरिकांनी कार्यक्रम सुरु होण्याच्या एका तासांपूर्वी पासून गर्दी करायला सुरवात केली होती. हळूहळू मैदान भरू लागले, पण ठरलेल्या वेळेवर कार्यक्रम सुरु झाला नाही. अशातच काही वेळ पावसाच्या सरी बरसल्या पण वर्धेकरांनी धीर राखत तेथेच ठाण मांडून बसून राहिले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)Latest Marathi Newsपावसाच्या सरी बंद होताच कार्यक्रम सुरु होईलच तर जनरेटरमध्ये बिघाड झाला तर काही वेळेत इलेक्ट्रिक वाद्यामध्ये सुद्धा बिघाड झाला. वर्धेकर नागरिक कार्यक्रम सुरु होण्याची वाट पाहत असताना वरूण राजाने पुन्हा आपली वाट मोकळी केली आणि मैदानात नागरिकांची तारांबळ उडाली.

 

नागरिकांनी बचावासाठी आपल्या डोक्यावर खुर्च्या घेत काहीनी दुचाकीवर तर काहींनी पायदळ आपल्या घरी खुर्च्या नेल्या. एवढंच नव्हे काहीनी खुर्च्याची मोडतोड केली तर काहींनी रस्त्यावर खुर्च्या फेकल्या.


PostImage

Ujjwala kale

Feb. 12, 2024   

PostImage

आता महाराष्ट्रत तुम्हाला थारा नाही - ॲड.यशोमतीई ठाकुर म्हणाल्या.


अमरावती, 12 फेब्रुवारी (हिं.स.) अशोक चव्हाण यांच्यासारख्या नेत्याला ब्लॅकमेलिंग करून भाजपने फोडले आहे. मात्र, भाजपाने कितीही प्रयत्न केले, दबाव टाकून नेत्यांना ओढण्याचा प्रयत्न केला, तरी महाराष्ट्रातील जनता भाजप आणि अशा गद्दार प्रवृत्तीच्या नेत्यांना निश्चितच थारा देणार नाही, असा दावा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या अँड.यशोमती ठाकूर यांनी केला आहे.

 

केंद्र सरकारने नुकताच प्रसिद्ध केलेल्या श्वेतपत्रिकेमध्ये काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांचे नाव आल्यानंतर त्यांनी दिलेला हा राजीनामा कशाचे लक्षण आहे हे स्पष्ट होते. चव्हाण यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने दबाव होताच, मात्र अखेरीस त्यांना अशा पद्धतीने ब्लॅकमेल करून राजीनामा द्यायला भाग पाडले आहे. स्वतःच्या पक्षाची ताकद आणि प्रतिमा दोन्ही उतरणीला लागल्यामुळे भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीचे डाव खेळत आहे. काही समस्यांमध्ये अथवा प्रकरणांमध्ये अडकलेल्या काही आदर्श नेत्यांना भारतीय जनता पार्टी निश्चितच आपल्याकडे दबाव टाकून ईडी, सीबीआय या यंत्रणांची भीती दाखवून पक्षात घेऊ शकते. मात्र, तमाम जनता जनार्दनाला ही बाब निश्चितच रुचणारी नाही. अत्यंत विकृत पद्धतीच्या या राजकारणाचा शेवट येत्या निवडणुकीत सुज्ञ मतदारांकडून निश्चितच केला जाईल याची आम्हाला खात्री आहे. यापूर्वीही मुघल सेना प्रचंड फौज फाटा आणि दारूगोळा घेऊन इथल्या मावळ्यांवर चाल करून आली होती. आमिष दाखवून आणि भीती दाखवून इथल्या काही मनसबदाराना आणि वतनदारांना मुघलांनी आपल्या बाजूने करून घेतले होते. देशासाठी, स्वराज्यासाठी लढणाऱ्या , मातीशी इमान बाळगलेल्या, संख्येने कमी असलेल्या मावळ्यांचा विजय छत्रपती शिवरायांच्या नेतृत्वाखाली झाला हे महाराष्ट्र विसरलेला नाही. आणि आगामी निवडणुकीत हे विसरणारही नाही. विकृत राजकारणाला आणि गद्दार युतींना महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही जनता थारा देणार नाही, असेही अँड. ठाकूर म्हणाल्या.


PostImage

Ujjwala kale

Feb. 9, 2024   

PostImage

इंडिया आघाडीतून RLD बाहेर पडताच आंबेडकरांचा काॅग्रेसवर निशाणां


VBA Prakash Ambedkar ( Marathi News ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न पुरस्काराची घोषणा करताच आरएलडी पक्षाचे प्रमुख जयंत सिंह यांची भाषा बदलली आणि त्यांनी इंडिया आघाडीला धक्का देत एनडीए प्रवेशाचे संकेत दिले आहेत.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक भूमिका घेत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. तसंच महाविकास आघाडी किमान समान कार्यक्रमावर चर्चा करण्यासाठी लवकरच वंचित बहुजन आघाडीला एक तारीख सुचवेल अशी आम्हाला अपेक्षा आहे, असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

 

प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडी आणि राज्य पातळीवर महाविकास आघाडीत समाविष्ट होण्याबाबत अनुकूलता दर्शवली असली तरी जोपर्यंत जागावाटपावर ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत याबाबत निश्चितता येणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अशातच नितीश कुमार यांच्या जेडीयूनंतर आता जयंत सिंह यांचा आरएलडी पक्षही इंडियातून बाहेर पडल्याने प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

 

आघाडीबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे की, "सध्या महाविकास आघाडीतील (MVA) घटक पक्षांमध्ये सुरु असलेल्या वाढत्या संघर्षाच्या बातम्या पाहायला मिळत आहेत. तरीसुद्धा माझी आणि वंचित बहुजन आघाडीची (VBA) भूमिका महाविकास आघाडीसाठी कायम आहे आणि राहील. राष्ट्रीय लोक दल (RLD) आज इंडिया आघाडीतून बाहेर पडल्याने, कॉंग्रेसच्या राजकीय समावेशकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. मात्र, महाविकास आघाडी इंडिया अलायन्सप्रमाणे संपुष्टात येणार नाही, अशी मला अजूनही आशा आहे," असं आंबेडकर म्हणाले.

 

"भाजपला पराभूत करणे हेच आमचे पहिले प्राधान्य असून, याच हेतूने वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांना ३९ कलमी किमान समान कार्यक्रम दिला आहे. महाविकास आघाडी किमान समान कार्यक्रमावर चर्चा करण्यासाठी लवकरच वंचित बहुजन आघाडीला एक तारीख सुचवेल अशी आम्हाला अपेक्षा आहे," असंही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे.


PostImage

Ujjwala kale

Jan. 21, 2024   

PostImage

अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी आतापर्यंत किती आला खर्च? श्रीरामाच्या जुन्या …


अयोध्येत प्रभू श्रीरामाचे भव्य राम मंदिर तयार होत आहे. श्रीराम यांचा अभिषेक सोहळा उद्या म्हणजेच सोमवारी होणार आहे. दरम्यान, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे खजिनदार गोविंद देव गिरी यांनी सांगितले की, तात्पुरत्या मंदिरात ठेवण्यात आलेली श्रीरामाची जुनी मूर्ती नवीन मूर्तीसमोर ठेवण्यात येणार असून, 22 जानेवारी रोजी येथील मंदिरात अभिषेक करण्यात येणार आहे.राम मंदिराच्या उभारणीसाठी आतापर्यंत 1,100 कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला असून, बांधकाम पूर्ण न झाल्याने आणखी 300 कोटी रुपयांची गरज भासू शकते, असेही ते म्हणाले. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

 

Jarange Vs Pawar: अजित पवार - जरांगे पाटील आमनेसामने, नेमकं कारण काय? मराठा आरक्षण की दुसरं काही?

 

गेल्या आठवड्यात राम मंदिराच्या गर्भगृहात श्रीरामाची 51 इंची मूर्ती ठेवण्यात आली होती. श्रीरामाच्या तीन मूर्ती बनवण्यात आल्या, त्यापैकी म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी तयार केलेल्या मूर्तीची अभिषेकासाठी निवड करण्यात आली आहे. इतर दोन मूर्तींचे काय होणार, असे विचारले असता श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे खजिनदार गोविंद देव गिरी म्हणाले, "आम्ही त्या पूर्ण आदराने आणि सन्मानाने मंदिरात ठेवू. एक मूर्ती आमच्याकडे भगवान श्रींची वस्त्रे आणि दागिने मापण्यासाठी म्हणून ठेवली जाईल.'' (Latest Marathi News)

 

ते म्हणाले, मूळ मूर्ती अत्यंत महत्त्वाची आहे. तिची उंची पाच ते सहा इंच असून ती 25 ते 30 फूट अंतरावरून भाविकांना दिसणार नाही म्हणून एका मथ्या मूर्तीची गरज होती.

 

Maratha Reservation: मराठा समाजाने आरक्षणासंदर्भातील आंदोलन मागे घ्यावे, मुख्यमंत्री शिंदे यांचे आवाहन

गिरी म्हणाले, "(मंदिराचा) एक मजला पूर्ण झाला आहे आणि दुसऱ्या मजल्याचे काम सुरू आहे." अरुण योगीराज यांनी बनवलेल्या श्रीरामाच्या मूर्तीच्या निवडीबद्दल गिरी म्हणाले, "आमच्यासाठी तीन मधून एक मूर्तीची निवड करणं खूप अवघड होतं. त्या सर्व अतिशय सुंदर आहेत, सर्व मुर्त्या आम्ही दिलेल्या निकषांचे पालन करून बनवण्यात आल्या आहेत."


PostImage

Ujjwala kale

Jan. 17, 2024   

PostImage

निवृत्तीवेतनात २०ते१०० टक्क्यांपर्यंत वाढ;राज्यभरातील ८० वर्षावरील ७५हजार लोकांना याचा लाभ


मुंबई : राज्य शासकीय, निमशासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या व वयाची ८० वर्षे पूर्ण केलेले व त्यावरील वय असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना २० ते १०० टक्क्यापर्यंत निवृत्तिवेतनात वाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.जानेवारी २०२४ पासून हा निर्णय लागू करण्यात आला असून, त्याचा राज्यातील सुमारे ७५ हजार निवृत्तिवेतनाधारकांना लाभ मिळणार आहे.

 

हेही वाचा >>> आमदारांचे वेतन आणि भत्त्यांचा निर्णय ही धोरणात्मक बाब त्यात न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही

 

केंद्राप्रमाणे राज्यातील ८० वर्षांवरील निवृत्तिवेतनधारकांना वाढीव निवृत्तिवेतन मिळावे, ही गेल्या अनेक वर्षांची महत्त्वाची मागणी मान्य केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे नेते ग.दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई तसेच, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस आणि समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी राज्य शासनाचे आभार मानले आहेत.

 

हेही वाचा >>> खासगी जागामालकांना झोपडीधारकांची संमती घेण्याची सक्ती करता येणार नाही, न्यायालयाने झोपु प्राधिकरणाला सुनावले

 

राज्य शासकीय तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, मान्यता व अनुदानाप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली महाविद्यालये, कृषी विद्यापीठे यांमधून सेवानिवृत्त झालेल्या ८० वर्षे व त्यापुढील वयाच्या निवृत्तिवेतनधारकांना, कुटुंबनिवृत्तिवेतनधारकांना हा निर्णय लागू करण्यात आला आहे. राज्यात सध्या सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची सुमारे ७ लाख संख्या आहे. त्यांतील १० टक्के ही ८० वर्षांवरील निवृत्तिवेतनधारकांची संख्या आहे. त्यानुसार या निर्णयाचा सुमारे ७५ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाभ मिळेल, अशी माहिती राजपत्रित अधिकारी महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई यांनी दिली.

 

वाढीचे स्वरुप

 

* वय वर्षे ८० ते ८५-मूळ निवृत्तीवेतनात २० टक्के वाढ

 

* वय वर्षे ८५ ते ९०- निवृत्तीवेतनात ३० टक्के वाढ

 

* वय वर्षे ९० ते ९५-निवृत्तीवेतनात ४० टक्के वाढ

 

* वय वर्षे ९५ ते १००- निवृत्तीवेतनात-५० टक्के

 

* १०० पेक्षा अधिक निवृत्तीवेतनात १०० टक्के वाढ


PostImage

Ujjwala kale

Jan. 16, 2024   

PostImage

मोदी सरकारने जाहीर कलेल्या राज्याच्या स्टार्टअप रॅकींगमध्ये महाराष्ट्र अव्वल


केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या व्यापार आणि उद्योग संवर्धन विभागाच्या वतीने राज्यांच्या स्टार्टअप रँकिंग कार्यक्रमाच्या चौथ्या आवृत्तीमध्ये स्टार्टअप संस्थांसाठीच्या सहाय्य कामगिरीच्या क्रमवारीत महाराष्ट्राने टॉप परफॉर्मर म्हणून क्रमांक पटकावलाया क्रमवारीवर आधारित २०२२ च्या आवृत्तीच्या निकालाची घोषणा आणि सत्कार समारंभ आज केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे पार पडला. महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रमोद शिंदे, सहायक व्यवस्थापक अमित कोठावदे आणि विवेक मोगल या टीमने पुरस्कार स्वीकारला.

 

राजधानी दिल्लीतील भारत मंडपम, प्रगती मैदान येथे "राज्यांचे स्टार्टअप रँकिंग" पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे भारत सरकारच्या उद्योग आणि आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्रालयाच्या अंतर्गत उद्योग आणि आंतरराष्ट्रीय व्यापार विभागाच्या (DPIIT) वतीने आयोजन करण्यात आले होते. वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते विविध श्रेणीतील पुरस्कारांचे यावेळी वितरण करण्यात आले. यावेळी विशेष सचिव सुमिता डावरा, लॉजिस्टिक्स, उद्योग, ग्राहक आणि आंतरराष्ट्रीय व्यापार विभागाचे सहसचिव व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.महाराष्ट्रातील संपूर्ण स्टार्टअप परिसंस्थेत, ज्यात राज्य सरकार, इनक्यूबेटर, एंजेल गुंतवणूकदार, शाळा आणि महाविद्यालये यांचा समावेश आहे. या स्टार्टअप्सच्या बळकटीकरणासाठी राज्य शासनामार्फत व्यापक प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्याने स्टार्टअपसाठी कार्यक्रमाची आखणी आणि उद्दिष्ट्य ठरवून उत्तम यंत्रणा निर्माण करत केलेल्या प्रभावी कार्यासाठी हा बहुमान मिळाला आहे. कौशल्य विकासाद्वारे सक्षमीकरण आणि उद्योजकतेला चालना देणे हे समृद्ध महाराष्ट्राचे ध्येय आहे.

 

हेही वाचाः SBI कडून ग्राहकांसाठी Green Rupee Term Deposit योजना सुरू, कोण करू शकते गुंतवणूक?

 

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या राज्यांच्या स्टार्टअप रँकिंग क्रमवारीत महाराष्ट्र राज्य टॉप परफॉर्मर म्हणून नावारूपाला आले आहे. अन्य काही रँकिंगमध्येही महाराष्ट्र राज्य पहिल्या स्थानावर आहे. महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटी, मुंबई २०१८ मध्ये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये स्टार्टअपच्या परिसंस्था वाढीसाठी नियम सुलभ करण्याच्या दिशेने आणि स्टार्टअप परिसंस्थेला बळकट पाठिंबा देण्यास विविध निकषांच्या आधारावर स्टार्टअप रँकिंग हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. वर्ष २०२२ च्या आवृत्तीमध्ये ७ व्यापक सुधारणा क्षेत्रांचा विचार करण्यात आला ज्यामध्ये २५ कृती मुद्दे होते जे स्टार्टअप्स आणि परिसंस्थेच्या भागधारकांना नियामक तसेच धोरण आणि आर्थिक समर्थन प्रदान करण्यासाठी आवश्यक आहेत. या सुधारणा क्षेत्रांमध्ये संस्थात्मक समर्थन, नावीन्यता आणि उद्योजकता, बाजारपेठेत प्रवेश, इंक्यूबेशन आणि मेंटरशिप सपोर्ट, फंडिंग सपोर्ट, एनेबलर्सची क्षमता बांधणी, शाश्वत भविष्यासाठी रोडमॅप यांचा समावेश होता. महाराष्ट्र स्टार्टअप वीक, स्टार्टअप पोर्टल आणि महिला इनक्युबेशन सेंटर या प्रमुख उपक्रमांमुळे या क्रमवारीत महाराष्ट्राने टॉप परफॉर्मरचा क्रमांक पटकवला.

 

महाराष्ट्र राज्यात स्टार्टअप इको सिस्टम बळकट करण्यासाठी सरकारचे प्रयत्न

 

महाराष्ट्र राज्य सरकार स्टार्टअप इको सिस्टमला अधिक बळकट करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवत आहे. यामध्ये स्टार्टअपसाठी वित्तीय सहायता, प्रशिक्षण आणि सल्ला सेवा, स्टार्टअप्ससाठी सुविधा उपलब्ध करून देणे आदींचा समावेश आहे.‍ राज्य सरकारने स्टार्टअप्ससाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीचा वापर स्टार्टअप्सना कर्ज, भांडवल गुंतवणूक आणि अनुदान देण्यासाठी केला जात आहे.राज्य सरकारने स्टार्टअप्सना प्रशिक्षणासोबत व्यवसाय योजना तयार करणे, बाजार पेठेचा अभ्यास करणे, वित्तीय व्यवस्थापन करणे यावर ही प्रशिक्षण दिले जात आहे.


PostImage

Ujjwala kale

Jan. 13, 2024   

PostImage

राज ठाकरेंची 'शोले 'स्टाइल;शालेय जीवनात पाहिलेली 'ती' अत्यंत भ्रष्ट ग्रामपंचायत


पुणे - मी १९८९ साली सक्रीय राजकारणात आलो. राज्यात फिरलो, अनेक गावागावात फिरलो. सगळ्या ठिकाणी मला दुरावस्था दिसली ती स्वच्छतेची, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गावागावातील स्वच्छता आणि ग्रामंचायतीच्या कारभारावर भाष्य केलं.पुण्यात मनसेचे ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला, त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे बोलत होते. त्यावेळी, एका ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराचा उल्लेख करताना, राज ठाकरेंनी शोले पिच्चरची आठवण सांगितली.

 

मध्यंतरी मी एका गावात गेलो होतो. तिथे अत्यंत वाईट अवस्था होती. गावात एक टाकी होती. माझ्या शालेय जीवनात मी अत्यंत भ्रष्टाचारी ग्रामपंचायत पाहिली ती म्हणजे रामगडची, माहितीय ना रामगड असे म्हणत उपस्थितांना प्रश्नही केला. त्यानंतर, शोले सिनेमातील रामगड असे राज यांनी म्हटले. त्या गावातील प्रमुख, सर्वात श्रीमंत ठाकूर त्याच्या घरात लाईट नाही. त्या गावात गेल्यावर रामगडची टाकी आठवली. कारण ठाकूरच्या घरात लाईट नाही, मग त्या टाकीत पाणी कुठून नेणार आहे?, असा मिश्कील टोला राज यांनी लगावला. तसेच, हे चित्र तुम्हाला बदलायचे आहे, असे आवाहनही उपस्थितांना केले.

 

तुमचे गाव तुम्ही चांगले ठेवा. गावचे वातावरण बदला. गावातील माताभगिनी महिला त्यांना राहावसे वाटले पाहिजे. तुम्हाला गावात बोलवावं वाटलं पाहिजे असं वातावरण करा. ज्यांनी तुम्हाला मतदान केले नाही त्यांचीही कामे करा. कुणावरही सूड उगवू नका. जर तुम्ही वातावरण चांगले केले तर त्या गावातून तुम्हाला कुणीही घालवू शकत नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा बदलू शकत नाही असं राज ठाकरेंनी सांगितले.

 

राज ठाकरे देणार ५ लाखांचे बक्षीस

 

गावातील नागरिकांची बैठक बोलवा. गाव स्वच्छ कसं ठेवायचे याबाबत चर्चा करा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातात जी ग्रामपंचायत असेल त्यातील जी सर्वात स्वच्छ ग्रामपंचायत असेल तिथे मी स्वत: येऊन ग्रामपंचायतीसाठी ५ लाखांचा निधी देईन. इतरांसारखी फक्त घोषणा करत नाही. जे तुमच्या आवाक्यात असेल त्या सर्व गोष्टी करा. लोकांचे मतरुपी आशीर्वाद मिळालेत त्यामुळे चांगले काम कायम तुमच्या हातून घडलं पाहिजे. लोकांना समाधानी ठेवा. तुम्ही इतक्या लांबून इथं आलात मला दर्शन दिले त्याबद्दल तुमचे आभारी आहे असंही राज ठाकरेंनी म्हटलं.

 

२२ तारखेला कारसेवकांचं स्वप्न पूर्ण होतंय...

 

२२ तारखेला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्याच्या बाकीच्या भानगडीत जाऊ नका. तिथे राम मंदिर होण्यापेक्षा ज्या कारसेवकांनी तिथे जे कष्ट घेतले त्यांनी स्वप्न पाहिले ते स्वप्न २२ जानेवारीला पूर्ण होतंय म्हणून जिथे जिथे तुम्हाला शक्य होईल तिथे लोकांना त्रास न होता महाआरती करा, पूजा करावी असं आवाहनही राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केले.


PostImage

Kunal kannake

Sept. 8, 2023   

PostImage

रोज धावायला जाण्याचे फायदे काय? आणि तुम्ही धावायला जात नसाल …


रोज धावायला जाण्याच्या अनेक फायदे आहेत. तुमच्या धावण्याचे काही फायदे:

रोज धावायला जाण्याचे फायदे मनस्से आणि शारीरिक आरोग्यासाठी महत्वपूर्ण आहेत. धावणे तुमच्या हृदयगत तंतूंची सेवा करते, तंतूंच्या स्थायिता विकासासाठी मदत करते, पाचन तंतूंची क्रियाशीलता वाढवते, चर्चेची क्षमता वाढवते आणि चिंता कमी करते. धावण्याच्या वायरोलोजिकल आणि न्यूरोलोजिकल फायद्यांसाठी प्रमुख आहे.

धावण्याचे काही फायदे:
1. हृदयरोगांवर प्रभाव: धावणे हृदयस्थायी ठरवून तसेच वायरोलोजिकल वर्गांमध्ये हृदयरोगांच्या आशापाशांच्या जोखमांवर कमी करू शकते.
2. मानसिक स्वास्थ्य: धावणे मानसिक तंतूंची क्रियाशीलता वाढवते, चिंता आणि डिप्रेशनची कमी करते.
3. वयोमानानुसार आरोग्यमंत्रीत्व: धावणे वयोमानानुसार आरोग्यमंत्रीत्व वाढवते, तसेच अनेक आरोग्यवर्धनांसाठी मदतकारक आहे. 

4. बलवर्धन: धावाने तुमच्या सार्वजनिक शारीरिक क्षमतेला वाढवतात.

5. मानसिक स्वास्थ्य: धावण्यातल्या आत्मविश्वास वाढवतो आणि तंतूसमर्पणाच्या अभ्यासातून मानसिक स्वास्थ्य वाढतो.

6. स्थैर्य: धावाने सजीव वायुसंचरण, मानसिक स्थिरता आणि समयप्रबंधन क्षमतेच्या विकसनात मदतीला आहे.

7. ओढणारी तंतूंची नाशक: धावाने तुमच्या शरीराला किंवा मस्तिष्काला अनेक किडकों, विषाणूंच्या किंवा अन्य किडकोंच्या प्रतिषेधकीचे नाशक आहे.

8. आत्मविश्वास: धावाने तुमच्या आत्मविश्वासाची वाढ झाली पाहिजे, कारण तुम्ही स्वयंच्या क्षमतेच्या अधिक अवगुण वाचल्यास तुम्हाला विश्वास असतो.

7. स्वस्थ तंतूंचा प्रबंधन: धावाने तुमच्या तंतूंचा प्रबंधन करताना आपल्या शारीरिक स्वास्थ्याची काळजी घेता, ज्यामुळे संक्रमणांच्या आपल्या संरक्षणाची काळजी घेता.

9. सामाजिक आणि सापेक्षता नेटवर्क: धावाने तुम्हाला अनेक सामाजिक आणि सापेक्षता नेटवर्क विकसवतात, ज्यामुळे तुम्हाला सामाजिक रुग्णांच्या सहाय्याची किंवा मदतीची काळजी घेता.

10. मनोरंजन: धावाने मनोरंजनाची अवसरे तुमच्या जीवनात घेतली पाहिजे, आणि तुम्हाला आनंद आणि सुख देतात.

11. आत्मविकास: धावाने आत्मविकास किंवा स्वयंशिक्षणाच्या अवसरे पुर्न करण्यात मदतीला आहे.

रोज धावायला जाण्यामुळे तुम्हाला शारीरिक, मानसिक, आणि सामाजिक दृष्ट्या सापेक्षता फायदे होतील.


PostImage

Pankaj Lanjewar

Aug. 9, 2023   

PostImage

अल्पवयीन मुलीचा वेश्याव्यवसाय संबंधी व्हिडिओ वायरल करू नका


*अल्पवयीन मुलीचा वेश्याव्यवसाय संबंधी व्हिडिओ  वायरल करू नका : रविंद्र शिंदे*

*या प्रकरणी कुणीही व्हिडिओ वायरल केला असल्यास गुन्हा नोंदवून कडक कारवाई करावी; पोलीस विभागाकडे मागणी*

भद्रावती : सोशल मीडिया वर वरोरा मधील एका अल्पवयीन मुलीचा वेश्याव्यवसाय संबंधी व्हिडिओ फिरत असून कोणत्याही अल्पवयीन मुलीचा व्हिडिओ काढणे, इतरांना पाठवणे, साठवणे कायद्याने गुन्हा आहे. 

याबाबत शिवसेना (उबाठा) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी आवाहन केले आहे की, सदर व्हिडिओ ज्यांच्याकडे असेल त्यांनी सोशल मीडियावर कुणालाही पाठवू नये आणि मोबाईल मधला व्हिडिओ डिलीट करावा.

सर्व सामाजिक संस्था, समाजातील सर्व घटक तसेच सुजान भारतिय नागरीक, यांनी लक्ष देवून असा प्रकार रोखावा असेही या आवाहना दरम्यान रविंद्र शिंदे म्हणाले.

या प्रकरणी ज्या कुणी सदर खोडसाळ प्रकार करून सोशल मीडिया वर त्या अल्पवयीन मुलीचा वेश्याव्यवसाय संबंधी व्हिडिओ  वायरल केला असेल, त्याच्यावर गुन्हा नोंदवून कड़क कारवाई करावी, असे रवींद्र शिंदे यांनी म्हटले आहे.
--------------------------------------
*एक अल्पवयीन मुलीचा व्हिडीओ वायलर केलेला जो कुणीही व्यक्ती असो, ज्यांनी हा घाणेरडा प्रकार केला आहे, समाजाचे हित लक्षात घेता, एक सुजान नागरीक म्हणून यात कोणीही व्यक्ती असो यांचे विरोधात मी कायदेशीर तज्ञांचे मार्गदर्शन घेवुन  कारवाई करणार, भविष्यात असे प्रकाराची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती नको : रविंद्र श्रीनिवास शिंदे*