PostImage

Bahujnancha Buland Aawaj

Yesterday   

PostImage

हुकूमशाहीचे पाउल पडती पुढे !


महाराष्ट्र सरकारने एमआयडीसी स्थापन करून भूसंपादनाच्या कायदा तयार केला त्यावेळी खूप आनंद वाटला असेल परंतु याच आनंदावर कुणाच्या तरी जीवनात दुःखाचा डोंगर उभा राहील,कोणाच्यातरी आनंदावर दुःखाचा सावट निर्माण होईल,असं का बरं कुणाच्यातरी मनात आलं नसेल.कारण प्रत्येक जन आप आपल्या स्वार्थापटी केलेला विचार कुणाचं जीवन उध्वस्त केला काय किंवा पुन्हा कुणी नाहीसा झाला काय याचा विचार करणार एकही नेता घडीला उदयास आलेला नाही.

निवडणुकीत गल्लोगल्ली फेऱ्या मारणारे नेते निवडणुका संपल्या की कुठं लपून जातात देव जाणे.त्यांची राजकारणाची पोळी एकदा भाजून झाली की पाच वर्ष तिलाच कुस्करत राहायचं आहे मग पुढची निवडणूक येईपर्यंत बिचारा भटकणार तर नाहीतच परंतु साधे नजरेत भरणार नाही.

शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी भूसंपादन करण्याचा शासनाने घेतलेला निर्णय अत्यंत चुकीचा आहे.शेतकऱ्यांना संपविण्याचा प्रकार चालू आहे.आज प्रश्न 14 गावांचा आहे परंतु हे बोके कारखानदार एवढ्या वरच थांबणार नाही तर उद्या 1400 गावांवर त्यांची नजर गेली तर नवल वाटायला नको कारण यांची हाव संपणारी नाही तर हाव वाढतच जाणार आहे.

म्हणजे सामान्य माणूस चिरटला जाईल आणि यांचे हुकूमशाहीचे पाऊले पडत जातील आणि जसे जसे यांचे पाऊले पुढे पडतील तसे तसे हुकूमशाहीचे पाळे मुळे घट्ट होत जातील तेव्हा मात्र सामान्य माणसाचा वाली कोणी शिल्लक राहणार नाही आणि शिल्लक राहिला तर ते गुलाम बनून राहील. 

 || वाघ नाही होता आला तरी चालेल |

पण कुत्रा बनवून कुणाच्या घरासमोर भुंकू नका ||

 

 


PostImage

Vaingangavarta19

Yesterday   

PostImage

ट्राक्टरची ट्राली सोडण्यास पोलीस उपनिरीक्षकाने मागीतली लाच


ट्राक्टरची ट्राली सोडण्यास पोलीस उपनिरीक्षकाने मागीतली लाच 

अमरावती:- ट्राक्टरची ट्राली सोडण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक याने लाचेची मागणी केली म्हणून त्यांचेवर व वाहण चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे 
दर्शन पुंडलीक दिकोंडवार,वय -३८ वर्ष, पोलीस उपनिरिक्षक, नेमणुक पो.स्टे. नांदगांव खंडेश्वर, ह्याने पोलिस स्टेशनच्या आवारातच लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविली होती.मात्र वेळेवर संशय आल्याने ती रक्कम ठरलेल्या वेळी न स्वीकारता टाळाटाळ केल्याने सदरहू दोघांवरही अखेर लाचेची मागणी केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आल्याने  अमरावती पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.
यातील तक्रारदार यांनी दि.१२/०३/२०२५ रोजी दिलेल्या तक्रारीवरुन दि.१३/०३/२०२५ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाई दरम्यान तक्रारदार यांना लोकसेवक दर्शन पुंडलीक दिकोंडवार, वय -३८ वर्ष, पोलीस उपनिरिक्षक, नेमणुक पो.स्टे. नांदगांव खंडेश्वर, अमरावती ग्रामिण रा.शिरे लेआउट,चौधरी हॉस्पीटल रोड,अवधुतवाडी,यवतमाळ जि. यवतमाळ यांनी तक्रारदार यांचे वडीलांच्या नावे असलेली ट्रक्टरची ट्रॉली सोडुन देण्याकरीता ५००० रूपये लाचेची मागणी केली. तसेच सदर ५,००० रुपये लाच रक्कम सुकेश सारडा याचेजवळ देण्यासाठी सांगितले. त्यावेळी सुकेश सारडा याने तक्रारदार यांना सांगितले की, मी तुला फोन केल्यावर येवुन जा.असे बोलुन सदरचे पैसे लाच रक्कम असल्याचे माहीत असताना सुध्दा लाचेची रक्कम स्विकारण्याची तयारी दर्शवली व दर्शन दिकोंडवार यांस गुन्हा करणेकामी मदत केली.मात्र दि.१३/०३/२०२५ रोजी दुपारी ३/३५ ते ४/४८ वाजेपर्यंतच्या दरम्यान आयोजीत सापळा कार्यवाही बाबत दिकोंडवार यांस तकारदार यांचेवर संशय आल्यामुळे त्यांने तकारदार यांचेकडुन लाच रक्कम ५००० रुपये घेतले नाहीत. त्यामुळे काल दि १८/०३/२०२५ रोजी दर्शन पुंडलीक दिकोंडवार व सुकेश अनिल सारडा या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले असुन त्यांचे विरूध्द लाचेची मागणी केल्यावरून पोस्टे. नांदगाव खंडेश्वर,अमरावती ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


PostImage

Vaingangavarta19

Yesterday   

PostImage

अवैध दारू विक्री विरोधात,महीलांनी गाठले पोलीस स्टेशन


अवैध दारू विक्री विरोधात,महीलांनी गाठले पोलीस स्टेशन 

 

जिवती:- आपल्या गावातील अवैध दारू विक्री विरोधात महिलांनी चक्क पोलीस स्टेशन गाठून पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन गावातील अवैध दारू विक्री बंद करावी अशी मागणी केली आहे 

जीवती तालुक्यापासून सुमारे पंधरा किमी अंतरावर असलेल्या गुडसेला या गावात मागील बऱ्याच दिवसापासून अवैध देशी दारू विक्री सुरू आहे. गावातील ज्येष्ठ व्यक्ती कडून दारू विक्रेत्यांना दारु विक्री करु नका असे समजावून सांगितले असता ते ऐकत नाहीत. गावात अशांतता पसरली आहे. दारूचे दुकान हे सार्वजनिक हातपंपाचे बाजूला असून तळीराम हे दुकानातून बॉटल घेऊन हातपंप वर येऊन दारू ढोसतात 

तेथेच महिला, मुली पाणी भरण्यास आलेल्या असताना त्यांना बाजूला व्हावे लागते. जर एखाद्या महिलेने तेथे दारू पिण्यास विरोध केला तर दारू विक्रेता म्हणतो की हा हातपंप माझ्या जागेत आहे. हातपंप करिता मी जागा दिली आहे. मी काही करू शकतो. माझ्या मालकीचा हातपंप आहे. असे म्हणत महिलांना अश्लील शिवीगाळ करतो. याच्या गुंड प्रवृत्ती मुळे कोणी महिला पुढे जात नाहीत. मात्र बहुतांश लोकांचे संसार दारूच्या पुरात वाहून जात आहेत. आणि गावातील अल्पवयीन पिढी बिघडत जात आहे हे पाहून महिलांनी पुढाकार घेऊन पोलिस स्टेशन जिवती येथे ठाणेदार यांना निवेदन देऊन ही अवैध देशी दारू बंद करण्याची विनंती केली. यावेळी गावातील मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या.आता पोलीस काय भुमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे 


PostImage

Vaingangavarta19

Yesterday   

PostImage

पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने केला काठीने प्रहार, पती जागीच ठार


पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने केला काठीने प्रहार, पती जागीच ठार 

भामरागड तालुक्यातील घटना, दोघांवर गुन्हा दाखल

भामरागड:- 
पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने काठीने प्रहार केला तेव्हा पती जागीच ठार झाल्याची घटना भामरागड तालुक्यातील दोबुर गावात घडली 
भामरागड तालुका मुख्यालयापासून १० किमी अंतरावर गटग्रामपंचायत मिरगुळवंचा अंतर्गत येत असलेल्या दोबूर या गावाचा समावेश आहे. दोबूर येथील प्रीतम बहादूर एक्का  वय ५० वर्षे याला त्याची पत्नी मानती प्रीतम एक्का  वय ४० व मुलगा जोसेफ प्रीतम एक्का वय २२ यांनी काठीने मारहाण केल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना घडली. प्रीतम एक्का हा नेहमी मद्यप्राशन करून कुटुंबीयांना त्रास द्यायचा. शारीरिक छळ करायचा. याबाबत २०२२ साली त्याचावर दोन गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार, १७ मार्च रोजी सकाळी मृतक प्रीतम हा स्वस्त धान्य दुकानातून धान्य आणण्यासाठी आरेवाडा येथे गेला होता. त्यानंतर दुपारी तो १२ वाजेच्या सुमारास मद्यप्राशन करून घरी परतला. यावेळी त्याची पत्नी घरी जेवायला बसली होती. दरम्यान, घरात धिंगाणा घालून तो पत्नीला मारायला गेला.  त्यामुळे चिडून जाऊन पत्नीने लाकडाने त्याच्यावर वार केला. नंतर मुलानेही वार केला. यात प्रीतमचा मृत्यू झाला. सध्या तेंदू हंगामाच्या बेलकटाईचे काम सुरू असल्याने गावातील बहुतांश नागरिक बेलकटाईकरिता जंगलात गेले होते. त्यामुळे प्रीतमची आई मानकुवारी बहादूर एक्का (६५) ही शेतात बेलकटाईला गेली होती. ती घरी परतल्यावर हा प्रकार तिच्या लक्षात आला. तोपर्यंत प्रीतमची जीवनयात्रा संपली होती. यासंदर्भात मंगळवार, १८ मार्च रोजी सकाळी भामरागड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर प्रीतमची पत्नी व मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास भामरागडचे पोलीस निरीक्षक दीपक डोंब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत


PostImage

Vaingangavarta19

Yesterday   

PostImage

आश्रमशाळेतील शिपाई यांचे आढळले तलावात मृतदेह


आश्रमशाळेतील शिपाई यांचे आढळले तलावात मृतदेह 

मार्कंडादेव येथील आश्रम शाळेत होते कार्यरत 

स्वगावातील मुरखडा (चक) तलावात मृतदेह 

आष्टी :-
मार्कंडा देव येथील आश्रम शाळेत कार्यरत शिपाई हे रात्रीच्या सुमारास कुटुंबीयांना शौचास जातो म्हणून घराबाहेर पडले मात्र  दुसऱ्या दिवशी तलावात मृतदेह आढळून आल्याची घटना सोमवारी (दि.17) ला सकाळच्या सुमारास चामोर्शी तालुक्यातील मुरखळा (चक) येथे येथे उघडकीस आली आहे मृतकाचे नाव तुमदेव पिटाले  वय ५७, रा. मुरखळा (चक) असे  आहे.

मृतक तुमदेव पिटाले हे चामोर्शी तालुका मुख्यालयांतर्गत असलेल्या मार्कंडादेव येथील आश्रमशाळेत शिपाई म्हणून कार्यरत होते. ते तालुका मुख्यालयालगत असलेल्या मुरखळा (चक) या आपल्या स्वगावावरुनच कर्तव्य बजावित होते. दरम्यान, रविवारी
पहाटे 3 वाजताच्या सुमारास शौचास जातो म्हणून ते घराबाहेर पडले. मात्र, सकाळ होऊनही ते घरी न परतल्याने कुटुंबीयांसह ग्रामस्थानी सोमवारी शोधाशोध सुरू केली. दरम्यान, सकाळी 11 वाजताच्या सुमारास गावालगतच असलेल्या तलावात त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती प्राप्त होताच चामोर्शी पोलिसांनी घटनास्थळ गाठूत पंचनामा केला. याप्रकरणी चामोर्शी पोलिस स्टेशनमध्ये मर्ग दाखल करण्यात आला असून, पुढील तपास चामोर्शी पोलिस करीत आहेत


PostImage

Vaingangavarta19

Yesterday   

PostImage

मंगळसूत्र चोरांच्या" हल्ल्यात जखमी हेमंत गावंडेचा “मृत्यू”... रेल्वे पोलिस करतात …


“मंगळसूत्र चोरांच्या" हल्ल्यात जखमी हेमंत गावंडेचा “मृत्यू”... रेल्वे पोलिस करतात तरी काय?

 


अकोला : अकोला रेल्वे स्टेशनवर उतरल्यावर एका महिलेच्या गळ्यातील "मंगळसूत्र हिसकावून" पळ काढणाऱ्या चोरट्याचा पाठलाग करीत असताना त्या चोरट्याने पळणे थांबवून उलट पाठलाग करणाऱ्या महिलेच्या पतीवरच प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात तो इसम गंभीर जखमी झाल्याने त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच काल सायंकाळच्या सुमारास त्या दुर्दैवी व्यक्ती हेमंत गावंडेचा मृत्यू झाला असून झालेल्या घटनेमुळे रेल्वे पोलिसांविरुद्ध जनसामान्यांच्या "भावना तीव्र" झाल्या आहेत.पत्नीच्या गळ्यातील "मंगळसूत्र" हिसकावून पळ काढणाऱ्या चोरट्यांचा पाठलाग करणाऱ्या पतीला मंगळसूत्र चोरट्यांनी बेदम मारहाण करीत पूर्ण "चेहरा दगडाने ठेचून" काढल्याचा जीवघेणा प्रकार काल रात्री घडला होता. अकोल्याच्या रेल्वे स्थानक परिसरातीलच ही घटना घडली आहे. अकोला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर मंगळसूत्र चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून पळ काढला होता.

त्यानंतर महिलेचा पती हेमंत गावंडे यांनी ह्या मंगळसूत्र चोरट्यांचा "पाठलाग" केला. याच दरम्यान चोरट्यांनी पाठलाग करणाऱ्या गावंडे यांना बेदम मारहाण केली, इतकेच नाही तर त्यांचा चेहरा देखील दगडानी ठेचून काढण्याचा "अंगावर शहारे" आणणारा प्रकार काल रात्री अकोला रेल्वे स्थानक परिसरातच रेल्वे पोलिसांच्या "बेफिकिरी" वृत्तीने घडला होता. हेमंत गावंडे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना "सर्वोपचार" मधून अकोल्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र गंभीर स्वरूपात जखमी झाल्याने सुरू असलेल्या उपचारांना प्रतिसाद न दिल्याने "निष्पाप व निर्दोष" हेमंत गावंडेची प्राणज्योत मालवली आहे.हेमंत गावंडे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याने रेल्वे पोलिसांच्या "बेजबाबदार" आणि "कामचोरी" चा विषय ऐरणीवर आला असून ही घटना घडली त्यावेळी ज्यांची "ड्युटी" स्टेशनच्या प्लेटफॉर्म वर होती ते खरेच त्यांची ड्युटी करत होते का.? हा ही प्रश्न उपस्थित होत आहे.


PostImage

Vaingangavarta19

March 17, 2025   

PostImage

गडचिरोली जिल्ह्यातील गावात अल्पवयीन मुलीवर केला दोघा नराधमांनी अत्याचार


गडचिरोली जिल्ह्यातील गावात अल्पवयीन मुलीवर केला दोघा नराधमांनी अत्याचार 

कुरखेडा:-
तालुक्यातील बेलगांव येथील एका अल्पवयीन मुलीवर दोघ्या नराधमांनी अन्याय अत्याचार करून अब्रु लुटण्याचा प्रयत्न केल्यामुळे अल्पपवयीन मुलीच्या रिपोर्ट वरून त्याच गावातील दोघावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांची रवानगी जेल मधे करण्यात आली. दि. १५ मार्च २०२५ दुपारी दोन चे सुमारास बेलगांव येथील अनु. जातीची अत्यवयीन मुलगी दुकानात चॉकलेट घेण्याकरीता गेली व घराकडे जातांना याच गावातील भावेश राजु कोरेटी वय २४ वर्ष व कोरेटी मोरेश्वर नामदेव कोरेटी वय २४ वर्ष या दोघांनी त्या अल्पवयीन मुलीचा हात धरून छेडछानीकरून नालीवर झोपवले व तिच्यावर बळजबरीने अन्याय अत्याचार केला. ९ व्या वर्गात शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीच्या रिपोर्ट वरून व प्रत्यक्ष साक्षीदार यांच्या बनायानुसार कुरखेडा पोलीसांनी भावेश व मोरेश्वर यांच्या विरोधात कलम ७४,३ (५) व पोस्को अर्तगत कलम ८ व १२ अर्तगत गुन्हा दाखल करून आता त्या दोघाची रवानगी कारागृहात करण्यात आली असून गावात शांततेचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून कुरखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेंद्रा वाघ गावात बैठका घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.


PostImage

Vaingangavarta19

March 17, 2025   

PostImage

गडचिरोली जिल्ह्यातील शबरी विकास महामंडळाचा लेखापाल लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात


गडचिरोली जिल्ह्यातील शबरी विकास महामंडळाचा लेखापाल लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात


गडचिरोलीः बरोजगार युवकास वाहन खरेदी करण्यासाठी कर्ज मंजूर करण्यासाठी त्याच्याकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज गडचिरोली येथील शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या कंत्राटी लेखापालस रंगेहाथ पकडून अटक केली आहे रुपेश वसंत बारापात्रे (४०) असे आरोपी लेखापालाचे नाव आहे

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्ता युवक हा देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव येथील रहिवासी असून, त्याला माल वाहतुकीकरिता वाहन खरेदी करावयाचे होते. त्यासाठी त्याने गडचिरोली येथील शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे अर्ज केला. त्याअनुषंगाने तक्रारकर्त्यास १० लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्याकरिता कार्यकारी लेखापाल रुपेश बारापात्रे याने शाखा व्यवस्थापक हर्षल बोरोले यांच्या नावाने १२ मार्चला ५० हजार रुपयांची मागणी केली. परंतु लाच देण्याची मूळीच इच्छा नसल्याने तक्रारकर्त्याने एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता रुपेश बारापात्रे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून तक्रारकर्त्याकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रुपेश बारापात्रे यास रंगेहाथ पकडून अटक केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले यांच्या पर्यवेक्षणात पोलिस निरीक्षक संतोष पाटील, शिवाजी राठोड, सहायक फौजदार सुनील पेद्दीवार, हवालदार किशोर जौंजाळकर, राजेश पद्मगिरवार, पोलिस नाईक स्वप्नील बांबोळे, संदीप घोरमोडे, संदीप उडाण, हितेश जेट्टीवार, विद्या म्हशाखेत्री, ज्योत्स्ना वसाके, राजेश्वर कुमरे यांनी ही कारवाई केली.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

March 17, 2025   

PostImage

तर मग जंगलावर आधारित उद्योग निर्माण करा....


गडचिरोली जिल्हा जंगलव्याप्त जिल्हा म्हणून नावारुपास आलेला आहे तर मग या जिल्ह्यामधील उद्योगधंदे सुद्धा जंगलावर आधारित असायला पाहिजे,जेणेकरून जंगल जमीन अबाधित राहिली असती आणि उद्योग पण निर्माण करता आले असते.

 परंतु तसं न होता महाराष्ट्र शासनाने एमआयडीसी स्थापन करून भूसंपादनाचा कायदा आणला आणि शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बळकाऊ पाहतो आहे.अशा कायद्यामुळे शेतकरी पूर्णपणे उध्वस्त होत आहे आणि दुसरीकडे कारखानदारी बोकाळतांना दिसतो आहे.

 जंगलव्यापत जिल्ह्यात जंगलावर आधारित उद्योगधंदे निर्माण झाले असते तर या जिल्ह्यातील जंगले सुद्धा टिकवून ठेवण्यास मदत झाली असती आणि जिल्ह्यातील शेती सुद्धा टिकून राहिली असती.राज्यातील सत्ताधाऱ्यांनी सर्वप्रथम शेतकरी नष्ट करायचा चंग  बांधलय,असं म्हणायला काही हरकत नाही.

म्हणजे हेच सरकार शेतकरी सुजलाम सुफलाम झाला पाहिजे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचा आहे अशी पोकळ वलग्ना करताना दिसतो आहे आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना निस्तानाबूत करू पाहतो आहे.जंगलावर आधारित अशी किती तरी उद्योग उभारता येतो परंतु सरकार जाणून बुजून याकडे कानाडोळा करताना दिसतो आहे परंतु असं न करता उध्वस्त होणाऱ्या शेतकऱ्यांचा सुद्धा सारासार विचार व्हायला पाहिजे कारण यामुळे शेतकऱ्यांच्या हातून भाकरीचा तुकडा नष्ट होऊन जाईल आणि सारा संसार उध्वस्त होऊन शेतकरी देशोघडीला लागेल.


PostImage

Vaingangavarta19

March 17, 2025   

PostImage

स्वतःहाच्या मुलाचा विचार न करता त्याने केली गळफास घेऊन आत्महत्या


स्वतःहाच्या  मुलाचा विचार न करता त्याने केली  गळफास घेऊन आत्महत्या 


धानोरा:-
 तालुक्यातील विवाहित तरुणाने आपल्या मुलाचा भविष्यात काय होईल याचा विचार न करता गळफास घेऊन आपली संपविली जीवनयात्रा ही घटना धानोरा तालुक्यातील येरकड येथे घडली 
पत्नी काही दिवसापूर्वी माहेरी जातो म्हणून घरून निघून गेल्याने आणि तिचा इतरत्र कुठेही शोध न लागल्याने ही बाब त्याला खटकत होती त्यामुळे शीलवंत आनंदराव सहारे वय 27 वर्षे राहणार येरकड असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार धानोरा तालुक्यातील येरकळ येथील शीलवंतआनंदराव सहारे व 27 वर्ष याची पत्नी काही दिवसापूर्वी माहेरी जातो म्हणून घरून अचानक निघून गेली मात्र ती आपल्या माहेरी पोहचली नाही इतरत्र कुठे शोध घेतला असता तिचा पत्ता लागला नाही. मात्र ही बाब शीलवंत आनंदराव सहारे यांनी मनावरती चांगलीच घेतल्याने त्याच्या मनामध्ये आत्महत्येचा विचार आल्याने त्याने 15 मार्च रोजी आपल्या स्वतःच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. शीलवंत सहारे यांनी नैराशेतून आत्महत्या केली असावी असे जनतेमधून बोलले जात आहे. मात्र आत्महत्या मागचे स्पष्ट कारण सखोल चौकशी केल्यानंतरच कळेल.अधीक तपास पोलीस करीत आहेत 


PostImage

विदर्भ फायर न्यूज

March 17, 2025   

PostImage

धानोरा: पत्नी माहेरी; घरी पतीची आत्महत्या


 

धानोरा : माहेरी जाते, असे सांगून पत्नी घरातून निघून गेली. मात्र, ती माहेरी पोहोचलीच नाही. तिचा शोध घेतला. मात्र, ती आढळून आली नाही. ही बाब मनावर घेत पतीने गळफास घेऊन जीवन संपवले. ही घटना १५ मार्च रोजी धानोरा तालुक्याच्या येरकड येथे घडली.

 

शीलवंत आनंदराव सहारे (२७, रा. येरकड) असे आत्महत्या करणाऱ्यायुवकाचे नाव आहे. मयताची आई शेजारच्या शेतात मजुरीला गेली होती. ती पाणी पिण्याकरिता घरी आली. परंतु, आतमधून दार बंद होते. तिने मागच्या दाराने घरात प्रवेश केला तेव्हा मुलगा गळफास घेतलेल्या स्थितीत दिसला.

 

शीलवंतने नैराश्येतून आत्महत्या केली असावी, असा कयास लावला जात आहे. परंतु सखोल चौकशीनंतर कारण स्पष्ट होईल.

 

 

 

 


PostImage

Vaingangavarta19

March 17, 2025   

PostImage

गांजा तस्करी करणाऱ्या इसमास पोलीसांनी बसस्थानक येथेच मुद्देमालासह केली अटक


गांजा तस्करी करणाऱ्या इसमास पोलीसांनी बसस्थानक येथेच मुद्देमालासह केली अटक 


चिमूर:-
अमली पदार्थ गांजा तस्करी करणाऱ्या इसमास पोलीसांनी बसस्थानक परिसरात रंगेहाथ अटक केल्याची घटना चिमूर बसस्थानकावर काल दि १६ मार्च ला घडली यात पोलिसांनी मोठी कारवाई करत एका व्यक्तीला गांजा बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. वहीद अब्दुल रहीम (वय अंदाजे ३५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे

गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, वहीद अब्दुल रहीम हा चिमूर बसस्थानकावर गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील कथ्या रंगाच्या बॅगेची तपासणी केली असता, त्यात १९६४ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. पोलिसांनी पंच, फोटोग्राफर आणि मापारी यांच्या समक्ष गांजा जप्त केला आणि आरोपीला अटक केली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक  मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू आणि नयोमी साटम सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा अतिरीक्त कार्यभार चिमूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक संतोष बाकल, स.पो.नि. निशांत फुलेकर, स.पो.नि. मल्हारी ताळीकोटे, पो.उपनि. दत्ताहरी जाधव, सहाय्यक फौजदार विलास निमगडे, सचिन खामणकर, भरत घोळवे, सचिन साठे, कुणाल दांडेकर, सोनू एलकुचेवार यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.

आरोपी वहीद अब्दुल रहीम याला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर हे करत आहेत


PostImage

Vaingangavarta19

March 17, 2025   

PostImage

लाकडाची तस्करी करताना आंतरराज्यीय टोळीला वनविभागाने केले जेरबंद


लाकडाची तस्करी करताना आंतरराज्यीय टोळीला  वनविभागाने केले जेरबंद 


एटापल्ली,
पुष्पा स्टाईल ने लाकडाची तस्करी करताना आंतरराज्यीय टोळीला वनविभागाने तत्परतेने जेरबंद केले आहे

एटापल्ली वनपरिक्षेत्रा अंतर्गत हालेवारा उपक्षेत्रातील जिजावंडी हे गाव छत्तीसगड सिमालगत असुन दिनांक 12/03/2025 रोजी रात्रीस C.G.08 AV 3294 क्रमांकाचे 16 चाकी ट्रक लाकडानी भरून छत्तीसगडच्या इरपनार मार्गे दुर्ग येथे जात असल्याचे वनविभागास मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे वनविभागाचे अधिकारी यांनी त्वरीत सापळा रचुन ट्रक अडविला. चौकशी अंती अवैध मार्गाने जंगलातुन सेमल प्रजातीचे लाकडे विनापरवाना वाहतुक होत असल्याचे निष्पन्न झाले असता ट्रक वनपरिक्षेत्र कर्यालय, एटापल्ली येथे आण्याचा पर्यंत केला परंतू ट्रक मध्ये बिघाड झाल्याने वाहण हलविता आले नाही. वनाधिकारी यांनी ट्रक दुरुस्तीचा पर्यंत केले असता यश आले नाही. सदरचे घटना स्थळ हे अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त भागात असल्याने वनाधिकारी हे त्या रात्री जवळच असलेल्या पिपली (बुर्गी) येथे मुक्कामी थांबले मात्र त्याच रात्री छत्तिसगड राज्यातुन जवळ-जवळ 50 ते 60 इसम येऊन ट्रक जबरदस्तीने छत्तिसगड राज्यात पळविला असता दिनांक 15/03/2025 रोजी पाहाटे 05.00 वाजेपासुन वनविभागाच्या पथकाने ट्रकचा पाठलाग करीत छत्तिसगड राज्यातील पाखांजुर येथुन ट्रक जप्त करुन पाखांजुर पोलीस विभागाच्या मदतीने वनपरिक्षेत्र कार्यालय, एटापल्ली येथे आणण्यात आला. घटनेतील आरोपी मिहीर निमाई विस्वास, अनादी मिस्त्री रा. पाखांजुर, शांती अरविंद दत्ता, बप्पी दत्ता, रा. विकासपल्ली हे फरार असून वरील गुन्हा गावकऱ्यांचा संगनमताने घडल्याची शक्यता नाकारता येत नाही.


सदरचा तपास  उपवनसंरक्षक भामरागड वनविभाग शैलेश मीना यांचें मार्गदर्शनात  दिपक रामटेके, सहाय्यक वनसंरक्षक भामरागड, निलीमा खोब्रागडे वनपरिक्षेत्र अधिकारी, एटापल्ली क्षेत्र सहाय्यक,  प्रदीप गेडाम, भगवान नागोसे, श्रीनीवास आडे, ओमप्रकाश धात्रक, वनरक्षक  राजेश्वर देशमुख, सचिन तोराम, कवि भांडेकर कैलाश मडावी, सुजाता अडगोपुलवर, यांनी पुर्ण केला असुन फरार आरोपींचा शोध सुरु आहे


PostImage

Vaingangavarta19

March 16, 2025   

PostImage

बसमधून दारुची तस्करी करणाऱ्या दोन महीला व एका पुरुषाला पोलीसांनी …


बसमधून दारुची तस्करी करणाऱ्या दोन महीला व एका पुरुषाला पोलीसांनी पकडले रंगेहाथ 

 

आष्टी पोलिसांनी पकडली ५३ हजाराची दारु 


आष्टी (प्रतिनीधी)##  गोंडपिपरी कडून आष्टी येथे येणाऱ्या  ट्रॅव्हल मधून प्रवास करणाऱ्या   दोन महिला व एका पुरुषाला आष्टी येथे बस स्टॉपवर उतरले असता त्यांच्या पिशव्यांची तपासणी करण्यात आली.  त्यात इंग्लिश दारूच्या बॉटल आढलून आल्या. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त केला. ही घटना आज दुपारी ४.३० वाजताच्या दरम्यान घडली. 
आरोपी १)सुनील प्रभाकर झोडे , वय ५२ वर्षे , रा. चंद्रपूर याच्या कडून दोन लिटर चे चार आर.एस.चे बंपर , किंमत १० हजार रुपये. २) सपना कैलास बोदलवार , वय ३५ , रा.चंद्रपूर हिच्या पिशवीत आय.बी.कंपनीच्या पाच बंपर जप्त केले.किंमत १२हजार ५०० रुपये.३) रंजना अशोक कोंडावार , वय ४० , रा. चंद्रपूर हिच्या पिशवीची झडती घेतली असता आर.एस. कंपनी च्या पाच बंपर सापडले , किंमत १२ हजार ५०० रुपये तर कुनघाडा (ठाकरी) येथील.४) भूमलिंगण सुनगोरवार याचे कडून एक पेटी देशी दारु व ५० लिटर मोहफुलाची दारु जप्त करण्यात आली.किंमत १८ हजार रुपये. 
सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.पुढील कारवाही पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. होळीच्या सणानिमित्त आठ दिवसांपासून  वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून अवैध दारु वाहतूक होत आहे त्यावर अंकुश घालण्याचे काम सुरू आहे त्यामुळे दारु तस्करी करणाऱ्या लोकांची धाभी दनानली आहे 


PostImage

Vaingangavarta19

March 16, 2025   

PostImage

चामोर्शी येथे भजन स्पर्धा, पुष्पांजली मार्गदर्शन तथा सत्कार


 

चामोर्शी येथे भजन स्पर्धा, पुष्पांजली मार्गदर्शन तथा सत्कार 

चामोर्शी:-

हनुमान मंदिर, साधुबाबा कुटी चामोर्शी जि. गडचिरोली येथे जगद्गुरु तुकाराम महाराज कुणबी समाज बहुउद्देशीय संस्था, तालुका कुणबी समाज संघटना, महिला कुणबी समाज संघटना, कृतिशील महिला बचत गट चामोर्शी द्वारा आयोजित संत तुकाराम महाराज (वैकुंठ गमन) निमित्त भजन स्पर्धा पुष्पांजली मार्गदर्शन तथा सत्कार समारंभ कार्यक्रमात गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी सत्कार स्वीकारून मार्गदर्शन केले.
  यावेळी तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी चामोर्शी प्रमोद भगत, अँड.संजयराव ठाकरे, प्रा.डॉ.विठ्ठलराव चौथाले, गंगाधर पाल, आनंदरावजी लोंढे, प्रा.सजय मस्के, दिलीप गौरकर, अतुल येलमुले, डॉ.सौ.वंदना चौथाले, सौ.ममता गौरकर, सौ.छायाताई भोयर, रजनीकांत मोटघरे, रूपेश टिकले पदाधिकारी, कार्यकर्ते व जनसमुदाय उपस्थित होता.


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

March 16, 2025   

PostImage

तर अशाने शेतकरी नावाची जातच नष्ट होईल ! रमेश चौखुंडे …


महाराष्ट्र सरकारने चामोर्शी तालुक्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे (एम.आय.डीसी) स्थापन करून तालुक्यातील वाघोली,भेंडाळा,दोटकूली,खंडाळा,घारगाव, रामाळा, फराडा, मोहुर्ली,सगनापूर,एकोडी, कान्होली, नवेगाव,मार्कंडा देव आणि वेलतूर तूकूम अशा 14 गावांमध्ये नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्याचा हालचाल सुरू झालेली आहे.

या 14 गावांमध्ये संपूर्ण जागेचा भूसंपादन करावयाचा असल्या कारणाने संपूर्ण गावातील सर्वे नंबर प्रमाणे जमिनीचे अद्यावत      सात- बारा,गाव नमुना आठ व गाव नकाशात त्वरित पुरविण्यात यावा असा आदेश प्रादेशिक अधिकारी मऔविम चंद्रपूर यांनी काढलाआणि हे सत्य आहे.

परंतु सदर या 14 गावातील शेतकऱ्यांची शेती महाराष्ट्र सरकारने कारखानदाराच्या घशात घातली तर या परिसरातील शेतकरी नावाची जातच नष्ट होऊन जाईल.अक्षदा लावायला सुद्धा या परिसरातील शेतकरी शिल्लक राहणार नाही,अशी भीती सामाजिक कार्यकर्ते रमेश   चौखुंडे यांनी व्यक्त केली.

 शेती आहे म्हणून शेतकरी आहे,म्हणजे वावर आहे तर पावर आहे. आणि राब-राब राबणाऱ्या शेतकऱ्याकडे शेतीच नसेल तर शेतकरी म्हणून जीवन जगायला अर्थच उरणार नाही कारण शेती नाही तर शेतकरी नाही.म्हणजे तो अर्धा मेलेलाच आहे आणि शेतकऱ्यांना निस्तनाभूत करण्याचा हा सरकारचा डाव आहे आणि हे सरकार शेतकऱ्यांना मारणारा सरकार आहे असलं म्हटलं तरी वावंग ठरणार नाही.अजूनही वेळ गेलेली नाही महाराष्ट्र सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा जिथे शेतकरी नष्ट होत असेल तर भूसंपादनाचा कायदा मागे घेवून सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं.


PostImage

Vaingangavarta19

March 16, 2025   

PostImage

दोन दुचाकींची धडक तिघे जण जखमी


दोन दुचाकींची धडक तिघे जण जखमी 


आष्टी -
             दोन दुचाकींची समोरासमोर धडक बसल्याने तिघे जण जखमी झाल्याची घटना आष्टी येथील चामोर्शी मार्गांवर दिनांक 16 मार्च रवीवारी दुपारच्या सुमारास घडली.

     होमेश अलगमकर वय 23 वर्ष रा. उमरी तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली, सुरेश दासरवार वय 26 रा. सोमनपल्ली तालुका चामोर्शी, रमेश झाडे वय 60 रा. आष्टी तालुका चामोर्शी असे जखमींची नावे आहेत.


  सविस्तर वृत्त असे की, होमेश अलगमकर व सुरेश दासरवार हे दोघे मित्र दुचाकीने आष्टी कडून उमरीकडे भरधाव वेगाने जात होते तर रमेश झाडे हे आपल्या घरुन मुख्य रस्त्यावर दुचाकीने निघत होते यावेळी दोन्ही दुचाकी ची एकमेकाला धडक बसली. व तिघेही जण रस्त्यावर पडले यात सुरेश दासरवार याची प्रकृती चिंताजनक असुन होमेश अलगमकर व रमेश झाडे यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. घटनेची माहिती कळताच आष्टी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जख्मीवर आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर चंद्रपूर येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. घटनेचा पुढील तपास आष्टी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सूरू आहे


PostImage

Vaingangavarta19

March 16, 2025   

PostImage

आष्टी येथील एका अनाथ तरुणीचा संशयास्पद मृत्यू


 आष्टी येथील एका अनाथ तरुणीचा संशयास्पद मृत्यू

आष्टी, 

आष्टी येथील वॉर्ड क्रमांक-2 मध्ये वास्तव्यास असलेल्या 24 वर्षीय अनाथ तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. 15) सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रागिणी गलबले (24, रा. आष्टी ता. चामोर्शी) असे मृत तरुणीचे नाव आहे.

मृत रागिणी गलबले हिचे आई-वडील बालपणीच मरण पावले. आष्टी हे तिच्या मामाचे गाव असल्याने ती आष्टी येथेच वास्तव्यास राहायची. ती भांडेधुणी व इतर मोलमजुरीची कामे करायची. शनिवारी सकाळच्या सुमारास ती राहत असलेल्या लीना गोंगले यांच्या घरी मृतावस्थेत

आढळून आली. तिच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नसले तरी तिच्या मृत्यूबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. तिचा मृत्यू संशयास्पद असून तिचा मृतदेह आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. शवविच्छेदन अहवालानंतर तिच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


PostImage

Vaingangavarta19

March 16, 2025   

PostImage

गडचिरोली जिल्ह्यातील पोलिसांनी नक्षलवाद्यांचा घातपाताचा डाव उधळला


गडचिरोली जिल्ह्यातील पोलिसांनी नक्षलवाद्यांचा घातपाताचा डाव उधळला

 

 जमिनीत पुरून ठेवलेली स्फोटके गडचिरोली पोलिसांकडून जप्त

 

गडचिरोली : भामरागड तालुक्यातील कवंडे येथील जंगलात नक्षल्यांनी जमिनीत पुरुन ठेवलेली स्फोटके शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. यामुळे घातपात करण्याचा नक्षल्यांचा डाव पोलिसांनी उधळून लावला आहे.
९ मार्चला गडचिरोली पोलीस दलाने छत्तीसगड सीमेवरील शेवटचे गाव असलेल्या कवंडे येथे पोलिस ठाण्याची उभारणी करण्यात आली. शनिवारी कवंडे येथील पोलीस ठाण्यातील विशेष अभियान पथकाचे जवान परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना पोलीस मदत केंद्रापासून दक्षिणेला शंभर मीटर अंतरावर जंगलातील पायवाटेवर पोलिसांना एक भरमार बंदूक आढळली. शेजारच्या जागेत काहीतरी संशयास्पद असल्याचा संशय आला.
त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या जवानांनी अत्याधुनिक उपकरणाद्वारे त्या जागेची तपासणी केली असता जमिनीत दीड ते दोन फूट खोल स्फोटके दडवून ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी ही स्फोटके शिताफीने बाहेर काढून ती नष्ट केली. यामुळे पोलिसांचा घातपात करण्याचा नक्षल्यांचा डाव उधळून लावला गेला.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, एम. रमेश, सत्यसाई कार्तिक, उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनात कवंडे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.

 


PostImage

Vaingangavarta19

March 16, 2025   

PostImage

पर्यटनासाठी गेलेल्या पाच तरुणांना तलावात जलसमाधी


पर्यटनासाठी गेलेल्या पाच तरुणांना तलावात जलसमाधी 

चंद्रपूर:-

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात असलेल्या घोडाझरी येथे पर्यटनासाठी गेलेले पाच युवकांना तलावात जलसमाधी मिळाली ही घटना शनिवारी, १५ मार्च रोजी धुलीवंदनाच्या दिवसी चार वाजताच्या सुमारास घडली. घटनास्थळी नागभीड पोलीस दाखल झाल्यावर त्यांनी शोधमोहीम राबवित पाचही युवकांचे मृतदेह बाहेर काढले.

सदर युवक हे चिमूर तालुक्यातील सारगाव कोलारी येथील आहेत, जनक किशोर गावडे, यश किशोर गावंडे, अनिकेत यशवंत गावंडे, तेजरा बालाजी गावंडे व तेजरा संजय ठाकरे अशी तलावात बुडालेल्या युवकांची नावे आहेत. यापैकी दोन सख्खे भाऊ असून दोन घुलत भाऊ आहेत. हे चार जण गावंडे कुटुंबातील आहेत. तर एका मित्राचा समावेश आहे.
शनिवारी चिमूर तालुक्यातील साटगाय कोलारी वैधील जनक किशोर गावंडे, यश किशोर गावंडे, अनिकेत यशवंत गावंडे, तेजस बालाजी गावंडे, तेजस संजय ठाकरे व आर्यन हेमराज हिंगोली हे सहा मुले पर्यटनासाठी आली होती. दुपारपासून त्यांनी घोडाडारी तलावावरील पर्यटनाचा आनंद घेतला. त्यानंतर त्यांना पोहावयाचे राहवले नाही. त्यामुळे सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास सहा मुले पोहण्याकरिता तलावात उतरली. पाण्याची पातळी खोल गेल्याने आणि या परिसरात डोह असल्यामुळे सहाही जण डोहामध्ये बुडाले, त्यापैकी आर्यन हेमराज हिंगोली मुलगा कसाबसा वाचला तर उर्वरित जनक किशोर गावडे यश किशोर गावडे, अनिकेत यशवंत गावडे तेजस बालाजी गावंडे. तेजस संजय ठाकरे हे पाचही मुले तलावात बुडाली.
सर्व मुले १८ ते २४ वर्षे वयोगटातील आहेत.

तलावातून वाचून बाहेर आलेल्या मुलाने सदर घटना घटनास्थळी असलेल्या नागरिकांना सांगितली. त्यानंतर तत्काळ नागभीड पोलिसांना माहिती देण्यात आली. अवध्या काही वेळातच नागभीड पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पाचही मुले उलावातच बुढालेले आहेत. सदर घटनेची माहिती मुलांच्या कुटुंबीयांना सारगाव कोलारी येथे देण्यात आलेली आहे. पोलिसांनी घटनास्थळी प्राथमिक चौकशी सुरू करीत तात्काळ शोधमोहीम राबवित बुडालेल्या युवकांचे मृतदेह बाहेर काढले.

अधिक तपास पोलीस करीत आहेत