PostImage

सुपर फास्ट बातमी

Yesterday   

PostImage

दुचाकीची झाडाला धडक; होमगार्ड ठार


 

शिरपूर मार्गावर रात्री अपघात : सकाळी मृतावस्थेत आढळला

 

 मोहटोला (किन्हाळा) : दुचाकीवरील चालकाचे सुटले व वाहन रस्त्यालगत पळसाच्या झाडावर आदळले. हा अपघात एवढा भीषण होता की, झाडाच्या फांद्या तुटून युवकावर पडल्या. यात गृहरक्षक दला (होमगार्ड) च्या जवानाचा जागेवरच मृत्यू झाला. हा अपघात शनिवार, १४ सप्टेंबरच्या रात्री देसाईगंज तालुक्यातील मोहटोला (किन्हाळा) शिरपूर मार्गावर महाजन डोंगरी या परिसरात झाला. देवेंद्र श्यामराव देवरे (३५) मु. वासी ता. कुरखेडा असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. तो कुरखेडा पोलिस ठाणे अंतर्गत गृहरक्षक दलाचा जवान होता. रविवारी सकाळी व्यायामाकरिता गेलेल्या

मोहटोला व विहीरगाव येथील युवकांना रस्त्यावर दुचाकीला उपघात झाल्याचे दिसून आले. या युवकांनी या अपघाताची माहिती देसाईगंज पोलिस स्टेशनला दिली. एमएच ३३, एल- ४००३ या क्रमांकाची दुचाकी घटनास्थळावर पडून होती. देसाईगंज पोलिसांनी पंचनामा करून मर्ग दाखल केला आणि प्रेत उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक अजय जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलिस हवालदार राजेंद्र मोहुर्ले करीत आहेत.

 

 

 

सायंकाळी रहदारी होते बंद, रस्ता सामसूम मोहटोला- शिरपूर रस्ता घनदाट

जंगलातून गेलेला आहे. जंगलव्याप्त हा रस्ता असल्याने सायंकाळी ७ वाजेनंतर हा रस्ता रहदारीसाठी बंद होतो. येथून दुचाकीवाहनचालक सुद्धा रात्रीच्या सुमारास जात नाहीत.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Sept. 10, 2024   

PostImage

वीज कोसळताच घराला आग; जीवितहानी टळली


 

कुरूड : देसाईगंज तालुका मुख्यालयापासून आठ किलोमीटर आग अंतरावर असलेल्या कोंढाळा येथे सोमवारी पहाटे एका घरावर वीज कोसळली. त्यानंतर लगेच घराला आग लागली, यात संसारोपयोगी साहित्य खाक झाले. सुदैवाने जीवितहानी टळली.

 

कुरूड परिसरात रविवारी रात्रीपासूनच पाऊस सुरू होता. सोमवारी पहाटे आकाशात कडालेली वीज झिंगर आत्माराम मेश्राम (वय ६५) यांच्या घरावर कोसळली. मेश्राम कुटुंबीय गाढ झोपेत होते. विजांचा कडकडाट ऐकून मेश्राम यांच्या

 

 

घराशेजारील एक व्यक्ती लघुशंकेसाठी बाहेर आला तेव्हा त्यास लागल्याचे निदर्शनास आले. त्याने आरडाओरडा करून मेश्राम कुटुंबास जागे केले. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. मात्र, तोपर्यंत घरासह कुटुंबीयांचे वस्त्र, झोपेची खाट, कोंबडा, दुचाकी व इतर साहित्य जळून खाक झाले. यात जवळपास २ लाखांचे नुकसान झाले. सरपंच अपर्णा राऊत, पोलिस पाटील किरण कुंभलवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष हरिभाऊ पत्रे, अरुण कुंभलवार, सुनील पारधी यांनी पाहणी केली. याबाबत पंचनामा करून मदत करण्याची विनंती मंडळाधिकारी, तलाठ्यांकडे केली.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Sept. 7, 2024   

PostImage

कोकडी येथील मुलाचा नदीमध्ये बुडून मृत्यू


देसाईगंज : प्राप्त झालेल्या माहितीनूसार हर्ष गुणाजी बनसोड मू. कोकडी (तुळशी) पोलीस शिपाई रीतुराज लंजे यांचा भाचा वय 11 वर्ष हा गौरी पूजनच्या निमित्याने तो गावांतील महीला सोबत नदीवर गेला होता.

 

त्या नदीमध्ये मित्रासोबत पोहताना अचानक बुडून मृत्यू झाला. ही घटना 6/9/2024 रोजी सकाळीं अंदाजे 11,12 .00 वाजता घडली . अश्या अचानक घडलेल्या घटनेमुळे बनसोड परिवारावर शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे परीसरात हळहळ व्यक्त केलं जातं आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Aug. 22, 2024   

PostImage

सायकलस्वारास ट्रकने चिरडले, सायकलस्वाराचा जागीच मृत्यू


 

देसाईगंज :

ट्रकने सायकलस्वारास धडक दिल्याने सायकलस्वाराचा ट्रकच्या चाकात सापडून जागीच मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवारी दुपारच्या सुमारास देसाईगंज शहरात घडली. समशेर खॉ सत्तारखॉ पठाण (५२) रा. किदवाई वार्ड असे मृतकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार मृतक हा शहरातील खानानी हार्डवेअर दुकानातुन काही सामान घेऊन देसाईगंज शहरातील राष्ट्रीय महामार्ग ओलांडून रेल्वे ट्रॅक कडे जाणाऱ्या बायपास मार्गाने सायकलने जात होता. ट्रॅक क्रमांक एमएच-३४ एबी-८८६७ ची धडक लागल्याने तो चाकाखाली सापडला.

 

त्यामुळे पठाण यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे या अपघातात ट्रक चालक नानाजी उके (५२) रा. विशी वार्ड याने सायकलस्वाराला वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतू सायकलस्वार चाकाखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

 

घटनेची माहिती ट्रॅक चालकाने स्वतःच ठाण्यात जाऊन पोलिसांना दिली. देसाईगंज पोलिसांनी ट्रॅक ताब्यात घेतला आहे. पुढील तपास देसाईगंज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय जगताप यांच्या मार्गदर्शनात देसाईगंज पोलीस करीत आहेत.


PostImage

सुपर फास्ट बातमी

July 15, 2024   

PostImage

दुचाकीच्या धडकेत वृध्द ठार


 देसाईगंज तालुक्यातील चोप-शंकरपूर मार्गावर गावानजीक आग्याबोवा मंदिराशेजारी रोडच्या बाजूला उभा असलेल्या शेळ्या राखत असताना समोरून येणाऱ्या दुचाकीने शामराव मोतीराम पर्वते (रा. चोप) यांना धडक दिल्याने शामराव यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी चालक स्वप्निल सत्यवान लांजेवार हा गंभीर जखमी झाला.

 

शामराव मोतीराम पर्वते (वय ६३) हे स्वतःच्या घरच्या शेळ्या राखत होता.

दुचाकी (एमएच ३३ एस १७३२) ने स्वप्निल सत्यवान लांजेवार हा शंकरपूरकडे जात होता. त्यात शामरावला स्वप्निलच्या दुचाकीने धडक दिली. दुचाकी एवढ्या जोरात होती की शामराव ५० ते ६० फुटांपर्यंत फरपडत नेले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना ग्रामीण रुग्णालयात देसाईगंज येथे नेण्यात आले असता डॉक्टरांनी शामरावला मृत घोषित केले. दुचाकीस्वार स्वप्निल लांजेवार हा जखमी अवस्थेत असताना आमदार कृष्णा गजबे यांनी त्यांना मदत केली.