GADCHIROLI : गडचिरोली तालुक्यातील वाकडी, मुडझा परिसरात वाघाचा वावर असून, लोकांना वाघाचे अधूनमधून दर्शन होत आहे. त्यामुळे शेतावर जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या मनात वाघाबाबत दहशतअसून, शेतकरी शेतावर जाण्यासघाबरत आहेत.
वाकडी परिसरातील आठ ते दहा किमी अंतर परिसरात वाघाचा वावर आहे.हा वाघ अधूनमधून नागरिकांना दिसून येतो.
सकाळी व सायंकाळच्या सुमारास गडचिरोली चामोर्शी
मार्गावरही रस्ता ओलांडताना दिसतो.
यामुळे वाकडी, मुडझा, गोविंदपूरसह परिसराच्या गावातील नागरिक धास्तावले आहेत.तीन महिलांचा बळी घेणाऱ्या या वाघाचा लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.
👉 अशीच माहिती जाणून घेण्यासाठी या Whatsapp ग्रुपला जॉईन करा जॉईन करण्यासाठी येथे क्लि करा 👈