PostImage

Avinash Kumare

Oct. 4, 2024   

PostImage

2024 भारतीय चित्रपटसृष्टीतला सर्वोत्तम हा राष्ट्रीय पुरस्कार सम्पूर्ण जगात डिस्को …


भारतीय सिनेसृष्टीचा ८० चा दशकातला असा काळ होता ज्यावेळी फक्त आणि फक्त प्रेक्षकांच्या ओठात फक्त मिथुन हेच नाव होतं. जवळपास ५०  वर्षे चित्रपटविश्वावर राज्य करणारे अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

मिथुन चक्रवर्ती याना ८ आक्टोबर रोजी ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दादासाहेब फाळके पुरस्कार त्याना प्रदान करण्यात येईल. दादासाहेब फाळके पुरस्कार हा सरकारतर्फे दिला जाणारा वार्षिक पुरस्कार आहे. हा पुरस्कार भारतीय चित्रपसृष्टीतील आजीवन योगदानासाठी दिला जातो. 

मृग्या चित्रपटातून हिंदी चित्रपटातू आपला प्रवास सुरू करणाऱ्या जेष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी सुमारे ५ दशकांच्या कार्यकिर्दीत साडेतीनशे हुन अधिक चित्रपटात त्यानी काम केले. 

मिथुन चक्रवर्ती यांचं खर नाव हे गोरांग चक्रवर्ती अस आहे त्यांचं जन्म १६ जून १९५० मध्ये झालं. मिथुन चक्रवर्ती हे एक भारतीय अभिनेते ,निर्माता, राजकारणी आहे. जो प्रमुख्याने हिंदी आणि बंगाली असे अनेक चित्रपटांमध्ये त्यानी उत्तमरीत्या काम केलं आहे. 

ते माझी राज्यसभा सदस्य आहेत त्याना ३ राष्ट्रिय पुरस्कार आणि ४ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. 

जानेवारी २०२४ मध्ये मिथुन चक्रवर्ती यांना भारत सरकारने पद्मपुषण हा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला. त्याना क्षेत्रातील भारतातील सर्वोच्च पुरस्कार २०२२ चा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आलं आहे. ज्याची घोषणा सप्टेंबर २०२४ मध्ये केंद्रिय माहिती व प्रसारण मंत्रालयातून करण्यात आली १९८९ मध्ये मुख्य अभिनेता म्हणून रिलीज झालेल्या १९ चित्रपटासाठी लिम्का बुक्स ऑफ रेकॉर्डमध्ये तो रेकॉर्ड धारक आहे. जो अजूनही सम्पूर्ण बॉलिवूड मध्ये अखंड आहे. 

मुंबई फिल्म इंडस्ट्री मध्ये असे अनेक दिगग्ज स्टार आहेत ज्यांना त्यांच्या लुकमुळे खूप ट्रोल व्हावे लागले होते. बॉलिवूड मध्ये एक असा सुपरस्टार होता ज्याला सुरुवातीलाच त्याच्या त्वचेच्या रंगामुळे खूप टीकेला सामोरे जावे लागले होते. कोणत्याही अभिनेत्री ला टीच्यासोबत काम करण्याची इच्छा नव्हती. त्याला बी ग्रेड हिरो सुद्धा म्हंटले गेले. पण या अभिनेत्याने शेवटपर्यंत हार मानली नाही. मोठी मेहनत आणि खूप सारे संघर्षा नंतर इंडस्ट्रीत आपले एक वेगळेच स्थान निर्माण केले. पुढे हा बॉलिवूड चा डिस्को डान्सर बनून प्रसिद्ध झाला.

आणि बॉलिवूड मध्ये डिस्को डान्स च्या नावाने प्रसिद्ध असलेले जेष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती नक्सलवादी ते सिनेमापर्यंत चा प्रवास खूप कमी लोकांना माहिती असेल, मिथुन चित्रपट उद्योगमध्ये येण्यापूर्वी एक कट्टर नक्षली होते.कौटुंबिक अडचणीमुळे त्यांनी आपला रस्ता बदलला आणि आपल्या कुटुंमध्ये परत आले. एका अपघातात त्यांच्या एकुलता एक भावाचा मृत्यू झाला होता. यानंतर मिथुन यांनी स्वतःला नक्षली आंदोलन पासून दूर केले. त्यांनी आपल्या चित्रपट करिअरची सुरुवात १९७६ मध्ये आलेल्या मृगया या चित्रपटातून सुरुवात केली. या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी त्याना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 

 

अश्याच प्रकारचे नवनवीन माहितीसाठी व सरकारी योजनेविषयी सरकारी माहिती अन्य खाजगी माहिती साठी आणि त्याचप्रमाणे मनोरंजन विश्वातील माहितीसाठी आमच्या Whatsapp ग्रुप मध्ये जॉईन व्हा...! 

https://chat.whatsapp.com/HqM9utVvLSwAcJ1h2kxYfO

 

 

 

 

 


PostImage

Avinash Kumare

Sept. 23, 2024   

PostImage

प्रेम हे कुणावरही होऊ शकते...!



मित्रांनो 

Don't Worry b happy

प्रेम हे कुणावरही होऊ शकते
प्रेमाला भाषा संस्कृती शी काही घेणं देणं नसते
प्रेम ही निरागस असते...सोज्वळ असते 
सखोल मनाने केलेली तपश्चर्या असते
प्रेम ही एकाच व्यक्तीवर जीव लावून बसते

आणि जर का प्रेमात गुलीगत धोका मिळालंच तर 
रडत बसण्यापेक्षा स्वतःला समजवायच असते.
मी कोण आहे याची ओळख स्वतःला पटवून दयायची असते
आयुष्याचा खडतर प्रवास स्वतःलाच करायचं असते
हीच खरी वस्तुस्थिती आहे अस समजून चालायचं असते
कारण, चुकलेल्या वाटाना दिशा दाखवायची असते
आणि मुकलेल्या माणसाला हाथ दयाच असते.....! 
अंतर्मनातील भावना महत्वाची असते 
 शेवटी प्रेम तर या जगात कुणावरही होऊ शकते...!

 

                         

                               Written By ~ Avinash Kumare