गडचिरोली : किमान आधारभूत खरेदी किंमत योजनेंतर्गत शेतमालाचे दर केंद्र शासनाकडून जाहीर केले जातात. त्यानुसार शेतमालाची खरेदी करणे आवश्यक असते. त्यापेक्षा कमी किमतीत शेतमालाची खरेदी केल्यास शासनाच्या नियमाचे हे उल्लंघन ठरते. जिल्ह्यात हाच प्रकार सध्या पाहायला मिळत आहे. हमीभावापेक्षा धानाची खरेदी व्यापाऱ्यांकडून केली जात असल्याने यात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जात आहे. अशा व्यापाऱ्यांवर पुरवठा विभागाकडून कारवाई होत नसल्याने व्यापाऱ्यांचे 'हौसले बुलंद' आहेत.
खरीप हंगामात धान पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आहे, तर मळणीही जोमात सुरू आहे. शेतकऱ्यांना मजुरांचे पैसे द्यावे शेतकरी आपला माल साठवून ठेवू शकत होते. लागतात. तसेच कर्ज व अन्य देवाणघेवाणीसाठी पैशांची आवश्यकता असल्याने शेतकरी आपल्याकडील धान व्यापाऱ्यांना कवडीमोल दरात विक्री करावे लागत आहेत. शासनाने जिल्ह्यातील सर्व धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
पुरवठा विभाग सुस्त
धानाला सध्या २ हजार ३०० ते २ हजार ३२० रुपये हमीभाव आहे. मात्र, यापेक्षा कमी दरात म्हणजेच २ हजार ते २ हजार १०० रुपये दराने मध्यम प्रतीचे धान शेतकऱ्यांकडून खरेदी केले जात आहेत. अशा व्यापाऱ्यांवर पुरवठा विभाग कारवाई करणार काय, असा सवाल शेतकऱ्यांचा आहे. याबाबत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी भ्रमणध्वनीवर प्रतिसाद दिला नाही. हमीभावापेक्षा कमी दरात धानाची खरेदी करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जात असतानाही प्रशासन कारवाई का करीत नाही.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, मरेगाव केंद्र- अमिर्झा पं.स./ जि. गडचिरोली
नुकत्याच विदर्भातील शाळांना सुरुवात झालेली असून विद्यार्थ्यांच्या अध्ययन कार्यास सुरुवात होत आहे. विद्यार्थ्यांना पुस्तकांसोबत नोटबुकची अत्यंत गरज भासत आहे. ग्रामीण भागातील बहुतेक मुले शेतकरी, मजूर व गरीबाची असतात. त्यामुळे आजच्या परिस्थितीत नोटबुकांच्या वाढलेल्या किंमती पाहता विकत घेताना पालकांना अडचणीचे जाते. हिच अडचण लक्षात घेवून आरमोरी येथे स्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते श्री सिद्धार्थ साखरे यांनी जि प उ प्रा शाळा मरेगाव केंद्र अमिर्झा पं स गडचिरोली येथील सर्व विद्यार्थ्यांना स्वतः नोटबुक वितरण करून सामाजिक दायित्व राखण्याचा प्रयत्न केला. तसेच पर्यावरण संवर्धन रक्षण संदेश विद्यार्थ्यापर्यत पोहचावा याकरिता शाळेला झाडे भेट दिली.
या छोट्याशा कार्यक्रमाता शाळेतील विद्यार्थी व सर्व शिक्षक उपस्थित होते. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री गुणवंत हेडाऊ यांनी सामाजिक कार्यकर्ते श्री सिद्धार्थ साखरे यांचे स्वागत करून आभार व्यक्त केले.
गडचिरोली : येणाऱ्या विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनसंपर्क आणि तयारी संबंधात शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा समीतीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पक्षाच्या जिल्हा परिषदेचे गठन, हर हर जोडो अभियान, बुथ रचना आणि व्यापक जनसंपर्क सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळाचे सदस्य आणि जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी मार्गदर्शन केले. युवक, बेरोजगार, कष्टकरी, कामगार, शेतकरी यांच्या प्रश्नांना घेवून शेतकरी कामगार पक्ष येणाऱ्या निवडणुकांमध्ये उतरणार असून धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती उभी करण्यासाठी पक्षाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त ३ ऑगस्ट पासून संपूर्ण गडचिरोली विधानसभा क्षेत्रात 'जनसंघर्ष यात्रा' सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली.
जिल्हा समीतीच्या या बैठकीला जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, जिल्हा सहचिटणीस संजय दुधबळे, महिला नेत्या व गडचिरोली विधानसभेच्या उमेदवार जयश्रीताई जराते, जिल्हा समीतीचे सदस्य डॉ. गुरुदास सेमस्कर, दामोदर रोहनकर, गंगाधर बोमनवार, तुळशिदास भैसारे, अशोक किरंगे, डंबाजी भोयर, एकनाथ मेश्राम, अविनाश कोहळे, चंद्रकांत भोयर उपस्थित होते.