महिला कुस्ती पट्टूंच्या थरारक डावपेचांनी ब्रह्मपुरीकर मंत्रमुग्ध
प्रेक्षकांची अलोट गर्दी - दुसऱ्या दिवशी रंगला 224 लढतींचा महासंग्राम
ब्रह्मपुरी..
राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांच्या वाढदिवसाच्या शुभ पर्वावर विजय वडेट्टीवार मित्र परिवार ब्रह्मपुरी व तालुका कुस्तीगीर संघ ब्रह्मपुरी यांचे संयुक्त विद्यमाने ब्रह्मपुरी येथे सुरू असलेल्या कुस्ती सामन्यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून 600 हून महिला कुस्तीपटूंनी विद्यानगरी ब्रह्मपुरी गाठत आयोजित महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सहभाग नोंदविला. तीन दिवसीय आयोजित स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी एकूण 224 महासंग्राम चांगलाच रंगला. यात सहभागी स्पर्धकांनी आपला अनुभव व संपूर्ण ताकदीनिशी सामन्यात रंगत आणली. कुस्तीपटूंच्या विविध डावपेचांचा थरार उपस्थित दर्शकांनी अनुभवला. व ब्रह्मपुरीकर नागरिक मंत्रमुग्ध झाले.
आज सकाळपासूनच आयोजकांमार्फत नियोजित वेळापत्रकानुसार कुस्ती सामन्यांच्या लढती वयोगटांनुसार घेण्यात आल्या. यात 50 किलो
सीनियर गटात 50 ते 72 किलो महिला महाराष्ट्र केसरी गटात 65 ते 76 किलो वजन गटात 132 लढती झाल्या. आयोजित स्पर्धेत बंकट यादव स्पर्धा प्रमुख तांत्रिक समिती, पंचप्रमुख नवनाथ ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पंच या स्पर्धेत न्याय दानाचे काम करत आहेत.
आज सकाळपासूनच महिला कुस्तीपटूंचे सामने बघण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
ऑनलाइन गेम ड्रीम11 में 1.5 करोड़ रुपये जीतकर करोड़पति बनने वाले पुणे पुलिस के एक सब-इंस्पेक्टर को अधिकारियों ने निलंबित कर दिया है। पुणे की पिंपरी-चिंचवड़ पुलिस ने उनके खिलाफ दुर्व्यवहार और पुलिस विभाग की छवि खराब करने के आरोप में कार्रवाई की.
सब-इंस्पेक्टर, सोमनाथ झेंडे ने लोकप्रिय ऑनलाइन गेम ड्रीम 11 में भारी रकम जीती और यह बात तेजी से फैल गई, जिसके बाद पुलिस विभाग ने कार्रवाई की। मौखिक चर्चा और उनके आचरण के बारे में चिंताओं के बाद, पिंपरी-चिंचवड़ पुलिस ने मामले की जांच के आदेश दिए। जांच से पता चला कि झेंडे ने बिना अनुमति के ऑनलाइन गेम खेला था और कथित तौर पर पुलिस की वर्दी पहनकर मीडिया साक्षात्कार दिया था। इसके बाद उन्हें ड्यूटी से निलंबित कर दिया गया। जांच का नेतृत्व करने वाली पुलिस उपायुक्त स्वप्ना गोरे ने कहा, "जांच के बाद, यह पाया गया कि उसने बिना अनुमति के ड्रीम गेम खेला, जिसके कारण उसे निलंबित कर दिया गया। यह अन्य पुलिस कर्मियों के लिए एक अनुस्मारक के रूप में कार्य करता है कि उन्हें इससे बचना चाहिए।" इसी तरह से ऑनलाइन गेम खेलने से बचें, क्योंकि उन्हें भी अनुशासनात्मक कार्रवाई का सामना करना पड़ सकता है।'' पुलिस ने कहा, ''झेंडे अब विभागीय जांच में अपना बयान पेश करेंगे।''
गडचिरोली : डिजिटल मीडियासाठी बातमीचे लिखाण कसे केले जाते, एसईओ म्हणजे नक्की काय, डिजिटल मार्केटिंग कशा प्रकारे केली जाते, ऑनलाईन ट्रॅफिकचे तंत्र, बातम्यांचे की-वर्ड आदी महत्वाच्या विषयांवर डिजिटल मीडिया अभ्यासक पत्रकार देवनाथ गंडाटे यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले.
गडचिरोली येथील चामोर्शी मार्गावर असलेल्या संविधान सभागृहात शहरातील माध्यम प्रतिनिधीसाठी 21 जानेवारी ला डिजिटल मीडिया कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी बदलते माध्यम, मोबाईलमुळे झालेले बदल, बिटनिहाय ऑनलाईन पत्रकारिता आणि ब्लॉगिंग, ऑनलाईन रोजगाराची संधी आणि उत्पन्नाची साधने, बातम्यामध्ये की-वर्ड कसे वापरावे, ऑनलाईन ट्रॅफिकमधील फरक आणि सोशल मीडिया आणि डिजिटल मीडियातील फरक, वेबसाईटनिर्मितीचे तंत्र आणि भविष्यातील पत्रकारितेवर सखोल मार्गदर्शन केले.
याप्रसंगी देवनाथ गंडाटे यांनी सांगितले की, डिजिटल मीडियातील बारकावे आणि ओळख जर नसेल तर आजचा पत्रकार मागे पडतो. ज्यांना तंत्रज्ञान अवगत आहे, ते रोजगाराची संधी निर्माण करीत आहेत. लिखाणाला तंत्रज्ञानाची जोड दिल्यास वेबपोर्टलमधूनही कमाई साधता येते, हे उदाहरणासह पटवून दिले. यावेळी डिजिटल मीडिया कायदा आणि नोंदणी कशी करावी, याची माहिती देण्यात आली.
मागील २० वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत देवनाथ गंडाटे यांचे "डिजिटल मीडिया संधी आणि आव्हाने" हे पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे. यानिमित्त गडचिरोलीतील डिजिटल मीडिया पत्रकारांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रारंभी ऍड. मनीष कासर्लावार यांनी प्रास्ताविक केले. समारोपीय कार्यक्रमात पुढील महिन्यात शुभारंभ होऊ घातलेल्या "MY KHABAR24" या नवीन मीडिया प्लॅटफॉर्मची माहिती आणि भविष्यात पत्रकाराना रोजगार कसा मिळेल. याची माहिती व्यवस्थापकीय संचालक प्रीतम मडावी यांनी दिली. कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक श्रीमंत सुरपाम यांनी केले. कार्यशाळेच्या आयोजनासाठी धर्मदास मेश्राम यांनी सभागृह उपलब्ध करून दिले.
कार्यशाळेत वरिष्ठ पत्रकार जयंत निमगडे, प्रवीण चन्नावार, किशोर खेवले, राजू सहारे, क्रिष्णा शेंडे, मिलिंद खोंड, यांच्यासह पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
डिजिटल मीडिया संधी आणि आव्हाने हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. अवघ्या काही दिवसातच डिजिटल माध्यम क्षेत्रातील पत्रकार, नवोदित, डिजिटल व्यावसायिक आणि स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी या पुस्तकाची मागणी केली. मुळातच हे पुस्तक नव्या माध्यमाची कठीण आणि किचकट प्रक्रिया सोपी करणारं आहे. डिजिटल माध्यमांची संख्या प्रचंड वाढली आहे. इतकेच नव्हेतर सोशल आणि डिजिटल माध्यम वापरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. इंटरनेटच्या युगात डिजिटल मीडियात मोठे बदल होत आहेत. डिजिटल मीडियातील अनेक मार्गदर्शक साहित्य यू-ट्युब, वेबसाईटवर उपलब्ध आहे; मात्र, ते इंग्रजी किंवा हिंदी भाषेत आहेत. अनेकदा तांत्रिक शद्बाचा अर्थ सहज समजत नाही. मराठी माणसाला डिजिटल मीडिया सहज आणि सोप्या पद्धतीने समजून घेता यावा, यासाठी देवनाथ गंडाटे यांनी माहिती संकलित करून तयार केलेले पुस्तक मराठी माणसाला देणगीच ठरणार आहे.
Digital Media oppurnity and appeal
देवनाथ गंडाटे (Devnath Gandate) हे मुळात पत्रकार आणि वेबडिझायनर आहेत. केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याकडून मान्यताप्राप्त डिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रीव्हन्स कौंसिल ऑफ इंडिया या स्वनियमन संस्थेचे सदस्य आहेत. सन २००२ पासून पत्रकारितेत कार्यरत असून, चंद्रपूर, नागपूर, अलिबाग आणि विदर्भातील विविध जिल्ह्यात पत्रकारितेचा अनुभव आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे दैनिक सकाळच्या विदर्भ आवृत्तीत १४ वर्ष पत्रकारिता केली. सोबतच चंद्रपूर समाचार, चंद्रधून, कृषीवल, सकाळ आणि लोकशाही वार्ता आदी वृत्तपत्रात बातमीदार, उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक, मुख्य वार्ताहर आदी पदांचा अनुभव आहे. नागपुरातील आयटी क्रॉफ्ट कंपनीच्या माध्यमातून चंद्रपूर महानगरपालिकेत ‘कंटेंट एक्सपर्ट’ म्हणून कामाचा अनुभव पाठीशी आहे. नागपुरातील द पी.आर. टाईम्स तसेच टेक्नोव्हिजन मीडिया ॲण्ड कम्युनिकेशन कंपनीत फ्री लॉन्सर कन्टेन्ट रायटर आणि वेब डिझाइनर म्हणून कार्यरत आहेत. विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थांचे माध्यम व डिजिटल सल्लागार तसेच स्मित डिजिटल मीडियाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.
वेबसाईट डिझाईन, सोशल मीडिया आणि डिजिटल मीडिया अभ्यास ते करीत असतात. हाच अभ्यास त्यांनी लोकांसोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकात प्रामुख्याने सोशल मीडिया आणि डिजिटल मीडिया, गूगल आणि सेवा, फेसबुकचे प्रकार, ट्विटरचे महत्व, टेलिग्रामचे फायदे, व्हाट्सएप आणि बिझनेस व्हाट्सएपमधील फरक, युट्युब आणि त्यातून होणारी कमाई, ऑनलाईन उत्पन्नाचे स्रोत आणि लोकांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिलेली आहेत. इतकेच नव्हेतर नव्या तंत्रज्ञानातील चॅट जीपीटी आणि युनिक मीडिया प्लॅटफॉम यावरही प्रकाश टाकला आहे.