PostImage

News mh33 live

June 27, 2024   

PostImage

मुख्य वन संरक्षक कार्यालयासमोर योगाजी कुडवे यांचे ठिय्या आंदोलन


मुख्य वन संरक्षक कार्यालयासमोर योगाजी कुडवे यांचे ठिय्या आंदोलन

वन परिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक यांना तात्काळ निलंबित करण्याची योगाजी कुडवे यांची मागणी

गडचिरोली : वनपरिक्षेत्र एटापल्ली अंतर्गत बांडे, झारेवाडा या जंगल परिसरात नदी मध्ये मोठ्या प्रमाणात हजारो ब्रास अवैध रेती उत्खनन झालेले आहे, यास जबाबदार वन परिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, या मागणी साठी आज दिनांक.27/06/2024 पासुन मुख्य वन संरक्षक कार्यालय गडचिरोली समोर बेमुदत आंदोलनाला सुरू केले आहेत वनपरिक्षेत्र एटापल्ली अंतर्गत बांडे, झारेवाडा या जंगलव्याप्त परिसरात नदी असून मागील काही महिन्यापासून या नदी पात्रातून अंदाजे हजारो ब्रास रेतीची अवैधरित्या चोरी, सुरजागड उतखनन करणारी कंपनी रेतीची खुलेआम चोरी करीत होती तरीसुद्धा वनरक्षक,वनपाल, वनपरीक्षेत्रअधिकारी, हे बघ्याची भूमिका घेतात. पगार शासनाचा घेतात, चुना शासनालाच लावतात. करोडो रुपयाची अवैध रित्या रेतीची चोरी वनविभागाच्या अधिकारी यांच्या संगणमतानेच झालेली आहे,यात वन विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी देवाण -घेवाण करून हजारो ब्रास रेती उपसा करू दिल्याचे दिसून येत आहे. एटापल्ली वनपरिक्षेत्र कार्यालयं अंतर्गत येत असलेल्या अधिकाऱ्यांनी जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येते, त्यामुळें यास सर्व जबाबदार वनरक्षक, वनपाल वन परीक्षेत्र अधिकारी एटापल्ली यांचे कडून अवैध रेती उत्तखंनंन ची रक्कम या सर्वांच्या सेवा पुस्तकात नोंद करून पगारातून वसुल करावेत व या सर्व जबाबदार अधिकारी, कर्मचारी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, महसूल विभागाच्या रेट नुसार ५ पट दंड आकारून संबंधित कंत्राटदार यांचे कडून तात्काळ रक्कम वसूल करण्यात यावे, या मागणी साठी आज दिनांक.27/06/2024 पासून मुख्य वनसंरक्षक कार्यालय गडचिरोली समोर बेमुदत ठिय्या आंदोलनाला बसले आहेत तसे निवेदन योगाजी कुडवे अध्यक्ष आदर्श समाज विकास सेवा संस्था /सामाजिक कार्यकर्ता यांनी मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य. ,उप मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य ,सुधीर मुनगंटीवार वनमंत्री म .रा. यांना पाठविले आहे


PostImage

News mh33 live

June 10, 2024   

PostImage

मुख्य वनसंरक्षक (प्रादे.) कार्यालयासमोर सलग पाचव्या दिवशी सुद्धा ठिय्या आंदोलन …


मुख्य वनसंरक्षक (प्रादे.) कार्यालयासमोर सलग पाचव्या दिवशी सुद्धा ठिय्या आंदोलन सुरू.

 

 

 

गडचिरोली (दि.१० ):- गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यामधील रस्ता बांधकामादरम्यान अवैध मुरुम, माती उत्खनन करुन वाहतूक व वापर केल्याने संबंधित कंत्राटदाराला व त्यास सहकार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनवर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी यासाठी मागील ५ दिवसांपासून सदर ठिय्या आंदोलन सुरू आहे.

      आज ५ दिवस होऊन सुद्धा प्रशासनाने यावर कुठलीही कारवाई केली नाही.कार्यवाही करण्या संबंधित उपवनसंरक्षक यांनी यावर कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले परंतु प्रत्यक्षात मात्र यावर काहीही कार्यवाही करण्यात आली नाही.

     आज ५ व्या दिवसी सदर आंदोलनास श्रीकृष्णा वाघाडे, मुकुंद जोशी , रेखाताई वंजारी, मनोहर नाडमवार बसलेले आहेत.


PostImage

News mh33 live

Feb. 8, 2024   

PostImage

अवैध माती उत्खनन करणाऱ्या दोन जेसीबी सह आरोपींना वन विभागाने …


अवैध माती उत्खनन करणाऱ्या दोन जेसीबी सह आरोपींना वन विभागाने घेतला ताब्यात

 

               कोरची तालुक्यातील नाडेकल रस्त्यावर अवैधपणे माती व मुरूम उत्खनन करून जेसीबी या यंत्राच्या साह्याने दिनांक ७ फेब्रुवारी रोज बुधवार ला रोडवर टाकतांना वनरक्षक गडेली पी एम मगरे व क्षेत्र सहाय्यक बेडगाव एस एन राठोड यांना दिसले. यावेळी वन अधिकारी रोडावर गस्तीवर असताना कक्ष क्रमांक 457 मधील राखीव वनात अवैधपणे जेसीपी यंत्राच्या साह्याने माती व मुरूम खोदकाम करीत होते तसेच या रस्त्यालगतच्या झाडांची अवैधरित्या कत्तल केली होती. त्यामुळे दोन जेसीबी जप्त करून जेसबी मालक व प्रतिनिधी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

        दरम्यान सर्रासपणे जेसीबी ही चालू अवस्थेत असताना सदर काम कोणाचे परवानगीने चालू आहे तसेच सदर रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्याचे कागदपत्र दाखविण्याबाबत विचारपूस केली असता कोणत्याही प्रकारचे कागदपत्र दाखवले नाही त्यामुळे या दोन्ही जेसीबी वर भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26 (1) व वन संवर्धन कायदा 1980 चे उल्लंघन केल्याची दिसून आले त्यामुळे सदर कामावरील दोन जेसीबी आणि आरोपी १) लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनी चंद्रपूर, २) कलाम उल्ला हाफिज उल्ला खान (प्रतिनिधी) यांच्यावर कारवाई करून जेसीबी जप्त करून बेडगाव वनविभागाच्या कार्यालयापुढील पोलीस मदत केंद्र बेडगाव याच्या बाजूला लावण्यात आले आहे.    

           सदर कारवाई वडसा उपवनसंरक्षक धर्मवीरसाल विठ्ठल तसेच सहाय्यक वनसंरक्षक (एसीएफ) मनोज कुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनात बेडगाव वनपरिक्षेत्र अधिकारी एल एम ठाकरे व बेडगाव क्षेत्र सहाय्यक एस एन राठोड, गडेली नियत वनरक्षक पी. एम. मगरे पुढील तपास करीत आहेत.


PostImage

News mh33 live

Dec. 30, 2023   

PostImage

हत्तीच्या हल्ल्यामध्ये आरमोरी तालुक्यातील शंकर नगर येथील महिला ठार, परिसरात …


हत्तीच्या हल्ल्यामध्ये आरमोरी तालुक्यातील शंकर नगर येथील महिला ठार, परिसरात दहशत दहशतीचे वातावरण

 (फाईल फोटो)

आरमोरी तालुक्यापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या शंकर नगर येथे दिनांक 29 -12 -2023 रोजी रात्रीच्या सुमारास साडेदहा वाजेच्या दरम्यान कौशल्या राधाकांत मंडल राहणार शंकर नगर अंदाजे वय 61 वर्ष हे आपल्या परिवारासह शेतामध्ये घरी असताना शेतामध्ये अचानक हत्ती आल्याने मुलगा महात्मा मंडल याला हाती आल्याचे कळाल्याने त्यांनी शेतातून गावाकडे जाण्याकरिता पत्नी वडील आणि आई यांना सोबत घेऊन निघाले असता हत्तीने आपला मोर्चा या तिघाकडे वळवून कौशल्या राधाकांत मंडल या महिलेवर हल्ला केला आणि महिलेला ठार केले .यामुळे शंकर नगर परिसरात हत्तीच्या दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. सदर घडलेली घटना वन क्षेत्र जोगीसाखरा उपक्षेत्र पळसगाव परीक्षेत्र आरमोरी जिल्हा गडचिरोली येथे घडली. परिसरात असलेल्या हत्तीचा तात्काळ बंदोबस्त लावावा अशी मागणी परिसरातील जनतेकडून जोर धरू लागली आहे.


PostImage

युवाक्रांती समाचार

Dec. 26, 2023   

PostImage

रानटी हत्तींचा पुन्हा हैदोस.! जीव वाचविण्यासाठी सोडावं लागलं घर.!


आरमोरी(गडचिरोली)
काही काळासाठी गोंदिया जिल्ह्यात गेलेला रानटी हत्तींचा कळप पुन्हा गडचिरोली जिल्ह्यात परतला असून आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा गावात रविवारी मध्यरात्री हत्तींनी धुडगूस घातला.
अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पाच कुटुंबांना जीव वाचवण्यासाठी घर सोडून पळ काढावा लागला. हल्ल्यात घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.२४ डिसेंबरच्या मध्यरात्री २० ते २२ रानटी हत्ती आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा गावातील पाच घरांवर हल्ला केला. सुरुवातीला अशोक वासुदेव राऊत यांच्या घराला धडक दिली.

हत्तीची किंचाळी ऐकून घरातील सर्व सदस्य उठून घराच्या मागच्या दरवाज्याने पळ काढला आणि मोठ्याने आरडाओरड करून शेजाऱ्यांना जागे केले. त्यामुळे या परिसरातील घरातील सर्व सदस्य जीव मुठीत घेऊन घराबाहेर सुसाट धावत सुटले. अशोक राऊत, सूरज दिघोरे, मंगला प्रधान ,चंद्रशेखर बघमारे, दुर्गादास बघमारे यांच्या घरांचीही हत्तींनी नासधूस केली. यानंतर संपूर्ण गाव जागे झाले, पण जीवाच्या भीतीने कोणीही घराबाहेर पडले नाही. गावकऱ्यांनी वनविभागाला कळविले. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम, वनपाल मुखरु किनेकर ,वनरक्षक बाळू शिऊरकर , रुपा अत्करे , पंढरी तेलंग आदी दाखल झाले. हुल्ला पार्टीच्या मदतीने हत्तीच्या कळपाला हुसकावून लावले. हल्ल्यात घरांचे नुकसान झाले, पण जीवितहानी टळली.
पाच कुटुंबांना निवाऱ्याची व्यवस्था करावी

हत्तीच्या हल्ल्यामुळे पाच कुटुंब उघड्यावर आले आहे. त्यामुळे समोर जायचे कोठे, रहायचे कसे, खायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या कुटुंबांना तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करुन भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. यापूर्वी शंकरनगर येथे ९ सप्टेंबर रोजी हत्ती पहिल्यांदा दाखल झाले आणि शेतकऱ्यांच्या शेतातील धान्यासह बोअरवेल, इलेक्ट्रिक साहित्यांचे नुकसान केले होते. आता पुन्हा एकदा या भागात हत्तींनी प्रवेश केल्याने शेतकरी दहशतीत आहे.


PostImage

News mh33 live

Dec. 15, 2023   

PostImage

ब्रेकिंग न्यूज... वाघाच्या हल्ल्यात गोविंदपूर येथील माया धर्माजी सातपुते यांचा …


ब्रेकिंग न्यूज...
वाघाच्या हल्ल्यात गोविंदपूर येथील माया धर्माजी सातपुते यांचा मृत्यू ....




गडचिरोली :- आज दिनांक १५ डिसेंबर २०२३ दुपारी १२:३० ते १ वाजताच्या सुमारास गडचिरोली तालुक्यातील मौजा - गोविंदपुर येथील माया धर्माजी सातपुते रा. गोविंदपुर ता. जि. गडचिरोली वय (५५ - ६० ) येथील रहिवासी असून सदर महिला सरपण गोळा करण्यासाठी गावाच्या जवळच गेली असता वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ठार केलं आहे..

या सदर घटनेची माहिती गडचिरोली वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळवण्यात आले असून वनविभागाची टीम रवाना झाली आहे.

या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण तयार झाले आहे. सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सातपुते परिवाराला लवकरात लवकर आर्थिक मदत करावी.आणि या परिसरात वावरत असलेल्या वाघाचा त्वरित बंदोबस्त करून वाघाला जेरबंद करण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांनी , व परिसरातील जनतेनी केली आहे..


PostImage

खबरदार महाराष्ट्र

July 30, 2023   

PostImage

एटापल्ली येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्यकर्ता ची बैठक


 

एटापल्ली:- दिनांक 27 जुलै 2023 रोजी राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा एटापल्लीचे वतीने हनुमान मंदिर एटापल्ली येथे श्री संतोष खापने यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. आजच्या बैठकीचे मार्गदर्शक श्री डॉ. बी डी.कोंगरे, प्रा.सी एन. घोंगळे हे होते तर प्रमुख उपस्थितीत प्रा.डॉ.शरद पाटिल, प्रा.एस डी.मंद , डॉ एस. बी. वळसकर, श्री किशोर मलेवार, प्रा .बारसांगडे सर हे होते.
     प्रा.सी एन घोंगळें यांनी आपले मार्गदर्शनात ओबीसी समाजाचा शैक्षणिक, सामाजिक, राजकिय व आर्थिक विकासाच्या प्रवाहात आणण्याकरिता आरक्षण महत्त्वाचे भूमिका बजावते असे आपले मार्गदर्शनात सांगितले. तर डॉ. शरद पाटील यांनी ओबीसी समाजाचे घटनात्मक अधिकार यावर मार्गदर्शन करताना ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यानकरीता वसतिगृह लवकरात लवकर सुरू झाले तर या शैक्षणिक विद्यार्थ्याना लाभ मिळण्यास सोईस्कर होईल  यावर चर्चात्मक मार्गदर्शन केले. व आजच्या बैठकीत तिरुपती येथे होणाऱ्या राष्ट्रीय ओबीसी महासंघचे महाअधिवेशनात प्रमुख मागण्या जातीनिहाय जनगणना, केंद्रात ओबीसी चे स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे व नॉन क्रोमिलेयर ची अट रद्द करण्यात यावे ही मागणी पूर्ण करण्याकरीता  ओबीसी समाज बांधवांनी सहभागी होणे गरजेचे आहे याकरिता बैठकीत नियोजन करण्यात आलें. तसेच एटापल्ली तालुक्यातील ओबीसी समाज बांधवांचे समस्या व अडचणी यावर चर्चा करण्यात आलेत.  राष्ट्रीय ओबीसी महासंघ ची बैठक यशस्वी करण्याकरिता श्री नागराज चीमटपवार तालुका उपाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा एटापल्ली, श्री वासुदेव चंनकापुरे तालुका सचिव , श्री राकेशभाऊ मुकेरवार तालुका कोषाध्यक्ष, श्री श्रीकांतभाऊ तेलकुंठवार तालुका सदस्य, श्री बजरंगभाऊ मार्गोनवार सदस्य, श्री नाजुकराव निकोडे सदस्य, श्री अतुल वसाके यांनी अथक परिश्रम घेतले. आजच्या बैठकीत गणमान्य ओबीसी समाज बांधव उपस्थित होते. आजच्या कार्यक्रमाचे संचालन श्री किशोर मलेवार यांनी केले तर उपस्थीत मान्यवरांचे आभार प्रा. सी एन. घोंगळे यांनी मानले.


PostImage

VAINGANGA NEWS 24

July 19, 2023   

PostImage

खवले मांजराला अवैधरित्या पकडून जंगलात बांधून ठेवणाऱ्या तीन आरोपींना वन …


गुप्तधन शोधणे व काळ्या जादूसाठी होतो वापर..

 

गडचिरोली : वन्यजीव अनुसूची १ मध्ये येत असलेले व अतिशय  दुर्मीळ मानल्या जाणाऱ्या खवले मांजराला पकडून अवैधरित्या जंगलात बांधून ठेवणाऱ्या तीन आरोपींना वन विभागाने १५ जुलै रोजी अटक केली.

सदर आरोपींना न्यायालयात हजर केले असता दोघांना कोठडी झाली तर एकाची सुटका करण्यात आली.

     निताई दास, हृदय बाला रा. श्रीनिवासपूर ता. चामोर्शी अशी आरोपींची नावे आहेत. श्रीनिवासपूर येथील निताई गौतम दास (२२) हृदय रेवती बाला (३८) व अन्य एका अल्पवयीन आरोपींने १४ जुलै रोजी वन्यप्राणी खवले मांजर अवैधरित्या पकडून त्याला दोराने बांधून दुचाकी वाहनाने नेत होते. परंतु आरोपींना वनाधिकाऱ्यांची कुणकुण लागताच खवले मांजराला वनातच बांधून ठेवले. तसेच खवले मांजर हे जंगलात पळून गेल्याचे वनाधिकाऱ्यांना सांगितले. परंतु वनाधिकाऱ्यांनी स्वस्त न बसता गोपनीय माहिती काढून चामोर्शी वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. वाडीघरे, चामोर्शीचे क्षेत्रसहायक ए. व्ही. लिंगमवार, भाडभिडीचे क्षेत्रसहायक व्ही. एस. चांदेकर, जामगिरीचे सिद्धार्थ गोवर्धन, आल्लापल्लीचे बोधनवार आदींच्या पथकाने १५ जुलै रोजी सकाळी ९ वाजता श्रीनिवासपूर येथून तिन्ही आरोपींना चौकशी करीता ताब्यात घेऊन खवले मांजर पळून गेले. त्या ठिकाणी शोधण्यासाठी नेले असता खवले मांजर घोट-चामोर्शी मार्गावरील श्रीनिवासपूर शिवारात आढळले.

आरोपींना १५ दिवसांची कोठडी :

खवले मांजर प्रकरणी वन्य जीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम २ (१), (१६), (ए), (बी),९,३९,५०,५१, नुसार दोन आरोपींना १६ जुलै रोजी चामोर्शी न्यायालयात तर एक आरोपी अल्पवयीन असल्याने बाल न्यायालय गडचिरोली येथे हजर केले. पुढील चौकशीसाठी वन कोठडी मागण्यात आली होती; मात्र न्यायालयाने निताई दास व हृदय बाला यांना १५ दिवसाची न्यायालीन कोठडी सुनावली. तर अल्पवयीन आरोपीस जमातीवर सोडण्यात आले.

 

गुप्तधन शोधणे व काळ्या जादूसाठी होतो वापर :

खवले मांजर प्राणी हा वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ मधील अनुसूची १ मध्ये येतो. हा प्राणी दुर्मीळ प्रजातीचा असून तो नामशेष होण्याचा मार्गावर असलेल्या प्रजातीमध्ये येतो. सदर वन्य प्राण्याच्या अवयवांची आंतरराष्ट्रीय स्तरावर तस्करी होत असून त्याची किंमत अंदाजे ३० ते ४० लाखांपर्यंत आहे. गुप्तधन शोधणे तसेच अंधश्रद्धेपोटी काळी जादू करण्यासाठी त्याचा वापर व व्यापार केला जातो.