PostImage

सुपर फास्ट बातमी

Dec. 29, 2023   

PostImage

Lic news: एलआयसीने बाजारातून कमावले तब्बल २.२८ लाख कोटी रुपये


 

नवी दिल्ली: भारतीय जीवन विमा महामंडळाने (एलआयसी) यंदा शेअर बाजारात तब्बल २.२८ लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे. 'एस इक्विटी'ने जारी केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.

 

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विविध कंपन्यांमधील एलआयसीच्या एकूण शेअर होल्डिंगचे बाजार मूल्य ९.६१ लाख कोटी होते. ते आता वाढून ११.८९ लाख कोटी झाले आहे. सप्टेंबरअखेरीस एलआयसीचे एकूण शेअर होल्डिंग आणि विद्यमान बाजार मूल्य या आधारे ही किंमत काढण्यात आली आहे.

 

 

एलआयसीसाठी सर्वाधिक कमाई करणाऱ्या ५ समभागांत कोल इंडिया, लार्सन अँड टुब्रो, बजाज ऑटो, टाटा मोटर्स आणि एनटीपीसी यांचा समावेश आहे. मागील वर्षात एलआयसीच्या लार्सन अँड टुब्रोमधील

 

हिस्सेदारीचे मूल्य ४६ टक्के वाढून ५२,७८६ कोटी झाले. कोल इंडियातील हिस्सेदारीचे मूल्य वाढून २४,०८७ कोटीवर पोहोचले तर एनटीपीसीतील एलआयसीच्या हिस्सेदारीचे मूल्य ८६ टक्के वाढून २,४०० कोटी रुपये झाले.

 

गुंतवणूकदारांना जबदरस्त परतावा

एलआयसी ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहेच; पण ती सर्वात मोठी संस्थात्मक गुंतवणूकदारही आहे. एलआयसीच्या पोर्टफोलिओमध्ये सुमारे २६० कंपन्यांचे समभाग आहेत, या समभागांनी एलआयसीला जबरदस्त परतावा दिला आहे.


PostImage

pramod abhiman raut

Aug. 31, 2023   

PostImage

आता घसबसल्या चेक करता येणार LIC ची Unclaimed Amount


 

चिमूर प्रतिनिधी :-

         दावा न केलेली रक्कम तपासण्यासाठी, तुम्हाला एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. यानंतर, सर्वात खाली या आणि तेथे दिलेल्या पर्यायांपैकी Unclaimed Amounts of Policyholders वर जा आणि क्लिक करा. यानंतर एक विंडो ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला पॉलिसी क्रमांक, पॉलिसीधारकाचे नाव, जन्मतारीख आणि पॅन कार्ड क्रमांकाची माहिती विचारली जाईल. ही माहिती दिल्यानंतर तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करावं लागेल. तुमच्याकडे एलआयसीमध्ये पैसे असल्यास, सबमिटवर क्लिक करताच त्याची माहिती तुम्हाला मिळेल. यानंतर तुम्हाला दावा अर्थात क्लेम करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

          चेक केल्यानंतर तुम्हाला थकबाकीची रक्कम दिसली, तर तुम्हाला त्यावर दावा करण्यासाठी एलआयसी कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल. यासाठी तुम्ही आधी अर्ज करावा लागेल आणि त्यासोबत तुम्हाला केवायसी द्यावे लागेल. त्यानंतर विचारलेली कागदपत्रेही सबमिट करावी लागतील. ते जमा केल्यानंतर, एलआयसीकडून रक्कम देण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि काही दिवसांत तुमचे पैसे पॉलिसीशी जोडलेल्या बँक खात्यात येतील.

        IRDAI नं सर्व विमा कंपन्यांना यासंदर्भात स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्यांच्या पोर्टलवर दावा न केलेलं खातं आणि पैशांची पूर्ण माहिती द्यावी लागेल. जर 1000 रुपये किंवा त्याहून अधिक रकमेचा दावा असेल तर त्याची संपूर्ण माहिती वेबसाइटवर द्यावी लागेल. दावा 10 वर्ष जुना जरी असला तरी त्याची संपूर्ण माहिती वेबसाइटवर द्यावी लागेल.