मुंबई, दि. १० : भेसळयुक्त अन्न नमुने तपासण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या प्रयोगशाळा कार्यरत आहेत. मात्र, प्रयोगशाळांची अन्न नमुने तपासण्याची मर्यादीत क्षमता असल्याने मोठ्या प्रमाणावर अन्न नमुने तपासणीसाठी प्रतीक्षेत असतात. अशा परिस्थितीत ‘पीपीपी’ (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप) पद्धतीवर प्रयोगशाळांची निर्मिती करण्यात येईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
सदस्य मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी सदस्य अनिल देशमुख, बच्चू कडू, यशोमती ठाकूर, योगेश सागर यांनी उपप्रश्न उपस्थित केले.
मंत्री श्री. आत्राम म्हणाले की, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात अंमली पदार्थ व अल्पार्झोलाम (कुत्ता गोळी) यांची बेकायदेशीररित्या विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी मार्च ते मे 2024 दरम्यान 6 गुन्हे दाखल करून 13 आरोपींना अटक केली आहे. मालेगाव शहर परिसरात टिक्का फ्राय मसाला, मिरची पावडर, सिंथेटिक पावडर यासह एक लाख 90 हजार रुपये किमतीचे एकूण 610.5 किलोग्रॅम साहित्य जप्त करण्यात आले आहे.
भेसळयुक्त दुधाबाबत एका वर्षात 196 दुधाचे नमुने तपासण्यात आले आहेत. यामध्ये 25 हजार 338 लिटर दुधाचा साठा जप्त करण्यात आला असून 13 लाख 44 हजार 406 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दुधाची भेसळ रोखण्यासाठी 20 अधिकाऱ्यांचे विशेष पथकही तयार करण्यात आले आहे. भेसळयुक्त अन्नपदार्थांवर कारवाई करण्याचे अन्न सुरक्षा अधिकारी यांना दरमहा उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे निश्चितच भेसळयुक्त पदार्थांवरील कारवाया वाढल्या आहेत, असेही मंत्री श्री. आत्राम यांनी सांगितले.
ब्रम्हपुरी/ तालुका प्रतिनिधी:- जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज व.प. पु. कानिफनाथ महाराज सेवा समितीतर्फे १७ फेब्रुवारी २०२४ पिपळगाव (भोसले) ता. ब्रम्हपुरी येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाध मिळाला सदर शिबिरात १०७ रक्तदात्यांनी रक्तदान केले सदर शिबीरात् जिवन ज्योती ब्लड बँक नागपुर रक्तपेढी रक्तसंकलन करण्याक्रीता उपलब्ध होती सर्व रक्तदात्यांचे खुप खुप अभिनंदन व आभार तालुक्याचे तालुकाध्यक्ष व त्यांची तालुका कमेटी, सेवा केंद्र कमेटी, आरती कमेटी व सर्व जिल्यांच्या कमेटीने व कार्यकर्त्यांनी परिश्रम करून शिबिर यशस्वी केले त्याबद्दल सर्वांचे खुप खुप अभिनंदन अशिच सेवा आपल्या हातून निरंतर घडत राहो अशी स्वामी चरणी प्रार्थना..
[24/12, 12:51 pm] Pranay: केंद्रीय स्वास्थ्य मंत्रालय के शीर्ष अधिकारियों ने कहा कि सरकार की इस समय कोई यात्रा सलाह जारी करने या हवाई अड्डों पर परीक्षण अनिवार्य करने की कोई योजना नहीं है।
[24/12, 12:53 pm] Pranay: केंद्रीय स्वास्थ्य मंत्रालय द्वारा साझा किए गए नवीनतम आंकड़ों के अनुसार, भारत में पिछले 24 घंटों में 752 ताजा कोविड -19 संक्रमण और 4 संबंधित मौतें दर्ज की गईं, जिससे सक्रिय मामलों की संख्या बढ़कर 2,997 हो गई।
24 घंटे में चार नई मौतों के साथ मरने वालों की संख्या 5,33,332 दर्ज की गई, जिनमें से दो केरल से, एक-एक राजस्थान और कर्नाटक से हैं, आंकड़ों के मुताबिक केंद्रीय स्वास्थ्य मंत्रालय के शीर्ष अधिकारियों ने कहा कि सरकार की कोई यात्रा सलाह जारी करने की कोई योजना नहीं है। या इस बिंदु पर हवाई अड्डों पर परीक्षण अनिवार्य कर दें।
इस बीच, आधिकारिक सूत्रों ने कहा कि देश में 21 दिसंबर तक नए जेएन.1 वेरिएंट के कुल 22 मामले पाए गए हैं, जो दुनिया भर में हाल ही में कोविड-19 मामलों में वृद्धि का कारण बने हैं।
हालाँकि, अधिकारियों ने कहा कि अब तक मामलों के समूह बनाने की कोई रिपोर्ट नहीं आई है, और JN.1 सबवेरिएंट के सभी मामलों में हल्के लक्षण हैं
50 महिलांसह बालकांची प्रकृती खालवली: सवना ग्रामीण रुग्णालयात उपचार
महागाव: तालुक्यातील आमणी(खुर्द) येथील 50 महिला व बालकांना अन्नातून विषबाधा झाली विषबाधा झाली. ही घटना मंगळवारी रात्री घडली. जेवणातून ही विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बाधित महिला व बालकांना तातडीने खाजगी दवाखाने, येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सवना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपचारानंतर सर्व विषबाधित महिला व बालकांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. प्राप्त माहितीनुसार आमणी ( खुर्द) येथील महिलांना मंगळवारी सायंकाळी एका ठिकाणी जेवण केले. त्यानंतर रात्री ८:०० वाजेच्या सुमारास मळमळ, उलटी ,जुलाब आणि तीव्र पोटदुखी अशी लक्षणे जाणवू लागली. काही बालकांमध्येही लक्षणे आढळली. त्यानंतर आमणी गावात एकच धावपळ सुरू झाली. बाधित रुग्णांना मिळेल उपचारासाठी महागाव येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.
रात्री बहुतांश दवाखाने बंद असल्याने रुग्णांना महागाव येतील प्राथमिक आरोग्य केंद्रात ,तसेच सवना येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. दूषित अन्नातून किंवा दूषित पाण्यातून महिला व बालकांना विषबाधा झाल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला. बाधित रुग्णांमध्ये संगीता आडेकर ,स्वाती शिंदे ,कमल बेंद्रे ,लक्ष्मी चिरंंगे , प्रिया बेले ,अश्विनी बेले, प्रणव खोकले ,शारदा खोकले, वेदिका खोकले ,सुनिता पुंडे ,सुनीता भलगे ,कुणाल मेतकर, सुनीता वानखेडे ,ललिता वाडेकर, महानंदा मोरे, शारदा सरनाटे ,सारिका सरनाटे ,अश्विनी सरनाते, मारुती सरनाटे ,ताई बाई काळबांडे ,सलोनी मोरी, सविता मने ,पूजा म्हणे, पद्मिनी म्हणणे, उषा शिंदे ,अनुसया नरवडे, पुण्यरथा नर्मले यांच्यावर उपचार करण्यात आले.
उपचारानंतर सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे रुग्णालयीन सूत्रांनी सांगितले .यामुळे मोठा अनर्थ टळला आहे .गावकऱ्यांनी सुटकेचा निष्वास सोडला आहे.
चिमूर प्रतिनिधी :-
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील आरोग्य संस्थामध्ये उपचारासाठी येणा-या लाभार्थ्यांमध्ये आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील रुगणांचा बहुतांशी समावेश असतो. या रुग्णांना क्वचित प्रसंगी उपचाराकरिता, तपासणीकरिता शासन निर्णय क्र. १ अन्वये माफक दरात सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. तथापि आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांना आर्थिक विवचनेमूळे ब-याचदा माफक दरातील आरोग्य सुविधा सुध्दा घेणे शक्य होत नसल्याचे निदर्शनास आले आहे, परिणामी असे रुग्ण औषधोपचारापासून वंचित राहू नये याकरिता मा. मुख्यमंत्री महोदयांनी सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून सर्व शासकिय आरोग्य संस्थामधून देण्यात येणा-या सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा निःशुल्क करण्याबाबत विधानसभेमध्ये घोषणा केलेली आहे.तसेच दिनांक ०३ ऑगस्ट २०२३ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील शासकिय रुग्णालयामधून करण्यात येणा-या तपासण्या व उपचार तसेच सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावरील वैद्यकिय सेवा ( राष्ट्रीय रक्त धोरणानुसार व रक्त घटक पुरवठा यासाठी आकारण्यात येणारे शुल्क वगळून ) निःशुल्क करण्याच्या प्रस्तावास मान्यता दिलेली आहे.
मुख्यमंत्री महोदयांनी सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून सर्व शासकिय आरोग्य संस्थामधून देण्यात येणा-या सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा निःशुल्क देण्याबाबत केलेल्या घोषणेनुसार संदर्भ क्र. १ नुसार आकारण्यात येणारे रुग्णशुल्क दिनांक १५ ऑगस्ट २०२३ पासून आकारण्यात येऊ नये.
दिनांक ०३ ऑगस्ट २०२३ रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयाबाबत शासन स्तरावरुन स्वंतत्ररित्या शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर व्यापक स्वरुपाच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येतील. ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी खालीलप्रमाणे मार्गदर्शक सुचना देण्यात येत आहेत.
आरोग्य संस्थेमध्ये येणा-या रुग्णांना शासनाने अधिकृत केलेल्या ओळखपत्राच्या आधारे निःशुल्क नोंदणी करण्यात यावी. आरोग्य संस्थामध्ये होत असलेल्या सर्व प्रकारच्या तपासण्या निःशुल्क करण्यात यावेत किंवा कोणत्याही प्रकारचे दर आकारण्यात येऊ नये. बाहयरुग्ण विभागामध्ये कार्यरत वैद्यकिय अधिका-यांनी रुग्णांना बाहेरुन औषधी व इतर कंझ्युमेबल्स खरेदी करण्याकरिता चिठ्ठी देऊ नये. क्वचित प्रसंगी बाहेरील औषधी रुग्णांस देणे आवश्यक असल्यास आरकेएस अनुदानातून स्थानिकरित्या औषध खरेदी करुन रुग्णांस मोफत उपलब्ध करुन द्यावे. आरोग्य संस्थामध्ये होणा-या चाचण्या ( उदा. इसीजी, एक्स-रे, सिटी स्कॅन, प्रयोगशाळा चाचण्या इत्यादी) यांचे शुल्क आकारण्यात येऊ नये.आंतररुग्ण विभागामध्ये दाखल असलेल्या रुग्णांस डिचार्ज करतांना कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येऊ नये.यापूर्वी रुग्णांकडून जमा करण्यात आलेले शुल्क शासन खाती अथवा रुग्ण कल्याण निधीमध्ये जमा करण्यात यावे व त्याबाबतचा लेखाजोखा अद्ययावत करण्यात यावा.
या योजनेची जनतेला माहिती व्हावी, या हेतूने सविस्तर माहिती व्यापक स्वरुपावर प्रसिध्दी माध्यमाव्दारे प्रसिध्द करण्यात यावी.आरोग्य संस्थेच्या आवारात याबाबत दर्शनी भागात फलक लावण्यात यावेत.आरोग्य संस्थेमध्ये रुगणसेवेबाबत शुल्क आकारल्याबाबतची तक्रार टोल फ्री १०४ क्रमांकच्या नंबर करता येईल, याबाबत सुस्पष्ट जनजागृती करण्यात यावी. तक्रार निवारण. टोल फ्री १०४ क्रमांकावर प्राप्त झालेल्या प्रत्येक तक्रारीची नोंद घेतली जाईल व त्याबाबत संबधित संस्था प्रमुखाला तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी/ जिल्हा शल्यचिकित्सक यांना अवगत केले जाईल. प्राप्त झालेल्या तक्रारीची निवारण करण्याची जबाबदारी ही संबधित संस्था प्रमुखाची राहील.आरोग्य संस्थेमध्ये शुल्क आकारण्यात आल्याचे आढळल्यास संबधित कर्मचारी /अधिकारी यांचेवर कार्यवाही करण्याची जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा आरोग्य अधिकारी यांची राहील. असे दिलेल्या आदेशात सांगितले आहे.
अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा येथील श्रीमती.सुभद्रा बानेश सोदारी काही दिवसांपासून कॅन्सर झालेल आहेत.रुग्णालयातील सर्व खर्च निशुल्क करण्यात येईल परंतु लागणारे मेडिकल मधून औषधी घेणे हे त्यांना शक्य होत नसल्याची माहिती गावातील नागरिक तसेच कार्यकर्त्यांन कडून आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प अध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती होतच आज त्यांच्या गावातील त्यांना भेट घेऊन.कॅन्सरग्रस्त रुग्ण श्रीमती.सुबध्रा बाणेश सोदरी यांना औषधोपचार करण्याकरिता आर्थिक मदत करण्यात आली.त्यावेळी अजयभाऊंनी सांगितली की पुढील कोणत्याही समस्या असो मला सांगा मदत करण्यासाठी मी तयार अहो असे गावातील नागरिकांना व रुग्णना सांगितले
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम,माजी पंचायत समिती सभापती भास्कर भाऊ तलांडे,माजी पंचायत समिती सभापती सुरेखा आलाम,अहेरी नगरपंचायत नगरसेवक प्रशांत गोडशेलवार,सरपंच लक्ष्मी मडावी,सरपंच श्रीनिवास पेंदाम,नरेंद्र गर्गम,राकेश सडमेक, ग्रामपंचायत सदस्य पूजा देवगडे,ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण कोडापे,गुलाब देवगडे,रामचंद्र रामटेके,तेजराज दुर्गे,दासू कांबळे,विलास बोरकर,लक्ष्मण रत्नंम,मोंडी कोटरंगे,राकेश सडमेक,प्रमोद गोडशेलवारसह गावातील नागरिक व आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधीकारी कार्यकर्ते उपस्थित होते.