येणापूर च्या नाल्याजवळ एका इसमाला चक्क जाळले
आष्टी:-
पोलीस स्टेशन हद्दीत एका इसमाला येणापूर नाल्या शेजारी चक्क जाळून मारल्याची घटना उघडकीस आली आहे.
दि.सहा नोव्हेंबर दुपारच्या दोन वाजताचे सुमारास ही घटना घडली असून मृतकाचे नाव मनोज आनंदराव मेकर्तीवार वय ३५ रा. सोमणपल्ली ता.चामोर्शी जिल्हा गडचिरोली असे आहे
आष्टी पोलीसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून मृतदेहाची ओळख पटवली लागलीच संशयित दोन तरुणांना अटक करण्यात आली
राहुल गुंजनकर रा.चंद्रपूर व श्रीनिवास मेकर्तीवार रा.सोमणपल्ली असे आरोपी
असून त्याचा खुन का करण्यात आला याचा तपास पोलीस निरीक्षक विशाल काळे, पोलीस उपनिरीक्षक मानकर व कर्मचारी करीत आहेत मृतकास का मारले प्रश्न अनूत्तरीत आहे
अल्पवयीन मुलीवर तरुणाने केला अत्याचार
आरोपी तरुणा विरोधात आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
अशोक वासुदेव खंडारे वैनगंगा वार्ता १९
आरमोरी:-
फेसबुक वर ओळख करून तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार केल्याची घटना 3 नोव्हेंबरला उघडकीस आली आहे. पोलिसांनी चंद्रपूर जिल्ह्यातील आरोपीला बेळ्या ठोकल्या आहेत. सूजीत कैलास गेडाम वय 22 वर्षे राहणार मोहाडी तालुका शिंदेवाही जिल्हा चंद्रपूर असे आरोपीचे नाव आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका 17 वर्षीय पीडित युवती सोबत सुजित गेडामची काही महिन्या पूर्वी फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली एकमेकांना फेसबुकच्या माध्यमातून मेसेज करणे सुरू झाले. दरम्यान याचे रूपांतर प्रेमात झाले एकमेकांची फेसबुक वर ओळख झाली होती अशातच दोघांनी परस्पर एकमेकांना भेटण्याचा निश्चय केला. परस्पर एकमेकांना भेटल्यानंतर सुजित गेडामने युवतीला शरीर सुखाची मागणी करून युवतीवर अत्याचार केला. झालेल्या प्रकारामुळे युवती घाबरुन जावून सोबत
घडलेला सर्व प्रकार युवतीने आपल्या स्वगावी जावून कुटुंबीयांना सांगितला. असता कुटुंबीयांनी लगेच आरमोरी पोलीस ठाणे गाठून सुजित गेडाम विरोधात तक्रार दाखल केली पोलिसांनी आरोपी विरोधात भारतीय दंड न्याय संहिता 64 (1)64(2)(1),64(2)87 137 (२) अन्वये गुन्हा दाखल करून 31 ऑक्टोबरला आरोपी सूचित गेडाम ला पोलिसांनी त्याच्या स्वगावातून ताब्यात घेतले आणि न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक कैलास गवते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिलीप मोहूर्ले तपास करीत आहेत
शेतशिवारा जवळील तलावात बुडून इसमाचा झाला करुन अंत
आरमोरी तालुक्यातील लोहारा येथील घटना.
प्रमोद झरकर वैनगंगा वार्ता १९ गडचिरोली
आरमोरी:-
शेतशीवाराजवळील तलावात बुडून इसमाचा करुन अंत झाल्याची घटना आरमोरी तालुक्यातील लोहारा येथे दिनांक 4- नोव्हेंबर-2024 सोमवार रोजी 11.30 वाजताच्या दरम्यान घडली
सविस्तर वृत्त असे की लोहारा येथील मृतक वामन बाजीराव कुमरे वय 45 वर्ष हे आपल्या मुलासोबत नामे सुमित वामन कुमरे वय 17 वर्षे याला सोबत घेऊन शेतातील धान्य कापले असल्याने ते पाहण्याकरिता शेताकडे गेले होते . मात्र ते शेतामध्ये गेले असताना त्यांना शौचास लागल्याने ते शेतापासून जवळच असलेल्या खोलबोडी तलावात गेले मात्र तलावातील काठावर गेले असता त्यांना चक्कर मिर्गी आल्याने ते तलावातील पाण्यामध्ये पडले व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. वामन कुंमरे यांचा मुलगा शेतामध्ये त्यांची वाट पाहत होता. वडिलांना शेताकडे येण्याकरिता अति जास्त वेळ झाला म्हणून मुलगा सुमित तलाव कडे गेला असता वामन कुमरे पडलेल्या अवस्थेमध्ये दिसले.
लगेच मुलाने आरडाओरडा करून घटनेची माहिती गावातील लोकांना दिली घटनास्थळी गावातील लोकांनी धाव घेऊन घडलेल्या घटनेची माहिती पोलीस पाटील यांना दिली लगेच पोलीस पाटील यांनी घटनेची माहिती आरमोरी पोलिसांना दिली. आरमोरी पोलीस लगेच घटनास्थळी दाखल होऊन मृताचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनाकरिता करिता आरमोरी येथे पाठवीण्यात आला. घटनेचा तपास एपीआय कामतूरे, पीएसआय विजय चलाख हेड कॉन्स्टेबल पिल्लेवान करीत आहेत.
अति प्रेमभराने लुप्त झालेल्या प्रियकराने प्रेयसीच्या नादात स्वतःहला लावला गळफास
सिरोंचा :
अती प्रेमाने लुप्त झालेल्या प्रियकराने प्रेयसीच्या मृत्यू झाला अशी भावनिक माहिती मिळताच त्याने गळफास घेऊन आपली जिवनयात्रा स़पवली
कोटा पोचमपल्ली येथे घरगुती भांडणातून पतीने २३ ऑक्टोबरच्या रात्री झोपेत असलेल्या पत्नीचा गळा चिरून हत्या केली होती. आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, विवाहित महिलेचे गावातीलच एका युवकाशी विवाहबाह्य प्रेम संबंध असल्याच्या संशयातून पतीने महिलेची हत्या केली. दरम्यान, महिलेच्या प्रियकराचाही मृतदेह अहेरी तालुक्याच्या आलापल्लीजवळ २६ ऑक्टोबर रोजी सकाळी गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला
लिंगय्या गट्ठ येलकुच्ची (३२, रा. कोटा पोचमपल्ल) असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या प्रियकराचे नाव आहे. समय्या मुतय्या बोल्ले याला पत्नी पद्मा हिचे समय्या बोल्ले गावातीलच लिंगय्या येलकुच्ची याच्याशी विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता. याच संशयातून दोघांमध्ये भांडण होत होते. गत आठवड्यापासून दोघांमध्ये खटके उडत होते. २३ ऑक्टोबर रोजी पद्मा हिचा धारदार शस्त्राने खून करून पसार झाला होता. या घटनेमुळे प्रियकर लिंगय्या गट्ठ येलकुच्ची याच्यावर मानसिक आघात झाला. त्यानंतर त्याने हे पाऊल उचलले.
ह्या घटनेचा पोलीस तपास करीत आहेत लवकरच सत्यता समोर येणार आहे
प्रेमाची भाषा बोलून अल्पवयीन मुलीशी केले शारिरीक संबंध, मुलगी राहीली गर्भवती व फुटले बिंग
शारीरिक संबंध करणाऱ्या इंजेवारी येथील युवकास आरमोरी पोलिसांनी केली अटक
आरमोरीः
प्रेमाची आस दाखवून एका अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेऊन तिला गर्भवती करणाऱ्या आरोपी युवकास आरमोरी पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केल्याची घटना दिनांक २४ ऑक्टोबर रोजी घडली. विनोद घनश्याम पात्रीकर वय (२०) रा. इंजेवारी ता. आरमोरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राप्त माहितीनुसार यातील फिर्यादी पिडीतेची आई ही दि २२ ऑक्टोबर २०२४ रोजी काम करुन घरी आल्यावर त्यांना त्यांची मुलगी पिडीता ही घरी आढळून आली नाही. त्यांनी सर्वत्र शोध घेवुनही ती मिळून नआल्याने आरमोरी पोलीस ठाण्यात रिपोर्ट देण्यासाठी आली असता आरमोरी पोलीसांनी तिच्या लोकेशन बाबत माहीती काढुन तिचा त्वरीत शोध घेतला. मुलगी मिळुन आल्याने कोणतीही तक्रार करायची नाही असे लेखी दिले व रिपोर्ट न देता मुलीला ताब्यात घेवुन घरी गेली.
त्यानंतर दि. २३ ऑक्टोबर रोजी पिडीतेच्या आईला व नातेवाईकांना पिडीता गर्भवती असल्याबाबत शंका आल्याने पिडीतेच्या आईने केलेल्या तपासणीत पिडीता ही गर्भवती असल्याचे लक्षात आले. पिडीतेला विश्वासात घेवून तिच्या आईने विचारले असता पिडीतेने इंजेवारी येथील विनोद पात्रीकर याने आपल्यासोबत शारिरीक सबंध प्रस्थापित केल्याचे सांगितले.यामुळे पिडीतेच्या आईने आरमोरी पोलीस ठाण्यात येवून तोंडी रिपोर्ट वरून आरमोरी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात कलम ३७६ (२) (१), ३७६ (२) (नं, भा. द. वी. सहकलम ४,६,८,१२, बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम २०१२ अन्वये गुन्हा नोंद केली व दिनांक २४ ऑक्टोबर रोजी आरोपीला अटक करण्यात आली.
आरोपीवर गुन्हा दाखल होताच आरोपीस न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास आरमोरी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक ज्योती राक्षे करीत आहेत.
पीडितेला पुढील वैद्यकीय उपचारासाठी गडचिरोली येथील महीला व बालरुग्णालय येथे पाठविण्यात आले आहे
आरमोरी तालुक्यात पोक्सो अंतर्गत गुन्ह्यांची वाढली संख्या
आरमोरी हे विद्येचे माहेरघर असल्याने तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी, विद्यार्थीनी आरमोरी येथे शिक्षणासाठी येतात. मात्र समाजमाध्यमांच्या आहारी जाऊन नको ते कृत्य करीत असल्याने आरमोरी पोलीस ठाण्याअंतर्गत पोक्सो खालील गुन्ह्यामध्ये वाढ होत असल्याचे दिसुन येत आहे. याकरीता शाळा, कॉलेजमध्ये प्रबोधन करण्याची गरज व्यक्त होत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात कामगार म्हणून आलेल्या इसमास रानटी हत्तीने चिरडले.
सेल्फीचा नाद जीवाच्या अलंगट आला
गडचिरोली, दि. 24 : रानटी हत्ती परिसरात आल्याने त्यासोबत सेल्फी काढण्याचा नाद एका मजुराच्या जीवावर बेतला. रानटी टस्कर हत्तीने हल्ला करीत मजुराला चिरडून जागीच ठार केल्याची घटना गुरुवार 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास चामोर्शी तालुक्यातील आबापूर जंगलामध्ये घडली. श्रीकांत रामचंद्र सतरे, रा. नवेगाव (भु), ता. मूल, जि. चंद्रपूर असे ठार झालेल्या मजुराचे नाव आहे.
गडचिरोली जिल्ह्यात मागील दोन वर्षापूर्वी ओडिशा राज्यातून रानटी हत्तीचा कळप दाखल झाला. जिल्ह्यातील विवध भागात कळपाने मार्गक्रमण करीत शेतपिकांची नासाडी केली तर विविध घटनेत नागरिकांचा हत्तीच्या हल्यात मृत्यू झाला.श्रीकांत सतरे हा आपल्या काही सोबत्यांसह गडचिरोली जिल्ह्यात केबल टाकण्याचे काम करण्याकरिता आला होता. दरम्यान गडचिरोली वनविभागातील कुनघाडा रै. वन परिक्षेत्रांतर्गत आबापूर गाव परिसरातच काम सुरु होते. 23 ऑक्टोबर रोजी चातगाव व गडचिरोली वन परिक्षेत्रातून रानटी टस्कर हत्तीने कुनघाडा रै. वन परिक्षेत्रात प्रवेश केलेला होता. नियत क्षेत्र मुतनूर वनक्षेत्रातील आबापूर जंगलात हत्ती वावरत असल्याची माहिती केबल टाकणाऱ्या मजुरांना मिळाली असता तिघेजण हत्ती पाहायला गुरुवारी सकाळीच गेले होते. हत्ती दूरवर असताना श्रीकांत हा हत्तीसोबत सेल्फी काढण्यात मग्न असताना हत्तीने हल्ला करुन त्याला चिरडले. घटनेच्या वेळी अन्य दोघांनी तेथून पळ काढत आपला जीव कसाबसा वाचविला. जिल्ह्यात आणखी एकाचा रानटी हत्तीच्या हल्यात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली असून रानटी हत्तीच्या जवळ जावू नये, सेल्फी च नाद करु नये, हत्ती असलेल्या परिसरात प्रवेश करु नये अशा सूचना वारंवार वनविभागामार्फत देण्यात येत आहेत. तरी मात्र काही नागरिक हत्तींना बघण्याकरिता जंगल परिसरात जात असल्याने अशा घटना समोर येत आहे.
गडचिरोली विधानसभा क्षेत्राची उमेदवारी विद्यमान आमदार डॉ. देवराव होळींनाच द्यावी
महायुतीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत केली मागणी
अशोक वासुदेव खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९
गडचिरोली:-
भाजपचे गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी यांनाच महायुतीच्या शिवसेना,राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी भाजपने उमेदवारी द्यावी अशी मागणी आज पत्रकार परिषद मधून करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. भाजपाच्या पहिल्या यादीत
डॉ. होळी यांचे नाव नसल्याने त्यांचे समर्थक हे नाराज
झाले असून त्यांच्या मदतीला मित्र पक्ष धावून आल्याने
राजकीय समीकरण बदलत आहेत.
२५ ऑक्टोंबरला डॉ. देवराव होळी हे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व आमदार डॉक्टर देवराव होळी मित्रपरिवाराच्या २५ हजार कार्यकर्त्यांचा मेळावा गडचिरोली येथे घेऊन शक्तिप्रदर्शन करणार आहेत. या मेळाव्यात २५ हजार कार्यकर्ते येणार असल्याचा दावा महायुतीतील नेत्यांनी केला आहे.
आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्रातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात यापूर्वी कधीच न झालेला विकास करून दाखवलेला आहे . त्यांनी भाजपासोबतच मित्र पक्षांच्या सर्व नेत्यांना सोबत घेऊन या ठिकाणी काम केलेले आहे. त्यामुळे विकास कामाच्या आधारावर त्यांचा विजय निश्चित आहे करिता जिंकून येणाऱ्यांनाच आमचा पाठिंबा असून भारतीय जनता पार्टीने आमदार डॉक्टर देवराव होळी यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व आमदार डॉक्टर देवराव होळी मित्र परिवाराच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली.पत्रकार परिषदेला शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे, उपजिल्हाप्रमुख हेमंत जंबेवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नामदेवजी दुधबळे लौकिक भिवापूरे, भाजपा जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे, शहराच्या अध्यक्षा कविताताई ऊरकुडे, पंचायत समिती सभापती मारोतराव इचोडकर, प स उपसभापती विलास दशमुखे, ज्येष्ठ नेत्या प्रतिभाताई चौधरी, पल्लवीताई बारापात्रे, विधानसभा प्रमुख रोशनभाऊ मसराम, दीपक भारसाकडे युवासेना जिल्हा प्रमुख, जिल्हा सचिव दिलीप चलाख, साईनाथजी बुरांडे, चामोर्शी तालुका प्रमुख पप्पी पठाण, तालुकाप्रमुख सोपान म्हशाखेत्री, ज्येष्ठ नेते जयराम चलाख, धानोरा महिला आघाडी प्रमुख वरगंटीवार ताई, आतिश मिस्त्री बंगाली आघाडी जिल्हाप्रमुख, युवा सेना उपजिल्हाप्रमुख सागर भांडेकर, यांचे सह २०० हून अधिक पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
माते तु झाली ग वैरीणी,माझी दया का आली नाही, नवजात अर्भकाचा टाहो
गडचिरोली ,
माते तु झाली ग वैरीणी माझी दया का आली नाही असा टाहो नवजात अर्भकाचा लोकांना ऐकू आला त्यामुळे नवजात अर्भक फेकल्याची घटना उघडकीस आली आहे
सदर घटना गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून जवळच असलेल्या खरपूंडी येथे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खरपूंडी ते आकरटोली कडे जाणाऱ्या कच्चा व सिमेंट काँक्रेटच्या रस्त्याच्या बाजुला कचऱ्यामध्ये अज्ञात व्यक्तीने नर जातीचे जिवंत अर्भक फेकूण दिले. याबाबत रस्त्याने जाणाऱ्या नागरिकाला कळताच त्यांनी गावातील व्यक्तींना माहिती देत गडचिरोली पोलीसांना कळविले. पोलीसांनी घटनास्थळ गाठून अर्भक ताब्यात घेत महिला व बाल रुग्णालय गडचिरोली येथे दाखल करण्यात आले आहे. सदर अर्भक हे पुरुष जातीचे असुन कोणीतरी आपले पाप लपविण्यासाठी हा लाजिरवाणा प्रकार केला असून पोलीसांकडून त्यांचा शोध घेणे सुरु आहे. अद्याप बाळाला जन्म दिलेल्या मातेचा थांगपत्ता लागलेला नाही
मात्र माता एवढी वैरीणी कशी होऊ शकते हा यक्ष प्रश्न निर्माण होतो आहे
गडचिरोली पोलीसांनी पाच नक्षल्यांचा केला खात्मा
अन्न व औषधी प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या दौऱ्या दरम्यानची घटना,
प्रमोद झरकर उपसंपदक गड़चिरोली वैनगंगा वार्ता १९
भामरागड; (गडचिरोली)
तालुक्याला लागून छत्तीसगड राज्य सीमेवरील कोठी पोलीस स्टेशन हद्दीतील कोपर्शी गाव जंगल परिसरात पोलिसांकडून नक्षलविरोधी अभियान राबवितांना पोलीस पथक आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत पाच नक्षल्यांचा खात्मा करण्यात पोलिसांनी यश आले आहे.
सदरच्या चकमकीत एक सुरक्षा जवान जखमी झाल्याची माहिती आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम हे आज भामरागड तालुक्याच्या दौऱ्यावर असून चकमकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. हे विशेष!
कोपर्शी गाव जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी असल्याची माहिती पोलिसांना गुप्तचर यंत्रणा द्वारे प्राप्त झाली होती. त्यावरून (ता. २१ ऑक्टोंबर) सोमवारी पोलिसांच्या नक्षल शोध अभियान पथकाने मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवत असतांना दुपारी एक वाजता दरम्यान नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला प्रत्युत्तरात पोलीस जवानांनी नक्षल्यांविरुद्ध चोख प्रत्युत्तर दिले. यात पाच नक्षल्यांचा खात्मा झाला असून एक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे.
चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. विधानसभा निवडणूक जाहीर पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांचा मोठ्या प्रमाणावर घातपात करण्याचा इरादा असल्याचे बोलले जात असून या घटनेमुळे पोलिसांकडून नक्षल्यांचा हातापती मनसुबा हाणून पाडण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम हे सकाळपासूनच भामरागड तालुक्याच्या दौऱ्यावर होते. अशातच भामरागड तालुक्यात चकमक घडल्यामुळे आत्राम यांच्या सुरक्षेत भरपूर प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. आत्राम यांना पोलिसांचा तगडा बंदोबस्त देण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आत्राम यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. चकामकीनंतर पोलिसांकडून परिसरात नक्षलविरोधी शोध मोहीम तीव्र करण्यात आला असून मृत ओळख पाठविली जात आहे.
लिटील हार्ट्स विद्यालयाच्या विद्यार्थ्याची गोळाफेक स्पर्धेत राज्यस्तरावर झाली निवड
अशोक खंडारे/ मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९
आष्टी:- लिटिल हार्ट्स विद्यालयाच्या विद्यार्थ्याची गोळाफेक स्पर्धेत राज्यस्तरीय निवड झाली आहे
जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या विभागस्तरिय मैदानी स्पर्धेत तन्मय चंद्रमणी फुलझेले या विद्यार्थ्यानी 14 वर्षे वयोगटातील गोळाफेक या स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त करत रजत पदक पटकावले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे .
तन्मय चंद्रमणी फुलझले या विद्यार्थ्यानी केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष अनिल आल्लूरवार, सचिव रमेश आरे, मुख्याध्यापक कृष्णमुर्ती गादे, क्रीडा शिक्षक नितेश पुंगाटी यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी कौतुक केले.
महिला पोलीस शिपाई विवाहित राहुनही, केलं दुसरे लग्न पोलिसांनी केला गुन्हा दाखल.
सांगली:-
येथे पोलिस महिला पोलीस हिने विवाहित राहुनही दुसरे लग्न केले हि खळबळजन घटना उघडकीस आली आहे
पोलीस महिला शिपाई महिलेने पहिले लग्न लपवून ठेवत चक्क दुसरे लग्न करीत पतीची फसवणूक केल्याची घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वंदना महेश कांबळे वय 39, रा. इनाम धामणी, ता. मिरज या महिला विरोधात सांगली ग्रामिण पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तिच्या विरोधात पती महेश लक्ष्मण कांबळे वय 36 वर्ष, रा. आष्टा यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता, न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वंदना ही सांगली पोलिस विभागात कार्यरत आहे. वंदना कांबळे सह जनाबाई चंद्राप्पा कांबळे वय 60 वर्ष, राजशेखर चंद्राप्पा कांबळे वय 42 वर्ष, उषा शंकर माळी वय 40 वर्ष, सर्व रा. इनाम धामणी यांच्यावरही तरुणाची फसवून केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश कांबळे हे आष्टा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश कांबळे हे आष्टा येथे मजुरीचे काम करतात. त्यांचे लग्न वंदना बरोबर 22 जून 2022 रोजी झाले होते. लग्नानंतर एका आठवड्यात म्हणजे 30 जून 2022 रोजी ती पतीला काही न सांगता आपल्या माहेरी इनाम धामणीला निघून गेली. त्यानंतर पती महेश यांचे मामा सुहास पठाणे व त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन महेश हे वैवाहिक संबंध ठेवण्यास पात्र नाहीत अशी तक्रार केली.
मी नांदण्यास त्यांच्याकडे जाणार नाही. महेश व त्यांच्या कुटुंबाने माझी फसवणूक केली, त्याबद्दल 9 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही केली. पैसे न दिल्यास खटल्यात अडकविण्याची धमकी दिली. यादरम्यान, वंदना, जनाबाई, राजशेखर व उषा यांनी महेशच्या घरी माणसे पाठवून दिली. महेशच्या कुटुंबातील माणसांचे बरेवाईट करण्याची धमकी दिली.
दरम्यान, महेश यांनी न्यायालयात तक्रार केली की, वंदना हिच्या आरोपांमुळे आपल्या लौकिकास बाधा पोहोचली आहे. वंदना विषयी चौकशी केली असता तिचा पहिला विवाह सांगलीतील संजय राजाराम शिंदे रा. वखारभाग यांच्याशी झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे तिने आपली फसवणूक केली आहे. पोलिसांनी वंदना व अन्य तिघा संशयितां विरोधात गुन्हे दाखल केले.
आमोरासमोर झालेल्या दोन दुचाकीच्या धडकेत ग्रामसेवक ठार
अहेरी; (गडचिरोली)
तालुक्यातील आलापल्ली वळणावर दोन दुचाकीच्या सामोरासमोर झालेल्या जबर धडकेत रघुनाथ तुगे मुळमा, (वय ३८ वर्ष) रा कुकामेट्टा, ता. भामरागड यांचा उपचारार्थ रुग्णालयात हलवितांना मृत्यू झाला असून त्यांच्या निधनाने पंचायत समिती प्रशासनात शोककळा परतली आहे.रघुनाथ मुळमा हे एटापल्ली तालुक्यातील घोडसुर ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते, ते (ता.१५ ऑक्टोंबर) मंगळवारी सायंकाळी सहा वाजता दरम्यान एटापल्ली येथून स्वतःच्या दुचाकीवरून भामरागडच्या दिशेने जात होते, त्याच वेळी विरुद्ध दिशेने येणारी दुचाकीत समोरासमोर भीषण धडक झाली, यात रघुनाथ मुळमा याच्या छाती व डोक्याला जबर मार लागला होता, त्यांना नागरिकांकडून उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले, मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे हलविण्यात आले होते. चंद्रपूरला जात असतांना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला आहे.रघुनाथ मुळमा यांच्या मृतदेहावर जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे उत्तरीय तपासणी केली जाऊन अंत्यविधीसाठी मृतदेह नातेवाहिकांना सुपूर्द करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास अहेरी पोलिसांकडून केला जात आहे.
चुलत मामाने केला भास्याचा घात मात्र उमरखेड पोलीसांनी अवघ्या बारा तासात खुनाच्या आरोपीला केले जेरबंद
उमरखेड:- . चुलत मामाने केला भास्याचा घात मात्र पोलीसांनी तात्काळ शोध घेत अवघ्या बारा तासात आरोपी मामास जेरबंद केले आहे
दि. १२ ऑक्टोंबर रोजी पोलीस स्टेशन उमरखेड येथे
तक्रारदार रतेराव अप्पाराव सोळंके वय ७० वर्ष धंदा सेवानिवृत्त कर्मचारी रा. महागाव रोड जि. प. कॉलनी उमरखेड यांनी तक्रार दिली की, त्यांचा पुतण्या मृतक सुमीत प्रभाकर सोळंके वय २३ वर्ष रा. जिल्हा परिषद कॉलनी महागाव रोड उमरखेड हा दि. १२/१०/२०२४ रोजी चे सकाळी ०९:०० वा.चे दरम्यान हा कामा निमीत्ताने नेहमी प्रमाणे घराबाहेर गेला व सायंकाळी उशीरापर्यंत तो घरी परत आला नाही म्हणुन दिनांक १३/१०/२०२४ रोजी पोलीस स्टेशन येथे तो हरविल्याबाबत तक्रार दिली त्यावरून पोलीस स्टेशन उमरखेड येथे हरविल्याची क्र.५७/२०२४ दाखल करून शोध सुरू केला.दरम्यान दुपारी १२ वाजताच्या सुमारास माहीती मिळाली की, सुमित हा चुरमुरा शेत शिवारातील जंगलामध्ये मृत अवस्थेत पडुन आहे. लगेच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहिले असता चुरमुरा फाट्यापासुन चुरमुरा फुलसावंगी रोडवर रोड पासुन सुमारे १०० मीटर अंतरावर जंगलात मृतक सुमीत प्रभाकर सोळंके वय २३ वर्ष जिल्हा परीषद कॉलणी उमरखेड याचे प्रेत रक्ताने माखलेले दिसुन आले त्याचा चेहरा कपडे व शरीरयष्टीवरुन ते प्रेत सुमीतचे असल्याचे खात्री झाली. त्याच्या मानेवर व गळ्यावर कापल्याच्या जखमा दिसल्या.
कोणीतरी अज्ञात आरोपीने मृतकचा खुन केल्याचे दिसत असल्याने तक्रारदार रतेराव अप्पाराव सोळंके यांनी दिलेल्या तक्रारीवरून अपराध क्र.६८८/२०२४ कलम १०३ (१) भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये गुन्हा नोंद करून तपासामध्ये घेतला.
गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेता अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन आरोपीने केलेल्या खुनाची माहिती पाहता आरोपी शोध बाबत महत्वपूर्ण सुचना दिल्या. उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग उमरखेड हनुमंत गायकवाड व पोलीस स्टेशन उमरखेड पो. नि. पांचाळ यांच्या आदेशाने वेगवेगळ्या टीम तयार करून आरोपी च्या शोध साठी रवाणा करण्यात आल्या. स्थानीक गुन्हे शाखा यवतमाळ येथील अधिकारी सपोनि गजानन गजभारे, पोउपनि शरद लोहकरे यांचे पथक तपास करीत असतांना मृतक हा त्याचा चुलत मामा संदीप अवधुत जगताप रा. नेर ता. माहूर याच्या दुचाकीवरून बसुन जातांना दिसल्याने त्याच्यावर संशय बळावल्याने आरोपीला ताब्यात घेण्यासाठी एक टीम नेर ता. माहूर येथे रवाणा केली.
आरोपी हा मृतका च्या अंतविधीसाठी आला आहे अशी माहिती मिळाल्याने आरोपीला महागाव रोडवरून ताब्यात घेऊन त्याला गुन्ह्याबाबत विचारणा केली असता आधी त्याने उडवा उडविची उत्तरे दिली परंतु विश्वासात घेऊन विचारणा केली असता आरोपी ने गुन्ह्याची कबुली दिल्याने आरोपीला गुन्हात अटक करण्यात आली आहे.
आरोपी याने मृतकला पैशाच्या वादातुन धारदार शस्त्राने गळा चिरुन खुन केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असुन अधिक तपास सुरु आहे
जन्मदात्या बापानेच तुझ्या आईला मारुन टाकतो अशी धमकी देत अल्पवयीन मुलीवर करायचा बलात्कार
तक्रारीवरुन बापाविरुद्ध गुन्हा दाखल
नागपूर (Nagpur): दारुड्या बापाने सख्ख्या १४ वर्षीय मुलीला तुझ्या आईला जीवे मारुण टाकतो अशी धमकी देऊन बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. गेल्या तीन महिन्यांपासून ती मुलगी बापाचा लैंगिक अत्याचार सहन करीत होती. शेवटी आईला प्रकार सांगितल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. लकडगंज पोलिसांनी तक्रारीवरुन बापाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
आरोपी किसन (बदललेले नाव) हा बेरोजगार असून पत्नी, मुलगी आणि मुलासह लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतो. तो गेल्या चार वर्षांपासून बेरोजगार असून त्याला दारुचे व्यसन आहे. किसन कामाला जात नसल्यामुळे पत्नी घराबाहेर पडली. ती खासगी काम करुन संसाराचा गाडा हाकत आहे. मुलगी १४ वर्षाची असून ती नवव्या वर्गात तर मुलगा पाचवीत आहे. दारुड्या किसनाची गेल्या काही दिवसांपासून आपल्या सख्ख्या मुलीवर वाईट नजर होती. गेल्या तीन महिन्यांपासून तो तिला बाहुपाशात घेऊन अश्लील चाळे करीत होता. तू आता मोठी झाली आहेस, म्हणून मी तुझा लाड करीत आहे. असे सांगून तो वारंवार तिच्याशी लगट करीत होता. मुलीने बापाच्या या घाणरेड्या कृत्याकडे दुर्लक्ष केले. मुलगी आंघोळ करुन बाहेर आल्यानंतर तिला त्याच्यासमोरच कपडे बदलण्याची सक्ती करीत होता. गेल्या काही दिवसांपूर्वी पत्नी नातेवाईकाकडे धार्मिक समारंभासाठी गेली असताना मध्यरात्रीनंतर झोपेत असलेल्या मुलीशी बापाने अश्लील कृत्य केले. शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीने नकार दिला. त्यामुळे तिला बापाने मारहाण केली. त्यानंतर बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
आईला जीवे मारण्याची धमकी -
पत्नी कामावर गेल्यानंतर किसन हा मुलाला खेळायला बाहेर पाठवायचा. त्यानंतर मुलीला शारीरिक संबंधाची मागणी करायचा. ती अनेकदा त्याला नकार द्यायची. त्यानंतर तो शिक्षण बंद करण्याची धमकी द्यायचा. तसेच आईला जीवे मारण्याची धमकी द्यायचा. त्यामुळे मुलगी घाबरुन त्याला संबंधासाठी होकार द्यायची. शिक्षण बंद आणि आईच्या जीवाला धोका असल्यामुळे झालेला प्रकार ती आईला सांगत नव्हती.
नातेवाईकांनी दिली हिम्मत
गेल्या आठवड्यात आई कामावरुन लवकर घरी आल्यानंतर मुलीने पोटात दुखत असल्याचे सांगून रडायला लागली. आईने तिची आस्थेने विचारपूस केल्यानंतर वडिलांनी नुकताच शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे सांगितले. त्यामुळे चिडलेल्या पत्नीने पतीला विचारणा केली. त्याने कबुली दिली आणि पोलिसात गेल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे महिलेने काही नातेवाईकांना घडलेला प्रकार सांगितला. नातेवाईकांनी हिम्मत दिल्यामुळे ती मुलीला घेऊन पोलीस ठाण्यात गेली. लकडगंज पोलिसांनी तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला.
वनमंत्री यांच्या निर्वाचन क्षेत्रात चक्क बिबट्याने घरात शिरुन महिलेवर केला हल्ला
चंद्रपूर :- . वनमंत्री यांच्या निर्वाचन क्षेत्रात आता चक्क घरात शिरून बिबट्याने महिलेस जखमी केले असल्याची घटना मूल तालुक्यातील मौजा शिवापूर चक येथे काल शुक्रवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. झोपेत असलेल्या महिलेवर बिबट्याने चक्क घरात शिरून हल्ला केल्याने परिसरात खळबळ माजली आहे. वंदना परशुराम निमगडे वय ४८, रा. शिवापूर चक, असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. मूल तालुक्यातील मौजा- शिवापूर चक येथे परशुराम आबाजी निमगडे आपल्या कुटुंबीयासह राहतात. घराला लागूनच बगिचा तसेच काही अंतरावर बफर क्षेत्राचे जंगल आहे. निमगडे यांचे कुटुंबीय रात्री झोपेत असताना शुक्रवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास बिबट्याने घरात शिरून वंदना परशुराम निमगडेवर हल्ला केला. काही अंतरावर असलेल्या कुत्र्यांनी बिबट्याला बघून भुंकण्याचा आवाज केल्याने निमगडे कुटुंबीय जागे झाले. दरम्यान,बिबटया वंदनावर हल्ला करीत असल्याचे दृश्य बघुन इतरांनी घाबरलेल्या अवस्थेत आरडाओरड केल्याने बिबट पळुन गेला. मात्र, बिबट्याच्या हल्यात वंदना निमगडे ही जखमी झाली. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन जखमी वंदना निमगडे हिला मूल येथील उपजिल्हा रूग्णलयात उपचारार्थ दाखल केले. वनविभागाने पंचनामा करून पुढील तपास करीत आहेत.
मुल तालुका हा बल्लारपूर मतदार संघात येतो. या क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार हे वनमंत्री असल्याने चक्क वनमंत्र्याच्या गृहक्षेत्रातच वन्यप्राण्यांची एवढी दहशत निर्माण झाल्याने तालुक्यातील नागरिकांनी कोणाकडे दाद मागावी असा प्रश्न निर्माण झालेला आहे. वनमंत्र्यांनी विधानसभा क्षेत्रातील वन्यप्राण्यांच्या हल्ल्यावर तत्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती ही नव्या जीवन मार्गाची क्रांती- खोब्रागडे
गोकुळनगर येथे धम्म चक्र प्रवर्तन दिन संपन्न
गडचिरोली -डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली धम्मक्रांती ही नव्या जीवन मार्गाची क्रांती होती. या धम्मक्रांतीमुळे दलितांच्या जीवनात नव्या पर्वाची सुरुवात झाली आणि त्यांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन झाले. धम्मक्रांतीची हि पताका अधिक डौलाने फडकविण्यासाठी प्रयत्नरत राहिले पाहिजे असे प्रतिपादन प्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत डॉ प्रेमकुमार खोब्रागडें यांनी केले.
सम्यक समाज समिती, विशाखा महिला मंडळ व सम्यक ज्येष्ठ नागरिक समितीच्या संयुक्त विद्यमाने येथील गोकुळनगर येथील सम्यक बुद्ध विहाराचे प्रांगणात आयोजित धम्म चक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
सम्यक समाज समितीचे अध्यक्ष हंसराज उंदीरवाडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर रिपब्लिकन पक्षाचे नेते रोहिदास राऊत, डॉ. खुशाल दुर्गे, माली समाज संघटनेचे हरिदास कोटरंगे, ज्येष्ठ नागरिक संघाचे कवडूजी उंदीरवाडे, विशाखा महिला मंडळाच्या चंद्रकला टेम्भूर्णे प्रामुख्याने उपस्थित होते.
बाबासाहेबानी माणसाला माणुसकीची जाणीव करून दिली. त्यांच्यात स्वाभिमान जागृत करून बुद्धाचा नवा मार्ग दिला आणि मूकनायकाला प्रबुद्ध भारतात रूपांतरित केले . त्यांचे हे कार्य अतुलनीय आहे आणि धम्माच्या या दिशेनेच मानवी समूहाचे कल्याण होणार आहे असेही डॉ. खोब्रागडे याप्रसंगी म्हणाले आणि धम्म प्रचाराचे कार्य पुढे नेण्याचे आवाहन केले.
रोहिदास राऊत म्हणाले बुद्धाचा धम्म आज सर्व जगात पोहोचला आहे. धम्म मार्गाचे अनुसरण देश विदेशात केल्या जात आहे हि बौद्धांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली धम्मक्रांती आज सर्व मानव जातीसाठी उपकारक झाली आहे. धम्मचक्र प्रवर्तन हे बाबासाहेबानी केलेले अलौकिक कार्य आहे आणि त्यामुळे दलितांच्या जीवनात झालेले परिवर्तन ही अत्यंत ऐतिहासिक बाब आहे.
अन्य मान्यवर पाहुण्यांचीही यावेळी समयोचित भाषणे झालीत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौतम मेश्राम यांनी केले. संचालन नमिता वाघाडे यांनी तर आभार प्रदर्शनअश्विनी साखरे यांनी केले. कार्यक्रमाला बौद्ध बांधव व अन्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी पंचशील ध्वजारोहण तथा गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमान वंदन करण्यात आले व बुद्ध वंदना घेण्यात आली.
तलावात नेले देवी विसर्जनाला मात्र खड्ड्यात पडून 3 तरुणांना झाली जलसमाधी
गोंदिया : देवी विसर्जन दरम्यान तलावात खोदलेल्या खड्ड्यात तोल गेल्याने तीन तरुणांचा त्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सावरी टोला (रावणवाडी) येथील संकुलात शनिवारी रात्री 10:30 वाजताच्या सुमारास घडली.
आशीष फागुलाल दमाहे वय, 22 वर्ष, अंकेश फागुलाल दमाहे वय, 19 वर्ष, यश गंगाधर हिरापुरे वय, 19 वर्ष तिघे रा. सावरी ता. गोंदिया असे या घटनेतील मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
गावातील तलावात रस्त्याच्या कामासाठी मे 2024 मध्ये खोदण्यात आलेल्या खड्ड्यात देवीच्या मूर्तीचे विसर्जन करताना तीन तरुणांचा तोल जाऊन खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची घटना सावरी येथे घडली.
12 ऑक्टोबर रोजी रात्री 10:30 वाजता रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत हा प्रकार घडला. या घटनेची माहिती मिळतात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने रात्री 3 तास तलावात मृतदेह शोधून एक मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळवले आणि दुसरा मृतदेह रविवारी सकाळी सापडला आणि एक उपचारासाठी घेवून जात असताना तिसऱ्या तरुणाचा मृत्यू झाला.
शनिवारी सावरी गावातील इतर रहिवासी दुर्गा देवी मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन कार्यक्रमात सहभागी झाले होते. अंतिम टप्प्यात सावरी टोला येथील तलावात मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी गावातील 9 तरुण देवीची मूर्ती घेऊन तलावाकडे गेले असता.
यश हिरापुरे, आशिष दमाहे, अंकेश दमाहे आणि मागून मूर्ती धरून बसलेला आणखी एक युवक पुढे आला. तलावात खोदलेल्या खड्ड्यात तीन तरुणांची जलसमाधी झाली आणि दुसऱ्या तरुणाने कशी तरी वरून मूर्ती हलवून त्यांचे प्राण वाचवले.
या घटनेत मृत्यू झालेल्या आशिष दमाहे या तरुणांची नुकतीच लष्करात निवड झाली होती आणि काही प्रशासकीय प्रक्रियेनंतर तो सरकारी सेवेत रुजू होणार होता.
तलावाच्या खोल खड्ड्यात बुडून या तिन्ही तरुणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच रावणवाडी पोलीस व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन चे पथक घटनास्थळी दाखल झाले. या हृदय द्रावक घटनेमुळे रावणवाडी, सावरी, सावरीटोला परिसरात शोकाचे वातावरण निर्माण झाले आहे. रावणवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास रावणवाडी पोलिस ठाणे चे पोलिस निरीक्षक वैभव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
शिक्षक पदभरतीत घोळ करणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यास निलंबित करा :- आझाद समाज पक्षाची मागणी
गडचिरोली :- जिल्ह्यातील जिल्हा परिषद कंत्राटी शिक्षक भरती मध्ये शिक्षण विभागाच्या भोंगळ व मनमानी कारभारामुळे गडचिरोली जिल्ह्यातील अनेक बेरोजगारांवर सातत्याने अन्याय होत आहे. त्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यास निलंबित करण्याची मागणी आझाद समाज पक्षाच्या वतीने करण्यात आली. ज्या उमेदवारांनी Bed झालेच नाही अशाही उमेदवारांना नियुक्ती दिली. परंतु ज्ञानेश्वर नंदेश्वर, नलिनी भोयर, मीना गोवर्धन यांचा Bed झाला असताना नियुक्ती दिली नाही. यामध्ये गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे.
05 सप्टेंबर रोजी आझाद समाज पार्टीच्या वतीने जिल्हा परिषदेवर काढलेल्या मोर्च्यात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दखल घेत शिक्षणाधिकाऱ्यांनी जाहीरपणे स्थानिकांना प्राधान्य देणार असल्याचे कबूल केले आणि राज्य सरकारने सुद्धा याची दखल घेऊन नविन 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत पदभरती करताना निवृत शिक्षकांना या प्रक्रियेतून बाद केले, पंचायत समिती अंतर्गत स्थानिकांना प्राधान्य दिले आणि CTET, TAIT सारख्या अट शिथिल केल्या या तिन्ही मागण्या पूर्ण करून आदेश काढला.
शिक्षण विभागाने 11 ऑक्टोबर ला 189 उमेदवार बाहेर जिल्ह्यातील बोलविले हे मात्र समजले नाही. नेमके जिल्हा परिषदेने चालविले काय, शासकीय आदेश असताना आणि स्वतः उघडपने कबूल केले असताना आता अशा प्रकारे जिल्ह्याबाहेरील उमेदवारांना स्थान देणे म्हणजेच हा मनामानी कारभार असल्याचा आरोप आझाद समाज पक्ष व बेरोजगार संघटनेने पत्रकार परिषदेतून केला आहे.
एक तर ज्यावेळी पदभरती चालू होती त्यावेळी Tait, Ctet नसलेल्या Ded, Bed धारकांचे अर्ज आले असताना स्वीकारले नाही. त्यामुळे आता जिल्ह्यातील Ded, Bed धारकांना संधी असताना अर्ज नाही म्हणून बाहेर जिल्ह्यातील उमेदवारांना स्थान देत आहेत यातून “शिक्षण विभागाने भ्रष्टाचार तर केला नाही ना? ” असा सवाल उपस्थित होतो.
एवढेच नव्हे तर 7 ऑक्टोबर 2024 रोजी 10 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळेत कंत्राटी शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध करून केवळ 3 दिवस मुदत देऊन 10 ऑक्टोबर अर्ज करण्याची शेवटची तारीख देण्यात आली हा प्रशासनानी बेरोजगारांशी मांडलेला खेळ आहे. कोणतीही भरती निघाली तर 2 दिवस ती माहिती होण्यासाठी लागतात मग केवळ 3 दिवसाची मुदत देऊन जिल्हा परिषद नेमके काय साध्य करायचे आहे हा प्रश्न आहे. आचारसंहिता लागणार म्हणून काय कशाही पद्धतीने मनमानी चालवीणार का?
तसेच कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती करताना उमेदवारांना त्याच्या गावाजवळ चीं शाळा देण्यात यावी असे असताना गावाजवळचीं शाळा न देता 100-150 km दूर पाठविण्यात आले. सुरुवातीला आदेशात 20 हजार मानधन असताना आदेशात 15 हजार मानधन करण्यात आले हा मोठा प्रमाणात भोंगळ कारभार असल्याचे सिद्ध होत आहे..
आझाद समाज पार्टी व बेरोजगार संघटनेकडून बाहेर जिल्ह्यातील उमेदवारांची पदभरती त्वरीत स्थगित करून, जिल्ह्यातील DEd, Bed धारक उमेदवारांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी व न्याय द्यावा. आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करून शिक्षणाधिकारी यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.
राज बन्सोड जिल्हाध्यक्ष, आझाद समाज पार्टी गडचिरोली यांनी प्रेस नोट द्वारे कळविले आहे.
धारदार शस्त्राने केली सख्या भावाने मोठ्या भावाची हत्या
सिरोंचा:-
तालुक्यातील रंगय्यापल्ली येथे दोन सख्ख्या भावांच्या झालेल्या भांडणात लहान भावाने मोठ्या भावाची धारधार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना दिनांक दहा ऑक्टोंबर शुक्रवारला रात्रो पाऊणे अकरा वाजताच्या सुमारास घडली.
चीन्नना मल्लया वडगुरी वय 40 वर्ष रा. रंगय्यापल्ली ता. सिरोंचा असे मृतकाचे नाव असून सत्यम मलय्या वडगुरी वय 31 वर्ष रंगय्यापल्ली असे आरोपीचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, रंगय्यापल्ली येथील चीन्नना वडगुरी व सत्यम वडगुरी या दोन भावंडा मध्ये जुन्या काही कारणाने वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, लहान भाऊ सत्यम वडगुरी याने मोठा भाऊ चिन्नना वडगुरी यांच्या वर धारधार शस्त्राने वार केला. चिन्नना च्या कानाच्या पाठीमागे जबर दुखापत झाली. यावेळी रक्तस्त्राव मोठया प्रमाणात झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सीरोंचा पोलिस घटनास्थळी पोहोचले व मृतकाचे शव उत्तरीय तपासणीसाठी सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आरोपीला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संदेश नाईक व ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश जंगले हे करीत आहेत
आदिवासी समाज संघटनाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात महाआक्रोश मोर्चा
गडचिरोली:-
गडचिरोली जिल्हा कार्यालयावर आदिवासी समाज संघटनाच्या वतीने महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चात गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान सहभागी झाले, आदिवासी बांधवांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर, संसदेत का मग न्यायालयातील लढा असो लोकप्रतिनिधी म्हणून नेहमी मी त्यांच्या सोबत आहे असे मत खासदार डॉ. किरसान यांनी व्यक्त केले.
यावेळी मोर्चात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी आम. आनंदराव गेडाम, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पा. पोरटी, शहर अध्यक्ष सतीश विधाते, युवक काँग्रेस प्रदेश सचिव ॲड. विश्वजीत कोवासे, डॉ. सोनल कोवे, रामदास मसराम, छगन शेडमाके, माधवराव गावडे, गुलाब मडावी, पुष्पलता कुमरे, भारत येरमे, मिलिंद खोब्रागडे, निजान पेंदाम, रुपेश टिकले, दिलीप घोडाम, प्रशांत कोराम, गिरीधर तीतराम, विश्वेश्वर दरो, रमेश कोडापे, सदानंद ताराम, वर्षा आत्राम, सह इतर काँग्रेस पदाधिकारी आणि हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव मोर्चात सहभागी झाले होते