‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना,महिलांनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
नारी शक्ती दूत ॲपवर करता येणार अर्ज
गडचिरोली दि. 2 : महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे, तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी शासनाने ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिला / मुलींना दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील महिलांनी 15 जुलै पूर्वी अर्ज करून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.
‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिला टप्प्यात १ ते १५ जुलै या कालावधीत लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येत आहे. यासाठी पात्र महिला अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, परिवेक्षिका, मुख्यसेविका, सेवा सुविधा केंद्र यांच्या सहाय्याने अर्ज करू शकतात. यांनतर या प्रतिनिधींनीमार्फत ऑनलाईन पद्धतीने अर्ज शासनास सादर होतील. तसेच, ज्या महिला स्वत: ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात त्यांच्यासाठी ‘नारी शक्ती दूत’ हे ॲप सुरू करण्यात आले आहे.
योजनेचा उद्देश : 1) महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, 2) त्यांचे आर्थिक - सामाजिक पुनर्वसन करणे, महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे, 3) महिला व मुलींच्या सशक्तीकरणास चालना मिळणे, 4) महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांचे आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे.
लाभार्थी पात्रता : 1) वय 21 ते 60 वर्षे असणारी महिला. 2) महाराष्ट्र राज्याची रहिवासी महिला. 3) विवाहित, विधवा, घटस्फोटित परित्यक्त्या, निराधार महिला. 4) कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लक्ष पेक्षा कमी असणे गरजेचे.
अपात्रता : 1) कुटुंबातील सदस्य आयकर दाता असल्यास, 2) सरकारी नोकरी, 3) आजी/माजी आमदार/खासदार 4) कुटुंबाच्या मालकीची 5 एकर पेक्षा जास्त जमीन असणारे, 6) चार चाकी गाडी असणारे.
अर्ज करण्याची पद्धत : अर्ज नि:शुल्क अंगणवाडी सेविका यांचेकडे भारता येईल. अर्ज विहित नमुन्यात भरून व त्याला आवश्यक कागद जोडून अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, सेतू केंद्र, वार्ड अधिकारी यांना देता येईल. वरील सर्वांकडून अर्ज ऑनलाईन भरून घेता येईल. लाभार्थ्याला स्वत: ‘नारी शक्ती दूत’ हे ॲपवर अर्ज करता येईल.
आवश्यक कागदपत्रे : योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज, लाभार्थ्याचे आधारकार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र / महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपर्यंत असावे), बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशनकार्ड, सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
अडचणी असल्यास येथे करा संपर्क : अर्ज भरतांना काही समस्या असल्यास नजिकच्या अंगणवाडी केंद्रावर तसेच महिला हेल्प लाईन 181 वर संपर्क करावा, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांनी कळविले आहे.
बोटीला कोणतेही नुकसान नाही
गोसीखुर्द जलाशय भूमिपूजन कार्यक्रमातील घटनेबाबत वस्तुस्थिती
भंडारा, दि. २४ : भंडारा जिल्हा येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गोसीखुर्द या जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान जल पर्यटनाची प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जलसफर करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळेस नाशिक बोट क्लब येथील दोन बोटी आणल्या होत्या. त्यातील एका बोटीमध्ये मुख्यमंत्री श्री.शिंदे, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यासह आठ जण होते. तर दुसऱ्या बोटीमध्ये पत्रकार होते. या बोटीचे वाहक गोविंद खवणेकर होते.
बोट सफर करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी प्रतिकात्मक म्हणून स्वतः बोट चालवण्याची इच्छा व्यक्त केली. मुख्यमंत्री बोट चालवतानाचे क्षण टिपण्यासाठी दुसऱ्या बोटीतील सर्व पत्रकार एकदम बोटीच्या पुढील भागात आले. बोट चालक श्री. खवणेकर यांनी सर्व पत्रकारांना एका बाजूला न जाण्याची आणि बसण्याची वारंवार विनंती केली. मात्र, पत्रकारांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सर्व पत्रकारांचे वजन पुढील एका बाजूस झाल्यामुळे बोटीचा पुढचा भाग थोडासा पाण्यात गेला. बोट एका बाजूला गेल्यामुळे बोटीतील बसण्याचा भाग जो बोटीला स्क्रूने फिट केलेला असतो तो ओढला गेला व सोफासेट पाण्यात पडला. घटनेमध्ये प्रसंगावधान राखून बोटीचे चालक श्री. खवणेकर यांनी सर्व पत्रकारांना व्यवस्थित बोटमध्ये बसवले आणि बोट पूर्ववत झाली.
त्यादरम्यान या कार्यक्रमासाठी महामंडळाद्वारे सुरक्षेसाठी जेटस्की आणि जिल्हा प्रशासनातर्फे रेस्क्यू टीम तैनात केली होती. ते सर्व काही क्षणात आले आणि पत्रकारांना कार्यक्रमस्थळी नेले. या घटनेच्या वेळी मुख्यमंत्री स्वतः घटनाग्रस्त बोटीकडे गेले आणि त्यांनी निश्चित केले की बोट आणि सर्व प्रवासी सुखरूप आहेत. या घटनेमध्ये कोणालाही कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. कोणतीही व्यक्ती पाण्यात पडली नाही. बोटीला कोणतेही नुकसान झालेले नाही. सबब घटनेनंतर माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त ‘बोटीचे तुकडे झाले, बोट बुडाली’ हे पूर्णपणे चुकीचे असल्याचे डॉ.सारंग कुलकर्णी, महाव्यवस्थापक तथा मुख्य प्रशिक्षक, एमटीडीसी यांनी कळवले आहे.
कुरखेडा ते कोरची मार्गावरील वाहतूकीत बदल
गडचिरोली दि. 22 : राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४३ वरील कुरखेडा ते कोरची दरम्यान सती नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम प्रगतीत आहे. सदर काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे शक्य नसून सदर पुलाची वाहतूक तात्पुरत्या स्वरुपात बांधण्यात आलेल्या वळण मार्गावरुन वळती करण्यात आले आहे. परंतु हा वळणमार्ग पावसामुळे क्षतीग्रस्त होवू शकतो किंवा पूराच्या पाण्याखाली येऊन वाहतूक बंद होऊ शकते. त्यामुळे पावसाळ्यात संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी या मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक २९ जून पासून ते ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत वळती करण्याचे आदेश जिल्हाधिकारी संजय दैने यांनी निर्गमित केले आहे.
पर्यायी मार्ग म्हणून नागरिकांनी हलक्या स्वरुपाची वाहनांकरिता कुरखेडा- चिचटोला फाटा- आंधळी-वाघेडा-मालदुगी-गोठणगाव फाटा मार्ग (रा.म.क्र.५४३) या रस्त्याचा तसेच जड वाहतुकीकरिता कुरखेडा-वडसा-आरमोरी-वैरागड मार्ग (रा.म. क्र. ३६३)- गोठणगाव फाटा मार्ग (रा.म.क्र.५४३) या पर्यायी मार्गाचा वापर करावा.
अंमलबजावणी न करणाऱ्या वाहतुकदार किंवा व्यक्तीविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्याचे अधिकार स्थानिक पोलीसांना असेल, असेही जिल्हाधिकारी यांचे आदेशात नमुद करण्यात आले आहे.
पाणीपूरवठ्याची कामे मूदतीत पूर्ण न करणाऱ्यांना ब्लॅकलिस्ट करणार -जिल्हाधिकारी
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीची बैठक संपन्न
गडचिरोली,दि.17(जिमाका): पाणीपूरवठा हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असून जिल्ह्यात पाणी पूरवठ्याची कामे मुदतीत पूर्ण न करणाऱ्या व निष्काळजीपणा दाखवणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिले. यासोबतच कामे गुणवत्तापूर्ण न झाल्यास कंत्राटदारांसोबतच संबंधीत शासकीय अधिकाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याबाबत गंभीर दखल घेण्याच्या सूचना श्री दैने यांनी दिल्या.
जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीची बैठक काल जिल्हाधिकारी, यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन पाटील, वरिष्ट भूवैज्ञानिक अभिजीत धाराशीवकर उपस्थित होते.
नागरिकांना तातडीने पाणी मिळावे यासाठी कोणत्याही परिस्थितीत योजनेच्या कामांना उशीर होवू नये. ग्रामीण व दुर्गम भागात पावसाळ्यातही कामे बंद पडू नये याची दक्षता घेवून रेती, गिट्टी, सिमेंट आदी साहित्यसाठा आताच उपलब्ध करून घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पाण्याचे स्रोत स्वच्छ ठेवावे व संबधीत विहिरींवर उंच कठडे व जाळी लावून ते सुरक्षीत केली असल्याची खात्री करून घेण्याचे त्यांनी सांगितले.
कार्यकारी अभियंता नितीन पाटील यांनी जिल्ह्यातील पाणीपूरवठा योजनांची माहिती दिली. जिल्ह्यात एकूण 1082 मंजूर पाणीपूरवठा योजनांपैकी 929 पुर्ण तर 153 प्रगतीपथावर आहेत. तसेच आदीम जमातीसाठीच्या पीएमजनमन योजनेतील 126 पैकी 44 पूर्ण तर 82 योजना प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीला जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधीकरणचे संबंधीत अधिकारी तसेच कंत्राटदार उपस्थित होते.
000
लोकसभा निवडणूक 2024
गडचिरोली जिल्ह्यासाठी 2613 शाईच्या बाटल्या
महाराष्ट्रासाठी 2 लाख 15 हजार 850 शाईच्या बाटल्यांची तरतूद
गडचिरोली, दि. 13 : लोकसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याकरिता 2613 बाटल्या प्राप्त झाल्या आहेत. तर महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदार संघाकरिता सुमारे २ लाख १५ हजार ८५० शाईच्या बाटल्यांची तरतूद करण्यात आली आहे.
जिल्ह्यात आरमोरी , गडचिरोली आणि अहेरी या तीन विधानसभा मतदारसंघात एकूण 950 मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदान केंद्रासाठी २ शाईच्या बाटल्या याप्रमाणे एकूण १९०० शाईच्या बाटल्यांची आवश्यकता होती, त्यासोबतच अतिरिक्त ७१३ मिळून एकूण २६१३ शाईच्या बाटल्या जिल्ह्याकरिता मिळाल्या आहेत. मतदानासाठी आवश्यक साहित्यासोबतच शाईच्या बाटल्या मतदान केंद्रावर निवडणूक यंत्रणेमार्फत पोहोचत्या करण्यात येणार आहेत.
मतदारांच्या तर्जनीवर लावण्यात येणारी आणि काही दिवस न पुसली जाणारी ही शाई म्हैसूर पेंटस् कंपनीमार्फत बनवली जाते.
मतदानाचा हक्क बजावल्याची खूण म्हणून सर्वसामान्य असो की लोकप्रतिनिधी अथवा सेलिब्रिटींकडून शाई लावलेल्या डाव्या हाताची तर्जनी अभिमानाने दाखविली जाते. लोकशाही मजबूत करणारी ही काळी रेष निवडणुकांचा अविभाज्य घटक बनली आहे.
मतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटविल्यानंतर त्याला प्रवेश दिला जातो. प्रत्यक्ष मतदानापूर्वीच मतदाराच्या डाव्या तर्जनीवर न पुसली जाणारी शाई लावली जाते. त्यानंतर मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जातो. मतदानापूर्वी मतदान केंद्राध्यक्ष (पोलींग ऑफीसर) मतदाराच्या डाव्या तर्जनीवर शाई लावलेली आहे की नाही याची तपासणी करतात. जी व्यक्ती डाव्या तर्जनीची तपासणी करु देत नाही ते मतदानासाठी अपात्र असल्याचे मतदान अधिकारी सांगू शकतात. जर एखाद्या मतदाराला डाव्या हाताची तर्जनी नसेल तर त्या व्यक्तीच्या डाव्या हातावरील कोणत्याही बोटाला शाई लावली जाते.
००००
दिव्यांगाच्या एका मतासाठी पोहचली यंत्रणा दुर्गम गावात,गृहमतदानातून नोंदविले मत
महाराष्ट्र – तेलंगणा सीमेवरील महाराजगुडा येथे गृहमतदानातून नोंदविले मत
चंद्रपूर :- चंद्रपूरच्याच नव्हे तर राज्याच्या टोकावर असलेला जिवती तालुका… त्यातच दुर्गम भाग आणि महाराष्ट्र – तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेले महाराजगुडा गाव….गावातील एकूण मतदार 281…..आणि यात एक दिव्यांग मतदार. होय, या एका दिव्यांग व्यक्तिच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा गावात पोहचते आणि गृह मतदानाच्या माध्यमातून लोकशाहीसाठी अमूल्य असलेले मत नोंदविते. हीच लोकशाहीची खरी ताकद.
सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक मत महत्वाचे आहे. कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच 85 वर्षांवरील मतदार आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. याच अनुषंगाने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनात 8 ते 14 एप्रिल या कालावधीत गृह मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. याचा शुभारंभ सोमवारी (दि.8) अतिदुर्गम असलेल्या जीवती तालुक्यात झाला.
महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या महाराजगुडा येथील सुरेखा तुकाराम राठोड (वय 40) या एकमेव दिव्यांग असलेल्या महिलेने गृह मतदानाची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार प्रशासनाने त्यांच्याकडून नमुना 12 – डी भरून घेतला होता. सुरेखा यांचे गृह मतदान घेण्यासाठी सोमवारी (दि. 8) जीवती तालुक्यातील टीम क्रमांक 10, महाराजगुडा येथे सुरेखा यांच्या घरी पोहचली. गृह मतदानाची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितल्यानंतर सुरेखा यांनी आपले अमुल्य मत नोंदविले. सुरेखा ह्या पूर्णपणे दिव्यांग असून त्या एका क्षणासाठीसुध्दा उभ्या राहू शकत नाही. त्यामुळे त्यांनी आपले मत घरातच स्थापन केलेल्या मतदान कक्षात बसूनच नोंदविले आणि मतपत्रिका लिफाफ्यामध्ये टाकून अधिका-यांकडे सुपूर्द केली.
यासेाबतच सदर टीमने राज्याच्या सीमेवरील नारपठार (विजयगुडा) येथील जमुनाबाई दुर्गे आत्राम (वय 90), संग्राम किसन कोरपल्लीवार (वय 89) आणि मुद्रीकाबाई संग्राम कोरपल्लीवार (85) या वयोवृध्द नागरिकांचेही गृह मतदानाद्वारे मत नोंदविले. या टीममध्ये मतदान अधिकारी नंदकिशोर उपासणी, नागेश उरकुडे, सुक्ष्म निरीक्षक (मायक्रो ऑब्जर्झव्हर) शिवशंकर उपरे, क्षेत्रीय अधिकारी संदीप लंगडे, विलास वानखेडे, पोलिस अंमलदार कौमुद मडावी आणि छायाचित्रकार प्रफुल गिरसावडे उपस्थित होते.
मतदानाची गोपनीयता : गृह मतदान करतांना मतदान प्रक्रियेची गोपनीयता पाळण्याच्या सूचना भारत निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यानुसार फॉर्म 13 – ए (डिक्लरेशन), फॉर्म 13 – बी (कव्हर ए लिफाफा), फॉर्म 13 – सी (कव्हर बी लिफाफा) आणि फॉर्म 13 – डी (मतदान कसे करायचे याबाबत सुचना) आदी प्रक्रियेबाबत अधिकारी व कर्मचा-यांनी सुरवातीला मतदारांना माहिती दिली. यावेळी घरामध्ये स्थापन केलेल्या मतदान कक्षामध्ये सदर मतदारांनी आपले मत नोंदविले. यावेळी मतदान करतांना कोणताही दुसरा व्यक्ती त्यांच्याजवळपास नव्हता. मतपत्रिका घडी केल्यानंतर सदर मतपत्रिका छोट्या लिफाफामध्ये आणि नंतर मोठ्या लिफाफामध्ये टाकून मतपेटीत जमा करण्यात आली.
ईव्हीएम-व्हीव्हीपॅटचे द्वितीय रँडमायझेशन पूर्ण
गडचिरोली दि.8: लोकसभा निवडणुकीकरिता जिल्ह्यातील मतदान केंद्रावर वितरीत करावयाच्या बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट या मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळीकरणाची (रॅण्डमायझेशन) प्रक्रिया निवडणूक निरीक्षक अनिमेश कुमार पराशर यांच्या हस्ते व जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने तसेच उमेदवाराचे प्रतिनिधी व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी समोर आज पूर्ण करण्यात आली. यातून ईव्हीएम मशिन कोणत्या मतदान केंद्रावर जाणार याची निश्चिती झाली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राष्ट्रीय सूचना केंद्रात ईव्हीएम ची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे पूर्ण करण्यात आली. सदर सरमिसळ करतेवेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा अधिकारी संजय दैने यांनी उपस्थित उमेदवारांच्या प्रतिनिधी तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी समक्ष पार पडलेल्या द्वितीय सरमिसळ प्रक्रिये नुसार विधानसभा मतदारसंघातील कोणत्या मतदान केंद्रावर कोणत्या क्रमांकाचे कंट्रोल युनीट, बॅलेट युनीट आणि व्हीव्हीपॅट वापरली जाईल, याबाबत माहिती दिली. त्यानंतर सदर सरमिसळ प्रक्रिया उमेदवाराचे प्रतिनिधी व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांच्या समक्ष करण्यात आली आणि जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या ईव्हीएम, व्हीव्हीपॅट विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येक मतदान केंद्रासाठी निश्चित झाल्या.
गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात मतदान केंद्रांची संख्या 1891 असून यासाठी 2330 बॅलेट युनिट (बीयू), 2330 कंट्रोल युनीट(सीयू) आणि 2517 व्हीव्हीपॅट उपलब्ध झाल्या आहेत. यापैकी द्वितीय सरमिसळ प्रक्रिये नुसार आमगाव विधानसभा मतदारसंघातील 311 मतदान केंद्रासाठी (बीयू – 404, सीयू – 404 आणि व्हीव्हीपॅट - 435), आरमोरी विधानसभा मतदारसंघातील 302 मतदान केंद्रासाठी (बीयू – 362, सीयू – 362 आणि व्हीव्हीपॅट - 392), गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील 356 मतदान केंद्रासाठी (बीयू – 427, सीयू – 427 आणि व्हीव्हीपॅट - 462), अहेरी विधानसभा मतदारसंघातील 292 मतदान केंद्रासाठी (बीयू – 350, सीयू – 350 आणि व्हीव्हीपॅट - 379), ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातील 316 मतदान केंद्रासाठी (बीयू – 395, सीयू – 395 आणि व्हीव्हीपॅट - 426) आणि चिमुर विधानसभा मतदारसंघातील 314 मतदान केंद्रासाठी (बीयू – 392, सीयू – 392 आणि व्हीव्हीपॅट - 423) ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट निश्चित झाल्या आहेत.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, ईव्हीएम, व्हीव्हीपॅट व्यवस्थापन कक्षाचे नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विवेक साळुंखे, जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी शिवशंकर टेंभुर्णे, अतिरिक्त जिल्हा सूचना अधिकारी संजय त्रिपाठी, तहसिलदार रविंद्र होळी उमेदवाराचे प्रतिनिधी व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी सर्वश्री करण सयाम, राजेंद्र कोडापे, भारत खटी, गोपाळ खानवळकर, दत्तात्रय खरवडे, मिलिंद लांडे, रोशन कोडापे व श्री शेंडे आदी उपस्थित होते.
०००००
प्रिंट मिडीयाच्या जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण आवश्यक,
मतदानापुर्वीचा एक दिवस व मतदानाच्या दिवशीची राजकीय जाहिरात
2 दिवस आधी अर्ज सादर करावा
गडचिरोली, दि. 6 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करण्यासाठी 12-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघाकरीता जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या अध्यक्षतेखाली माध्यम पूर्व प्रमाणिकरण आणि सनियंत्रण समिती (एम.सी.एम.सी.) स्थापन करण्यात आली. मतदानापुर्वीचा एक दिवस (18 एप्रिल) आणि मतदानाच्या दिवशी (19 एप्रिल) मुद्रीत माध्यमाद्वारे (प्रिंट मिडीया) प्रकाशित करावयाच्या राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. अशा जाहिरातींबाबतचे अर्ज, जाहिरात प्रकाशित करण्याच्या प्रस्तावित तारखेच्या दोन दिवसापूर्वी समितीकडे सादर करावे, अशा सुचना जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी दिल्या आहेत.
गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात म्हणजे 19 एप्रिल 2024 रोजी होत आहे. मतदानाच्या दिवशी व मतदानाच्या एक दिवसापूर्वी प्रिंट मिडीयातून कोणत्याही भडकाऊ, दिशाभुल करणा-या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातींमुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेला खीळ बसेल, अशा जाहिराती प्रकाशित होऊ नये, याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहे.
कोणताही राजकीय पक्ष किंवा उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या एक दिवस आधी प्रिंट मिडीयामध्ये कोणतीही राजकीय जाहिरात, जोपर्यंत राज्य / जिल्हा स्तरावरील माध्यम पूर्व प्रमाणीकरण समितीकडून (एमसीएमसी) पूर्व प्रमाणीत केली जात नाही, तोपर्यंत वृत्तपत्रात प्रकाशित करू नये. मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या एक दिवस आधी प्रिंट मिडीयामध्ये राजकीय जाहिरात द्यायची झाल्यास अर्जदारांना सदर जाहिरात प्रकाशित करण्याच्या प्रस्तावित तारखेच्या दोन दिवस आधी समितीकडे अर्ज सादर करावा लागेल. भारत निवडणूक आयोगाच्या वरील निर्देशाचे काटेकोरपणे पालन व्हावे, असे राज्याचे अवर सचिव व उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी यांनी त्यांच्या दिनांक 5 एप्रिल 2024 च्या पत्रान्वये कळविले आहे.
०००००
मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद;जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
गडचिरोली,दि.4:- सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता मतदानाचे दिवशी (१९ एप्रिल २०२४) आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी संजय दैने यांनी निर्गमित केले आहे.
12 गडचिरोली-चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघात, सार्वत्रिक निवडणूक-2024 करीता 19 एप्रिल 2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. सर्व मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा, याकरिता शासनातर्फे आवाहन करण्यात आलेले आहे. मतदानाच्या दिवशी जिह्यातील अनेक गांवामध्ये आठवडी बाजार आहे. नागरीकांच्या गर्दीमुळे ठिकठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जनतेच्या सोयी-सुविधेकरिता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मतदानाचे दिवशी गडचिरोली जिल्ह्यात भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.
ओपिनियन आणि एक्झिट पोलला निवडणूक कालावधीत प्रतिबंध
गडचिरोली, दि. 3 : भारत निवडणूक आयोगामार्फत लोकसभा निवडणूक 2024 साठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने निवडणूक कालावधीत निवडणूक अंदाज (ओपिनियन पोल तसेच एक्झिट पोल) दर्शविण्यावर प्रतिबंध केला आहे.
राज्यात एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणुका होणार असून याअनुषंगाने 16 मार्च 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. राज्यात 19 एप्रिल रोजी सकाळी सात वाजेपासून 1 जून 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजेपर्यंतच्या कालावधीत एक्झिट पोल साठी प्रतिबंध लागू राहणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक टप्प्यातील मतदान संपण्याच्या आधी 48 तासाच्या कालावधीत ओपिनियन पोल अथवा अन्य मतदान सर्वेक्षणाच्या परिणामांच्या प्रकाशन अथवा प्रसारणावर प्रतिबंध असेल, असे निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे स्पष्ट केले आहे.
उन्नत सुरक्षा व्यवस्था के तहत, उपयोगकर्ता अभी भी सीआरए प्रणाली में लॉग इन करने के लिए अपने वर्तमान यूजर आईडी और पासवर्ड का उपयोग करेंगे।
राष्ट्रीय पेंशन प्रणाली (एनपीएस) की सुरक्षा को मजबूत करने के लिए पेंशन फंड विनियामक और विकास प्राधिकरण (पीएफआरडीए) ने एक नया निर्देश जारी किया है। 1 अप्रैल, 2024 से एनपीएस सेंट्रल रिकॉर्ड-कीपिंग एजेंसी (सीआरए) सिस्टम तक पहुँचने के लिए दो-कारक प्रमाणीकरण की आवश्यकता होगी, जिसमें मौजूदा पासवर्ड-आधारित लॉगिन पद्धति के साथ आधार-आधारित सत्यापन को एकीकृत किया जाएगा।
पीएफआरडीए के हालिया परिपत्र में सरकारी नोडल कार्यालयों को इस उन्नत सुरक्षा प्रोटोकॉल को अपनाने का आदेश दिया गया है। पहले, ये कार्यालय एक साधारण पासवर्ड का उपयोग करके सीआरए सिस्टम तक पहुँच सकते थे
हालाँकि, 1 अप्रैल 2024 से आधार-आधारित प्रमाणीकरण अनिवार्य हो जाएगा, जिससे दो-कारक प्रमाणीकरण प्रक्रिया सुनिश्चित होगी।
नई प्रणाली कैसे काम करती है?
बढ़ी हुई सुरक्षा व्यवस्था के तहत, उपयोगकर्ता अभी भी CRA सिस्टम में लॉग इन करने के लिए अपने मौजूदा उपयोगकर्ता आईडी और पासवर्ड का उपयोग करेंगे।
हालाँकि, इन क्रेडेंशियल के अलावा, आधार-आधारित प्रमाणीकरण चरण को शामिल किया जाएगा। सुरक्षा की इस अतिरिक्त परत का उद्देश्य अनधिकृत पहुँच को कम करना और NPS लेनदेन को सुरक्षित रखना है।
उन्नत प्रणाली की मुख्य विशेषताएं और इससे क्या नया होगा?
अनधिकृत प्रवेश का जोखिम कम होता है
दो-कारक प्रमाणीकरण की शुरूआत से CRA प्रणाली में अनधिकृत प्रवेश का जोखिम काफी कम हो जाता है, तथा यह सुनिश्चित होता है कि केवल सत्यापित उपयोगकर्ता ही प्रवेश प्राप्त कर सकेंगे।
सुरक्षा की अतिरिक्त परत
इस अतिरिक्त सुरक्षा उपाय को लागू करके, PFRDA NPS ग्राहकों और हितधारकों के हितों की सुरक्षा के लिए अपनी प्रतिबद्धता को रेखांकित करता है।
आधार लिंकेज
सरकारी नोडल कार्यालयों को अब अपने आधार क्रेडेंशियल को अपने CRA उपयोगकर्ता आईडी से लिंक करना आवश्यक है। यह लिंकेज प्रमाणीकरण के लिए आधार OTP (वन-टाइम पासवर्ड) के उपयोग को सक्षम बनाता है।
निर्बाध NPS गतिविधियाँ
सुचारू परिवर्तन सुनिश्चित करने के लिए, सरकारी कार्यालयों और स्वायत्त निकायों को सभी NPS-संबंधित लेनदेन के लिए आधार-आधारित लॉगिन और प्रमाणीकरण की सुविधा के लिए आवश्यक बुनियादी ढाँचे को तेज़ी से अपनाना चाहिए।
वन विभागाची धडाकेबाज कारवाई..
विनापरवाना लाकडाची वाहतूक करणाऱ्यांची आता खैर नाही..
लाकडाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर वन विभागांनी केला जप्त..
जालना शहरातील मंठा चौफुली परिसरात अवैधरित्य लाकडाची विनापरवाना वाहतूक करणारा ट्रॅक्टर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले.
गुप्त बातमी वरून वन विभागाचे वनपाल राऊत आणि वनरक्षक घुगे यांना माहिती मिळाली होती की, मंठा रोड वरून लाकडाचा अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर येत आहे. या माहितीच्या आधारावर वन अधिकाऱ्यांनी तात्काळ मंठा चौफुली परिसरात सापळा लावला असता,थोड्याच वेळात मंठा चौफुली परिसरातील अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर वन अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आला. त्यांनी ट्रॕक्टरा ला थांबवून वाहतुकीच्या परवाना बाबत विचारपूस केली असता त्यांच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे ट्रॅक्टर ड्रायव्हरने सांगीतले. यावरून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ ट्रॕक्टर ताब्यात घेऊन वनपरिक्षेत्र ऊद्यानात लावले,
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सदरील कारवाई जालन्याचे वनपाल राऊत वनरक्षक घुगे यांनी केली.
जिल्ह्यात लाकडाची अवैध वाहतुक करणाऱ्यांवर यापुढे ही कारवाई सुरु राहणार असून जालना शहाराच्या चार ही बाजूने असलेल्या बायपास रोडवर वन विभागाच्या वतीने फिल्डिंग लावलेली असून अवैध रित्या लाकडाची वाहतूक करणारे वाहन आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल,असा ईशारा वन विभागाच्या आधिकांऱ्याच्या वतीने देण्यात आला आहे.
नागपूर, दि. १९ : ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणातून मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मराठवाड्याला सोडण्यात येणार असून यावर्षीचे पाणी २४ नोव्हेंबर २०२३ रोजी सोडण्यात आले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.
मराठवाड्यातील जायकवाडी धरणामध्ये ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणातून पाणी सोडण्याबाबतचा प्रश्न विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी श्री. फडणवीस बोलत होते. या चर्चेत सदस्य एकनाथ खडसे, बाबाजानी दुर्राणी, सुरेश धस यांनी सहभाग घेतला.
यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मेंढेगिरी समितीच्या समन्यायी तत्वानुसार मराठवाड्याला हक्काचे पाणी सोडण्यात येत असते. परंतु, स्थानिक परिस्थितीनुसार पाणी सोडण्याचा कालावधी पुढे-मागे होत असतो. न्यायालयातही मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी शासन ठाम भूमिका घेईल. पुढील काळात पिण्याच्या पाण्याच्या नियोजनासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे, ती पिण्याच्या पाण्याचे नियोजन करेल, असेही यावेळी सांगण्यात आले.
00000
दत्तात्रय कोकरे/विसंअ/
——————–
नागपूर, दि. 19 : धाराशिव नगरपालिकेंतर्गत कोट्यवधी रुपयांच्या मोजमाप पुस्तिका गहाळ झाल्याप्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकामार्फत (SIT) केली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.
धाराशिव नगरपालिकेंतर्गत कोट्यवधी रुपयांच्या मोजमाप पुस्तिका गहाळ झाल्याप्रकरणी गुन्ह्याच्या तपासात दिरंगाई होत असल्याबाबतचा प्रश्न सदस्य सुरेश धस यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. या चर्चेत सदस्य नरेंद्र दराडे यांनी सहभाग घेतला होता.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, धाराशिव नगरपालिकेंतर्गत कोट्यवधी रुपयांच्या मोजमाप पुस्तिका गहाळ झाल्याप्रकरणी गुन्ह्याच्या तपासात दिरंगाई आणि चालढकल होत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकामार्फत (SIT) केली जाईल.
00000
दत्तात्रय कोकरे/विसंअ/
————————
बाबरगाव बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम गतीने पूर्ण करणार– मंत्री संजय राठोड
नागपूर दि.19 : मौजे बाबरगाव ता.गंगापूर,जि.छत्रपती संभाजीनगर येथील बंधाऱ्याच्या दुरुस्ती कामाला सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी विधानपरिषदेत दिली.
यासंदर्भात सदस्य विक्रम काळे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी श्री. राठोड बोलत होते. या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य एकनाथ खडसे यांनी सहभाग घेतला.
यावेळी श्री राठोड म्हणाले, मौजे बाबरगाव ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर येथील शिवना नदीवर 2015-16 मध्ये कोल्हापुरी बंधाऱ्याच्या बांधकामामुळे बंधाऱ्यात समाधानकारक पाणी अडविल्याने परिसरातील सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला होता. सप्टेंबर 2021 मध्ये पावसाच्या पुरामुळे हा बंधारा वाहून गेल्याने परिसरातील सिंचन क्षेत्र कमी झाले असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. यासाठी या बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामास सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन लवकरात लवकर बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्यात येईल
मुंबई, दि. १९: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ठाणे जिल्ह्याचे महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.
राज्यशासनामार्फत रस्त्यावर फिरणाऱ्या व वास्तव्य करणाऱ्या मुलांना संरक्षण देण्याबरोबरच त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात महिला व बालविकास विभागामार्फत विविध उपक्रम व योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये बालस्नेही बस, फिरते पथक शाळा, सखी वन स्टॉप सेंटर, हिरकणी कक्ष आणि जिल्ह्यातील बालविवाह रोखण्यासाठी राबविण्यात आलेली विशेष मोहीम यांची अंमलबजावणी याबाबत महिला व बालविकास अधिकारी श्री. गायकवाड यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमात माहिती दिली आहे. निवेदिका शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमात श्री. गायकवाड यांची मुलाखत बुधवार दि. २०, गुरुवार दि.२१, आणि शुक्रवार दि. २२ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ७:२५ ते ७:४० या वेळेत आकाशवाणीची सर्व केंद्र व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे.
नवी दिल्ली, १९: ‘दिवाळी अंक’ महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक पंरपरेचे प्रतिक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांनी दिवाळी अंकांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी आज केले.
महाराष्ट्रात दिवाळी अंकांची दीर्घ परंपरा आहे. विविध विषयांना वाहिलेल्या आकर्षक दिवाळी अंकांचे महाराष्ट्र परिचय केंद्रातील प्रदर्शन म्हणजे दिल्लीतील मराठी माणसांसाठी साहित्यिक मेजवानी असल्याचे मत श्री. सिंग यांनी येथे मांडले.
महाराष्ट्र परिचय केंद्रात, दिवाळी विशेषांक प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त तसेच प्रधान सचिव श्री. रुपिंदर सिंग यांच्या हस्ते झाले. उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी श्री. सिंग यांचे स्वागत केले. यावेळी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
दिवाळी हा भारतीयांचा प्रमुख सण म्हणून देशभर साजरा होता. महाराष्ट्रात दिवाळी निमित्त प्रकाशित होणाऱ्या दिवाळी विशेषाकांच्या पंरपरेमुळे वेगळी ओळख निर्माण झाली आहे. महाराष्ट्र आणि देशभर जिथे मराठी लोक राहतात तिथूनही विशेषांक प्रकाशित केले जातात.
महाराष्ट्रात १९०९ पासून सुरू झालेल्या दिवाळी विशेषकांची सुरु झाली. दिवाळी विशेषांक हा अक्षर सोहळा म्हणून आता दरवर्षी साजरा होत आहे. वाचकांच्या अभिरूचींना जपत आज जवळपास सर्वच विषयांवर दिवाळी अंक बाजारात उपलब्ध आहेत. दिवाळी अंकांमुळे नवोदित लेखकांपासून तर प्रतिष्ठित लेखकांपर्यंतचे विविध विषयांवरील लेखन यामध्ये कथा, कविता, तसेच सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयांवरील लेख एकाच अंकात वाचण्याची पर्वणी यानिमित्ताने मिळत असल्याचेही श्री. सिंग यावेळी म्हणाले.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने विशेषांक प्रदर्शन येथील वाचकांसाठी पर्वणी असून दिल्ली परिसरातील वाचकांनी याचा जरूर लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. सिंग यांनी यावेळी केले.
प्रदर्शनात १२० दिवाळी अंकांची मेजवानी
या प्रदर्शनात गृह लक्ष्मी, आवाज, मिळून साऱ्याजणी, चारचौघी, श्री व सौ, अंतर्नाद, जत्रा, किशोर, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, लोकमत-दीपोत्सव, साप्ताहिक सकाळ, झी मराठी, धनंजय, साधना, सामना, अक्षरधारा, प्रपंच, छावा, मैत्र, निनाद, हंस, ऋतुरंग, स्वरप्रतिभा, आदी दिवाळी अंक मांडण्यात आले आहेत. हे प्रदर्शन आजपासून सुरू झाले असून, सकाळी १० ते सायं. ६ या वेळेत शुक्रवार दि. २२ डिसेंबरपर्यंत चालणार आहे
मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालीआज मंत्रालयात झालेल्या. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत. विविध निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह. मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
संक्षिप्तमंत्रिमंडळ निर्णय खालील प्रमाणे.
१).दिवाळीनिमित्तशिधापत्रिका धारकांना. 100 रुपयात आनंदाचा शिधा. मैदा आणिपोह्यांचा देखील समावेश.
२).विदर्भ मराठवाड्यातील कृषी पंप विज. जोडण्या वेगाने पूर्ण होणार. उच्चदाब वितरण प्रणाली. योजनेला मुद्दत वाढ.
३).अल्पसंख्याक विद्यार्थी करिता. परदेशी शिक्षणासाठी. शिक्षा वृत्ती योजना. दरवर्षी 27 विद्यार्थ्यांना मिळणार लाभ.
४).नागपूरला पाचअतिरिक्त कौटुंबिक. न्यायालय स्थापन करणार. 45 पदांनाही मंजुरी.
५).इमारतींच्या पुनर्विकासाला वेग येणार विरोध करणाऱ्या सदनिका मालकांच्या निष्कासनाबाबत अधिनियमात
६).गारगोटी येथील तंत्रनिकेतनच्या विनाअनुदानित शाखांना ९० टक्के शासन अनुदान.
JSSC PGT TEACHER EXAM HALL TICKET 2023 DETAILS
जिन उम्मीदवारों ने जेएसएससी पीजीटी शिक्षक भर्ती /के लिए आवेदन किया है, वे जेएसएससी पीजीटी शिक्षक प्रवेश पत्र 2023 डाउनलोड कर सकते हैं जो आधिकारिक वेबसाइट पर उपलब्ध होगा। उम्मीदवार नीचे दिए गए सीधे लिंक से भी जेएसएससी पीजीटी शिक्षक एडमिट कार्ड 2023 डाउनलोड कर सकते हैं। जेएसएससी पीजीटी शिक्षक परीक्षा एडमिट कार्ड जल्द ही जारी किया जाएगा।
Department Name Jharkhand Staff Selection Commission
Exam Name JSSC PGT Teacher Recruitment Exam
Post Name Post Graduate Teacher
JSSC PGT Teacher Exam Date 18 August to 10 September 2023
Download Admit Card Date Seven Days Before the Exam date
Download Mode Online
Website URL jssc.nic.in
Location Jharkhand
८७ होमगार्ड जवानांनाही पदोन्नती
गडचिरोली : जिल्हा पोलीस दलात नाईक पदावर कार्यरत असलेल्या ५५४ पोलीस अंमलदारांना पोलीस हवालदार या पदावर तर पोलीस हवालदार पदावर कार्यरत असलेल्या ३८५ अंमलदारांना सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मिळालेल्या या अनोख्या भेटीमुळे पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
नेमणुकीच्या ठिकाणी असताना उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल त्यांना ही पदोन्नती देण्यात आली. याशिवाय गेल्या १० वर्षांपासून रखडलेली होमगार्डस् ची पदोन्नतीही मार्गी लावत ८७ होमगार्ड जवानांना पदोन्नत करण्यात आले. होमगार्ड महासमादेशकांच्या आदेशान्वये जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी यासाठी पुढाकार घेतला. पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या होमगार्डच्या जवानांसाठी ही मोठी भेट ठरली आहे