चिमूर प्रतिनिधी :-
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अरविंद रेवतकर व मित्र परिवारा तर्फे सामान्य नागरिकांच्या मुलीच्या लग्न कार्य समारंभाकरिता अल्पशी भेट म्हणून किराणा वाटप भिसी येथील युवराजजी दिघोरे यांचे निवासस्थानी भेट देऊन देण्यात आला.
अरविंद रेवतकर यांच्या चिमूर विधानसभा क्षेत्रात अनोखा सामाजिक उपक्रम राबविला जात असून, अनेक गरजू व गरजवंत गोरगरीब जनतेला आर्थिक मदत, कुठं किराणा वाटप तर कुणाच्या दुःखात सहभागी होत आधार देत असतात. तर कोरोणा काळात सुद्धा त्यांनी अनेकांना एक हात मदतीचा म्हणून दिला होता. त्यामुळं कोरोना योद्धा म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आलेला होता.
असाच आज आर्थिदृष्टया कमजोर असलेल्या गरीब मुलीच्या लग्न कार्य समारंभाकरिता अल्पशी भेट म्हणून किराणा वाटप करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे देवा घुटके, जगतजी तांबे, विजय नन्नावरे, मनोज दिघोरे, हरीश डुकरे, रोशन रेवतकर, सौरभ कामडी, शैलेश आजबलकर, अक्षय नागपुरे, फैयाज शेख, अक्षय सातपैसे, राहूल कामडी, यश कोथळे, राहूल दिघोरे, आशिष श्रीरामे, श्रीकांत वाघ, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ता गण आदी उपस्थित होते.