चालक जखमी कोरची- भिमपूर मार्गावरील
कोरची - बंगलोर येथुन पाईप वाहुन नेणाऱ्या ट्रकने झाडाला धडक दिल्याने चालक जखमी झाल्याची घटना आज २७ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास कोरची पासुन १ कि.मी अंतरावर वनश्री कला महाविद्यालय समोर घडली.
सी.जी.०४ एम.जी. ६७२३ क्रमांकाचा ट्रक बंगलोर वरून पाईप घेऊन रायपुरला जात असताना ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव वेगाने विद्युत खांबास धडक देऊन १०० मी अंतरावर असलेल्या झाडाला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, ट्रकचा पुर्णतः चेंदामेंदा झाला. विद्युत खांब खाली कोसळल्याने विद्युत लाईन खंडित झाली. ट्रक चालक जसंवत पटेल रा. सेवरागांव ता. जबलपुर हा ट्रक मध्ये फसला होता. त्यांना आवागमन करणाऱ्या लोकांनी बाहेर काढून कोरची ग्रामीण रुग्णालयांमध्ये भरती केले. त्याच्या डाव्या हाताला व पायाला जबर मार लागला आहे.
कोरची : तालुक्यातील मसेली येथील वैद्यकीय अधिकाऱ्याला शिवीगाळ करून त्यांच्यावर हात उचलणे एका युवकाला चांगलेच भोवले आहे. पोलिसांनी तरुणाला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १३ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पुरुषोत्तम माधव हलामी (२९, रा. बोदालदंड, ता. कोरची) असे आरोपीचे नाव आहे. डॉ. नरेंद्र खोबा (३१) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २० जानेवारी रोजी ते कर्तव्यावर असताना दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास रस्ता अपघातातील जखमी ऋत्विक श्रीराम सयाम (२३, रा. मसेली) याला त्याच्या मित्रांनी दवाखान्यात आणले होते.
डॉ. नरेंद्र खोबा यांनी रुग्णाची गंभीर दुखापत बघून रुग्णास रेफर करण्याची कागदपत्रे तयार केली आणि रुग्णाच्या नातेवाइकांना रुग्णास वाहनात बसवण्यास सांगितले. पुरुषोत्तम हलामी याने रुग्णास रेफर करण्याची कार्यवाही बघून डॉ. नरेंद्र खोबा यांची कॉलर पकडून त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली.