रत्नापुर ता.सिदेवाही जि.चंद्रपूर येथे नवरात्र उत्सवानिमित्त श्री गुरुदेव दुर्गा उत्सव मंडळ द्वारा आयोजित "नृत्यरंग २०२४ एकल, समूह व गरबा नुत्य स्पर्धा" कार्यक्रमाचे उदघाटन गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेव किरसान यांचे हस्ते संपन्न झाले. यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ.किरसान यांनी लोकसभा निवडणुकीत मोलाचे योगदान केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले
यावेळी सचिव महाराष्ट्र प्रदेश युवक महिला काँग्रेस कमिटी शिवानीताई वडेट्टीवार, मंडळाचे अध्यक्ष व तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी सिदेवाही रमाकांत लोधे, शहराध्यक्ष नवरगाव सुशांत पोहणे, नगराध्यक्ष लोनवाही भास्कर नन्नावरे, तालुका अध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी सीमाताई सहारे, उपसभापती दादाजी चौके, अनिलभाऊ लोणकर, सरपंच रत्नापूर सौ.नजिरीताई मेश्राम, उपसरपंच सौ.स्वातीताई लोणकर, पंकज उईके, श्रीकांत हेडाऊ, जगदीश गहाणे, विनोद निनावे, अजिज पासा पदाधिकारी, कार्यकर्ता व भक्तगण उपस्थित होते.
आलापल्ली येथे काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा खूप उत्तम रित्या पार पडला. सदर मेळाव्यात खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी उपस्थित राहुन लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्ष अधिक बळकट झाला असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत जनता सुद्धा काँग्रेस पक्षासोबत राहून सत्तेत असलेल्या भ्रष्ट सरकारला उखडून फेकणार आहे. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी प्रामुख्याने विरोधी पक्ष नेते ना. विजयभाऊ वडेट्टीवार, जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली महेन्द्र ब्राम्हणवाडे, माजी आमदार पेंटारामा तलांडी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, जिल्हाध्यक्ष आदिवासी विभाग काँग्रेस कमिटी गडचिरोली हनुमंत मडावी, बानय्या जंगम,जिल्हाध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी गडचिरोली कविता मोहरकर,शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली सतीश विधाते, जिल्हाध्यक्ष परिवहन विभाग काँग्रेस कमिटी गडचिरोली
रुपेश टिकले,जिल्हाध्यक्ष अ. जा. विभाग रजनीकांत मोटघरे,सगुणा तलांडी, सोनाली कंकडालवार, सुरेखा आत्राम, सुरेखा गोडशेलवार, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी अहेरी डॉ. निसार हकीम, प्रमोद गोटेवार, बाळू बोगामी, भास्कर तलांडे, मुश्ताक हकीम, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी सिरोंचा सतिश जवाजी, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी मुलचेरा रमेश गंपावार,तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी भामरागड लक्ष्मीकांत बोगामी सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिनी व हजारोच्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.
*कंकडालवारांचे "कौतूक",आत्रामांवर "निशाना"....! वडेट्टीवार म्हणाले,अहेरी मतदारसंघात काॅग्रेसचाच उमेदवार*
आलापल्ली : अहेरीतील पितापुत्री एकच आहेत,हे धोकेबाज अनं खोकेबाजही आहेत.लोकांना मुर्ख बनविण्यासाठी त्यांची हि सर्व नौटंकी आहे.राजनगरी असलेल्या या भूमीला खडडेनगरी करणा-यांना आता त्यांची जागा दाखवून दया.अहेरी विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक अजय कंकडावार यांच्या नेतृत्वात अहेरी विधानसभा मतदारसंघ हा काॅग्रेस पूर्ण ताकदीनिशी लढेल अनं जिंकेलही.एकीकडे कंकडालवार यांचे कौतूक करतांना दुसरीकडे त्यांनी आत्राम परिवारावर निशाणा साधला. आता आपल्याच भागातील काॅग्रेसचा सामान्य कार्यकर्ता आमदार होणार आहे.राज्यात महाविकास आघाडीचच सरकार येणार आहे.अशावेळी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागण्याच्या सुचना राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिल्या.आज दि. २९ रोजी अहेरी येथे काॅग्रेसचा कार्यकर्ता मेळावा झाला यावेळी ते बोलत होते.
काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे,अहेरी विधानसभा मतदारसंघाचे काॅग्रेसचे समन्वयक अजय कंकडालवार,हनुमंतू मडावी यांच्यासह अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.आज काॅग्रेसने अहेरीत जोरदार शक्तीप्रदर्शन केले.गेल्या दिवसात याठिकाणी दोन मोठया सभा झाल्या.पण आज झालेला मेळाव्यातील गर्दी हि या मतदारसंघात काॅग्रेसच विजयी ठरणार हे दाखविणार असल्याचे व वडेट्टीवार म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत काॅग्रेसने अहेरी मतदारसंघात मोठया मतांची आघाडी घेतली.राज्यात यावेळी महाविकास आघाडीचेच सरकार येणार आहे.
अशावेळी आता अहेरी विधानसभा मतदारसंघात परिवर्तन आवश्यक आहे.आपला उमेदवार कोण असेल हे पक्षश्रेष्ठी ठरवितील पण या भागातील भूमीपूत्रच आता आमदार होणार आहे.हि काळया दगळावरची रेघ आहे.भाजपवाले संविधान बदलवायला निघाले होते.मोठया तो-यात चारशे पार चा नारा देत होते.पण देशातील जनतेनी यांचा 56 इंच वाला सिना 32 वर आणून ठेवला.यांची नौंटकी आता लोकांच्या लक्षात आली आहे.हे सरकार पुंजीवांदयाचे आहे.अडाणीला एवढे देउनही यांचे समाधान झाले नाहीत्यामुळे आता त्यांना शाळाही देण्यात येत आहे.पण आम्ही महाराष्ट्राचा सातबारा अडाणींच्या नावे करू देणार नसल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.
कंकडालवारांचे कौतूक....
आपल्या भाषणातून वडेट्टीवार यांनी अहेरी विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक अजय कंकडालवार यांचे भरभरून कौतूक केले.अहेरी मतदारसंघात सत्ताधा-यांचे सामान्य नागरिकांकडे लक्ष नाही.त्यांच्या व्यथा,वेदंनाशी त्यांना काही घेणे देणे नाही.पण अजय कंकडालवार हे सामान्यांशी जुळून आहेत.गावागावातील अनेक गरीबांच्या मदतीसाठी ते नेहमीच तप्तर असतात.अनेक गरजूंना ते सातत्याने मदतीचा हात देत आहेत.अनेकांच्या सुखदुखात भावाप्रमाणे ते धावून जात आपली जबाबदारी पार पाडत आहेत.येथील जनता त्यांच्या पाठीशी आहे.त्यांच्याच नेतृृत्वात काॅग्रेसचे नेते या मतदारसंघात जिंकून येतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
*राजघराने सत्तेच्या मदमस्तीत व्यस्त, जनता मात्र त्रस्त : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मंत्री आत्राम यांच्यावर सडकून टीका
My khabar 24 : आलापल्ली येथे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ताचा पार पडला भव्य मेळावा
अहेरी, दि.२९ -गेल्या चाळीस वर्षापासून अहेरीतील राजघराणे सत्ता भोगत आहे.विकासाच्या बाबतीत माञ प्रचंड असंवेदनशीलता बाळगत आहे.क्षेत्रातील जनतेला मूलभूत सुविधांसाठी जीवाचे रान करावे लागत असून प्रचंड यातनामय जीवन जगावे लागत आहे.स्वार्थापोटी राजघराणे सत्तेच्या मस्तीत व्यस्त असताना क्षेत्रांतील जनता माञ वेदनांनी त्रस्त असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.मंत्री धर्मराव आत्राम यांच्या मतदारसंघात आलापल्ली येथे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा प्रसंगी अध्यक्ष म्हणून बोलत होते.राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीच्या खोटारड्या विकासाचे पितळ उघडे पाडले.
आयोजित मेळाव्यास गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान, गडचिरोली काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेन्द्र ब्राम्हणवाडे, माजी आमदार पेंटारामा तलांडी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, काँग्रेस आदिवासीं सेल जिल्हाध्यक्ष हनुमंत मडावी, भानय्या जंगम, महीला आघाडी काँग्रेस जिल्हाध्यक्ष कविता मोहरकर,सगुणा तलांडी,सोनाली कंकडालवार,सुरेखा आत्राम,सुरेखा गोडशेलवार, डॉ. निसार हकीम, प्रमोद गोटेवार, बाळू बोगामी, भास्कर तलांडे, मुश्ताक हकीम, सतिश जवाजी, गंपावर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारचा आपल्या शैलीतून खरपूस समाचार घेतला.एकीकडे जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवून बहिणीची लूट करून सुरू आहे दुसरीकडे कोट्यावधींची जमीन अदानीला विकता, राज्यातील उद्योग गुजरातला पळविण्यात हातभार लावता,अशा निर्दय आणि निष्ठूर सरकारला आगामी निवडणुकांमध्ये जनताच धडा शिकवेल, हे त्यांनी स्पष्ट केले. तसेच अन्न औषध प्रशासन मंत्राच्या क्षेत्रात लाखो रुपयांचा सुगंधी तंबाखू, गुटखा सापडतो आणि कारवाई होत नाही. राज्यात कायदा असा राबवला जातो का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. केवळ घरात सत्ता राहावी म्हणून मंत्री आत्राम व त्यांच्या मुली मध्ये राजकीय द्वंद हे सुनियोजित आहे, अशी टीका केली. अहेरी मतदारसंघ काँग्रेसला मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार असून राजघराण्यापेक्षा सामान्य कुटुंबातील व्यक्तीला निवडून द्या असे आवाहन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.
लोकसभेत दाखवलेली जागरूकता आणि संविधान वाचविण्यासाठी दिलेला लढा हीच काँग्रेस पक्षाची ताकद असून आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागून राज्यातील महायुतीच्या भ्रष्ट सरकारला हद्दपार करावे असे आवाहन गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी केले. तत्पूर्वी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी आपल्या प्रास्ताविकातून क्षेत्रातली जनतेच्या समस्या मांडल्या. तर काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे व कविता मोहरकर यांनी जिल्ह्यांतील कार्यकर्ता व पदाधिकारी यांना काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण तळागळ पर्यंत पोहचविण्याचे आवाहन केले. यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कार्यक्रमाकरिता गडचिरोली अहेरी विधानसभा क्षेत्रातील कानाकोपऱ्यातील काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
काल चंद्रपूर येथे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्ष हा जोमाने तयारीला लागला आहे
सध्या महाराष्ट्रात निवडणूकची तयारी जोमात सुरू आहे आणि सगळीकडेच त्याच प्रचार प्रसार चालू आहे अशातच
काल दिनांक 23 सप्टेंबर 2024 चंद्रपूर येथे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानेकाँग्रेस पक्ष जोमाने तयारीला लागला असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपुर येथील प्रत्येक विधानसभा क्षेत्राचा आढावा बैठक घेण्यात आली
या आढावा बैठकीला उपस्थित प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, महाराष्ट्र राज्य प्रभारी रमेशजी चैनीथला साहेब, विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, विधानसभा विरोधी पक्ष नेते विजयभाऊ वडेट्टीवार साहेब, खासदार प्रतिभाताई धानोरकर मॅडम, खासदार नामदेवराव किरसान साहेब, पदवीधर आमदार अभिजीत वंजारी साहेब, चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे साहेब, डॉ. आशिष कोरेटी, गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ ब्राह्मणवाडे, गोंदिया जिल्हाध्यक्ष दिलीपभाऊ बनसोड काँग्रेस कार्यकर्ते नीलकंठभाऊ गोहने अंकुशभाऊ गाढवे, सारंगभाऊ जांबुळे, श्रीकांतभाऊ आतला व ईतर मान्यवर उपस्थित होते*
https://chat.whatsapp.com/HqM9utVvLSwAcJ1h2kxYfO
दिल्ली/ (11) :- नीतीश कुमार की छवि अपने क्षेत्र में ओबीसी आरक्षण और जातीय जनगणना कराकर बिहार की राजनीति और राष्ट्रीय राजनीति में सुधार लाई, जिसका नतीजा उन्हें कांग्रेस चुनाव में मिला। लेकिन अब उनकी सबसे बड़ी जिम्मेदारी भारत सरकार के साथ गठबंधन सरकार बनाना और भाजपा और गठबंधन सरकार के साथ जल्द से जल्द ओबीसी समुदाय की जातीय जनगणना की मांग को पूरी करना होगा, अगर ऐसा नहीं किया गया तो बिहार क्षेत्र में उनकी राजनीति खत्म हो सकती है। और पूरे देश में उनकी छवि को भी नुकसान हो सकता है और पांच साल बाद ओबीसी जनगणना को लेकर बिहार की जनता और विपक्ष उनसे घिरा भी हो सकता है, अगर मांग पूरी नहीं हुई तो क्या नीतीश कुमार की ओबीसी जाति जनगणना की मांग पूरी होगी भारत से समर्थन वापस लेंगे, क्या भारत गठबंधन में शामिल होगा,
अगर भारत में ओबीसी गठबंधन भी जाति आधारित जनगणना नहीं करता है? अगर नीतीश भारत गठबंधन में शामिल नहीं हुए, तो संभावना है कि एक या दो साल में फिर से एक बार कांग्रेस चुनाव होने की संभावना है! अगर ऐसा कुछ नहीं हुआ तो क्या नीतीश कुमार के लिए बिहार की राजनीति पर ग्रहण लगना संभव है, क्योंकि क्या नीतीश कुमार देश और बिहार के ओबीसी लोगों की जातीय जनगणना की मांग को पूरा कर पाएंगे, ये तो वक्त ही बताएगा कि राजनीति का तरीका कब और कैसे बदलेगा, नीतीश कुमार की हर एक दाव पर देश की राजनीति का भविष्य जुड़ा है!
Raj Thackeray Speech: राज ठाकरे म्हणाले की, जेव्हा ते एखाद्यावर प्रेम करतात तेव्हा ते मनापासून करतात. नरेंद्र मोदींनी पंतप्रधान व्हावे, असे 2014 मध्ये सांगणारे महाराष्ट्रातील ते पहिले नेते असल्याचे ते म्हणाले.
मुंबईतील शिवाजी पार्क येथील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा देणार असल्याची मोठी घोषणा केली. आम्हाला राज्यसभा नको आहे आणि कोणत्याही प्रकारची तडजोडही नको आहे, असे राज ठाकरे म्हणाले. आम्ही भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला पाठिंबा देऊ कारण आमचा पाठिंबा फक्त पंतप्रधान मोदींना आहे.
'मी कोणाच्या हाताखाली काम करणार नाही'
यासोबतच कोणाच्याही हाताखाली काम करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांचे हे विधान महत्त्वाचे आहे कारण नुकतेच त्यांच्या भाजपसोबतच्या युतीची चर्चा महाराष्ट्रात रंगली होती. ते म्हणाले, "आता मी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा प्रमुख होणार असल्याची बातमी आली. मला जर प्रमुख व्हायचे असते तर मी फार पूर्वीच प्रमुख झालो असतो. मी फक्त माझ्या पक्षाचा प्रमुख राहीन. मी निवडणूक लढवली तर मी सांगितल्यावर निवडणूक लढवीन.
अमित शहा यांची भेट घेऊन काय बोलले?
राज ठाकरे म्हणाले, "अनेक दिवसांपासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस मला सांगत होते की आपण एकत्र यायचे आहे. पण कसे यावे हे मला समजत नव्हते. म्हणून मी अमित शहा यांच्या भेटीची वेळ मागितली."
यासोबत ते म्हणाले की, "2014 मध्ये मी महाराष्ट्रातील पहिला नेता आहे ज्याने नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत, असे सांगितले होते. जर मी कोणावर प्रेम करत असेल तर ते मी मनापासून करतो. 2014 मध्ये मी नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला होता. 2019 मी विरोध केला कारण मी त्यांच्या भूमिकेशी सहमत नाही."
उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला
आपल्या भाषणात मनसे प्रमुखांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले, "उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ज्या प्रकारची टिप्पणी करतात ती माझी भाषा नाही. कारण मला सत्ता नको होती. पण उद्धव ठाकरेंनी स्वार्थासाठी सर्व काही केले. सत्तेबाहेर फेकले गेले."
'विधानसभा निवडणुकीची तयारी करा'
विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले. ते म्हणाले, "महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना माझी विनंती आहे की, एक चांगली संघटना निर्माण करा. तुम्ही विधानसभेची तयारी सुरू करा."
झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) ने चंपाई सोरेन यांना राज्याचे पुढील मुख्यमंत्री म्हणून निवडले आहे. विद्यमान मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीच्या अटकेनंतर राजीनामा दिल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
चंपाई सोरेन हेमंत सोरेन यांचे जवळची नातेवाईक आहेत. ते JMM च्या सरायकेला विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. कॅबिनेट मंत्री म्हणून ते हेमंत सोरेन सरकारमध्ये परिवहन, अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती आणि मागासवर्गीय कल्याण विभागाची जबाबदारी सांभाळत होत्या.
चंपाई सोरेन यांना 2005 मध्ये झारखंड विधानसभेवर प्रथम निवडून आल्या होत्या. त्यानंतर 2009 मध्ये ते आमदारही झाल्या. सप्टेंबर 2010 ते जानेवारी 2013 या काळात त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान, कामगार आणि गृहनिर्माण मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. ते जुलै 2013 ते डिसेंबर 2014 या काळात अन्न व नागरी पुरवठा आणि परिवहन मंत्री होत्या.
काल बुधवारी इडीने झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जमीन घोटाळा प्रकरणी अटक केली.हेमंत सोरेन यांच्यावर 77 करोड रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप आहे. हेमंत सोरेनच्या अटकेनंतर त्यांची पत्नी कल्पना सोरेन हे मुख्यमंत्री होणार, अशी चर्चा चालू होती परंतु झारखंड मुक्ती मोर्चा ने चंपाई सोरेन यांना मुख्यमंत्री पदाचे कारभार सोपवले.
चंपाई सोरेन यांनी मुख्यमंत्री म्हणून निवडल्याबद्दल त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “हे एक मोठे आव्हान आहे. मी राज्याच्या विकासासाठी कठोर परिश्रम करेन.
2024 मधील लोकसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असून,त्याचे वारे व्हायला सुरुवात देखील झालेली आहे. आणि जर केंद्रात भाजपाचे सत्ता आली तर भाजपाचे ज्येष्ठ नेते मा.नितीनजी गडकरी हे पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार ठरू शकतात.
भारत देशाची लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असून देशात 2024 मधील निवडणुकींचे वारे वायला सुरुवात देखील झालेली आहे आणि समजा या निवडणुकीत जर भाजपाने पूर्ण बहुमताने केंद्रात सत्ता स्थापन करू शकले तर विदर्भातील उपनगरीचे खासदार म्हणून निवडून आले तर नितीनजी गडकरी पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार ठरू शकतात
देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी, आजच्या घडीला 73 वर्षाचे झालेले आहेत.आणि मोदीजी आता पंतप्रधान पदाचे उमेदवार न होता पक्षाचे प्रमुख प्रचारक बनवून मोलाची भूमिका पार पाडावे,असे महाराष्ट्रातील जनतेचे मत असून.मोदी साहेबांनी त्या मागणीची स्वीकार करावे,अशी जनतेची मागणी आहे.
नितीन गडकरी हे उत्तम नेते असून.एक मराठी माणूस देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले तर,महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस या निर्णयाचा स्वागत करेल. भाजपामध्ये नितीन गडकरी चे कार्य आजपर्यंत मोलाचे ठरले असून,तसा ठसा देखील त्यांनी उमटविला आहे,असं त्यांच्या कार्यामधून दिसून येते.
उत्तम वक्ता आणि रोखठोक विचार मांडण्याचे कार्यशैली हे त्यांच्या कार्यपद्धतीचा आकर्षण असून.तळगाळातील जनतेचे कार्य करणारा नेता,अशी त्यांची ओळख आहे.म्हणून केंद्रात जर भाजपाची सत्ता आलीस तर देशाचे पंतप्रधान म्हणून झालेली निवड सार्थ ठरवित जनतेच्या आशा,आकांक्षाचे पालन करण्यात गटकरी सक्षम ठरतील.
सीनियर सिटीजन नुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वयस्कर नेते ठरू शकतात.त्यामुळे त्यांनी ऐच्छिक निवृत्ती स्वतःहून जाहीर करायला पाहिजे,कारण त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री पदभूषण, देशाचे पंतप्रधान पद देखील भूषविलेले आहेत.म्हणूनच स्वखुशीने,आपली जबाबदारी पक्षातील वजनदार नेते आणि मराठी माणूस म्हणून महाराष्ट्राला एखदा संधी द्यावी आणि विदर्भ नगरीचे नेते म्हणून नितीन गडकरी यांना पंतप्रधानपदी आरूड करावे.
आज पर्यंत भाजपाला मराठी माणसाने भरभरून साथ दिली आहे.म्हणून मराठी माणसाला एक संधी देऊन मराठी माणसातले गुण-सदगुण आणि मराठी परंपरा आत्मसात करायला वाव मिळेल आणि नितीन गडकरी उत्तम पर्याय भाजपा समोर आहे,त्यांनी तो पर्याय निवडावं.
मागील महिन्यात छत्तीसगड,मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि भारतीय जनता पक्षाला मिळालेला घवघवीत यश याचा जर सारासार विचार केला तर,हळूचपणे डोक्यात कल्पना तरंगायला सुरुवात होते.हा सर्व प्रकार ईव्हीएम मशीनचाच आहे बाकी सर्व काही नाही आणि समोरच्या निवडणुका होणार आहेत त्या सर्व अशाच प्रकारे होणार,असे मत देशातील अनेक राजकीय पुढारी व्यकत करीत आहेत.
भारतीय जनता पक्षाने आजपर्यंत ज्या काही निवडणुकाजिंकल्या त्या सर्वच्या सर्वच ईव्हीएम मशीनमुळे जिंकल्या,असे म्हणता येणार नाही. ज्यावेळी २०१४ मध्ये नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाले होते त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीची जबरदस्त हवा निर्माण झाली होती आणि आधीच्या सरकारला जनता देखील कंटाळली होती,हेही तितकच खरं आहे.परंतु आता मोदी लाट वगैरे काहीच नाही तरी परंतु भाजपाने जो निर्विवाद यश संपादन केला त्यावरून असं लक्षात येते की,दाल में कुछ काला है.
मध्यप्रदेश,छत्तीसगड,राजस्थान या राज्याच्या निवडणुका पार पडल्या यांत भाजपाने या तीनही राज्यांमध्ये भरभरून यश संपादन करून काँग्रेस पक्षाला चारी मुंड्या चित करण्यात, भाजप वरचढ ठरला. राजस्थानमध्ये परिवर्तन होणार होता,हे सांगायची गरज नाही आणि तेच झाले इथपर्यंत ठीक आहे परंतु मध्य प्रदेश,छत्तीसगड राज्यांचा विचार करायला गेलो तर या दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेस पक्ष सत्तेत येईल,असा अंदाज होता आणि त्या राज्यातील वातावरण काँग्रेस पक्षाच्या बाजूने होता परंतु या दोन्ही राज्यांमध्ये माशी एकाच वेळी शिंकली आणि होत्याच नव्हतं झालं.
आता काही दिवस गेले की लोकसभेच्या निवडणुका जाहीर होतील देशातील सर्वच राजकीय पक्ष आपाआपली ताकद पणाला लावण्याचा प्रयत्न करतील,यात काही शंकाच नाही परंतु देशात ज्या काही राजकीय घडामोडी निर्माण होत आहेत, त्यावर लक्ष केंद्रित करणे फार महत्त्वाचे होऊन गेला आहे.खरोखर ईव्हीएम मशीन मध्ये जर घोळ निर्माण झाला असेल तर देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी तिसऱ्यांदा विजय संपादन करू शकतात आणि एकदा जर पुन्हा मोदीनी विजय संपादन केले तर विरोधी पक्ष पुन्हा एकदा चारही मुंड्या चीत.
नरेंद्र मोदी यांची पूर्वीसारखी अनुकूल परिस्थिती आजच्या घडीला उरलेली नाही आणि या गोष्टीला स्वतः नरेंद्र मोदी नाकारू शकत नाही.कारण त्यांनी कितीही विकासाच्या वलग्ना करीत असतील तरी पण सामान्य जनता महागाईने हवालदिल झालेली आहे आणि आजच्या घडीला परिवर्तनाची लाट असल्याचा वातावरण निर्माण झालेला आहे आणि ही वस्तुस्थिती स्वतः भाजपाचे राजकीय पुढारी सुद्धा नाकारू शकत नाही.तरीपण भाजपाने आत्ताच जाहीर करून टाकलंय,आबकी बार चारसौ के पार,म्हणजे विचार करा किती आत्मविश्वास मनात निर्माण झाला असेल.
राम मंदिर आस्थेचा मुद्दा आहे आणि सर्वांना तो ठाऊक आहे.जो तो आप आपल्या जाती धर्माचा अभिमान बाळगतो आणि बाळगायलाच पाहिजे.परंतु देशातील गोरगरीब जनता महागाईने होरपळतो आहे,याचे सोयरसुतक केंद्रातील सत्ताधारी पक्षाला आहेच नाही.तरीपण चारसौ के पार चा नारा देण्यात सरकार मग्न आहे. म्हणूनच मनात शंका निर्माण होतात,कही ईव्हीएम मशीन की तो चाल नही है.पुढील निवडणुका ईव्हीएम मशीनद्वारे न होता बॅलेट पेपर नीच घ्यायला पाहिजे,अशी जनतेची मागणी आहे.
लेखक : रमेश चौखूंडे
नई दिल्ली: इलेक्टोरल बॉन्ड स्कीम (Electoral Bonds Case) मामले में 2 नवंबर को सुप्रीम कोर्ट (Supreme Court) में तीसरे दिन की सुनवाई हुई. इलेक्टोरल बॉन्ड से राजनीतिक चंदे (Political Parties Funding) को लेकर सुप्रीम कोर्ट ने चुनाव आयोग से जानकारी मांगी है. अदालत ने कहा कि चुनाव आयोग सितंबर 2023 तक राजनीतिक पार्टियों को मिले चंदे का डेटा मुहैया कराए. सुप्रीम कोर्ट ने कहा कि चुनाव आयोग (Election Commission) SBI और राजनीतिक दलों से फंड का डेटा ले. शीर्ष अदालत ने चुनाव आयोग से पूछा कि आदेश के बावजूद 2019 के बाद कोई डेटा क्यों नहीं दाखिल किया गया? सुनवाई के बाद अदालत ने फैसला सुरक्षित रख लिया है.
अदालत ने चुनाव आयोग से हर राजनीतिक दलों को 30 सितंबर 2023 तक मिले फंड का डेटा मांगा है. सुप्रीम कोर्ट ने चुनाव आयोग को याद दिलाया कि 2019 में एक आदेश पारित किया गया था, जिसके तहत चुनावी बांड के माध्यम से फंड लेने वाले सभी राजनीतिक दलों की डिटेल ECI को देने थी. सुनवाई के अंत में सुप्रीम कोर्ट ने चुनाव आयोग (ECI) से पूछा कि आदेश के बावजूद 2019 के बाद कोई डेटा पेश क्यों नहीं किया गया?ECI पार्टियों या SBI से मांगे डेटा- SC
अदालत ने कहा कि हम 2023 तक चुनावी बांड के जरिए विभिन्न दलों को मिले डोनेशन के डेटा पर एक नज़र डालना चाहते हैं. जस्टिस संजीव खन्ना ने कहा कि आपके पास आज तक 2023 तक का डेटा होना चाहिए था. CJI ने चुनाव आयोग को जरूरत पड़ने पर भारतीय स्टेट बैंक (SBI) और राजनीतिक दलों से डेटा इकट्ठा करने के लिए कहाअदालत में क्या हुई बहस?
चुनाव आयोग के वकील अमित शर्मा ने कहा कि सारी जानकारी सीलबंद लिफाफे में है. हमने भी वो लिफाफा नहीं खोला है. आप ही उसे खोल सकते हैं. हम नहीं. हमने मंत्रालय को दो चिट्ठियां लिखी हैं. सॉलिसिटर जनरल ने भी कहा कि RBI और ECI के बीच बैठकें हुई हैं. उनमें सर्व सम्मत निर्णय लिए गए.
इस पर जस्टिस खन्ना ने पूछा कि कितने बॉन्ड्स आए? इसकी जानकारी तो आपको होगी? इस पर अमित शर्मा ने हामी भरी. जस्टिस खन्ना ने पूछा कि मार्च 2023 तक का कोई आंकड़े आप हमें दे सकते हैं? अमित शर्मा ने कहा कि 2021 में सुप्रीम कोर्ट ने ही एक आदेश पारित किया गया था, क्योंकि कोर्ट ने ही कहा था कि रिकॉर्ड रखने की जरूरत नहीं है. लिहाजा हमारे पास वो आंकड़ा नहीं है. क्योंकि आयोग उसे मेंटेन नहीं करताजस्टिस खन्ना ने कहा कि आप जब कोर्ट आ रहे थे, तो आपके पास आंकड़ा होना चाहिए था. हमने भी ऑर्डर देखा है. हमें लगा था कि आप डेटा के साथ आएंगे. क्या आपके पास मार्च 2023 तक का कोई डेटा है? इसपर अमित शर्मा ने कहा कि डेटा तो नहीं दिया जा सकता, लेकिन पार्टियों द्वारा जमा कराए गए इकोनॉमिक और टैक्स रिकॉर्ड दिखाए जा सकते हैं. ये रिकॉर्ड्स पार्टियां वित्तीय वर्ष की समाप्ति के छह महीने बाद आयोग के पास भेजती हैं. हमारे पास तो इलेक्टोरल बॉन्ड्स की कुल बिक्री का हिसाब है.
इसपर CJI ने कहा कि आपके पास हर पार्टी को मिलने वाले बॉन्ड्स और चंदे का हिसाब होना चाहिए. हमें इसका डेटा दीजिए. अब तो वित्तीय वर्ष खत्म हुए छह महीने हो चुके हैंकपिल सिब्बल ने भी रखी दलीलें
कपिल सिब्बल ने रिजॉइंडर में कहा कि कॉरपोरेट सत्तारूढ़ दल को बड़ा चंदा देते हैं. बाकी को मामूली. सरकार से वो फायदा उठाते हैं. पावर एंजॉय करते हैं. ये भी एक तरह का भ्रष्टाचार है. अगर भ्रष्टाचार खत्म करना है, तो उस स्कीम को फौरन बंद करना जरूरी है. वोट का अधिकार तो गुप्त है, लेकिन डोनर को जानकारी सबको होनी चाहिए. सत्तारूढ़ दल के साथ अन्य दलों को भीमामले में 4 याचिकाएं दायर
इस मामले की सुनवाई चीफ जस्टिस डीवाई चंद्रचूड़, जस्टिस संजीव खन्ना, जस्टिस बीआर गवई, जस्टिस जेबी पारदीवाला और जस्टिस मनोज मिश्रा की बेंच कर रही है. इस मामले में चार याचिकाएं दायर की गई हैं. इनमें कांग्रेस नेता जया ठाकुर और सीपीएम की पिटीशंस भी हैं... .
चिमूर प्रतिनिधी :-
कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांच्या शुभहस्ते चिमूर तालुक्यातील भिसी येथे वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजना सन - २०२२-२३ नगरपंचायत भिसी अंतर्गत असलेल्या स्मशानभूमी मध्ये सोयी-सुविधा, सौंदर्यीकरण आणि अत्यावश्यक बांधकामाचे भूमिपूजन संपन्न झाले. (कामाची किंमत: १९१.८१ लक्ष रुपये) यावेळी आमदार बंटीभाऊंनी भूमिपूजन स्थळी उपस्थित मान्यवरांसह कुदळ मारून व फलकाचे अनावरण करून बांधकामाचा शुभारंभ केला.
या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजपा तालुका महामंत्री प्रशांत चिडे, भाजपा नेते गोपालभाऊ बलदुवा, भाजपा ज्येष्ठ नेते घनश्यामभाऊ डुकरे, ठोंबरे काका, गरिबाजी निमजे, माजी भाजयुमो तालुकाध्यक्ष किशोर मुंगले, भाजपा जि.प. सर्कल प्रमुख निलेश गभणे, माजी जि.प. सदस्या ममताताई डुकरे, माजी पं.स. सदस्य प्रदिप कामडी, भाजपा शहराध्यक्ष पंकज गाडीवार, लीलाधर बन्सोड, अभय मुंगले, रामू जाजू, राजू बानकर, रवि लोहकरे, विनोद खेडकर, किशोर नेरलवार, विनोद खवसे, बंडू तुंबेकर, प्रशांत जुमडे, आकाश ढबाले, अमोल कटारे, दीपाली बानकर, मंजुषा ठोंबरे, शोभाताई उघडे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
चिमूर प्रतिनिधी :-
कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांच्या शुभहस्ते चिमूर तालुक्यातील भिसी येथे पशुवैद्यकिय दवाखाना श्रेणी-२ व संकुलाच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडला. (कामाची किंमत - रूपये ६२.४५ लक्ष) यावेळी आमदार बंटी भांगडियानी सर्वप्रथम श्री गुरुदेव सेवा मंडळ येथे वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या आसनाचे व श्री संत गजानन महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले आणि कार्यक्रमस्थळी उपस्थित मान्यवरांसह फीत कापून दवाखान्याच्या इमारतीचे लोकार्पण केले. दरम्यान, आमदार बंटीभाऊंचे विविध मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ भेट देऊन स्वागत करण्यात आले.
या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी प्रामुख्याने जि.प. बांधकाम उपविभागीय अधिकारी माथनकर, पशुवैद्यकीय अधिकारी चिमूर एस. के. राऊत मॅडम, डॉ. एस. सी. देशमुख मॅडम, बिडीओ राठोड तसेच, भाजपा तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजपा तालुका महामंत्री प्रशांत चिडे, भाजपा नेते गोपालभाऊ बलदुवा, भाजपा ज्येष्ठ नेते घनश्यामभाऊ डुकरे, ठोंबरे काका, गरिबाजी निमजे, माजी भाजयुमो तालुकाध्यक्ष किशोर मुंगले, भाजपा जि.प. सर्कल प्रमुख निलेश गभणे, माजी जि.प. सदस्या ममताताई डुकरे, माजी पं.स. सदस्य प्रदिप कामडी, भाजपा शहराध्यक्ष पंकज गाडीवार, लीलाधर बन्सोड, अभय मुंगले, रामू जाजू, राजू बानकर, रवि लोहकरे, विनोद खेडकर, किशोर नेरलवार, विनोद खवसे, बंडू तुंबेकर, प्रशांत जुमडे, आकाश ढबाले, हर्षल डुकरे, अमोल कटारे, दीपाली बानकर, मंजुषा ठोंबरे, शोभाताई उघडे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
उदया चिमूर येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य जन आक्रोश मोर्चा
सर्व समाजबांधवांनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन भंते धम्मचेती यांनी केले आहे
चिमूर प्रतिनिधी :-
उदया चिमूर येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर १८ ऑक्टोंबर २०२३ ला दुपारी १२ ते ५ वाजेपर्यत मोर्चा प्रारंभ होणार असून, सदर मोर्चा संविधान चौक, नविन पोलीस स्टेशन जवळून निघणार असून, या मोर्च्या चे मार्गदर्शक भदन्त ज्ञानज्योती महाथेरो संघारामगिरी, ताडोबा अभयारण्य यांच्या मार्गदर्शनात निघणार आहे.
महाराष्ट्रातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त, अल्पसंख्यांक शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, बेरोजगार व शासकीय निमशासकीय तसेच खाजगी आस्थापनेतील सर्व कर्मचारी सेवकांच्या प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच भारतीय लोकशाही वाचवण्यासाठी "ईव्हीएम हटाव, संविधान बचाव'" या विषयावर भव्य मोर्चाचे चिमूर उपजिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजन करण्यात आले आहे. तरी मोर्चाला संविधान मानणाऱ्यांना लोकांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भदन्त ज्ञानज्योती महाथेरो संघारामगिरी, ताडोबा अभयारण्य व भंते डॉ. धम्मचेती यांनी केले आहे.
*या मोर्चाचे प्रमुख मागण्या*
भारतीय निवडणूक प्रक्रिया बॅलेट पेपरवर घेण्यात यावी. तीन पिढ्यांची अट रद्द करून जबरानजोत धारक शेतकन्यांचे तात्काळ पट्टे वाटप करावे. के.जी. ते पि.जी. शिक्षण मोफत करण्यात यावे. ६२ हजार शासकीय शाळांचे खाजगीकरण रद्द करावे. सर्व जातीची जातनिहाय जनगणना करण्यात यावी. दिनांक ६ सप्टेंबर २०२३ रोजी कंत्राटीकरणाच्या शासन निर्णय रद्द करण्यात यावा. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे खाजगीकरण बंद करावे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर कराव्या. शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनेतील नियमित कर्मचान्यांना जुनी पेन्शन योजना त्वरित लागू करावी. शेतकन्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा. गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांना बारमाही सुरु करावे. दुष्काळग्रस्त नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी व देण्यात यावी. गोंडवाना विद्यापीठात झालेली बोगस प्राध्यापक भरती रद करावी. चिमूर तालुक्यातील अपात्र झालेल्या घरकुलांच्या याद्या तात्काळ जाहीर कराव्या. शेतकयांच्या कापसाला रू. १५०००/- हमीभाव द्यावा. चिमूर तालुक्यातील शेतातील पांदणरस्ते तात्काळ मंजूर करावेत. शेतकयांचे सर्व प्रकारचे कर्ज सरसकट माफ करावे. धान उत्पादन शेतकऱ्यांना रू. ५०००/- प्रति किंटल देण्यात यावे. शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा देण्यात यावा. संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेचे थकित हमे त्वरीत देण्यात यावे. असे मागण्या करण्यात आलेल्या आहेत.
मोर्चाचे प्रमुख मार्गदर्शक भदंत धम्मचेती संघारामगिरी, ताडोबा अभयारण्य असून सर्व समाजबांधवांनी या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
चिमूर शहर काँग्रेस कमिटी तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्व.लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतनिमित्त.....
चिमूर प्रतिनिधी :-
चिमूर शहर काँग्रेस कमिटी तर्फे राहुलजी गांधी यांच्या जनसंवाद यात्राचे ओीचित्य साधुन चिमूर शहरात दि. 2 ऑक्टोबर 2023 रोज सोमवारला इंदिरा गांधी चौक चिमूर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्व.लाला बहादुर शास्त्री यांच्या जयंतनिमित्त गुणवंत विद्यार्थी व राज्य लोकसेवा आयोग परीक्षा प्रावीण्यप्राप्तांचा प्रमुख मान्यवरांचा उपस्थित सत्कार सोहळा कार्यक्रम घेण्यात येत आहे.
या कार्यक्रम प्रसंगी देशभक्तीपर गीत संगीत कार्यक्रम स्वप्नील बन्सोड प्रस्तुत ऑर्केस्ट्रा आवाज मुझिकल नाईट कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. व या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.अविनाश वारजुकर सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. नामदेव किरसान सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, कार्यक्रमाचे सहउद्घाटक डॉ. सतिश वारजुकर समन्वयक 74/ चिमूर विधानसभा श्रेत्र तर या कार्यक्रमाचे विशेष अतिथी राम राऊत, सहसचिव सेवादल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस, धनराज मुंगले संघटक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभाग, गजानन बुटके माजी जिल्हा परिषद सदस्य, किशोर घाडगे उपविभागीय अधिकारी चिमूर मनोज गभणे पोलीस निरीक्षक चिमूर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, विजय गावंडे पाटील अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी, चिमूर, माधवबापु बिरजे माजी सभापती कुर्षी उत्पन्न बाजार समिती, विजय डाबरे सचिव तालुका काँग्रेस कमिटी, संजय डोंगरे माजी अध्यक्ष जि. म. स. बैंक चिमूर, भिमरावजी ठावरी माजी शहराध्यक्ष तालुका काँग्रेस श्रीमती वनिता मगरे अध्यक्ष महिला तालुका काँग्रेस किशोरबापु शिंगरे, अध्यक्ष तालुका काँग्रेस सेवादल, राजेंद्र लोणारे जिल्हा सरचिटणीस काँग्रेस ओबीसी, माननीय कदीरचाचा माजी बांधकाम सभापती तथा गटनेता नगर परिषद, गोपाल झाडे माजी अध्यक्ष नगर परिषद चिमूर, विलास डांगे अध्यक्ष तालुका काँग्रेस ओबीसी विभाग, साईश सतीश वारजुकर सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस, प्रदीप तळवेकर अध्यक्ष तालुका काँग्रेस पर्यावरण विभाग, आरिफभाई शेख अध्यक्ष तालुका काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग, हेमंत उर्फ राजु कापसे अध्यक्ष तालुका काँग्रेस किसान सेल विभाग, लोकनाथ रामटेके अध्यक्ष तालुका काँग्रेस अनु.जाती. भरत बंडे संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीचे, सुधीर पोहनकर माजी सचिव तालुका काँग्रेस कमिटी डॉ. रहमान पठाण सचिन महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक काँग्रेस, स्वप्निल मालके माजी उपसभापती प. स. चिमूर, बालाजी कोयचाडे अध्यक्ष तालुका काँग्रेस अनु .जमाती, नर्मदा रामटेके अध्यक्ष महिला तालुका काँग्रेस अनु.जाती, राजू चौधरी उपाध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी, राजू हिंगणकर उपाध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी, तर या कार्यक्रमाचे विनीत आहे. अविनाश अगडे,अध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी, गितांजली थुटे अध्यक्ष शहर महिला काँग्रेस कमिटी चिमूर, मोहम्मद शफिक शेख उर्फ पप्पूभाई मिडिया प्रमुख, धनराजजी मालके संपर्कप्रमुख चिमूर शहर, अमोल जुनघरे उपाध्यक्ष शहर काँग्रेस, विनोद ढाकुणकर, उपाध्यक्ष तालुका काँग्रेस, गौतम पाटील जिल्हा महासचिव युवक काँग्रेस , रोशन ढोक अध्यक्ष चिमूर विधानसभा युवक काँग्रेस, जावाभाई शेख अध्यक्ष ता .काँग्रेस अल्पसंख्यक विभाग, प्रशांत डवले उपाध्यक्ष विधानसभा युवक काँग्रेस ओबीसी विभाग, नागेंद्र चट्टे अध्यक्ष तालुका युवक काँग्रेस, अक्षय लांजेवार संघटक तालुका युवक काँग्रेस, उमेश हिंगे माजी नगरसेवक, राकेश साटोने उपाध्यक्ष विधानसभा युवक काँग्रेस इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहे. असे आव्हान शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अविनाश अगडे. व शहर काँग्रेस कमिटी यांनी केले आहे.
चिमूर प्रतिनिधी :-
भिसी येथील अनेक युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चंद्रपूर जिल्हा सरचिटणीस व भिसीचे माजी सरपंच अरविंद रेवतकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नामदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते प्रदेश कार्यालय मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या युवकात शुभम सहारे, चेतन पडोळे, अक्षय नागपुरे, शैलेश आजबलकर, शैलेश सतीबावणे, राहुल कामडी, फैयाज शेख, अक्षय सातपैसे, बबलू दिघोरे, सतीश शेंडे, आशुतोष भुते, आयुष तुरारे, रोहित गभणे यांचा समावेश आहे. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नागभीड तालुका अध्यक्ष विनोद नवघडे, भिसी शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष किशोर गभणे, युवक राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष अक्षय खवसे, कार्यकर्ते देवा घुटके, अमृत बन्सोड, जगत तांबे, पंकज रेवतकर, सौरभ कामडी, रोशन रेवतकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.