PostImage

Today Latest News

April 11, 2024   

PostImage

Rape Case : भरदिवसा मोलकरणीवर केला बलात्काराचा प्रयत्न


 Rape Case : नागपूर खुनांच्या मालिकेने उपराजधानी हादरलेली असताना बुधवारी एका महिलेचे तोंड दाबून तिला झुडपात नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सोनेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी सकाळी १०:१५ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली असून, महिलेने प्रतिकार करून आरोपींच्या तावडीतून सुटका करून घेतल्यामुळे अनर्थ टळला. या प्रकरणात सोनेगाव पोलिसांनी त्या दोन्ही आरोपींना गजाआड केले आहे.

कुबेरसिंग बागेशरण (वय 30 ) आणि सुनीलकुमार रूपशाह (30, दोघे रा. अमवार, ता. दुद्धी, जि. सोनभद्र उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी गेल्या सात वर्षांपासून शहरात मजुरीचे काम करतात. सोनेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणारी 35 वर्षीय महिला घरकाम करते. तिचे पती 2012 मध्ये अपघातात मृत्यू पावले आहे. तिला दोन मुले आहेत. पतीच्या मृत्यूनंतर ती आईवडील आणि भावाकडे राहते. घरकाम करून ती आपली उपजीविका आणि मुलांचे पालनपोषण करते.

बुधवारी सकाळी 10 :15  वाजता ती मिहान फर्स्ट सिटीत घरकामासाठी जात होती. रोजच्या पायवाटेने फोनवर काकूसोबत बोलत जात असताना पायवाटेत असलेल्या निर्जनस्थळी आरोपी कुबेरसिंग आणि सुनीलकुमार यांनी मागून येऊन महिलेचे तोंड दाबले. आरोपी तिला झुडपात उचलून नेत होते. परंतु, महिलेने आरडाओरडा करून जोरात प्रतिकार करीत आपली सुटका करून घेतली.

त्यानंतर महिलेने आरोपींच्या तावडीतून पळाली आणि जवळच्या  अपार्टमेंट गेली. तेथील सुरक्षा रक्षकाला तिने आपबिती सांगितली. तसेच तिच्या भावाला, तेथे जमलेल्या लोकांनी व पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी परिसरात शोध घेऊन दोन्ही आरोपींना गजाआड केले. या प्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून सोनेगाव ठाण्याचे उपनिरीक्षक किशोर चुटे यांनी आरोपींविरुद्ध कलम 341, 354, 34 नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.