PostImage

सुपर फास्ट बातमी

Feb. 12, 2024   

PostImage

लाच घेणारा कारकून कारागृहात


गडचिरोली : जमीन विक्रीकरता संमती देण्याचे आदेश पारित करण्यासाठी १५ हजारांची लाच मागणी करून १३ हजार रुपये स्वीकारताना कुरखेडा उपविभागीय कार्यालयातील अव्वल कारकून नागसेन प्रेमसाद वैद्य यास सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले होते. त्याची ९ फेब्रुवारीला चंद्रपूर कारागृहात रवानगी झाली.

 

चार दिवसांची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यास ९ रोजी पुन्हा न्यायालयात हजर केले. न्यायालयीन कोठडीत रवानगीनंतर त्यास चंद्रपूर पाठविण्यात आले. 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 23, 2024   

PostImage

क्रांतिसूत्र ( THE REVOLUTION FORMULA) लघुपट होणार अलगद प्रॉडक्शन्स या …


 

या लघुपटाचे चित्रीकरण गेल्या आठवड्यात जुनी वडसा आणि कुरखेडा तालुक्यातील गुरनुली या गावी पुर्ण झाले. या लघुपटाचे लेखक आणि दिग्दर्शक प्रतिक देवाजी लाडे असून यांनी व यांच्या संपूर्ण टीमने २६ नोव्हेंबर संविधान दिना निमित्त "अधिकाराचा लढा" हे लघुपट तयार करून यूट्यूब वरती प्रदर्शित केले होते व प्रेक्षकांचा त्यांना खूप छान प्रतिसाद सुद्धा मिळाला होता. 

आता प्रदर्शित होत असलेल्या "क्रांतिसूत्र" या लघुपटात मोहित राऊत, मयंक मेश्राम, विक्की राऊत, स्विटी टेंभुरणे, रोहित जनबंधू, तुषार राहाटे, पल्लवी चौधरी आणि आतिश राहाटे हे कलाकार अभिनय करताना दिसणार आहेत.  

आजची युवा पिढी शिक्षणाकडे बऱ्याच प्रमाणात दुर्लक्ष करीत आहे आणि सोशल मीडिया कडे ज्यास्त प्रमाणात आकर्षित होऊन आपला बराच वेळ वाया घालवत आहेत. तसेच आपले समाजसुधारक व क्रांतिकारी महापुरुषांना विसरून जात आहेत. आजच्या युवा पिढी द्वारे एक क्रांतीची मशाल नेहमी पेटत राहावी. आणि हे फक्त शिक्षणा मुळे आणि आपल्या महापुरुषांचे विचार डोक्यात घेतल्यावरच होऊ शकते. हे या लघुपटाच्या माध्यमातून दाखवण्याचं प्रयत्न केलेला आहे असे प्रतिक लाडे यांनी सांगितले आहे. 

तरी येत्या २५ जानेवारी ला हा लघुपट बघून सर्व रसिक प्रेक्षकांनी देसाईगंज तालुक्यांतील या युवा कलाकारांना प्रोत्साहन द्यावे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 10, 2024   

PostImage

खदान विरोधी संघर्षात 'पद्मश्रीं' चा सहभाग का नाही?


सुरजागडच्या यात्रेत उपस्थितांचा सवाल

 

एट्टापल्ली : आदिवासींची सेवा केल्याच्या नावाखाली 'पद्मश्री' पुरस्कार मिळालेले व्यक्तीमत्व जिल्ह्यात असूनही आदिवासींचे अस्तित्व नष्ट करु पाहणाऱ्या लोह खदानींच्या विरोधातील संघर्षात या 'पद्मश्रीं' नी आजपर्यंत का सहभाग घेतला नाही. असा सवाल सुरजागड इलाख्यातील कार्यकर्त्यांनी देवाजी तोफा यांना केला. ठाकुरदेव यात्रेदरम्यान झालेल्या अधिकार संम्मेलनाच्या समारोपा दरम्यान देवाजी तोफा यांनी भेट दिली होती.

५ ते ७ जानेवारी ला संपन्न झालेल्या ठाकुरदेव यात्रेदरम्यान ६ जानेवारीला अधिकार संम्मेलन पार पडले यावेळी जिल्ह्यातील बेकायदेशीर लोहखाणी आणि त्या खाणी खोदण्यासाठी स्थानिक आदिवासींचे होणारे दमन याविरोधातील आंदोलनात सहभागी असलेल्या प्रागतिक पक्ष, महाराष्ट्र आघाडीच्या नेत्यांनी यात्रेतील जनतेला मार्गदर्शन केले. सभेच्या अध्यक्षस्थानी सुरजागड इलाखा प्रमुख सैनू गोटा तर प्रमुख अतिथी म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते काॅ.डॉ. महेश कोपूलवार, काॅ. अरुण वनकर, शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे जिल्हा प्रभारी राज बन्सोड, आदिवासी विकास युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष विनोद मडावी, माजी पं.स.सदस्य शिलाताई गोटा, जयश्रीताई वेळदा, शामसुंदर उराडे, अक्षय कोसनकर, भाकप जिल्हा सचिव काॅ. देवराव चवळे, ॲड.जगदिश मेश्राम, विनोद झोडगे, मिलिंद भनारे, आप चे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, साहित्यिक कुसूम आलाम प्रामुख्याने उपस्थित होते.

 

रविवार दिनांक ७ जानेवारीला यात्रेचे समारोप प्रसंगी आदिवासी समाज सेवक देवाजी तोफा यांनी भेट दिली असता त्यांचेसोबत सुरजागड इलाख्यात कार्यकर्त्यांनी चर्चासत्र घडवून आणून जिल्ह्यातील 'पद्मश्री' आणि प्रशासना बद्दल तीव्र रोष व्यक्त करण्यात आला. तसेच जे आमच्या संघर्षात नाही, आम्हीही त्यांच्या सोबत नाही. अशी भूमिका घेत डॉ. अभय बंग यांच्या दारुबंदी आणि दारुनिर्मिती कारखाना विरोधी भूमिकेला धुत्कारण्यात आले. उल्लेखनीय की, यावर्षी लोह खदानी संबंधात विरोधाची स्पष्ट भूमिका नसणाऱ्या विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना अधिकार संम्मेलनाच्या मंचावर स्थान नाकारण्यात आले.

ठाकुरदेव यात्रा आणि पारंपरिक अधिकार संम्मेलनाच्या यशस्वीतेसाठी लक्ष्मण नवडी, मंगेश होळी, पत्तू पोटावी, सैनू हिचामी, रमेश कवडो, सरपंच करुणा सडमेक, माजी सरपंच कल्पना आलाम, दारसू तिम्मा, शिवाजी गोटा व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 9, 2024   

PostImage

परंपरागत खेळांना वाव द्या.- रेखलालभाऊ टेंभरे


रुमदेव सहारे सहसंपादक गोरेगाव:-

                  बोटे येथे नुकतेच संपन्न झालेल्या भव्य कबड्डी स्पर्धेच्या बक्षिस वितरण सोहळ्याला अध्यक्ष म्हणून रेखलालभाऊ टेंभरे (डायरेक्टर, जीडीसीसी बॅंक गोंदिया) उपस्थित झाले होते. व आदी मान्यवर उपस्थित होते. 
         याप्रसंगी रेखलालभाऊ टेंभरे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, देश विकासाच्या मार्गावर आहे. देश प्रगत होत आहे. त्यामुळे देशाच्या सर्व बाबींमध्ये थोडाफार बदल होत असल्याचे समजून येत आहे. अशा वेळी खेळ व मनोरंजनाच्या साधनांमध्ये सुद्धा बदल झालेला आहे. अशा वेळी आपले परंपरागत खेळ व परंपरागत मनोरंजनाचे साधन टिकवून ठेवणे ही आपण सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. शेवटी ते म्हणाले की, माणूस कितीही मोठा झाला तरी त्याने आपल्या जन्मभूमी शी निगडित परंपरांना विसरू नये.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 5, 2024   

PostImage

५ लाखाची लाचखोर वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात


रुमदेव सहारे सहसंपादक

गडचिरोली :-

आलापल्ली वनविभाग  अंतर्गत येत असलेल्या पेरमिलीचे वनपरिक्षेत्र अधिकार्याला ५ लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. रस्त्याच्या कामावरील पकडलेले ट्रॅक्टर सोडण्यासाठी आणि दंड कमी करण्यासाठी त्याने १० लाख रुपयांची मागणी केली होती. प्रमोद आनंदराव जेनेकर असं लाचखोर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे नाव आहे. ही कारवाई गडचिरोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (४ जानेवारी) रोजी रात्रीच्या सुमारास केली.तक्रारदार रस्त्याचे काम करतो. तुमरगुंडा ते कासमपल्लीपर्यंत रस्त्याचे काम सुरू होते. त्या कामावर सुरू असलेले काही ट्रॅक्टर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद जेनेकर यांनी पकडली होती. ती वाहने सोडण्यासाठी व आकारलेले ७२ लाखांचा दंड कमी करण्यासाठी त्यांनी तब्बल १० लाखांची मागणी केली होती. तडजोड अंती ५ लाख रुपये देण्याचे ठरले. मात्र, संबंधित तक्रारदाराला लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या अनुषंगाने सापडा रचण्यात आला असता, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद जेनेकर यांनी ५ लाख रुपयांचा लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. विशेष म्हणजे लाचखोर प्रमोद आनंदराव जेकर यांच्या पेरमिली शासकीय निवासस्थानी झळती घेतले असता ८५ हजार रुपये रोख रक्कमही मिळाले.सदर कारवाई पेरमेली येथे करण्यात आली असून ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल माणकीकर अँटी करप्शन ब्युरो नागपूर, सचिन कदम अप्पर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक श्रीमती अनामिका मिर्झापुरे अँटी करप्शन ब्युरो गडचिरोली, पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, सुनील पेद्दीवार, किशोर जंजारकर, संदीप घोरमोडे, संदीप उडान, नरेश कस्तुरवार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली यांनी केले.

 


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 3, 2024   

PostImage

आरमोरीत ४ जानेवारीला क्रांती निळ्या पाखराची, प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन


रूमदेव सहारे सहसंपादक

आरमोरी... समता युवा सामाजिक संघटना  आरमोरीच्या वतीने भिमा कोरेगांव शौर्य दिन अभिवादन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती समारोह निमीत्य दिनांक  ४ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता विजय पारधी यांचा "क्रांती निळ्या पाखराची, हा प्रबोधनपर संगीतमय  कार्यक्रम आरमोरी जूना बसस्थानक जवळील तथागत बुद्ध विहाराच्या परिवर्तन मंच सभागृहात  होणारं आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामीण विकास शिक्षण संस्था चुरमुराचे संस्थापक डॉ. राजकुमार शेंडे यांच्या हस्ते होणारं आहे. सहउद्घाटक म्हणुन  किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्था आरमोरीचे अध्यक्ष भाग्यवान खोब्रागडे हे राहणार आहेत तर  अध्यक्षस्थानी   प्रेरणा शिक्षण. संस्था आरमोरीचे सचिव मदन मेश्राम हे राहणार आहेत.
प्रमूख अतिथी म्हणून भिवापूरचे तहसिलदार  कल्याणकुमार डहाट, आरमोरीचे तहसीलदार,  श्रीहरी माने, अहेरीचे पोलिस निरीक्षक  मनोज काळबांडे , आरमोरीचे पोलीस निरीक्षक संदिप मंडलिक, डॉ आंबेडकर स्मारक मंडळाचे अध्यक्ष  यशवंत जांभुळकर , सामाजिक कार्यकर्ते  जयकुमार मेश्राम, नगराध्यक्ष . पवन नारनवरे, आरमोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी, अविनाश मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते  विजयकुमार ठवरे,  प्रा. शशिकांत गेडाम,  माजी जि.प.सभापती वेणुताई ढवगाये, माजी जिल्हा परिषद सदस्य मनिषा दोनाडकर,  तालुका कृषी अधिकारी निलेश गेडाम,योगेंद्र बन्सोड, नगरपरिषद उपाध्यक्ष  हैदरभाई पंजवानी, नगरपरिषद सभापती  भारत बावणथडे,   विलास पारधी,  सागर मने, सुनिता चांदेवार नायब तहसिलदार  ललीतकुमार लाडे, प्राचार्य  रविंद्र बांबोळे,  प्राचार्य  जयदास फुलझेले , प्राचार्य साईनाथ अद्दलवार, भाजपा तालुकाध्यक्ष पंकज खरवडे, धानोराचे सहाय्यक गटविकास अधिकारी एम. ई. कोमलवार,. माजी प्राचार्य पि.के. सहारे , विनोद शेंडे , श्री सत्यसाई आदीवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्था आरमोरीचे सचिव महेश तितीरमारे , शाखा अभियंता प्रविण झापे, गट समन्वयक कैलाश टेंभुर्णे, मोरेश्वर टेंभुर्णे, खिरेंद्र बांबोळे  डॉ. प्रदिप खोब्रागडे,  मनोज टेंभुर्णे, कलिराम गायकवाड, अभियंता अविनाश बंडावार   डॉ. अमोल धान्नक, डॉ. सोनाली धान्नक,  प्रा. सौ स्नेहा श्रीकांत गौतम,  राजु उके  अविनाश चंहादे, अमर बोबाटे,  गोलू वाघरे,  गंगाधर कुकडकर,  शुभम हुकरे, जितु शेंडे, राजु कुंभारे, प्रफुल ठवकर,  सत्यवान वाघाडे,  सिध्दार्थ साखरे,  विजय लाकडे, अतुल मेश्राम,  शुभम तुमने आदी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समता युवा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष निलेश अंबादे यानी केले आहे


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 2, 2024   

PostImage

नियंत्रण सुटल्याने दुचाकी आदळली पुलाच्या लोखंडी कठड्याला .!दुचाकीस्वार जावयासह, सासरा …


चामोर्शी(गडचिरोली) दिनांक ०२ :-  चामोर्शी तालुक्यातील आष्टी - चामोर्शी मार्गांवरील उमरी जवळील पुलाच्या लोखंडी कठड्याला दुचाकीची जबर धडक बसली यात दुचाकीस्वार जावया सह सासरा गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 2 जानेवारीला मंगळवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली.
     संदिप तुळशीराम पोटे वय 42 वर्ष रा. मुरखळा ता. चामोर्शी परशूराम बालाजी ठाकूर वय 65 वर्ष रा बल्लू ता. चामोर्शी असे गंभीर जखमीची नावे आहेत. 

  मुरखळा येथील संदीप पोटे हा आपल्या सासरे परशूराम ठाकूर यांना घेउन दुचाकी क्रमांक MH 33 AB 0655 ने तेलंगणातील सिरपुर येथे शेतीची कीटकनाशके खरेदी करण्यासाठी गेले तिथून गावाकडे परत जात असताना. दुचाकी वरुन नियंत्रण सुटल्याने आष्टी चामोर्शी मार्गावरील उमरजवळील पुलाच्या लोखंडी कठड्याला दुचाकीची जबर धडक बसली ही धडक इतकी भीषण होती की यात दुचाकीस्वार जावई संदिप पोटे याचा एका पायाचा अर्धा तुकडाच पडला तर सासरे परशूराम ठाकूर यांचा एक पाय चेंदामेंदा झाला. घटनेची माहिती कळताच आष्टी पोलिस ठाण्याचे ठाणेदार कुंदन गावडे , उपनिरिक्षक गणेश जंगले हे पोलिस पथकासह घटना स्थळी दाखल झाले व जखमींना आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. नंतर दोन्हीं जखमींना चंद्रपूर येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. घटनेचा पुढील तपास आष्टी पोलिस करीत आहे.

जखमी अवस्थेत दुचाकीस्वार 

PostImage

युवाक्रांती समाचार

Dec. 30, 2023   

PostImage

रानटी हत्तीच्या हल्ल्यात महीला ठार.! रानटी हत्तींचा हैदोशामुळे नागरिकांत भीतीचे …


गडचिरोली, दि. ३० : जिल्ह्यात रानटी हत्तीच्या कळपाने धुमाकुळ माजवला असून आता रानटी हत्तीने आरमोरी तालुक्यातील शंकरनगर येथील महिलेला ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. कौशल्या राधाकांत मंडल रा. शंकरनगर ( वय ६७ ) असे मृतक महिलेचे नाव आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा परिसरात दोन दिवसांपूर्वी रानटी हत्तींच्या कळपाने धुमाकुळ माजवत घरांचे नुकसान केले होते. कसेबसे नागरिकांनी यावेळी आपला जीव हत्तीच्या तावडीतून वाचवला. दरम्यान २९ डिसेंबर च्या रात्री शंकरनगर येथील जंगलालगत शेतशिवारात असलेल्या घरात मंडल कुटुंब असतांना जवळपास साडेदहा वाजताच्या सुमारास आपल्या परिसरात हत्ती आल्याचे त्यांना कळाले. हत्ती आपल्याला नुकसान पोहचवतील या भीतीने ते गावाकडे जाण्यास निघाले असता हत्तीने कौशल्या मंडल हिच्यावर हल्ला करून ठार केल्याचे कळते. सदर घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून संतापही व्यक्त केला आहे.
घटनेची माहिती मिळताच वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आल्याचे कळते. रानटी हत्तीच्या दहशतीत नागरिक असून हत्तीचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. दरम्यान तालुक्यात आता वाघासह हत्तीच्या दहशतीने नागरिक भयभीत झाले आहे.