चिमूर प्रतिनिधी :-
पोलिस स्टेशन शेगाव (बू ) आणि पैगामे रजा सेवा संस्था शेगाव बू यांचे संयुक्त विद्यमाने हजरत पैगंबर साहेब यांचे जयंती निमित्त भव्य रोग निदान शिबिर चे आयोजन नेहरू शाळा शेगाव बू आज दिनाक 26.09.2023 रोजी सकाळी 9.00 वा ते 14.00 वा पर्यंत करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन वरोरा भद्रावती विधानसभा चे आमदार प्रतिभाताई धानोरकर आणि ठाणेदार अविनाश मेश्राम पोलिस स्टेशन शेगाव (बू) यांनी केले. ठाणेदार मेश्राम यांनी जयंती लोकभिमुख कार्यक्रम घेऊन साजरी करण्यात येत आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने जयंती साजरी होते असे बोलून सर्व मुस्लिम बांधवांना हजरत मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या जयंती च्या शुभेच्या दिल्या. तसेच गणपती उत्सव सुध्दा असेच कार्यक्रम घेऊन साजरी करावी असे आवाहन केले.
आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी आरोग्य हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येकाला निरोगी जीवन जगता यावे यासाठी प्रयत्न करायला हवे. शिबिराचा उद्देश जनतेला निरोगी ठेवण्याचा आहे. नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आव्हान केले. तसेच रीबिन कापून रीतसर सर्वरोग निदान व उपचार शिबिर चे उद्घाटन केले.
या शिबिर करीता आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे येथील डॉक्टरांची टीम बोलवण्यात आली होती. यामध्ये मेडीसिन तज्ञ, नेत्ररोग , सर्जरी, बालरोग, स्त्रीरोग, अस्थिरोग, स्वशन रोग, दंत व मुख रोग , त्वचा रोग तज्ञ डॉ यांनी तपासणी केली. या शिबिराचा 560 लोकांनी लाभ घेतला. कार्यक्रम करीता नेहरू शाळेचे मुख्यध्यापक ढाकुनकर, कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा चे माजी अध्यक्ष राजू चिकटे, शेगाव बू माजी सरपंच यशवंत लोडे, तंटामुक्ती अध्यक्ष गजानन ठाकरे, शांतता समिती शेगाव बू चे उमेश माकोडे इत्यादी हजर होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ पठाण यांनी केले तर आभार मुज्जू शेख यांनी मानले. आरोग्य शिबीर यशस्वी होण्यासाठी पैगामे रजा सेवा संस्थाचे सर्व सदस्य आणि पोलिस स्टेशन शेगाव बू चे सर्व अधिकारी आणि अमलदार यांनी प्रयत्न केले.
चिमूर प्रतिनिधी :-
केंद्र सरकारमार्फत नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. यातीलच एक योजना म्हणजे आयुष्मान भारत योजना. या योजनेच्या मार्फत अनेक नागरिकांना मोफत उपचाराची सुविधा मिळते. केंद्र सरकारने ही योजना आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्मान भारत मिशन अंतर्गत 2018 साली सुरु केली आहे.
या योजनेतून अनेक गरीब आणि गरजू लोकांना आरोग्य विमा उपलब्ध केला जातो. केंद्र सरकारच्या या योजनेतून 10 कोटीपेक्षा अधिक लोकांनी लाभ घेतला आहे. तसेच ज्या लोकांकडे आयुष्मान भारत योजनेचे कार्ड आहे त्यांना 5 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतो.
जर नागरिकांकडे आयुष्मान भारत योजनेंच कार्ड असेल तर त्या नागरिकाला भारतातील कोणत्याही रुग्णालयात मोफत उपचार मिळू शकतो. जर तुम्ही आयुष्मान भारत योजना कार्डधारक असाल आणि या योजनेत असणाऱ्या हॉस्पिटलने रुग्णावर उपचार करण्यास नकार दिला तर तुम्ही तातडीने रुग्णालयाविरुद्ध तक्रार दाखल करु शकता. यासंदर्भात तक्रार करायची असल्यास नागरीक राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक 14555 वर नोंदवू शकतात.