PostImage

P10NEWS

Aug. 7, 2024   

PostImage

EDUCATION NEWS :- सरकारी व खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांच्या पाठिवर वय …


.                                         

   गडचिरोली/07:-    गडचिरोली जिल्ह्यातील खाजगी व सरकारी शाळेतील पहिली व सातवीत शिकणारी विद्यार्थ्यांच्या पाठिवर वयापेक्षा व वजनापेक्षा जास्तीचे ओझं घेऊन शाळेत जात असताना निर्देशनात येत आहे. याकडे संपूर्ण शिक्षण विभागाने दुर्लक्ष केलेले आहे. ती चिमुकली मुलं भीती पोटी कितीही दमछाक झाली तरी तक्रार करित नाही. पण त्यांची जनावरासारखं ओझ वाहुन ठकलेली चेहरे सर्व सांगुन जातात आणि घरी गेल्यानंतर आई-वडीलांचा अभ्यासासाठी सतत पाठिमागे लागलेली रि यामुळे मुलांचा अभ्यासाकडे दुर्लक्ष होतो आणि त्याला क्षणभरही शाळेत किंवा घरी स्वतंत्र खेळण्याचा क्षण भेटण्याची वाट पाहात राहतो. पण तेही कधी संधी मिळत नसल्यामुळे तो अंतरमनार न्युनगंड ठेवुन मनातल्या मनात कुरघडत असतो. अशा प्रकारे त्या चिमुकल्यांची खूप दमछाक होते. मध्यंतरी शासनाकडून परिपत्रक काढून धडक मोहीम राबविण्यात आली होती. परंतु कालांतराने ती मोहीम बंद झालेली दिसत आहे. परंतु झोपलेल्या शिक्षण विभागाने जागे होऊन त्या चिमुकल्यांच्या मदतीला धावून येईल काय ? 


PostImage

Nikhil Alam

March 12, 2024   

PostImage

RKVY Online Registration 2024: फ्री ट्रेनिंग के साथ हर मैने …


RKVY Online Registration 2024

आप लोगो की जानकारी के लिए हम आपको बता दे की देश के अनेक बेरोजगार युवाओ को रोजगार योग्य बनाने के लिए उद्देश से रेल कौशल्य विकास योजना 2024 को शुरू किया गया है l ही योजना के अंतर्गत बेरोजगार युवा क इलेक्ट्रिशियन, वेल्डर, फिटर मशीनिंग घ्यायची अलग अलग ट्रेड की ट्रेनिंग देकर विवाह को रोजगार योग्य बनाया जा रहा है l टाके युवा ट्रेनिंग पूरा करके अपने मोबाइल लिये रोजगार उत्पन्न कर सके या फिर खुद का रोजगारी सुरू कर सके l

इस योजना की सुरुवात माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी माननीय रेल मंत्री श्री अश्विनी वैष्णव जी के द्वारा की गई है, टाकी देश मे अधिक से अधिक युवा को रोजगार योग्य बनाया जा सके रेल कौशल्य विकास योजना के अंतर्गत देश के गरीब 50,000 से भ अधिक युवा को फ्री ट्रेनिंग के साथ ट्रेनिंग से संबंधित सर्टिफिकेट विधी जायेगीl टाकी युवा सरकारी या प्रायव्हेट सेक्टर मे अपने लिए रोजगार आसानी से धूंड सकेl

RKVY Online Registration 2024-----Overview

ऐसे में अगर आप भी बेरोजगार है और रोजगार खोज रहे है, तो आपरेल कौशल विकास योजना के अंतर्गत आपणा रजिस्ट्रेशन करवा कर फ्री मे ट्रेनिंग लेकर असा नीचे रोजगार प्राप्त कर सकते है तो चले जानते है l इस आर्टिकल के माध्यम से की रेल कोशल विकास योजना मे रजिस्ट्रेशन की पूरी प्रक्रिया एलिजीबिलिटी क्राईटरिया दस्तावेज इत्यादी सभी प्रकार की जानकारी को जानते हैl

आप लोगो की जानकारी के लिए हम आपको बता दे की भारतीय रेल मंत्रालय के द्वारा देश के बेरोजगार विवाह को रोजगार के प्रति रुची बढाने के लिए कोई ट्रेडर को ट्रेनिंग सर्टिफिकेट डी जा रही है ताकी किंवा रोजगार योग्य बन सके और रेल मंत्री अश्विनी वैष्णव जी के द्वारा रेल कौशल विकास योजना की सुरुवात की गई है l ही योजना के अंतर्गत पुरे देश मे रेल्वे के 75 से भी अधिक लोकेशन पर रेल्वे कौशल विकास योजना की सुरुवात की गई है जहा पर युवा को फ्री मे ट्रेनिंग दी जायेगी l ही योजना के अंतर्गत देश के किसी भी कोणी मे रहने वाले युवा जो 18 वर्षे असे 35 वर्षे तक के है वह अपना आवेदन आसानी कर सकते हैl

यशोदा की सुरुवात 17 डिसेंबर 2021 कोही की गई थी इसके अंतर्गत प्रत्येक वर्ष 50,000 से भी अधिक युवा को स्किल कोर्स करवाई जाती है टाकी वह अपने लिये रोजगार उत्पन्न आसानी से कर पाये l प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के द्वारा अभी इस योजना के अंतर्गत विवाह को अध्यक्ष अधिक जोडणे की सलाहद्यकर होने प्रेरित किया जा रहा है l तागी अध्यक्ष अधिक युवा को रोजगार का औषध दिया जाए ऐसे मे अगर आप बेरोजगार है, तो आप भी रेल कोचला विकास योजना के अंतर्गत ट्रेनिंग कर अपनी सरकारी या प्रायव्हेट नोकरी अभिप्राप कर सकते है l

रेल कौशल विकास योजना के लिए जरुरी पात्रता मापदंड

रेल कौशल्य विकास योजना मे रजिस्ट्रेशन करणे के लिये इच्छुक अभयार्थी के पास काम से कम इन एलिजिबिलिटी क्रायटेरिया का होना अनिवार्य है l

. उमेदवार बेरोजगार होना चाहिये l

.  उमेदवार की उम्र 18 वर्षे 35 वर्ष होनी चाहिये

.  उमेदवार कम से कम दसवी बोर्ड पास होना चाहिये l

.  उमेदवार भारत का मूल निवासी होना चाहिये l

. उमीदवार के पास अंग्रेजी भाषा का भी जानकारी होना चाहिएl

. उमेदवार की फिटनेस अच्छीहोनी चाहियेl

रेल कौशल्य विकास योजना के लिए जरुरी दस्तावेज

* दसवी बोर्ड मार्कशीट

*आवासीय प्रमाणपत्र

*जन्म प्रमाणपत्र

*मोबाईल नंबर

*आधार कार्ड

*फिटनेस सर्टिफिकेट

*पासपोर्ट साईज फोटो

रेल कौशल्य विकास योजना के अंतर्गत दी जाने वाली ट्रेनिंग

रेल कौशल्य विकास योजना के अंतर्गत काही सारे रेल्वे अन्य संबंधित रेट की ट्रेनिंग देकर युवा ओको रोजगार योग्य बनाया जा रहा है l ही योजना के अंतर्गत भारतीय रेल्वे के द्वारा मुख्य रूप से मशीनी इलेक्ट्रिशियन वेल्डर फिटर कैसे ट्रेनिंग के साथ साथ रहने में कम्प्लीट करने पर ट्रेनिंग से संबंधित सर्टिफिकेट विधी जा रही है योजना के अंतर्गत 100 घंटे का फ्री ट्रेनिंग दी जा रही है l

रेल कौशल्य विकास योजना के लिए आवेदन कैसे करे?

*सबसे पहले आपको रेल कौशल्य विकास योजना के अधिकारी वेबसाईट पर जाना होगा l

*अब वेबसाईट के होम पेज पर आपको Apply Here वाले लिंक पर क्लिक कर देना है l

*अब यहा पर साइन अप वाला विकल्प दिखाई देगा जिस पर आपको क्लिक कर देना है l

*अब इसके बाद आपके सामने Trainees आवेदन फार्म का पेज खुल जायेगा l

*अब यहा पर आपको अपना नाम, जन्मस्थिती, मोबाईल नंबर, आधार नंबर, पासवर्ड इत्यादी जानकारी दर्ज करके साईन अप वाले ऑप्शन पर क्लिक कर देना हैl

*अब आपका साइन आपकी प्रक्रिया पुरी हो जायेगी l

*अब बाकी बची जानकारी दर्ज करके मांगे गये दस्ता भजो को अपलोड करके रजिस्ट्रेशन फॉर्म के सबमिट के बटन पर आपको क्लिक कर देना हैl

*अब यहा ट्रेनिंग सेंटर का चयन करके रजिस्ट्रेशन की प्रक्रिया पुरी करले l

*इस तरह से आप रेल कौशल विकास योजना में अपना रजिस्ट्रेशन कर सकते है l


PostImage

Rohit

Nov. 25, 2023   

PostImage

कोई ओटीपी और कोई लिंक नहीं, कर्नाटक की महिला के …


एक साइबर बदमाश ने कथित तौर पर अपने पिता का करीबी दोस्त होने का दिखावा करके एक 43 वर्षीय महिला को धोखा दिया और उसके डिजिटल भुगतान एप्लिकेशन में पैसे भेजने के बहाने उसके खाते से 1 लाख रुपये निकाल लिए। हेब्बल की रहने वाली और पेशे से शिक्षिका महिला ने आरोप लगाया कि जब वह पैसे खोने के एक घंटे से भी कम समय में शिकायत दर्ज कराने और प्राप्तकर्ता का खाता फ्रीज कराने के लिए सदाशिवनगर पुलिस स्टेशन गई, तो पुलिस ने यह दावा करते हुए जवाब देने में देरी की। राज्यपाल और मुख्यमंत्री की सुरक्षा ड्यूटी में व्यस्त। उन्होंने कहा, स्टेशन पर मौजूद कर्मचारी कन्नड़ के अलावा कोई अन्य भाषा नहीं बोल या समझ सकते थे।

महिला के मुताबिक, बदमाश ने बुधवार शाम 4.45 बजे से 5 बजे के बीच उसके पिता का नाम हटाकर 1 लाख रुपये उड़ा लिए और उसने न तो किसी लिंक पर क्लिक किया, न ही कोई ओटीपी प्राप्त किया। शहर के वरिष्ठ पुलिस अधिकारी ने कहा कि उन्होंने ऐसे कुछ मामले देखे हैं और यह साइबर अपराध में एक नया चलन लगता है। साइबर अपराध विशेषज्ञों ने कहा कि टेक्स्ट संदेश एक कोड के साथ एन्क्रिप्टेड होते हैं जो पैसे की चोरी की अनुमति देता है। "मैं काम से घर वापस जा रहा था जब मुझे एक अज्ञात नंबर से कॉल आया। कॉल करने वाले ने हिंदी में बात की और खुद को एक चार्टर्ड अकाउंटेंट बताया जो मेरे पिता का दोस्त है।" उसने TOΙ को बताया.


PostImage

Worldwide news

Oct. 8, 2023   

PostImage

*कंत्राटी नोकरभरती चा निर्णय दुर्दैवी!* *शासन निर्णय रद्द न झाल्यास …


**

शासन नोकर भरतीसाठी नकारात्मकच असते असा सर्वसामान्य अनुभव असला तरीसुद्धा अनेक वर्षापासून सुशिक्षित बेरोजगार सरकारी नोकरी करिता रात्रीचा दिवस करून स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत.
महाराष्ट्र राज्यात  सरकारी कर्मचारी/ अधिकारी यांचे 3 लाख पद रिक्त असून सुद्धा मागील अनेक वर्षापासून नोकर भरती नाही.
सद्यस्थितीत महाराष्ट्रात लाखो तरुण बेरोजगार आहेत.
नवीन कर्मचारी यांना जुनी पेन्शन लागू नाही.
कंत्राटीकरणाच्या नावावर सुशिक्षित बेरोजगारांचे शोषण सुरू आहे.
सरकारी शाळा खाजगी संस्थांना देणार आहेत.

भारतीय संविधानातील नागरिकाच्या कल्याणाचे सर्व पर्याय शासन हळूहळू कमी करत आहे.
आता तर शासनाने राज्यातील शासकीय कर्मचारी आणि अधिकारी या पदावर ठेकेदारा मार्फत  कर्मचारी भरतीचा निर्णय घेतलेला आहे.
या निर्णयामुळे महाराष्ट्रातील सर्व सुशिक्षित बेरोजगार यांच्या भविष्याचे वाटोळे शासन करणार हे नक्की आहे.
सुशिक्षितांना - ना कायमचा रोजगार,  ना सुरक्षित वेतन, ना पेन्शन, ना आरक्षण.
कोणतीही सामाजिक सुरक्षा नाही. त्यामुळे समाजातील कुटुंब व्यवस्था उध्वस्त होणार आहे.
आपण आता सावध होऊन शासन निर्णया विरोधात लढा देणे गरजेचे आहे.
हा लढा फक्त बेरोजगार तरुणांचा नाही तर  प्रत्येक कुटुंबाचा आपल्या सर्वांचा आहे.
आता खऱ्या अर्थाने जन आंदोलनाची गरज आहे.
सर्व नागरिक, विद्यार्थी, विद्यार्थ्यांचे कुटुंब, शेतकरी, सर्व सामाजिक संस्था/संघटना, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण संस्था तसेच शासकीय/ निमशासकीय कर्मचारी/अधिकारी शिक्षक/ शिक्षकेतर संघटना यांनी जनआंदोलनात सहभागी होणे आवश्यक आहे.
तरी जन आंदोलनात सहभागी होण्यास इच्छुक सर्व  नागरिक, संघटना व संस्था यांनी दि. 24/09/2023 रोजी सायंकाळी 5.00 वाजता
स्थळ - बचत भवन,
जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे उपस्थित रहावे.
या ठिकाणी आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यात येईल 🙏

सर्व नागरिक, विद्यार्थी, विद्यार्थ्यांचे कुटुंब, शेतकरी, सर्व सामाजिक संस्था/संघटना, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण संस्था तसेच शासकीय/ निमशासकीय कर्मचारी/ अधिकारी शिक्षक, शिक्षकेतर संघटना यांना आंदोलन सहभागी होण्याचे आव्हाण करण्यात येत आहे.

श्री. बाबा भाकरे तसेच 
विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण  केंद्राचे संचालक व विद्यार्थी.

 

महासंघ सदर आंदोलनाला पूर्ण पाठिंबा देत असून सर्व अधिकारी /कर्मचाऱ्यांनी सदर आंदोलनात सक्रिय सहभागी व्हावे असे आव्हान करीत आहे  🙏


विजयकुमार चौरपगार 
राज्यअध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय अधिकारी/कर्मचारी महासंघ


PostImage

pramod abhiman raut

Oct. 3, 2023   

PostImage

आरक्षण संपविण्याचा घाट :- कवडू लोहकरे


खाजगीकरण व कंत्राटीकरण भरतीला कडाडून विरोध

चिमूर प्रतिनिधी :-

        राज्य सरकारने नऊ खाजगी कंपन्यांची निवड करुण विविध शासकीय विभागात त्यांच्या माध्यमातून  6/9/2023 रोजी शासनाने कंत्राटी पदभरतीचा निर्णय घेतला.त्यामुळे लाखो सुशिक्षित बेरोजगारांवर उपासमारीचे संकट येणार आहे. तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शोषण करणारा निर्णय आहे. संविधानातील समान काम , समान वेतन पायदळी तुडविल्या जाईल. लगेच 18/9/2023 रोजी शासणाने एक शासणनिर्णय काढुन शाळेचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला. 65 हजार शाळेचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला.पुन्हा लगेच 20/9/2023 ला 20पटसंख्येच्या आतील शाळा बंद करण्याचा तुघलकी निर्णय घेतला.यामुळे सर्वसामान्य गरीब व होतकरू तसेच हुशार  विद्यार्थ्यांचे शिक्षण संपविण्याचे षडयंत्र रचले जात आहे.ग्रामीण भागातील मुले दुरवरच्या शाळेत जाणे शक्य नाही.
    शाळा बंद, नोकर भरती बंद,शाळांचे खाजगीकरण, नोक-यांचे कंत्राटीकरण करूण शिक्षण व शाळा संपविण्याचा विडा उचलला आहे. कंत्राटी भरतीमूळे वाशीलेबाजी, आर्थिक गैरव्यवहार, मनमानी कारभार, अपारदर्शकता असे प्रकार घडू शकतात.सध्या तहसीलदार पदांची कंत्राटी भरती केली जाणार आहे तर काही दिवसांनी जिल्हाधिकारी यांची सुद्धा पदभरती होऊ शकते
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

         राज्य सरकारने विकासकामांना  पुरेसा निधी उपलब्ध व्हावा व प्रशासकीय खर्चात काटकसर व्हावी यासाठी रिक्त जागेवर बाह्ययंत्रणेच्या माध्यमातून मनुष्यबळ घेण्याचा निर्णय अन्यायकारक आहे.या निर्णयामुळे आरक्षण , शिक्षण , नोकरी, पेंशन संपविण्याचा घाट घातला जात आहे. अन्यायकारक शासण निर्णय रद्द न केल्यास प्रचंड जन आक्रोशाला समोरे जावे लागेल.

         कवडू लोहकरे, तालुकाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी 


PostImage

Chunnilal kudwe

Sept. 28, 2023   

PostImage

Role acting competition - अनुसूचित जाती मुलींची निवासी शाळा विभागस्तरीय …


भूमिका अभिनय स्पर्धेत प्रथम -

       राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण प्रकल्प अन्वये जिल्हास्तरीय भूमिका अभिनय व लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन बुधवारला जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत चिमूर येथील अनुसुचित जाती मुलींची निवासी शाळा येथील विद्यार्थीनींच्या संघानी भूमिका अभिनय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून विभागस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरल्या आहेत.


        पंचायत समिती गटशिक्षण अधिकारी वृषाली गड्डमवार, मुख्याध्यापिका सुनिता खोब्रागडे, केंद्र प्रमुख टी आर महल्ले, सहाय्यक शिक्षक सतिश कुकडे, विनय खापर्डे, सहाय्यक ग्रंथपाल मनोहर गभने, प्रयोगशाळा सहायक अनुराधा महाजन, शिपाई हेमूताई मगरे, बॉबी धात्रक, समन्वयक वरभे, आत्राम, पंधरे यांनी विजयी संघाचे कौतूक करून विभागस्तर स्पर्धेच्या शुभेच्छा दिल्या.


PostImage

pramod abhiman raut

Sept. 11, 2023   

PostImage

इंग्रजी ही जागतिक संवादाची भाषा असल्याने राज्यातील काही मराठी शाळा …


 

चिमूर प्रतिनिधी :-

           इंग्रजी माध्यमाकडील ओढा आणि गरज लक्षात घेता राज्यातील मराठी माध्यमाच्या काही शाळा या इंग्रजी माध्यमात परिवर्तीत कराव्या लागणार आहेत. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी बोलणे झाले आहे. 30 हजार शिक्षकांची भरती करीत असताना त्यात इंग्रजी माध्यमासाठीच्या शिक्षकांचीदेखील भरती केली जाणार आहे,' अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

        जिल्हा परिषदेच्या वतीने अल्पबचत भवन येथे आयोजित जिल्हा शिक्षक पुरस्कार व अध्यक्ष चषक पुरस्कार वितरण कार्यक्रमात पवार बोलत होते. या वेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, सुनंदा वाखारे, कमलाकांत म्हेत्रे, रणजित शिवतारे आदी या वेळी उपस्थित होते.

         इंग्रजी ही ज्ञानाची आणि जागतिक संवादाची भाषा आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत इंग्रजी भाषेतूनही शिक्षण देण्यावर भर देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी सरकारकडून आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. असही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.


PostImage

pramod abhiman raut

Sept. 11, 2023   

PostImage

चिमूर तालुक्यात कृषी महाविद्यालय दया :-


 

युवक काँग्रेसचे माजी विधानसभा अध्यक्ष संदीप कावरे यांची मागणी 

चिमूर प्रतिनिधी :-

        चिमूर तालुका हा जिल्ह्याच्या उंबरठयावर आला असून तालुका शैक्षणिक क्षेत्रात मागासलेला आहे. त्यामुळं चिमूर तालुक्यात कृषी महाविद्यालय देण्यात यावे अशी मागणी चिमूर युवक काँग्रेसचे माजी विधानसभा अध्यक्ष संदीप कावरे यांनी केली आहे. 

       चिमूर तालुका हा क्रांती तालुका असून आता अप्पर जिल्हा झालेला आहे. अनेक शासकीय कार्यालय चिमूरात आहेत. चिमूर हा आता  जिल्ह्याच्या उंबरठयावर आहे. येथे उपविभागीय कार्यालय, पोलीस उपविभागीय कार्यालय असून बीए, एमए, आठवले समाजकार्य महाविद्यालय, विज्ञान विषय असलेले महाविद्यालय सुद्धा आहे. मात्र विद्यार्थ्यांना कोणताही डिप्लोमा कोर्स करायचा असेल तर बाहेरील तालुक्यात शिक्षण घेण्यासाठी जावे लागत असते. त्यामुळं जाण्यायेण्यात विद्यार्थ्यांचा वेळ वाया जात असून नाहक त्रास सुद्धा सहन करावा लागत असतो. चिमूर हा क्रांती जिल्हा होण्याच्या मार्गावर असून आजुबाजूच्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना डिप्लोमा शिक्षण घेण्यासाठी बाहेर जिल्ह्यात तालुक्यात जाता येऊ नये आपल्याच जिल्ह्यात शिक्षण घेउन डिप्लोमा कोर्स पूर्ण करता यावा. याकरिता चिमुर तालुक्यात कृषी महाविद्यालय देण्यात यावे अशी मागणी युवक कांग्रेस चे माजी विधानसभा अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते संदीप कावरे यांनी केली आहे.


PostImage

pramod abhiman raut

Sept. 7, 2023   

PostImage

म.रा.शि.प. जिल्हा चंद्रपुरच्या वतीने धरणे आंदोलन


 

चिमूर प्रतिनिधी :- 

           राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात शिक्षक दिनाच्या दिवशी  5 सप्टेंबर ला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा चंद्रपुर च्या वतीने जिल्हापरिषद व जिल्हाधिकारी कार्यालयासमो धरणे आंदोलन करण्यात आले. ५ सप्टेंबरला संपूर्ण भारतभर शिक्षकदिन साजरा होत आहे . त्यानिमित्ताने शिक्षकांना ब्रम्हा , विष्णु ,महेश संबोधून त्यांचा सत्कार करण्यात येणार ? दुसरीकडे मात्र याच शिक्षकांना त्यांच्या न्याय्य हक्कां पासून त्यांना वंचित ठेवण्याचं पातक शासन करीत आहे .
(1) राज्यातील संपूर्ण राज्य शासकीय कर्मचार्यांना १०, २०, ३० ( सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना )  लागू करण्यात आली आहे . मात्र शिक्षकांना जाणीवपूर्वक या योजनेपासून वंचित ठेवून शिक्षक समुदायाचा अपमान करण्यात आला आहे .
 2)२००५ नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेंशन योजनेच्या न्याय हक्कापासून वंचीत ठेवण्यात आले आहे .
३) - प्रशांत बंब यासारखे अविचारी आमदार शिक्षकांप्रती गरळ ओकत असताना शासनमात्र मुग गिळून गप्प बसले आहे .
४)- शिक्षकांना शिक्षणाचे कार्य सोडून विविध प्रकारच्या अशैक्षणिक कामात गुंतवून एक प्रकारे इंग्रजी माध्यमाच्या शाळांना प्रोत्साहन देवून अनुदानित मराठी / हिंदी माध्यमाच्या शाळा बंद करण्याचा छुपा अजेंडा राबविला जात आहे .
५) - अंशत : अनुदानित शाळांना अनुदान घोषीत केल्यानंतरही जाणीवपूर्वक आदेश वितरीत करण्यात   येत नाही . त्यांच्या नियमित वेतनाचाही प्रश्न प्रलंबित आहे .
६) - शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला असून राज्यातील सर्व वेतनपथक कार्यालयाचे महालेखाकार यांचे मार्फत लेखा परीक्षण झाल्यास मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचा पर्दाफाश नक्कीच होईल.
७) - त्याच प्रमाणे शिक्षकांना कॅशलेश मेडीकल योजना सुरू करणे , संचमान्यता दुरुस्ती प्रकरणे . विद्यार्थ्यांना आधार सक्ती न करणे आदी  विविध न्याय मागण्याचे संदर्भात शिक्षक दिनाचे दिवशीच शिक्षकांनी न्यायासाठी रस्यावर उतरावे यासारखे दुर्दव्य ते काय ?
      महाराष्ट्र  शासनाच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी  मंगळवार दि .५ सप्टेंबर २०२३ ला दु . ३ ते ५ या वेळात जिल्हा परिषद  व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चंद्रपूर येथे शांततेच्या मार्गाने मुक धरणे आंदोलन करण्यात आले .
          यावेळी विलास खोंड जिल्हाध्यक्ष ,दिलीप मॕकलवार जिल्हाकार्यवाह ,वंसत वडस्कर शहर कार्यवाह ,विवेक आंबेकर काॕन्व्हेंट विभाग प्रमुख ,चवले सर ,पेचे सर ,बुटले सर ,संदिप बद्दलवार ,रविंद्र टिकले ,तथा म.राशि.प.चे पदाधिकारी ऊपस्थित होते.


PostImage

Chunnilal kudwe

Aug. 31, 2023   

PostImage

Chimur News "CEO" शाळा भेटीला येताच विद्यार्थीनी बांधली राखी


 बोथलीच्या जि प उच्च प्राथ.शाळेच्या विद्यार्यांचा आनंद व्दिगूणीत

 

               पंचायत समिती चिमूर अंतर्गत येत असलेल्या जि. प. उच्च प्राथमिक शाळा बोथली येथे जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन यांनी अचानक गुरुवार ला आकस्मिक भेट दिली दरम्यान विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन निमीत्त त्यांना ओवाळून राखी बांधली त्यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद व्दिगुणीत झाला.

       मुख्य कार्यकारी अधिकारी जॉनसन यांनी आकस्मिक शाळेत भेट दिली भेटी दरम्यान आठ पाकळ्यांची पोषण वाटीका, निपूण भारत अंमलबजावनी बाबत पाहनी केली. ग्रामपंचायत च्या माध्यमातून उमेद अंतर्गत बचत गटाच्या औजार बँकेस भेट, जलजीवन मिशन अंतर्गत कामाची पाहणी केली.

      यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, कपील कलोडे, गटविकास अधिकारी राजेश राठोड, गटशिक्षणाधिकारी वृशाली गड्डमवार, सरपंच विनोद देठे, उपसरपंच देविदास नन्नावरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामदास नन्नावरे, ग्रामसेवक नरड, गटसाधन केंद्राचे संजय पंधरे, जितेंद्र बगडे, मुख्याधीपीका अर्चना नवघडे शाळेचे पदाधीकारी, शिक्षक, कर्मचारी व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.


PostImage

Chunnilal kudwe

Aug. 28, 2023   

PostImage

एड्स पथनाट्य स्पर्धेत ग्रामगीता महाविद्यालय प्रथम


निमित्त आंतरराष्ट्रीय युवा दिन -

 

 एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष सामान्य रुग्णालय चंद्रपूर व रोटरी क्लब चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एड्स पथनाट्य स्पर्धेत ग्रामगीता महाविद्यालय चिमूर च्या चमूला प्रथम पारितोषिक मिळाले.

       आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्याने चंद्रपूर येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विविध महाविद्यालयाच्या जवळपास चौदा चमुने या स्पर्धेत भाग घेतला होता. ग्रामगीता महाविद्यालयातील रेड रिबीन क्लब व राष्ट्रीय सेवा योजना या उपक्रमाच्या अंतर्गत प्रशिक्षक लेखक दिग्दर्शक सचिन भरडे यांच्या मार्गदर्शनात पथनाट्य सादर करण्यात आले. पहिल्यांदा महाविद्यालयाने प्रथम सहभागी होत पहिले पारितोषिक प्राप्त केले. दरम्यान कोमल डहारे, साक्षी कौरासे, गौरी चंदनखेडे, लक्ष्मी पिंपळकर, वैशाली गायकवाड, सानिका बारापात्रे, आरती अरके, आकाश पाटील या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. उपजिल्हा रुग्णालय चिमूर च्या समुपदेशक कामिनी हलमारे यांचे मार्गदर्शन, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमीर धम्मानी यांचे प्रोत्साहन व महाविद्यालयाचे रेड रिबीन क्लब समन्वयक प्रा.डॉ. निलेश ठवकर तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. बिजनकुमार शील यांचे सहकार्य लाभले.