PostImage

pramod abhiman raut

Sept. 11, 2023   

PostImage

आमदार बंटी भांगडिया म्हणजे कलीयुगातील द्रौपदीचे रक्षण करणारा कृष्ण :- …


 

भांगडिया फाउंडेशनच्या वतीने चिमुरात भव्य दहीहांडी स्पर्धा संपन्न

चिमूर प्रतिनिधी :-

       चिमूरात भव्य दहीहंडी स्पर्धा नेहरू विद्यालयाच्या भव्य पटांगणावर पार पडला यावेळी चंद्रमुखी फेम अभिनेत्री अमृता खानविलकर या मंचावर उपस्थित होत्या. यावेळी बोलतांना अमृता खानविलकर यांनी म्हंटले की, महाभारत काळात द्रौपदीच्या अब्रूचे रक्षण भगवान श्रीकृष्णाने केले. आजच्या काळात आई बहिणींचे रक्षण करणारे आमदार म्हणजे बंटी भांगडिया हे कलीयुगातील कृष्णासारखेच आहेत. असे यावेळी सांगितले.

     पुढे म्हणाले की, आताच्या काळात स्वतःच्या पदरचे पैसे खर्च कोणी कोणासाठी करत नाहीत. मात्र बंटी भांगडिया हे आपल्या बहिणीला कुठं आर्थिक मदत कुठं शिक्षणासाठी मदत तर कुणाला स्वतःच्या पायावर रोजगार करता यावा यासाठी मदत असे आपल्या विधानसभा क्षेत्रात करीत असतात. तर विधानसभा क्षेत्रातील कोणाच्याही घरी जन्मलेल्या मुलींसाठी एफ. डी. च्या रूपात मदत करतात. आमदार बंटी भांगडिया करीत असतात. बंटी भांगडिया यांचा कार्यकर्ता अजूनही जीवंत आहे. त्यांनी स्वतःच्या राजकीय आयुष्याला सुरुवात केली तेव्हापासूनचा कार्यकर्ता आजही जीवंत ठेवला. म्हणूनच ते मोठे नेता झाले. या नेत्याला आपण कितीही काही झालं तरी सर्व आई बहिणींनी साथ द्यायची असे प्रतिपादन सिनेअभिनेत्री अमृता खानविलकर ( चंद्रमुखी फेम ) यांनी केले.

      भांगडिया फॉउंडेशनच्या वतीने चिमूर येथील नेहरू विद्यालयाच्या भव्य पटांगणावर 10 सप्टेंबर रोज रविवारला सायंकाळी सात वाजता 'दहीहंडी स्पर्धेचा' भव्य सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्याच्या मुख्य अतिथी म्हणून मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध सिनेअभिनेत्री अमृता खानविलकर (चंद्रमुखी फेम) उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित जनसमुदायला संबोधित करतांना त्या बोलत होत्या.

       यावेळी मंचावर चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते, भाजपाचे ज्येष्ठ नेते वसंत वारजूकर, भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष (ओबीसी मोर्चा) राजू पाटील देवतळे, भाजपा चिमूर तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे, जेष्ठ नेते मनोहर मुंगले, माजी जि. प. सदस्य ममता डुकरे व भाजपाचे अनेक नेते उपस्थित होते.

      सिनेअभिनेत्री अमृता खानविलकर यांच्या संबोधनानंतर प्रेक्षकांच्या प्रचंड आग्रहास्तव अमृता खानविलकर यांनी चंद्रमुखी चित्रपटातील 'सुंदरा' नृत्याची एक झलक सादर केली. त्यांच्या नृत्य अदांनी चिमुरकर व उपस्थित तरुण - तरुणी घायाळ झाले. दहीहांडी कार्यक्रमाच्या प्रारंभी अमृता खानविलकर, खासदार अशोक नेते, आमदार बंटी भांगडिया यांनी गोविंदाच्या स्पर्धेसाठी उभारण्यात आलेल्या दही हांडीचे विधिवत पूजन केले. आमदार बंटी भांगडिया यांच्या हस्ते मंचावरील दहीहांडी फोडण्यात आली. त्यानंतर गोविंदांच्या स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेत अनेक गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता.