PostImage

Avinash Kumare

Aug. 6, 2024   

PostImage

फक्त कबुतर चोरल्याने छोट्या चिमकल्या मुलांना लोखंडी साखळीवर आपटून मारहाण


 

My khabar 24:- देसाईगंज तालुक्यातील आमगाव राम मंदिर परिसरात तीन चिमकल्या मुलांना एक तरुण मुलगा अमानुषपणे मारहाण करताना व्हिडीओ मध्ये झालं व्हायरल. त्या चिमकल्या मुलांना हाथाने, लाथाने काठी, मुक्क्याने मारत होता. नुसतं व्हिडीओ बघितलं तरी ह्रदयाला धडकी भरवणार होत. फक्त कबुतर चोरले म्हणून इतकं कुणी मारतय का कुणी ही तर राक्षस प्रवृत्ती मनस्थिती झाली म्हणायची.

 


सूत्रांच्या माहितीनुसार ही घटना
 20 जुलै रोजी म्हणजे कालची घटना आहे काल दिनांक ५ ऑगष्ट रोजी झालं 
या घटनेचा व्हिडीओ सध्या शोशल मीडियावर वर व्हायरल होत आहे. सदर प्रकरण उघडकीस आला आहे.
इतक्या साध्या आणि नासमज मुलांना मारण हे कितपत योग्य आहे. फक्त कबुतर तर चोरले इतक्या क्षुल्लक कारणावरून इतक अमानुष मारहाण. त्या मुलांना न्याय मिळालाच पाहिजे.  हा व्हिडीओ सार्वत्रिक झाल्याने आमगाव तसेच देसाईगंज शहरासह तालुक्यातील नागरिकांची संतापाची लाट उसळली आहे. 

 

 


PostImage

Asmita Ramteke

July 26, 2024   

PostImage

Kamthi News: प्रेमसंबंधातून तरुणीवर लैंगिक अत्याचार


Kamthi News: कामठी: प्रेमसंबंधातून तरुणीसोबत वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित करीत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. ब्रेकअपनंतर तिचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याने प्रकरण पोलिसांत पोहोचले आणि पोलिसांनी आरोपीस अटक केली. हा प्रकार कामठी शहरात नुकताच घडला.

शुभम अनिल नितनवरे (22, रा. विदूतबाबानगर, कामठी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शुभम व कामठी शहरांतील विदूतबाबा नगरात राहणारी 22 वर्षीय तरुणी पुणे शहरातील खासगी कंपनीत नोकरीला होते. तिथेच त्यांची आपसांत ओळख व पुढे घट्ट मैत्री झाली. त्यामुळे दोघेही काहीकाळ एकाच खोलीत वास्तव्याला होते.

या काळात त्याने तिच्याशी वारंवार शरीरसंबंधही प्रस्थापित केले. शुभमने मोबाइल फोनने तिचे काही आक्षेपार्ह फोटो काढले होते तर काही व्हिडीओ क्लिप तयार केल्या होत्या. या प्रेमसंबंधाविषयी दोघांच्याही कुटुंबीयांना माहिती होती. मे 2024 मध्ये मतभेद निर्माण झाल्याने त्यांचा ब्रेकअप झाला. त्यामुळे तरुणीच्या भावासोबत शुभमचा वादही उदभवला होता.

दोघेही एकमेकांच्या विरोधात तक्रार नोंद‌विण्यासाठी पोलिस ठाण्यात गेले होते. मात्र, तक्रार दाखल न करता निघून आले. त्यानंतर शुभमने तिचे आक्षेपार्ह फोटो टेलिग्रामवर व्हायरल केले. त्यामुळे तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी कामठी (नवीन) पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 74, आयटी अॅक्ट सहकलम 67, 67 (अ) अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. या घटनेचा तपास ठाणेदार प्रमोद पोरे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक सचिन यादव व दीप्ती मोटघरे करीत आहेत.


PostImage

Nikhil Alam

March 18, 2024   

PostImage

हैदराबाद मे चड्डी गॅंग का आतंक, आधी रात को स्कूल …


तेलंगणा की राजधानी हैदराबाद मे चड्डी गँग का आतंक सामने आया है. या चड्डी पहनकर आये दो चोरून एक स्कूल मे घुसकर 7 लाख 85 हजार रुपये चुरा लिये. अब इस वारदात का सीसीटीव्ही फुटेज सामने आया है.

पोलीस के मुताबिक वारदात शनिवार की आधी रात के समय हुई. तोरणे हैदराबाद के मियापुर में स्थित वर्ल्ड वन स्कूल को निशाना बनाया. रात के समय चड्डी बनकर स्कूल परिसर में दाखिल हुए दो चोरोने लाखो की नगदी उडाली. पोलीस ने केस दर्ज कर मामले की जान शुरू करती है.

पहचान छुपा ने के लिए पहन रखा था नकाब

घटनाकार सीसीटीव्ही फुटेज भी सामने आया है जिसमे दो चोर स्कूल परिसर के अंदर भूम भूमकर चोरी करते हुए नजर आ रहे है. चोरोने शरीर मे सिर्फ अंडरवियर पहण रखा है. पहचान छुपाने के लिए दोनो ही चोरोने चेहरे को नकब स डक रखा है. सीसीटीव्ही फुटेज मे यहा भी दिखाया गया है कि एक चोर छुपते छुपाते हुए व्हिडिओ से उपर की तरफ जा रहा है.

बिहार : काउंटर से चुराये थे दो लाख रुपये

इस इस तरह चोरी की वरदान पहले भी देशभर के अलग अलग इलाको में सामने आती रही है. करीब एक साल पहले बिहार की राजधानी पटना मे भी ऐसा ही एक मामला सामने आया था, जिसमे चड्डी बनियान गॅंग मे इलेक्ट्रॉनिक दुकान को निशाणा बनाया था. चोरोने दुकान मे घुसकर काउंटर से दो लाख रुपये की चोरी किती थी. पुरी वार्ता दुकान मे लगे सीसीटीव्ही कॅमेरे मे के दो गई थी.

मुंबई और भोपाल मे सामने आ चुके है केस

बता दे कि इस पहले मुंबई और भोपाल में भी चड्डी बनिया गिर्हो का आतंक सामने आ चुका है. मुंबई पोलीस ने ऐसे तीन चोरो को पकडा था, जो बंद गैरो मे चड्डी बनियान पण कर चोरी करते थे.


PostImage

युवाक्रांती समाचार

March 3, 2024   

PostImage

कारंजा शहर पोलीसांच्या तिक्ष्ण नजरेने हरिश्चंद्र मेश्राम यांच्या हत्येच्या आरोपीच्या …


कारंजा : शुक्रवार दि. 01 मार्च रोजी,नागरीकांची वर्दळ असणाऱ्या तहसिल परिसरात दस्तऐवज लेखक हरिश्चंद्र विश्राम मेश्राम यांची धारदार शस्त्राने हत्या करून हत्याऱ्याने पळ काढला होता. या संदर्भात दिनकर विश्राम मेश्राम राहणार ग्राम मेहा यांनी दिलेल्या फिर्यादी वरून शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून कारंजा शहरचे कर्तव्यतत्पर पोलीस निरिक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांनी समयसुचकता दाखवीत ताबडतोब तपासाची चक्रे फिरवून चौकशी केली असता सदर गुन्ह्यामध्ये हत्या झालेली मृतक व्यक्ती हरिश्चंद्र मेश्राम हे ग्राम मेहा ता.कारंजाचे रहिवाशी असून त्यांचे घराशेजारील प्रेमदास उद्वव भगत यांचेशी सरकारी अतिक्रमित जागेवर हातपंप काढल्यामुळे वादविवाद होऊन त्याची तक्रार मृतक व्यक्तीने मेहा ग्रामपंचायतला दिली होती. त्यामुळे प्रेमदास उद्धव भगत यानी दि 04 डिसेंबर 2023 रोजी मृतक हरिश्चंद्र मेश्राम यांचेशी भानगड करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार मृतक व्यक्तीने  धनज पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली होती. पुढे या तक्रारीच्या रागामधूनच शुक्रवारी, संगनमताने मिथुन विठ्ठल शिरसाट या आरोपीने मृतक हरिश्चंद्र मेश्राम यांचे मानेवर व गळ्यावर प्राणघातक शस्त्राने हल्ला करीत त्यांना जीवानिशी ठार मारले. या घटनेचा तपास जिल्हा पोलीस अधिक्षक अनुज तारे ,अप्पर पोलीस अधिक्षक भारत तागडे,उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाडवी यांच्या मार्गदर्शनात व सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला  यांनी करून, वेगवेगळी पोलीस पथके चोहीकडे पाठवून सदर गुन्हाच्या आरोपीला केवळ पाच तासात अटक करून त्याच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवीले.त्याबद्दल कारंजा शहर पोलीसाच्या हजरजवाबी कर्तव्यतत्परता पूर्ण यशस्वी कामगीरीचे सर्व स्तरातून कौतुक होत असून अधिक तपास सुरु असल्याचे कळविण्यात आले असल्याचे वृत्त आमचे जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळविले आहे .


PostImage

युवाक्रांती समाचार

March 1, 2024   

PostImage

दिवसाढवळ्या चाकू हल्ल्यात तहसिल आवारात दस्तलेखकाची निघृण हत्या.


संजय कडोळे वाशिम जिल्हा विशेष प्रती.

सदर हत्येने करून दिली 30 वर्षापूर्वीच्या कारंजा बसस्थानकावरील सरपंच स्व. खटेश्वर करडेच्या हत्येची आठवण."

कारंजा : आज शुक्रवार दि . 01 मार्च 2024 रोजी, कारंजा तहसील कार्यालय परिसरात कार्यालयीन कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर दस्तऐवज लेखक (अर्जनविस) सुद्धा परिसरात आपले टेबल मांडून बसले असतांना अचानक दुपारी दोन वाजताच्या दरम्यान  हरिश्चंद्र विलास मेश्राम वय 38 वर्ष यांचे मानेवर कुण्यातरी अज्ञात मारेकऱ्यानी प्राणघातक शस्त्राने हल्ला चढवून हरिश्चंद्र मेश्राम या दस्तऐवज लेखकाची हत्या केली. व मारेकरी फरार होण्यात यशस्वी झाला. सदर मृतक कारंजा तालुक्यातील मेहा येथील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली आहे. प्राप्त माहितीनुसार दुपारी मृतक दस्तलेखक आपले काम करीत असताना अचानक पणे एका अज्ञात इसमाने येऊन त्याच्या मानेवर चाकूने वार केले त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच त्याला कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तपासणी दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरिक्षक दिनेशचंद्र शुक्ला व पोलीस पथकानी देखील घटनास्थळी धाव घेतली व पुढील तपास सुरु आहे . घटनेची माहिती घेतली दरम्यान वृत्त लिहेस्तोवर या संदर्भात पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली नव्हती .चाकू हल्ला केल्यानंतर आरोपी फरार झाला. सदर घटना तहसिल कार्यालया समोरच्या वर्दळीच्या परिसरातील असूनही आरोपी पळून गेल्याने, तीस वर्षापूर्वी कारंजा बसस्थानकासमोर वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती झाल्याचे दिसून येत आहे.


PostImage

युवाक्रांती समाचार

Feb. 13, 2024   

PostImage

शुल्लक वादातून पतीने केली पत्नीची हत्या.! ब्रम्हपुरी तालुक्यातील मालडोंगरी येथील …


ब्रम्हपुरी (ता.प्र.):-

     तालुक्यापासून अवघ्या 2 किमी. अंतरावर असलेल्या मालडोंगरी येथे पतीनेच पत्नीची हत्या केल्याची घटना दि.12 फेब्रुवारी ला सकाळी उघडकीस आली.
प्राप्त माहितीनुसार सदर घटनेतील आरोपी जयदेव पिल्लेवान (60)रा.मालडोंगरी व मृतक पत्नी यांच्यात मागील 2-3 दिवसापासून रोज भांडण होत होते दरम्यान दि.11 फेब्रुवारी ला रात्री 11.00 वा दरम्यान फिर्यादी मजलग जॉकीस जयदेव पिल्लेवान (30)याला आरोपी व मृतक भांडण करताना दिसले.हे भांडण नेहमीचेच  समजून फिर्यादीने लक्ष्य दिले नाही.मात्र  सकाळी 7.00 वा जॅकीस ला त्याची आई हिरकण्या जयदेव पिल्लेवान (50)  ही मृतावस्थेत पडलेली दिसली. त्यामुळे आरोपीने त्याला शिवीगाळ केल्याचे कारणावरून त्याचे पत्नीला हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याने डोक्याला व चेहऱ्याला मार लागल्याने ती मरण पावली अशी माहिती पोलीस ठाण्यात दिली.
        फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी  जयदेव पिल्लेवान वय (60)याचेवर  अ.क्र. 71/24 कलम 302 भादवी नुस गुन्हा दाखल करून. आरोपीला अटक करण्यात अली.घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांच्या मार्गदर्शनात ब्रम्हपुरी पोलीस करत आहेत.


PostImage

युवाक्रांती समाचार

Feb. 11, 2024   

PostImage

प्रेम प्रकरण मान्य नसल्याने; सखां बाप व मोठा भाऊच निघाले …


बापाने व मोठ्या भावानेच लहाण्याची केली गळा आवळून हत्या अन् केला कोणीतरी मारल्याचा बनाव

स्वान पथकाच्या साह्याने असा झाला धक्कादाय घटनेचा उलगडा

अकोला :

महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील टिटवा गावात एक खळबळजनक घटना समोर आली आहे.येथे एका तरुणाचा बापाने आणि मोठ्या भावाने गळा आवळून खुन अन् पिंजर पोलीस ठाणे गाठून मुलाला कोणीतरी मारल्याचे सांगितले मात्र तपासा दरम्यान प्रकरण उघडकीस आले.

अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील टिटवा गावातील संदीप गावंडे या  तरुणाची बापाने व त्याच्या मोठ्या भावाने मिळून गळा आवळून हातपाय बांधून  हत्या केली.संदीप चे गावातीलच एका अनुसूचित जातीच्या मुलीशी प्रेम प्रकरण जुळले होते.व तो तिच्याशी लग्न करणार होता.हे प्रकरण घरातील लोकांना पसंद नसल्याने त्यांनी संदीपला टोकले असता त्यांच्यात वाद निर्माण झाला.या वादाचे  रूपांतर एकदम टोकाच्या भूमिकेवर गेल्याने सखां बाप व मोठा भाऊ वैरी झाला व त्यांनी संदीपचा गळा आवरून हातपाय बांधून त्याला संपविल्याचे उघड झाल्याने सध्या पोलिसांनी आरोपी बाप आणि मोठ्या भावाला अटक करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बार्शिटाकळी तालुक्यातील टिटवा गावात वास्तव्यास असणारे नागोराव गावंडे यांना दोन मुले असून लहान मुलगा संदीप गावंडे हा पुणे येथील एका कंपनीत काम करीत होता.त्याचे गावातील एका अनुसूचित जाती गटातील मुलीशी प्रेम संबंध जुळल्याने तिच्याशीच लग्न करण्याचा कायमचा हट्ट धरला होता.त्याचे वडिलांना हे प्रेम प्रकरण मान्य नसल्याने  याबद्दल त्यांच्या घरात नेहमीच वादविवाद व्हायचे.यामुळे संदीप ने पळून जाऊन लग्न करण्याचे वडील नागोराव गावंडे यांना समजले यावरून त्यांनी संदीपला तू तिच्याशी प्रेम का करतो व आता लग्न करू लागलाय असे म्हणून त्यांच्यात वाद वाढल्याने गुरुवार आठ फेब्रुवारी च्या दिवशी वडील नागोराव गावंडे यांनी  मोठ्या मुलाला सोबत घेऊन संदीप चा गळा आवळून हत्या केली व त्याचे हात पाय बांधून बाहेरगावी चालले गेले.दुसऱ्या दिवशी शुक्रवार 9 फेब्रुवारीला दुपारच्या दरम्यान घरी आले असता संदीप चा मृतदेह पाहून एकच टाहो फोडला व पिंजर पोलीस स्टेशन गाठून माझ्या मुलाला कोणीतरी मारल्याचे बनाव करून सांगितले. पिंजर पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मुर्तीजापुर उपविभागीय अधिकारी मनोहर दाभाडे व अकोला श्वान पथकाला सदर घटनेची माहिती दिली. घटनास्थळी श्वान पथकाच्या सहाय्याने पोलिसांनी तपास केला असता श्वान वडील व मोठ्या भावा जवळ येऊन थांबले यावरून पोलिसांनी वडील नागोराव गावंडे व मोठ्या भावाला ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी हत्या केल्याची कबुली दिली. असा झाला घटनेतील हत्या करणाऱ्या आरोपींचा उलगडा झाला.याप्रकरणी अधिक तपास मुर्तीजापुर उपविभागीय अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल वाघ यांच्या नेतृत्वात पिंजर पोलीस करीत आहे.असे वृत्त प्रतिनिधी प्रज्ञानंद भगत यांनी कळविल्याचे आमचे जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांनी सांगितले .


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 7, 2024   

PostImage

गुटख्यापुडी दिला नाही म्हणून तरुणाने मित्रालाच भोसकलं.! कुठली घटना आहे …


जालन्यात हत्यांचं सत्र सुरुच असल्याने नागरिकांमध्ये आता दहशत निर्माण झाली आहे. गुटख्याच्या पुडीवरून झालेल्या बाचाबाचीत मित्रानेच मित्राचा चाकून भोसकून खून केला.

शहरापासून जवळच असलेल्या पीर पिंपळगाव शिवारात ही घटना घडली. दिलिप हरिभाऊ कोल्हे (वय 23 वर्ष) असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर अरविंद लक्ष्मण शेळके असं आरोपीचं नाव आहे.

गुटख्याची पुडीवरुन खून
गुटख्याची पुडी मागण्यावरून दोघांमध्ये शाब्दिक बचावाची झाली होती. त्यानंर बाचाबाचीचे रूपांतर चक्क हाणामारीमध्ये झाले. या हाणामारीत दिलीप हरिभाऊ कोल्हे याच्या छातीत अरविंद लक्ष्मण शेळके यांने चाकू भोसकला. त्यानंतर तो साथीदारांसह फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी चंदनझीरा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन या मयत तरुणाला जिल्हा सामान्य रुग्णालयात शविछेदन करण्याकरिता दाखल केलं. घटनेतील आरोपींचा शोध घेण्यासाठी चंदनझीरा पोलीस ठाण्याचे दोन पथके तैनात करण्यात आली आहेत.

काही दिवसांपूर्वीच भरदिवसा गोळीबार


काही दिवसांपूर्वीच जालना शहरातील मंठा चौफुली भागात गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली होती. या गोळीबाराच्या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला होता. गोळीबारात मृत्यू झालेला व्यक्ती अनेक गुन्ह्यात आरोपी असल्याचे देखील माहिती सूत्रांनी दिली आहे. गजानन तौर असे गोळीबारात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

दुचाकीवरून आलेल्या अज्ञात तीन आरोपींकडून गजानन तौर नावाच्या व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला. या गजानन याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच गोळीबार करणाऱ्या आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेने मात्र जालना जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 6, 2024   

PostImage

वडिलांनी मुलांना विष पाजलं, नंतर नवरा-बायकोने संपवलं जीवन


अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वारणवाडीत एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका वडिलांनी मुलांना विषारी औषध पाजून पत्नीसह गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घोड्याचं समोर आलं आहे.

या घटनेत नऊ वर्षांची मुलगी बचावली असून सहा वर्षांचा मुलाचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गजानन रोकडे, पौर्णिमा रोकडे , दुर्वेश रोकडे यांचा मृतांमध्ये समावेश असून नऊ वर्षाची चैताली रोकडे ही बचावली आहे. चैताली रोकडे हिच्यावर अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गजानन रोकडेने पत्नी पौर्णिमा रोकडे हे जुन्नर तालुक्यातील रहिवासी असून पारनेर तालुक्यातील एका पतसंस्थेमध्ये नोकरी करत होते. या घटनेने वारणवाडीसह पारनेर तालुक्यात खळबळ उडाली असून या कुटुंबाने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस घटनेचा तपास करत आहेत. 


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 4, 2024   

PostImage

चिमुकल्याच्या गळा आवळून केला खून.! चुलत भाऊच निघाला खुनी


अकोला:-

कबुतर पकडण्यासाठी शेतात गेला असता तेथे झालेल्या वादानंतर सात वर्षीय मुलाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह शेतातील विहिरीत टाकून दिला. १६ दिवसांनी मृतदेह विहिरीत आढळून आला.

मुलाचा खून गळा आवळून झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मारेकऱ्याला शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे होते. अखेर हा खून मृतकाच्या विधिसंघर्ष १७ वर्षीय चुलत भावानेच केला असल्याचे गुढ उकलण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले. 

अकोला जिल्ह्यात नव्याजे रुजू झालेले पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेने पहिलीच उत्कृष्ट कारवाई करीत सात वर्षाच्या मुलाचा हत्येच्या क्लिष्ट गुन्ह्याची उकल केली. ता. १९ डिसेंबर २०२३ पासून हरवलेला मुलगा शेख अफ्फान शेख अय्युब (रा. बागवानपुरा पिंजर) याचा मृतदेह स्थानिक गुन्हे शाखा अकोला, श्वान पथक व पिंजर येथील पोलिस तसेच संत गाडगेबाबा आपातकालीन पथक पिंजर यांचे १२ दिवसांचे अथक प्रयत्नाने पिंजर-अकोला रोडवरील विहिरीत सापडला होता.

घटनेचे गांभिर्य ओळखून पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, अप्पर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलिस अधिकारी मूर्तिजापूर मनोहर दाभाडे, स्थानिक गुन्हे शाखा अकोला प्रमुख पोलिस निरीक्षक शंकर शेळके, पो.उप. नि. गोपाल जाधव व पोलिस स्टेशन पिंजरचे ठाणेदार स. पो. नि. राहुल वाघ यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस अधीक्षकांनी तपासाबाबत सूचना दिली.

त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विचारपूस करीत, तांत्रिक माहिती व पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनावरून गुन्ह्यातील संशयित यांना ताब्यात घेतले. सखोल विचारपूस केली असता मयत शेख अफ्फान शेख अय्युब याचा खून त्याचा चुलत भाऊ विधी संघर्षित बालक वय १७ वर्षे याने केल्याची कबुली दिली.

ही कारवाई पो. नि. शंकर शेळके, सपोनि कैलास भगत, पोउपनि गोपाल जाधव, व स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पोलिस अंमलदार दशरथ बोरकर, राजपालसिंह ठाकुर, गोकुळ चव्हाण, प्रमोद डोईफोडे, फिरोज खान, रवी खंडारे, अब्दुल माजीद, वसीमोद्दीन, महेंद्रं मलीये, अविनाश पाचपोर, खुशाल नेमाडे, लिलाधर खंडार, शेख अन्सार एजाज अहेमद, आकाश मानकर, धीरज वानखडे, उदय शुक्ला, स्वप्निल चौधरी, मोहम्मद आमीर, अभिषेक पाठक, चालक शेख नफीस, अक्षय बोबडे, प्रवीण कश्यप, अनिल राठोड व तांत्रिक विश्लेषक राहुल गायकवाड, गोपाल ठोंबरे, आशिष आमले यांनी केली.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 3, 2024   

PostImage

चिकन दिलं नाही म्हणून दुकानदाराला चाकूने हल्ला


नव्या वर्षाला सुरुवात झाली पण पुण्यातील  गुन्हेगारी कृत्य काही कमी व्हायची नाव घेत नाहीत. पुण्यातील विविध भागात जीवघेणं हल्ले सुरुच आहेत, त्याशिवाय काही भागात कोयाता गँगची  दहशत आहेच. तर अनेक ठिकाणी गाड्यांची तोडफोड केली जातेय. अशातच कोंढव्यात धक्कादायक घटना घडली आहे. पार्टी करण्यासाठी चिकन दिलं नाही, म्हणून चक्क दुकानदाराला भोकसल्याची घटना घडली आहे. सुफियान आयुब शेख असं मारहाण करत दुकानदारास चाकूने भोकसणाऱ्या आरोपीचं नाव आहे. तर अब्दुला शेख असं हल्ला झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. 

पार्टी करण्यासाठी चिकन दिलं नाही, म्हणून चिकन दुकानदाराला चाकूने भोकसल्याची घटना पुण्यातील कोंढवा परिसरात घडली आहे. सुफियान आयुब शेख असं आरोपीचं नाव आहे. हा प्रकार सोमवारी (दि.1) रात्री अकराच्या सुमारास मिठानगर येथील आयशा चिकन नावाच्या दुकानात घडला आहे. 23 वर्षीय अब्दुला हाशिम शेख याने याबाबत कोंढवा पोलिसात  तक्रार दिली.

याबाबत अब्दुला हाशिम शेख याच्या तक्रारीनंतर कोंढवा पोलीस ठाण्यात सुफियान अय्युब शेख याच्यावर गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी आयपीसी 323, 324 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. या प्रकरणाबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अब्दुला शेख याचे कोंढव्यातील मिठानगर येथे आयशा चिकन सेंटर नावाचे दुकान आहे. एक जानेवारी रोजी म्हणजेच सोमवारी रात्री अकराच्या सुमारास दुकान अब्दुला शेख बंद करत होता. दुकानदाराच्या तोंड ओळखीचा सुफियान शेख त्यावेळी दुकानात आला. सुफियान याने त्याच्याकडे चिकन मागितले. पण अब्दुलाने त्याला नाही म्हणून सांगितले.  दुकान बंद करत आहे, चिकन मिळणार नाही असे अब्दुलाने सुफियान याला सांगितले. पण हाच राग सुफियान याला आला. सुफियान याने अब्दुला याला मारहाण करत जाब विचारला. अब्दुला याच्या कानाखालीही लगावली. सुफियान इतक्यावरच थांबला नाही, त्याने दुकानातील चाकू अब्दुला शेख याच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. काहीसं दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. कोंढवा पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. आरोपी सुफियाना फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. अब्दुला याच्यावर प्रथमिक उपचार सुरु आहेत. 


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 2, 2024   

PostImage

रागवराचा ताबा सुटला आणि माणूस राक्षस बनला.! चावी फेकली म्हणून …


धाराशिव : राग आणि भिक माग अशी म्हण आहे. रागावरचा ताबा सुटला की माणूस राक्षस होतो, आणि तो नको ते कृत्य करतो. अशीच एक घटना तुळजापुर तालुक्यातील अणदुर येथे घडली आहे. घराची चावी पुतण्याने चुलतीकडे मागितली. चुलतीने चावी लांबून फेकून दिली. चावी फेकल्याचा राग आल्याने ३२ वर्षीय पुतण्याने ४५ वर्षीय चुलतीला पाण्याने भरलेल्या विहिरीत ढकलून दिले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शब्बीर दस्तगीर पिंजारी (वय ३२, रा. अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव) याने त्याची चुलती मयत जैनाबी कासीम पिंजारी (वय ४५, रा. अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव) दशरथ घुगे याच्या शेतात ऊस तोडत होत्या. या दरम्यान आरोपी शब्बीरने जैनाबी यांच्याकडून घराची चावी मागितली. जैनाबी यांनी चावी खाली का टाकून दिली? या कारणावरून आरोपी शब्बीर पिंजारी याने मयत चुलती जैनाबी पिंजारी यांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली.
''तुला जिवंत सोडत नाही'', असं म्हणत शब्बीरने जैनाबी यांना हाताला धरुन ओढत नेऊन पाण्याने भरलेल्या दशरथ घुगे यांच्या अणदुर शिवारातील विहिरीत ढकलून देऊन जिवे ठार मारलं. ही घटना शनिवारी रोजी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास घडली. यावेळी ऊसतोड करणारे कामगार जैनाबी यांना वाचवण्यासाठी विहिरीच्या दिशेने धावले. परंतु जैनाबी यांनी विहिरीचा तळ गाठला होता. बघ्यांपैकी कोणी तरी नळदुर्ग पोलिसांना घडलेल्या घटनेबद्दल सांगताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. आरोपी शब्बीर पिंजारी हा हैद्राबाद - सोलापूर हायवेवर जात असताना नळदुर्ग पोलिसांनी त्याला पकडले.
या बाबत फिर्यादी मस्तान ईसाक शेख (वय ३६, रा. अणदुर, ता. तुळजापूर जि. धाराशिव) यांनी काल रोजी दिलेल्या फिर्यादीवरुन नळदुर्ग पोलीस ठाणे येथे कलम ३०२, ३२३, ५०४ भारतीय दंड विधान संहिता अन्वये गुन्हा नोंदवला आहे. आरोपी शब्बीर पिंजारीला न्यायालयात हजर केल्यानंतर २ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मयत जैनाबी यांना १ विवाहित मुलगी, २ अविवाहित मुले आहेत. तर आरोपी शब्बीर पिंजारीला ४ मुली आहेत. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक सुरज देवकर हे सहाय्यक पोलीस निरिक्षक स्वप्निल लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 1, 2024   

PostImage

आईचा प्रियकर निघाला सख्खा मित्रच..! अन्....


लातूर:-

जिल्ह्यातील औसा तालुक्यातील भादा पोलिस ठाणे हद्दीतील वडजी गावातील एका युवकाचा झोपेत असताना डोक्यात व गळ्यावर वार करून अत्यंत निर्दयीपणे खून (Murder) केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली होती. या घटनेबाबत पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत तपास सुरु केला होता. दरम्यान, आईसोबत नको त्या संबंधांचा संशय आल्याने मयत तरुणाच्याच मित्रानेच त्याची हत्या केल्याचं आता पोलीस तपासात समोर आले आहे. रणजित उर्फ बाळू तानाजी माळी (वय 22 वर्ष) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

रणजित हा अविवाहित असून आई-वडीलांना शेती व्यवसायात मदत करून दुग्ध व्यवसाय करायचा. शुक्रवारी नेहमीप्रमाणे रणजित आपल्या शेतात मुक्कामी गेला असताना रात्री उशिरा किंवा पहाटेच्या वेळी अज्ञात मारेकऱ्याने झोपेत असताना त्याच्या डोक्यात व गळ्यावर अत्यंत निर्दयीपणे धारधार कोयत्याने वार करून त्याचा खून केला. ही घटना शनिवारी रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस येताच याची माहिती भादा पोलिसांना देण्यात आली. सदरील घटनेची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरु केला होता. 

असा अडकला आरोपी... 
दरम्यान, पोलिसांकडून गावात चौकशी सुरु असतानाच मृत रंजितचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते आणि तिचा मुलगा रंजितचा खूप जवळचा मित्र असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ एका 17 वर्षीय मुलास चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याला विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिले. दरम्यान, याचवेळी याच तरुणाने गावातील एका मुलाकडून कोयत्याला धार लावून नेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली.

आदल्या दिवशी कोयत्याला धार लावून आणली...
मयत रंजित आणि आरोपी दोघेही चांगले मित्र होते. त्यामुळे एकमेकांच्या घरी त्यांचे येणेजाणे असायचे. दरम्यानच्या काळात रंजित आणि आपल्या आईचे अनैतिक संबंध असल्याचा आरोपीला संशय आला होता. त्यामुळे त्याने काही दिवस पाळत ठेवत खात्री केली. त्यामुळे मयत रंजितला कायमचे संपवण्याचा त्याने निर्णय घेतला. त्यानुसार आदल्या दिवशी कोयत्याला धार लावून आणली आणि रात्री रंजित गोठ्यात झोपला असतानाच त्याचा खून केला. 


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 1, 2024   

PostImage

महिलेचा दगडाने ठेचून खून.!


सांगली : भावा-भावाच्या वादात एका महिलेचा दगडाने ठेचून खून करण्याचा प्रकार कडेगाव तालुक्यातील नेवरी येथे शनिवारी सायंकाळी घडला. या मारामारीत महिलेच्या पतीसह दीरही जखमी झाला असून या प्रकरणी दोन महिलांसह पाच जणांना रविवारी पोलीसांनी ताब्यात घेतले.नेवरी (ता. कडेगाव) येथे कौटुंबिक कारणातून अजय महाडिक व शरद महाडिक यांच्यात वाद झाला. या वादात प्रियांका अजय महाडिक (वय २५) हिच्यासह पती अजय महाडिक आणि चुलत दीर नवनाथ बाबूराव महाडिक यांच्यावर हल्ला करण्यात आला. महिलेला दगडाने ठेचून धारदार हत्याराने वार करण्यात आले. यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

याबाबत कडेगाव पोलिसात नोंद झाली आहे. याप्रकरणी मृत महिलेची सासू तारामती आप्पासाहेब महाडीक, दीर शरद आप्पासाहेब महाडीक, जाऊ उवला शरद महाडीक, पुतण्या अभिषेक शरद महाडीक या संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शरद व अजय महाडिक हे सख्खे भाऊ आहेत. शरदचा मुंबई येथे रिक्षाचा व्यवसाय आहे. तो पंधरा दिवसांपूर्वी नेवरी येथे आला. शनिवारी सायंकाळी दोन्ही कुटुंबात भांडण सुरू झाले. रागाच्या भरात दीर शरद आणि पुतण्या अभिषेक याने धारदार शस्त्राने प्रियांकाच्या डोक्यावर व गळ्यावर तसेच, तिचा पती अजयच्याही डोक्यावर वार केले. त्यामुळे प्रियांकाचा जागीच मृत्यू झाला. तर भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या मयत महिलेचा चुलत दीर नवनाथ महाडीक जखमी झाला. त्यास स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पुढील तपास कडेगाव पोलीस करत आहेत.


PostImage

युवाक्रांती समाचार

Jan. 1, 2024   

PostImage

भावाने बहिणीचा गळा आवळून केला खून.!


भंडारा:-

चारित्र्याच्या संशयावरून मोठ्या भावाचा बहिणीसोबत शाब्दिक वाद झाला. वादाचे पर्यवसान मारहाणीपर्यंत पोहचले, अशातच भावाने बहिणीचा गळा दाबला आणि तिचा मृत्यू झाला. सदर घटना भंडारा तालुक्यातील वरठी लगतच्या सोनूली येथे घडली.
वरठी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून आशिष गोपीचंद बावनकुळे (२२) याला अटक केली आहे. अश्विनी बावनकुळे (२०) असे मृत बहिणीचे नाव आहे. भंडारा तालुक्यातील वरठी नजीकच्या सोनूली या गावात रविवारी घडलेली ही घटना रात्री उशिरा उघडकीस आली. 

सोनूली येथे गोपीचंद बावनकुळे आपल्या परिवारासह अनेक वर्षांपासून राहतात. ते एक मुलगा व मुलगी आणि पत्नी सोबत राहत असून आई वडील मोलमजुरी करतात. घटनेच्या दिवशी आई साकोली व वडील कन्हान ला कार्यक्रमानिमित्त गेले होते. दरम्यान आशिष व त्याची बहीण अश्विनी दोघे घरी होते.

दुपारी दोघात प्रेमप्रकरणावरून शाब्दिक वाद झाला. क्षुल्लक वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. वाद एवढा विकोपाला गेला की आशिषने अश्विनीच्या नाका-तोंडावर बुक्क्या हणल्या. एवढ्यावरच न थांबता तिचा गळा आवळला. यात नकळत ती गतप्राण झाली. घटनेनंतर कुठेही वाच्यता न करता तो गावातच थांबून राहिला. आपल्या हातून घडलेले कृत्य लपविण्यासाठी त्याने लहान बहीण छतावरून पडल्याचे आईवडिलांना सांगितले. सायंकाळपर्यंत गावातही शुकशुकाट होता.
दरम्यान, पोलीस पाटीलांनी घटनेबाबत पोलिसांना सायंकाळी सूचना केली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी सामान्य रुग्णालयात हलवला. तो पर्यंत पोलिस यंत्रणा घटनेचा शोध घेण्यास कामाला लागली. गळ्यावर दाबल्यागत खुणा दिसत असल्याने पोलिसांनी तपासाची गती वाढवली व आशिषला विचारपूस केली. यावेळी तो पोलिसांसोबत दवाखान्यात होता. शवविच्छेदन अहवालात सर्व उघड होण्याची कल्पना येताच त्याने रात्री दवाखान्यातच खुनाची कबुली दिली. पोलिसांनी या प्रकरणी भादंवि ३०२ अन्वये गुन्हा नोंद करून आशिषला ताब्यात घेतले. गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक अभिजित पाटील व उपनिरीक्षक महेंद्र शहारे, हवालदार विनायक बेदरकर करीत आहेत.

परिक्षेकरिता आली होती स्वगावी

अश्विनी नागपूरला मावशीकडे राहायची. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने ती नागपूरला व्यावसायिक शिक्षण घेत होती. १२ वी नंतर तिने भंडारा येथील महाविद्यालयात तात्पुरता प्रवेश घेतला होता. सध्या हिवाळी परीक्षा सुरू असल्याने ती परीक्षा देण्यासाठी २२ तारखेला सोनूली येथे आली होती.


PostImage

KASAK

Aug. 27, 2023   

PostImage

Crime branch team nabs two men possessing MD powder worth …


Nagpur:  Crime branch sleths nabbed two persons and seized the contraband mephedrone (MD powder) worth Rs.2.60 lakh. THE duo were apprehended from (dongar gao ) area on Friday afternoon. A team induding inspector (Sarin Druge) was patrolling in the area under Hingna police station when they got a tip off about some illegal activities near Goldy Beer shoppe. Acting swiftly the cops raided the area where they found the duo moving around in suspicious manner. Immediately the team datainad them .the duo was indentified as Sheikh Sharik (24) , A resident of (Bada Tajbag) behind overhead water tank. Of  Plot No. 24 pardi. During their body search.the team found MD powder.

The Drug - peddlers had smuggled 26.9. gm MD powder in city of sale to prospective consumer.the total worth of the drug   seized is valued at Rs. 2,60,900.

A well connected network operates to smuggle the MD powder from Mumbai and the same is distributed in small quantity is various parts of vidarbha. 

A case under sections 8(c), 22(b), 2 of the Narcotic Drugs and Psychotropic.......