गडचिरोली/ दिनांक 17.07.2024 रोजी दुपारी 3.00 वाजता गडचिरोली तालुक्यातील मौजा गुरवळा ते कुंभी दरम्यान शेतात कामावर गेलेले 5 व्यक्ती जोरदार झालेल्या पावसामुळे स्थानिक नाल्याला आलेल्या पूरामुळे नदी व नाल्याचे मध्ये अडकले असल्याचे तहसील कार्यालय गडचिरोली द्वारे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षामध्ये सुचना मिळतात तात्काळ राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूर यांचे पथकास घटना स्थळी रवाना करण्यात आले. सदरचे पथकांनी तातडीने बोटीचे तसेच शोध व बचावाचे सहाय्याने सर्व अडकलेले व्यक्तींना सायंकाळी 5.00 वाजता सुरक्षित नाल्याचे पाण्याबाहेर काढून बचाव करण्यात आला.अडकलेल्या व्यक्तीची नावे प्रमोद श्रावण बोबाटे वय 38 रा.गुरवळा,शेखर उईके वय 48 रा.गडचिरोली,सतिश चुधरी वय 38 रा.विहीरगाव,संजय बोरकुटे वय 45 रा.विहीरगाव,कुणाल बर्डे वय 21 रा.लेखामेंढा यांचा सुरक्षित बचाव करण्यात आला. सदरचे बचाव कार्य जिल्हाधिकारी संजय दैने, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी, राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूर टीम क्रमांक 2 चे पोलिस निरीक्षक डि.जे.दाते यांचे मार्गदर्शनाखाली तसेच पोलिस उपनिरीक्षक एस.डी.कराळे व त्यांचे पथक यांचे नेतृत्वामध्ये तसेच जिल्हा कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन सल्लागार कृष्णा रेड्डी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे यांचे उपस्थितीमध्ये सदरची बचाव मोहीम राबविण्यात आली या वेळी जिल्हा कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातील अक्षय भांनारकर, आपदा मित्र चंद्रशेखर मोलंगुरवार,कल्पक चौधरी,अजित नरोटे तसेच स्थानिक गुरवळा गावातील नागरिक उपस्थित होते.
धान विक्री करीता आँनलाईन सातबारा करण्यासाठी फेडरेशनचा खो
लिंक फेल चे कारण दाखवून आँनलाईन ची सुविधा केली बंद
गडचिरोली :-
गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली तालुक्यातील शेतकऱ्यांना महामंडळात धान विक्री करीता आँनलाईन सातबारा करण्यासाठी फेडरेशनचा खो पहायला दिसून येते आहे व लिंक फेल आहे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती गडचिरोली येथील कार्यालयात त्यांनी आपला कर्मचारी ठेवने बंद केले आहे
गडचिरोली तालुक्यातील दोन ते तीन हजार शेतकरी अजूनही सातबारा आँनलाईन करण्यापासून वंचित ठेवले आहेत मात्र दि १६ जानेवारी पासून ते शासनाने ३१ जानेवारी ही मुदत वाढवून देण्यात आली असली तरी फेडरेशन ने १६ जानेवारी पासून ते २३ जानेवारी पर्यंत एकही सातबारा आँनलाईन केलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांची ससेहोलपट सुरू आहे
दररोज नित्य नेमाने शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समिती गडचिरोली येथील कार्यालयात येतात व दिवसभर भुकेताहनेने थांबून सायंकाळी आल्या पावली परत जाताना दिसून येते आहे
शासनाने या बाबीची दखल घेउन तात्काळ लिंक सुरू करुन द्यावी किंवा ती सुरुच असेलच तर फेडरेशन ला ते करवून घेतले पाहिजे तसे होत नसल्यास ऑफलाईन फार्म स्विकारून शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे
सहा शेतकऱ्यांचा सत्कार
चिमूर कॉटन इंडस्ट्री येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मंगेश धाडसे व उप सभापती पिसे तालूका कृषी अधिकारी ज्ञानदेव तिखे यांचे हस्ते सोमवार ला काटा पूजन करून कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आले.
यावेळी व्यापारी मंगळाचे अध्यक्ष प्रविण सातपुते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कैलास धनोरे, राजू बानकर, बाजार समितीचे सचिव दिनेश काशीकर, लेखापाल अरविंद देठे, निरिक्षण निशांत बिरजे चिमूर कॉटन इंडस्ट्री संचालक अनिल मेहेर, प्रमोद भलमे, सचिन अंबागडे आदी उपस्थित होते. दरम्यान प्रथम कापूस विक्रीसाठी आननारे शेतकरी नामदेव फलके बामणी, बाबाराव बावणकर चिमूर, प्रविण पिजदुरकर शेंगाव, प्रभाकर उताने चिमूर, शुभम गोरले बामणी, राकेश दुर्गे बामणी, देविदास जुमडे सोनेगाव, राहुल नेरलकर मारोडा मुल, हरिहर आष्टणकर या शेतकऱ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. कापूस खरेदी दरम्यान प्रति क्विंटल सात हजार भाव पडला.
....................,.......
शेतकरी हिताच्या दृष्टिकोनातून कृषी उत्पन्न बाजार समिती, तालुका कृषी विभाग, तालुक्यातील सर्व कृषी केंद्र, शेती अवजार विक्रेते, शेती बियाणे विक्रेते, कृषी शास्त्रज्ञ, लोकप्रतीनीधी, जिनिंग चालक मालक यांच्या वतीने जैविक बुरशी नियंत्रण, किड नियंत्रण, माती सुधार, जैवीक शेतीचे महत्व, ट्रक्टर शेती, माती परिक्षण, कापूस, धान, सोयाबीन, तुर, हळद आदी यावर कार्यशाळा व मार्गदर्शन कार्यक्रम घेन्याचे आयोजन डिसेंबर महिन्यात चिमूर कॉटन इंडस्ट्री येथे कापूस खरेदी चर्चे दरम्यान करण्यात आले.
प्रहार सेवक विनोद उमरे यांचा प्रशासनाला प्रश्न
चिमूर प्रतिनिधी :-
चंद्रपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या शेतातील काही भागा मधील सोयाबीन पीक रोगांच्या प्रादुर्भावामुळे संपल्यात जमा आहे. हा रोग झपाट्याने पसरत असल्याने शेतकर्यामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावर्षी पाऊस कमी असल्यामुळे जोमात आलेले सोयाबीन पीक ऐन जोमात असताना नुकत्याच आलेल्या अनोळखी रोगाला शेतकरी बळी पडले आहे. या रोगाची लक्षणे झाडे पिवळी पडणे व संपूर्ण झाड वाळत जाणे हे दिसून येत.यामुळे शेतकर्यांच्या हातात आलेले पीक जात असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या पिकांची उपाययोजना संदर्भात पांढरी माशीच्या प्रभावामुळे करप्या रोग वाढत असुन बुरशीजन्य रोग आणि पावसाचा खंड पडल्यामुळे सोयाबीनची पाने पिवळी पडून सुकून जात आहे. त्यामुळे शेतकरी या रोगामुळे व पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. झोपी गेलेल्या शासनाला जाग येईल काय? व शेतकऱ्याच्या बांधावर येऊन पंचनामे करतील काय? असा प्रश्न प्रहार सेवक विनोद उमरे यांनी उपस्थित केला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात आधी पावसामुळं पिकांचे नुकसान तर आता सोयाबीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव आल्याने शेतकरी राजा संकटात सापडला आहे तरी झोपी गेलेल्या शासनाने तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देतील काय? असा प्रश्न विनोद उमरे यांनी उपस्थित केला आहे. शेतकरी राजाची आर्थिक परिस्थिती खालावली असून निसर्ग सुध्दा घात करतोय. चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव आल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. सोयाबीन पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेंगांची गळती होत असून पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे. चंद्रपूर येथील प्रहार सेवक यांनी शेतकरी राजांवर संकट येताच शेताची पाहणी केली आहे.
मध्यंतरी झालेल्या पावसामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळं खरिपातील उत्पादनात घट होणार असून, पावसाचे सावट दूर होत असतानाच आता खरिपाच्या पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून शेतकरी हवालदिल झाला आहे.
हंगामाच्या सुरवातीपासूनच खरिप पिक जोपसताना शेतकऱ्यांना अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागत आहे. गतवर्षी खरिप पिकांचे नुकसान झाले होते यावर्षी देखील सोयाबीनच्या पिकावर शेतकऱ्यांनी भर दिला होता. तालुक्यातील बाजारपेठ आणि नगदी पिक म्हणून शेतकरी सोयाबीनला प्राधान्य देत आहे. मध्यंतरी पावसामुळे पिकाचे तर नुकसान झाले आहेच परंतु, आता ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनवर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. हवामानातील आर्द्रता वाढत असून बुरशी वाढीस वातावरण तयार झाल्याने सोयाबानची पाने ही पिवळी पडत आहेत. त्यामुळे उत्पादनात घट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. दरवर्षी या परिसरात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे पिकाची फेरपालट ही गरजेची आहे. मात्र, उत्पादनापोटी शेतकरी हे सोयाबीनलाच पसंती देत आहेत. खरिप हंगामाच्या सुरवातीला पावसाने ओढ दिली होती. यानंतर किडीची प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना फवारणीची कामे करावी लागली होती. आता सोयाबीन बहरत असतानाच मुसळधार पाऊस आणि आता पावसाने उघडीप दिली तर किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करून नुसकान भरपाई द्यावी अशी मागणी प्रहार सेवक विनोद उमरे यांनी केली आहे.