PostImage

News mh33 live

April 16, 2024   

PostImage

शेतकरी पुत्राने काढली बैलगाडीतून लग्नाची वरात


शेतकरी पुत्राने काढली बैलगाडीतून लग्नाची वरात

 

 

 

 

कोरपना तालुक्यातील नारांडा मधील राजेश मोहूले हा राजुरा येथे एका छोट्याशा दुकानात नोकरी करून आपला उदरनिर्वाह करत होता हा युवक रमान नगर राजुरा येथे स्थायी झालात त्यांचे विवाह भुरकुंडा येथील एका पूजा शेंडे या युवतीशी जुडला मात्र त्यांनी आपला हा विवाह हा समाजाला एक आदर्श ठरणार असावा व जुन्या रूढी परंपरेनुसार विवाह करण्याचे ठरविले तेव्हा एक आगळीवेगळी वरात पहायला मिळाली. शेतकरी पुत्राने घोड्यावरून नव्हे तर चक्क बैल गाडीतून वरात काढली. या वरातीची चर्चा राजुरा शहरात व तालुक्यात सुरू आहे.

 एक आगळीवेगळी वरात पहायला मिळाली. शेतकरी पुत्राने चक्क बैलगाडीतून वरात काढली. यावेळी बैलगाडीची आकर्षक सजावट करण्यात आली होती. विशेष म्हणजे बैलगाडीतून वरात काढण्यात आली तेव्हा डफळे देखील लावण्यात आले . वऱ्हाडी मंडळी डफडेच्या तालावर चांगलेच थिरकताना दिसते. या आगळ्या -वेगळ्या वरातीची तालुक्यात चर्चा रंगल्याचे पहायला मिळाले. ग्रामस्थांकडून नवरदेवाचे कौतुक करण्यात येत आहे.

अनेक राजकीय मंडळींनी त्या विवाह ला भेटी दिल्या त्यांचाच मोठे बंधू संतोष मोहुर्ले एका राजकीय (भाजपा)पक्षाचे पदाधिकारी असल्याने त्यांच्या या लग्नात अनेक राजकीय मंडळींनी हजेरी लावली


PostImage

VAINGANGA NEWS 24

July 24, 2023   

PostImage

अंधाधुंद गोळीबारात भाजयुमो सचिन डोहे यांची पत्नी पूर्वशा डोहे यांचा …


आताची मोठी बातमी...

 

राजुरा, २४ जुलै::- अज्ञात इसमाने केलेल्या अंधाधुंद गोळीबारात सौ. पूर्वशा सचिन डोहे यांचा विनाकारण मृत्यू झाला असुन ज्याच्यासाठी गोळ्या झाडल्या गेल्या त्या व्यक्तीलासुद्धा गोळी लागल्याने त्याला चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.

 

प्राप्त माहितीनुसार राजुरा येथील सोमनाथपूर वॉर्ड येथे राहणाऱ्या लल्ली नामक व्यक्तीला मारण्यासाठी अज्ञात व्यक्ती येत असल्याचे लल्ली ह्यांच्या लक्षात येताच तो रात्री 8 ते 8:30 च्या दरम्यान भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे ह्यांच्या घरात शिरला. तेव्हा मागावर असलेल्या मारेकऱ्यांनी त्याच्यावर अंधाधुंद गोळीबार सुरु केला. नेमक्या त्याच वेळी सौ. पूर्वशा डोहे या अंगणात आल्याने त्यांना गोळी लागून त्या जागीच कोसळल्या तर लल्लीच्या पाठीला गोळी लागली.

 

सदर घटना लक्षात येताच घरातील मंडळींनी शेजाऱ्यांच्या मदतीने दोघानाही तत्काळ उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सौ. पूर्वशा डोहे ह्यांना मृत घोषित केले तर गंभीर जखमी असलेल्या लल्ली ह्याला चंद्रपूर येथे हलविण्यात आले. सौ.पूर्वशा या भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे यांच्या पत्नी आहेत, घटना घडली त्यावेळेस सचिनचे काका राजेंद्र डोहे ह्यांचेसह बाहेर गेले होते. पुढील तपास राजुरा पोलीस स्टेशन करीत आहेत.