PostImage

सुपर फास्ट बातमी

Aug. 26, 2024   

PostImage

युवतीची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिस कोठडी


 कुरखेडा : येथील ज्योती ऊर्फ चांदणी मसाजी मेश्राम या २६ वर्षीय युवतीचा गळा दाबून हत्या करणारा आरोपी इकराम सलाम शेख याला न्यायालयाने २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. कुरखेडा येथे २४ ऑगस्ट रोजी सकाळी हत्येची घटना उघडकीस आल्यानंतर आरोपी इकराम शेख याला कुरखेडा पोलिसांनी अवघ्या १२ तासांतच अटक केली होती. शनिवारी आरोपीची कसून चौकशी करण्यात

 

आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २५ ऑगस्ट रोजी कुरखेडा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला २६ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

 

विशेष म्हणजे, आरोपीने जुन्या पैशांच्या वादातून ज्योती मेश्राम हिची हत्या केल्याची कबुली दिली होती; परंतु या घटनेत पुन्हा नवीन बाबींचा उलगडा होतो काय, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Aug. 19, 2024   

PostImage

वीज पडून बैल ठार ,शेतकऱ्यांचे नुकसान


 

तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

भा ज पा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये यांची महसुल विभागाकडे कडे मागणी

 

कढोली : आज बारा वाजेच्या सुमारास कढोली खरकाडा रस्त्यालगत असलेल्या शेतात बैल चरत असताना अचानक वीज कोसळल्याने बैल जागीच मरण पावल्याने बैल मालक दत्तेश्वर बळीराम मानकर कढोली यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाल्याने त्यांच्यावर दुःखाचे डोंगर कोसळून त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे .या घटनेची माहिती मिळताच कुरखेडा तालुका समन्वय व पुर्नरविलोकन समिती अध्यक्ष तथा भाजपा तालुका अध्यक्ष चांगदेव फाये यांनी घटनास्थळी भेट देत या संदर्भात आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कुष्णाजी गजबे, तहसिलदार रमेश कुमरे, पशुवैद्यकिय अधिकारी भामरे यांना संपर्क करून तात्काळ पंचनामा करुन नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी त्यांना मागणी केली आहे.

यावेळी भाजपा तालुका महामंत्री चंद्रकांत चौके, विजय पाटील नाकाडे, रोशन भोयर, फाल्गुन ठाकरे, राजेश मानकर व गावातील नागरिक उपस्थित होते.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Aug. 15, 2024   

PostImage

कढोली: युवकाचा नदीत बुडून मृत्यू


 

 वैरागड : मित्रासोबत नदीत पोहायला गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना कुरखेडा तालुक्यातील कढोली येथे १३ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.

 

विशाल ताराचंद सहारे (२०) असे मृत युवकाचे नाव आहे. कढोली जवळून वाहणाऱ्या सती नदी पात्रात तुटलेल्या बंधाऱ्याजवळ मित्रासह आंघोळ करायला गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने विशाल खोल पाण्यात जाऊन वाहत गेला. सोबत असलेल्या मित्रांनी वाचविण्याचा प्रयत्न केला पण पाण्याचा प्रवाह वेगाने असल्याने तो दिसेनासा झाला. गावकऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून विशालचे प्रेत बाहेर काढले व पोलिसांना माहिती दिली.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

July 18, 2024   

PostImage

दुचाकीस्वाराला ठार करून चारचाकीचालक पळाला


 

कुरखेडा : कुरखेडा-कढोली मार्गावर गोठणगाव नाका ते मालदुगीदरम्यान अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात बुधवारी (दि.१७) सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास घडला. रघुनाथ तुलावी (५५, रा. मालदुगी) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. रघुनाथ तुलावी हे कामानिमित्त

 

गोठणगाव नाक्यावर आले होते. परत मालदुगीकडे जात असताना त्यांचा दुचाकीला एका ढाब्याजवळ चारचाकी वाहनाने धडक दिली. अपघातानंतर चालक वाहनासह पळून गेला. यात रघुनाथ तुलावी यांचा जागीच मृत्यू झाला. तुलावी हे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था गोठणगाव येथे संचालकपदी कार्यरत होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

April 25, 2024   

PostImage

बांधगाव(सोनसरी) येथे विवाहीतेचे गळफास घेतलेला मॄतदेह आढळले



कुरखेडा (Gadchiroli) : तालूक्यातील बांधगाव येथे एका ३० वर्षीय विवाहित महीलेचे (Woman Suicide) स्वंयपाक खोलीचा दाराला गळफास घेतलेला मॄतदेह आढळून आले. सदर घटणा आज सकाळी पहाटे सहाच्या दरम्यान उघडकीस आली. मृतक महिलेचे नाव प्रतिभा गिरीधर राणे असे असून कौटूंबिक कलहाला कंटाळत तिने आत्महत्या केली असावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तिचा (Woman Suicide) मृतदेह आज सकाळी स्वंयपाक खोलीचा दाराला गळफास घेतलेला अवस्थेत आढळून आला. परंतु तीच्या माहेरच्यानी आमच्या मुलीची हत्या करण्यात आली, असा आरोप सासरच्या मंडळी वर केला आहे.

घटनेची माहीती मीळताच‌‌ पूराडा पोलीस स्टेशनचा चमूने घटणास्थळ गाठत पंचनामा केला, शवउत्तरीय तपासणी करीता (Kurkheda Hospital) उपजिल्हा रूग्णालय कूरखेडा अंतर्गत शवविच्छेदन सेंटरला पाठविण्यात आले. मृतकाला पती व २ अपत्य आहेत .यासंदर्भात (Kurkheda Police) पूराडा पोलीस स्टेशन येथे मर्ग दाखल करण्यात आले आहे. पूढील तपास (Kurkheda Police) पूराडा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी भूषण पवार यांचा मार्गदर्शनात सूरू करण्यात आला आहे.

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

April 2, 2024   

PostImage

पेट्रोल पंप समोर भरधाव ट्रकने दूचाकी स्वाराला चिरडले


ता. प्र / कुरखेडा, दि. 01 : येथील देसाईगंज मार्गावर एच.पी पेट्रोल पंप समोर भरधाव ट्रकने दूचाकी स्वाराला चिरडल्याची घटना 31 मार्च रोजी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास घडली. हा अपघात एवढा भीषण होता कि मृतक दुचाकीस्वाराचे शरीर छिन्न विछिन्न झाले होते. यशवंत नामदेव गहाणे (वय 58) रा. अंगारा असे मृतकाचे नाव आहे.

 

दिपक ट्रान्सपोर्ट चा ट्रक नागपुर - कूरखेडा या मार्गावर नियमीत माल वाहतूक करतो. दरम्यान मृतक हा एम एच 33 झेड 6124 क्रमांकाच्या दुचाकी वाहनाने अंगारा येथून मुलीच्या गावी ताडगांव येथे जाण्याकरीता सकाळी निघाला होता. कुरखेडा- देसाईगंज मार्गावर असलेल्या एच.पी पेट्रोल पंप मधून त्याने वाहनात पेट्रोल भरले व कुरखेडा-देसाईगंज या मुख्यमार्गावर निघताच देसाईगंज कडून कुरखेडाकडे येणारा एम.एच 31 सि. बी 8635 क्रमांकाच्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली यावेळी दुचाकी हि ट्रकच्यासमोरील चाकात तर दुचाकीस्वार मागील चाकात सापडल्याने दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहीती मिळताच साहायक पोलीस निरीक्षक दिनेश गावंडे यांनी घटणास्थळावर पोहचत पंचनामा केला व शव उत्तरीय तपासणी करीता उपजिल्हा रुग्णालयात पाठविले तसेच ट्रक जप्त करीत पोलीस स्टेशन कुरखेडा येथे जमा केले.


PostImage

सुपर फास्ट बातमी

April 2, 2024   

PostImage

Kurkheda news: शिक्षकाने शाळेतील 13 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीची केली छेडछाड


 

 

ता.प्र / कुरखेडा, दि. 01 : विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या एका शिक्षकाने शाळेतील 13 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीची छेडछाड केल्याप्रकरणी त्या शिक्षकावर कुरखेडा पोलीस ठाण्यात विनयभंग व पोक्सोच्या विविध कलमान्वये आज सांयकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेने शिक्षण विभागासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

 

घनश्याम मंगरु सरदारे (वय 47) असे आरोपी शिक्षकाचे नाव असून तो कुरखेडा तालुक्यातील एका जि.प. उच्च प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. शाळेतीलच एका अल्पवयीन मुलीला दोन पानी प्रेम-पत्र देत तसेच तिच्या शरीराचा मुका घेणे, चिमटे घेणे अशी छेड काढत असल्याचा आरोप करीत आज मुलीच्या पालकांनी मुलगी व गावकऱ्यासह कुरखेडा पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून आरोपी शिक्षकाविरोधात भादवि 354 (अ) 8,10,12 पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिक्षक फरार असल्याची माहिती असून प्रकरणाचा तपास ठाणेदार रेवचंद सिंगनजूडे यांच्या मार्गदर्शनात महिला पोलीस उपनिरीक्षक अवचार करीत आहेत.


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 11, 2024   

PostImage

कार-दुचाकीची धडक; एक गंभीर, पाच किरकोळ जखमी


कोरची : भरधाव वेगाने कोरचीकडे येणाऱ्या कारने मोटरसायकलला समोरासमोर जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला, तर कार उलटल्याने तेथील पाचजण किरकोळ जखमी झाले. ही घटना रविवार १० मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता बोडेना फाट्याजवळ घडली.

 

कार-दुचाकी अपघातात दुचाकीस्वार प्रताप मडावी (४०) रा. दोडके हे गंभीर जखमी झाले असून यांचा उजवा पाय तुटला. वाहनांची धडक एवढी जोरदार होती, की कार रस्त्याच्या डाव्या बाजूच्या खड्यात उलटून पुन्हा सरळ झाली. कोरचीकडे भरधाव वेगाने एम.एच. ४९, एफ. ०८२९ क्रमांकाची कार येत होती. बोडेना फाट्यावर दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले. तेव्हा कार व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. दरम्यान, मोटारसायकल क्षतिग्रस्त झाली असून कारचे टायर फुटून बरेच नुकसान झाले.

 

दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली असून कारमधील पाच जण किरकोळ जखमी झाले. सायंकाळी घटनास्थळी लोकांनी गर्दी केली. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. १०८ रुग्णवाहिकेला संपर्क साधल्यानंतर सदर रुग्णवाहिका एकतास उशिरा येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, उशिरापर्यंत जखमींना रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले.

 

चांदागडचा इसम जखमी

कुरखेडा: चांदागडवरून कुरखेडाकडे दुचाकीने येत असताना गोठणगाव नाक्यावरील चौरस्त्यावर दुचाकीची कारला धडक बसल्याने दुचाकीस्वार क्रिष्णा भजने (रा. चांदागड ४०) हा गंभीर झाला. हा अपघात १० मे रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडला. अपघातानंतर दुचाकीस्वार क्रिष्णा भजने हा रस्त्यावर पडला. यावेळी तो गंभीर जखमी असल्याने लगेच नाक्यावरील युवकांनी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेकरिता टोल फ्री क्रमांकावर फोन केला. यावेळी रुग्णवाहिका बाहेर असल्याने थोडा वेळ लागेल असे सांगण्यात आले. अर्धा तास वाट बघूनही रुग्णवाहिका न पोहचल्याने सोहम कावळे, पवन शिडाम, मोहीद शेख व अन्य युवकांनी दुचाकीनेच जखमी इसमाला दोन किलोमीटर अंतर असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात पोहचविले. जखमीला रुग्णालयात पोहचविण्यात आले.यावेळी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका उपजिल्हा रुग्णालयातच उभी होती, असा आरोप युवकांनी केला आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 8, 2024   

PostImage

संतप्त शेतकऱ्यांचा कुरखेडा वीज कार्यालयाला घेराव; प्रशासन नमले


कुरखेडा : वारंवार बंद होणारा कृषिपंपाचा आणि घरगुती विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा, या मागणीला घेऊन सोनसरी, बांधगाव व परिसरातील संतप्त शेकडो शेतकऱ्यांनी बुधवारला कुरखेडा विद्युत कार्यालयाला चार तास घेराव घातला. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, तालुकाप्रमुख आशिष काळे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी कुरखेडाच्या वीज कार्यालयावर धडक दिली. दरम्यान, यावेळी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता मुरकुटे यांना कार्यालयाबाहेर बोलावून शेकडो शेतकऱ्यांचा उपस्थित घेराव करण्यात आला. शेतीपंपाचा विद्युत पुरवठा वारंवार बंद का होतो? असा सवाल उपस्थित करण्यात आला. ८ तासांपैकी

 

शेतीला फक्त २ तासच विद्युत पुरवठा मिळतो. बाकी ६ तास वीजपुरवठा बंद असतो. शेती पिकवायची कशी, असा प्रतिप्रश्न शेतकऱ्यांनी यावेळी केला. घरगुती वीजपुरवठा सायंकाळी बंद होतो. रात्रीही बंद होतो, अशा तीव्र भावना व्यक्त केल्या. त्यानंतर उपस्थित आंदोलकांनी कार्यकारी अभियंता मुरकुटे यांच्याशी चर्चा करण्यात आली. वारंवार शेतीला मिळणारा आणि घरगुती विद्युत पुरवठा बंद राहणार नाही. २४ तासांपैकी चार- चार तास ब्रेक करून विद्युत पुरवठा सुरळीत राहील, असे आश्वासन मुरकुटे यांनी दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

March 8, 2024   

PostImage

कलहामुळे पत्नी माहेरी, - निराश पतीची आत्महत्या कुरखेडा तालुक्याच्या आंधळीतील …


कुरखेडा:  कुटुंबात कलह वाढल्याने पत्नी महिनाभरापूर्वी माहेरी निघून गेली. त्यामुळे वाढलेल्या भांडणतंट्यांमुळे पतीच्या मनातही नैराश्य आले. पत्नी माहेरी निघून गेल्याचे व कौटुंबिक कलहाचे दुःख चे दुःख सोसवेना झाल्याने पतीने चिंचेच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बुधवार ६ मार्च रोजी सकाळी कुरखेडा तालुक्याच्या आंधळी येथे उघडकीस आली. किरपाल रामजी भोंडे (३१) रा. आंधळी,

 

असे आत्महत्या करणाऱ्या विवाहित इसमाचे नाव आहे. भोंडे यांच्या कुटुंबात सततची भांडणे होत होती. याच कौटुंबिक कलहामुळे महिनाभरापूर्वी किरपालची पत्नी घर सोडून माहेरी गेली. तेव्हापासून किरपाल हा नैराश्यात होता. दरम्यान, बुधवार ६ फेब्रुवारी रोजी सकाळी गावालगतच्या चिंचेच्या झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत किरपाल यांचा मृतदेह आढळून आला. पुढील तपास कुरखेडा पोलीस करीत आहेत. 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 21, 2024   

PostImage

Kurkheda news: वर पोहे, खाली सुगंधित तंबाखू


वर पोहे, खाली सुगंधित तंबाखू.. छत्तीसगडच्या तस्करांची शक्कल

२३ लाखांचा मुद्देमाल जप्तः गोठणगाव नाक्यावर पोलिसांची कारवाई

कुरखेडा : वर पोहे व खाली सुगंधिततंबाखू टाकून छत्तीसगडहून आलेला टेम्पो तालुक्यातील गोठणगाव येथे पोलिसांनी पकडला. यावेळी चालकास ताब्यात घेतले असून सुमारे २३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १९ जानेवारीला रात्री आठ वाजता करण्यात आली.

ललितकुमार खेमचंद टंडण (वय २५, रा. राजनांदगाव, छत्तीसगड) असे आरोपीचे नाव आहे. तो टेम्पोतून (सीजी ०८ एके-४२३८) छत्तीसगडहून गडचिरोलीमार्गे चंद्रपूरला जात असल्याची माहिती मिळाल्यावरून उपाधीक्षक साहील झरकर यांनी गोठणगाव नाक्यावर सापळा लावला. टेम्पो आल्यावर झडती घेतली असता,त्यातील पोत्यात वर पोहे व खाली सुगंधित तंबाखू आढळून आली.

सुमारे ८ लाख ९ हजार २८० रुपयांची तंबाखू, ३ लाख ८५ हजारांचे पोहे, मोबाइल, टेम्पो असा सुमारे २३ लाख ५० हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. चालक ललितकुमारखेमचंद ठंडण (२५, रा राजनांदगाव, छत्तीसगड) याला अटक करण्यात आली.याप्रकरणी कुरखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. उपनिरीक्षक दयानंद भोंबे हे तपास करत आहेत.

रॅकेट उघडकीस येणार का ?

दरम्यान, जिल्ह्यातील गांजा, सुगंधित तंबाखू तस्करीचे छत्तीसगड कनेक्शन यापूर्वीही अनेकदा उघडकीस आलेले आहे. मात्र, पाळेमुळे खणून काढण्यात पोलिसांना यश येत नाही. या कारवाईनंतर रॅकेट उघडकीस येणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.