मोहम्मद हजरत पैगंबर साहेब जयंती निमीत्त
पोलीस स्टेशन शेंगाव ( बु ) व पैगामे रजा सेवा संस्था शेंगाव ( बु ) यांच्या संयुक्त विद्यमाने हजतरा पैगंबर साहेब यांच्या जयंतीचे निमीत्त साधून विवीध रोगांवरील शिबीर व निदान कार्यक्रमाचे आयोजन मंळवार ला नेहरु विद्यालय शेंगाव (बु) येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्दघाटन वरोरा - भद्रावती विधान सभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर व ठाणेदार अविनाश मेश्राम यांनी केले. या विवीध रोगांवरील शिबीरात पाचशे साठ नागरीकांनी सहभाग दर्शवित लाभ घेतला.
कार्यक्रमाच्या उद्दघाटनाप्रसंगी आमदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, आरोग्य हा प्रत्येकाच्या जिवनाचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येकाला निरोगी जिवन जगता यावे यासाठी प्रयत्न करायला पाहीजे. नागरीकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असल्याचे बोलत होत्या. ठाणेदार अविनाश मेश्राम म्हणाले की, लोकाभिमुख कार्यक्रम घेवून मुस्लीम बांधवांना मोहम्मद पैगंबर जयंतीच्या शुभेच्छा देत गणपती उत्सव सुद्धा शांतता सुव्यवस्था अबाधीत ठेवून साजरा करावा असे आवाहन याप्रसंगी केले. विवीध रोगावरील शिबीरात निदान व उपचारासाठी वर्धा येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे येथील तज्ञ डॉक्टरांची चमू बोलावण्यात आली. यामध्ये मेडिसीन तज्ञ, नेत्ररोग तज्ञ सर्जरी बालरोग स्त्रीरोग आस्थिरोग स्वसन रोग दंत व मुख रोग त्वचा रोग तज्ञ यांचा समावेश होता.
या कार्यक्रमाकरीता नेहरू विद्यालयाचे मुख्याध्यापक ढाकुनकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष राजू चिकटे, माजी सरपंच यशवंत लोडे, तमूस अध्यक्ष गजानन ठाकरे, शांतता समितीचे उमेश माकोडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ पठाण, यांनी केले तर आभार मुज्जू शेख यांनी केले. कार्यक्रमाला बहुसंख्य नागरीक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करन्यासाठी पैगामे रजा सेवा संस्था व पोलीस स्टेशन शेगांव ( बू ) यांनी प्रयत्न केले.
गणपती उत्सवा दरम्यान काळजी घ्या
"गणपती" उत्सवापासून इतर सनाला सुरुवात होत आहे. वर्तमानातील सप्टेंबर महिन्यात हिंदू व मुसलमान या दोन्ही समाजांचे सन आले आहे. मंगळवार पासुन गणेश उत्सवाला सुरुवात होत आहे. जगात देशात व राज्यात काय घडत हे सोशल मिडीयावरून कळते कोनतीही पोष्ट फारवड करताना शहानिशा केली पाहिजे. हल्ली अनेक अनुचित घटना घडत आहे. याचा परिणाम गणपती प्रतिष्ठापणा ते विसर्जन पर्यत व्हायला नको याची दखल गणेश मंडळानी घेत नियमांचे पालन गणपती मंडळ व नागरीकांनी केले पाहीजे असल्याचे मार्गदर्शन सोमवारला चिमूर येथील शहीद बालाजी रायपूरकर सभागृहातील आयोजीत कार्यक्रमात गणपती मंडळांना अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधू यांनी केले.
चिमूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अंतर्गत येनाऱ्या चिमूर, भिसी, शेंगाव (बु) पोलीस स्टेशनच्या संयुक्त विद्यमाने शांतता कमेटी, गणपती मंडळ, पोलीस पाटील, पत्रकार, सरपंच, नगर परिषद, नगर पंचायत, प्रशासकीय अधिकारी, समाजसेवक व नागरीक यांची संयुक्त सभा घेन्यात आली.पूढे बोलताना जनबंधू म्हणाले की, गणपती मंडळानी गणपती उत्सवाची परवानगी घेने आवश्यक आहे. गणपतीची मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसची नको निव्वळ मातीने बनविलेल्या मूर्तीची प्रतिस्थापना करा. गणपती उत्सवादरम्यान कोनते कार्यक्रम घेता याची माहीती पोलीस पाटील किंवा प्रत्यक्ष पोलीस स्टेशनला येवून द्या. गणपती मूर्तीची प्रतिस्थापना करताना कोणतीही अनुचित घटना घडनार नाही याची काळजी घ्या. गणपती मंडळातील दोन सदस्यांनी गणपती प्रतिस्थापना ते विसर्जन पर्यत आळीपाळीने देखरेख करने आवश्यक आहे. जमत असेल तर एका रांगेत गणपति विसर्जन करा याचा फायदा इतर नागरीकांना दर्शनासाठी होईल. एक गाव एक गणपती संकल्पना ही समाजाला जोडनारी आहे होत असेल असा प्रयत्न करून गणपतीची प्रतिस्थापना करा. MSEB कडून परवानगी घेवून लाईट ची व्यवस्था करा. CCTV कॅमेरा लावा. इतरांना त्रास होनार नाही याची काळजी घेत साऊंड 60 डेसीबल पर्यतच वाजवा. कोर्टाच्या सुचनेचा अवमान होनार नाही याची काळजी घ्या. गणपती विसर्जन दरम्यान मुख्य मार्गावरील मंदीर - मजीद जवळ साऊंड किंवा वाजंत्री वाजविने शक्यतोवर टाळा. वाहतुकीला अडथळा होनार नाही याची काळजी घ्या असल्याचे बोलत होते.
उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणाले की, यापूर्वी सुद्धा सन उत्सव साजरे करत आलो गणपती उत्सवादरम्यान ईद ए मीलाद कार्यक्रम आला दोन्ही समाजातील नागरीकांनी शांतता सुव्यवस्था अबाधीत ठेवून उत्सव साजरा करावा. यावेळी भिसी ठाणेदार प्रकाश राऊत, शेंगाव ( बु) अविनाश मेश्राम, API विनोद जांभूळे, PSI भिष्मराज सोरते, PSI दिप्ती मरकाम, नायब तहसीलदार तुळशीदास मोहर्ले आदि उपस्थीत होते. कार्यक्रमाचे संचालन कैलास आलाम आभार प्रभारी ठाणेदार निलेश चवरे यांनी केले.
सावर्डेच्या हेड कॉन्स्टेबलच्या पतीप्रेमाचे सर्वत्र कौतुक
चिपळूण : दोघेही पोलिस दलात कामाला, सुखाचा संसार सुरू असतानाच पतीला एका आजाराने ग्रासले आणि त्या आजारात दोन्ही किडन्या निकामी झाल्या. पतीच्या उपचारासाठी पत्नीने वणवण सुरू केली; मात्र प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नोंदणीप्रमाणे प्रत्यारोपणासाठी थांबल्यास ते जीवावर बेतणारे होते. त्याचवेळी पोलिस दलात आपले कर्तव्य बजावणाऱ्या महिला कॉन्स्टेबलने आपली एक किडनी देऊन पतीला जीवदान मिळवून दिलेच शिवाय 'गृह कर्तव्य' ही पार पाडले. सावर्डे (ता. चिपळूण) पोलिस स्थानकातील महिला कॉन्स्टेबल आदिती अभिजीत गावणंग यांच्या या धाडसाचे सान्यांनीच कौतुक केले.
पूर्णगड (ता. रत्नागिरी) येथील असलेल्या आदिती या पोलिस दलात सेवा बजावत असतानाच २०१० मध्ये त्यांचे आगवे (ता. चिपळूण) येथील अभिजीत गावणंग यांच्याशी विवाह झाला. अभिजीत गावणंग हेही पोलीस दलात सक्षम कर्मचारी म्हणून ओळखले जातात. पोलिस दलातील कर्तव्य पार पाडतानाच वैवाहिक जीवन सुखी समाधानाने जगत होते. त्यांना १२ वर्षांची स्वरा ही मुलगी आहे.मात्र, २०१८ मध्ये अभिजीत यांना एका आजाराने ग्रासले. तपासणीअंती त्यांची एक किडनी व त्यानंतर काही महिन्यांनी दुसरी किडनीही निकामी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न सुरूच केले.
बेळगाव, मुंबई येथील नामांकित रुग्णालयांमध्ये उपचार घेतले. परंतु, किडनी प्रत्यारोपणाशिवाय कोणताही पर्याय उरला नव्हता. अखेर किडनी मिळवण्यासाठी नोंदणी केली. परंतु, नोंदणीप्रमाणे किडनी मिळण्यासाठी उशीर होणार होता. अशा परिस्थितीत आदिती यांनी स्वतःची किडनी देण्याचा निर्णय घेतला.
कोल्हापूर येथील एका रुग्णालयात किडनी प्रत्यारोपणासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया पूर्ण केली. त्यातही वर्षभराचा कालावधी गेला. काही महिन्यांपूर्वी किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आणि जणू पतीला जीवदानच मिळाले. त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरले. शिवाय पोलिस दलही सुखावले आहे. मंगळवारी आदिती गावणंग या पुन्हा एकदा पोलिस दलात नव्या दमाने कार्यरत झाल्या. यानिमित्त सावर्डे स्थानकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
पोलिसांकडून पायघड्या
किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्यानंतर आठ महिन्यांच्या रजेनंतर मंगळवारी (२९ ऑगस्ट) आदिती गावणंग आपल्या कर्तव्यावर हजर झाल्या. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्यासाठी फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. त्यांच्या या शौर्याबद्दल सायांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन कौतुकही केले.