PostImage

P10NEWS

Sept. 6, 2024   

PostImage

१३० अभियंता संवर्गातील अन्यायग्रस्त जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा शासन परिपत्रकानुसार मागणी …


 

      १३० अभियंता संवर्गातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा मागण्यावर कार्यवाही न झाल्याने असहकार व लेखणी बंद बेमुदत आंदोलनाला बहुजन समाज पार्टी गडचिरोली पदाधिकार्यांनी पाठिंबा दिला.- मा. भास्कर भाऊ मेश्राम जिल्हा प्रभारी बसपा गडचिरोली     

 

 

गडचिरोली/ दिनांक,06 :- गडचिरोली जिल्ह्यातील अभियंता संवर्गातील मागण्यावर जिल्हा परिषद प्रशासनाकडून मागील दिड वर्षांपासून अवगत करून सुद्धा हेतुपुरस्सर दुर्लक्ष व या संवर्गाची हेळसांड होत आहे. सेवा विषयक मागण्यांवर वारंवार पाठपुरावा करूनही कार्यवाही न होणे हि बाब अतिशय असंवेदनशील व अमानवीय आहे.     संदर्भ क्रं 14 मध्ये नमूद मागण्यांवर मा.अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांनी दिनांक 21/08/2024 रोजी संघटनेचे पदाधिकार्यांची बैठक घेतली ‌. परंतु सभेत आमच्या मागण्यांवर कोणताही सकारात्मक दृष्टिकोन दिसुन आला नाही.निवेदनातील मागण्या सदस्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा व रास्त आहेत. परंतु आपले प्रशासन एकतर्फी विचार करून शासन निर्णयाला बगल देऊन अभियंता संवर्गाची दिशाभूल करीत असल्याची माहिती दिली.                                                    जिल्हा परिषद गडचिरोली प्रशासनाला अभियंता संवर्गाच्या कर्मचाऱ्यांनी गोंदिया, चंद्रपूर येथील जिल्हा परिषद प्रशासनाने खालील मागण्यांची शासन परिपत्रकानुसार लाभ दिलेले आहेत तसेच सेंट्रलच्या पाटबंधारे विभागाने तेथील अभियंता संवर्गाच्या कर्मचाऱ्यांना लाभ दिलेले आहे या सर्वांचे सभेत दाखले दिल्यानंतरही सभेतील चर्चैनंतर कोणतीही कारवाई केलेली नाही. यामुळे दिनांक 04/09/2024 पासून असहकार आंदोलन व लेखणी बंद बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आलेला आहे. या संबंधीत आंदोलनाला बहुजन समाज पार्टी गडचिरोली पदाधिकार्यांनी 06/09/2024 ला भेट देऊन अभियंता संवर्गाच्या मागण्या रास्त असुन गोंदिया, चंद्रपूर जिल्हा परिषद प्रशासनाने दिलेले आहे . आणि शासन परिपत्रकानुसार लाभ देणे आहे असे चर्चेत व त्यांच्या कडे असलेल्या कागदपत्रावरुन दिसुन येते. आणि खरोखरंच या 130 अभियंता संवर्गाच्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. तरी जिल्हा परिषद प्रशासनाने खालील मागण्यांची पूर्तता करण्याची बहुजन समाज पार्टी गडचिरोली पदाधिकार्यांनी केली. यावेळी मा. भास्कर भाऊ मेश्राम जिल्हा प्रभारी बहुजन समाज पार्टी गडचिरोली, मा. मंदीप भाऊ गोरडवार विधानसभा अध्यक्ष बसपा गडचिरोली,  मा.नरेश महाडोळे, जेष्ठ पदाधिकारी, सुधीर वालदे प्रभारी विधानसभा गडचिरोली,  तसेच जिल्हा परिषद अभियंता संघटना महाराष्ट्र जिल्हा शाखा गडचिरोली जिल्हा अध्यक्ष इंजिन. के एस. ढवळे, जिल्हा सचिव इंजि. पी.बी.झापे , कार्याध्यक्ष इंजि. इ.वाय. सिडाम, जिल्हा उपाध्यक्ष इंजि. एम.टी.रामटेके, इंजि. एस.एम. दुर्गे, इंजि. के. आर. सलामे, कोषाध्यक्ष इंजि. बी. व्ही. शेन्डे, इंजि. जी.के शिरपुरकर, इंजि. ए.एम. अगळे, इंजि. एम.पी.कावळे, इत्यादी 50 ते 60. अभियंता संवर्गाची आंदोलनात सहभागी होते.              1) एक स्तर योजने अंतर्गत कनिष्ठ अभियंता यांना उप अभियंता पदाचे वेतन देण्यात यावे. २) आज घडीला फक्त बांधकाम विभागात कार्यरत कनिष्ठ अभियंता/ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांचे प्रवास देयके रु. 57.00 लक्ष प्रलंबित आहेत. सदर प्रवास देयकाची प्रतिपुर्ती वेळिच होणे गरजेचे आहे. जो पर्यंत प्रलंबित प्रवास देयकाची प्रतिपुर्ती होत नाही.तो पर्यंत कोणीही सदस्य स्वतः चे वाहनाने दौरा करणार नाहीत. कार्यालयाकडून वाहन किंवा आग्रिम देण्यात आल्यास बांधकामावर दौरा करण्यात येईल. 3) बांधकामात अनियमितता झाल्यास फक्त कनिष्ठ अभियंता यांना जबाबदार न धरता साखळीतील सर्व जसे कंत्राटदार, उप अभियंता कार्यकारी अभियंता यांना सम प्रमाणात जबाबदार धरण्यात यावे. 4) कनिष्ठ अभियंता यांनी झालेल्या बांधकामांचे देयक सादर केल्यानंतर उप विभाग स्तरावर उप अभियंता यांची 100 टक्के व वरिष्ठ सहाय्यक यांचे कडून गणीतीय तपासणी होवुन, संबंधित विभागास सादर करण्यात येतात, त्यानंतर विभाग स्तरावर लेखा व तांत्रिक तपासणी केल्यानंतर उप विभाग स्तरावर लेखा व तांत्रिक तपासणी केल्यानंतर वित्त व लेखा विभागात पुनश्च लेखा व वित्त विषयक तपासणी करून भुगतान केल्या जाते. यानंतरही लेखा आक्षेप निकाली काढण्याची जबाबदारी संबंधितांवर निश्चित करावी. यापुढे या कामांकरिता कनिष्ठ अभियंते सहकार्य करणार नाहीत. त्यामुळे नाहक मानसिक त्रास देवु नये. 5) जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती व जिल्हा परिषदेकडे लहान परंतु विखुरलेली स्वरुपाची कामे असल्याने प्रस्तावित बांधकामांचे अंदाज पत्रक तयार करणे, वारंवार भेटी देवून कामावर नियंत्रण ठेवणे, कामे करवून घेणे झालेल्या बांधकामांचे मापे घेणे/नोंदविणे, देयक तयार करणे इ काम करण्यास मानसिक व शारीरिक त्रास सहन करावे लागते. शासनाने या सर्व कामांकरिता जिल्हा परिषदेला संगणीकृत प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रणालीचा लागु करण्यास कळविलेले आहे. सर्व विभागांना पि.एम‌.एस. प्रणाली तात्काळ उपलब्ध करून द्यावी. 6) पदवी/पदविका, अर्हता धारक कनिष्ठ अभियंता यांना 3/5 वर्षे सेवेनंतर सहाय्यक/ शाखा अभियंता म्हणून दर्जोन्नती देण्यात यावी. तसेच अर्हतारहित कनिष्ठ अभियंता 7/10 वर्षे सेवेनंतर शाखा अभियंता म्हणून दर्जोन्नती देण्यात यावी. 7) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांना घरकुलाचे कामातुन मुक्त करावे. इत्यादी मागण्याकरिता आंदोलन करण्यात आले.


PostImage

P10NEWS

Aug. 19, 2024   

PostImage

गडचिरोली बहुजन समाज पक्षाने गांधी चौकात कलकत्ता व बिहार बलात्कार …


 

        बहुजन समाज पार्टी गडचिरोलीच्या वतीने इंदिरा गांधी चौकात बिहार मुजफ्फरनगरला दलित मासुम मुलगी व पं. बंगालमधील कोलकत्ता येथील ट्रेनि महिला डॉक्टरवर बलात्कार करून निर्घृण हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षेची मागणी करण्यात आली.              

     

       गडचिरोली/19:- बहुजन समाज पार्टी गडचिरोली येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी इंदिरा गांधी चौक येथे भारतातील बिहार राज्यातील मुजफ्फरनगर येथील रुपा कुमारी 14 वर्षीय दलित मासुम मुलीला रात्रो घरातुन उचलून नेवुन सामुहिक बलात्कार करुन निर्घृण हत्या करण्यात आली. तसेच पश्चिम बंगाल मधील कोलकत्ता मधील ट्रेनी महिला डॉक्टर वय 31 वर्षे ही रात्रो कर्तव्यावर असताना आरोपींनी सामुहिक बलात्कार करुन निर्घृण हत्या केली. ही देशाला काळीमा फासणारी घटना असुन या दोन्ही घटनेचा बहुजन समाज पार्टी जिल्हा गडचिरोली च्या वतीने इंदिरा गांधी चौकात जाहीर धिक्कार करून जाहीर निषेध केला. या घटनेतील दोन्ही आरोपींना कठोरातली कठोर फाशीची शिक्षा देण्यात यावी. अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शासनाला निवेदनाद्वारे दिला. यावेळी मा भास्कर भाऊ मेश्राम जिल्हा प्रभारी बसपा गडचिरोली, मा. मंदीप एम गोरडवार विधानसभा अध्यक्ष बसपा गडचिरोली, मा. गुलाबराव मडावी, मा. सुधीर वालदे प्रभारी विधानसभा गडचिरोली, नरेश महाडोळे, पुरुषोत्तमा रामटेके,प्रेमदास रामटेके, लवकुश भैसारे, ज्ञानेश्वर वाडके, सुमन क-हाडे, वेणुताई खोब्रागडे शहर अध्यक्ष बसपा गडचिरोली, आरती कोल्हे, विद्या दुग्गा, मालता पुडो, वनिता पदा, इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

P10NEWS

July 28, 2024   

PostImage

LOKADALAT : राष्ट्रीय लोक अदालतमध्ये १८२ प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली. …


 


   

गडचिरोली दि.२८ : राष्ट्रीय लोकअदालतमध्ये जिल्ह्यातील ९० प्रलंबित आणि ९२ दाखलपूर्व असे एकूण १८२ खटले आपसात तडजोडीने निकाली निघाले असून  एकुण १ कोटी ०९ लाख ३५ हजार ७२९ रुपये नुकसान भरपाई वसुली करण्यात आली. तसेच. किरकोळ गुन्हा प्रकरणांमध्ये एकुण ३१ प्रकरणे गुन्हा कबूलीद्वारे निकाली निघाले आहे.

  जिल्हा न्यायालय व जिल्हयातील सर्व तालुका न्यायालयात दिनांक २७ जुलै, २०२४ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. लोकन्यायालयामध्ये तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, धनादेशाबाबतची कलम १३८ अन्वयेची प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे, दरखास्त प्रकरणे, बँकेची कर्ज वसुलीची प्रकरणे व दिवाणी प्रकरणे असे न्यायालयात प्रलंबीत दावे व दाखलपूर्व वाद प्रकरणांमध्ये महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची थकीत विजबील प्रकरणे, पतसंस्था व बँकाची थकीत कर्ज प्रकरणे, फायनान्स कंपनीची थकीत कर्ज प्रकरणे, ग्रामपंचायतींची थकीत घरपट्टी व पाणीपट्टीची प्रकरणे, घरकुल अनुदान वसुली प्रकरणे तसेच ग्राहक न्यायालयातील प्रकरणे, मोटार वाहन कायदा अंतर्गत चालान प्रकरणे ठेवण्यात आली होती.  जिल्हयात एकुण १० पॅनल ठेवण्यात आले होते. 

श्री. व्ही. एस. कुलकर्णी, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश,
गडचिरोली व  श्री. आर. आर. पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांचे देखरेखीखाली
लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते.
 श्री. एस. पी. सदाफळे, दिवाणी न्यायाधीश (व. स्तर) तथा मुख्य न्यायदंडाधिकारी, गडचिरोली यांनी पॅनल
क्र. ०१ वर काम पाहीले, पॅनल क्र. ०२ वर  श्री. सी. पी. रघुवंशी, सहदिवाणी न्यायाधिश (क. स्तर) तथा न्यायदंडाधिकारी (प्र.श्रे.) गडचिरोली, पॅनल क्र. ०३ वर  श्रीमती व्ही. आर. मालोदे, २ रे सहदिवाणी न्यायाधीश (क. स्तर) तथा न्यायदंडाधिकारी (प्र.श्रे.) गडचिरोली यांनी काम पाहिले.
 दिनांक २७/०७/२०२४ रोजी कार्यालयीन कामकाज दिवस घोषीत करुन किरकोळ गुन्हयाचे खटले फौ.
प्र. सं. कलम २५६, २५८ अन्वये तसेच गुन्हा कबुलीद्वारे निकाली काढण्याकरीता श्रीमती एन. ए. पठाण तृतिय सहदिवाणी न्यायाधिश (क. स्तर) तथा न्यायदंडाधिकारी (प्र.श्रे.) गडचिरोली यांचे न्यायालय कार्यरत होते.
तसेच पॅनल क्रमांक ०१ मध्ये पॅनल सदस्य म्हणून  श्री. गौतम दयाराम डांगे, सामाजिक कार्यकर्ता पॅनल
क्रमांक ०२ मध्ये पॅनल सदस्य म्हणून श्री. मनोहर माधवराव हेपट, सामाजिक कार्यकर्ता, पॅनल क्रमांक ०३ मध्ये पॅनल सदस्य म्हणून कु. अर्चना लहुजी चुधरी, सामाजिक कार्यकर्ता यांनी काम केले.
सदर लोकन्यायालय यशस्वी करण्याकरीता गडचिरोली जिल्हा अधिवक्ता संघातील समस्त अधिवक्ता वृंद,
न्यायालयीन कर्मचारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोलीच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.


PostImage

P10NEWS

July 20, 2024   

PostImage

FOREST CORRUPTION: चातगाव वनपरिक्षेत्रातील रोपवन व इतर कामातील गैरव्यवहाराची चौकशी …


 

गडचिरोली : गडचिरोली वनविभागाअंतर्गत येणाऱ्या चातगाव वनपरिक्षेत्रातील वनविभागाच्या कामकाजात गैरव्यवहार झाल्याची तक्रार भारतीय जनसंसदचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी केली होती. त्यासंदर्भात त्यांनी वनमंत्री आणि वनखात्याच्या प्रधान सचिवांकडेही तक्रार केली होती. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू आहे. दरम्यान संबंधित आरएफओने वनपालामार्फत आपल्याला लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी खरवडे यांनी केली आहे.

रोपवन लागवड, खोदतळे, साहित्य खरेदी, टिसीएमची कामे, कामावरील मजुर, मजुरांचे व्हाऊचर, त्यांचे बँक खाते पुस्तिका तपासून घेऊन अन्य कामांची सखोल चौकशी करण्याची मागणी खरवडे यांनी केली होती. यादरम्यान आपल्याला कोणत्याही प्रकारची विचारणा न करता चातगावचे वनपाल परशुराम मोहुर्ले यांनी चातगाव वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी एस.बी.पडवे यांच्या सांगण्यावरून 10 हजार रुपये आपल्या मुलाच्या अकाऊंटला पाठविले, असे खरवडे यांनी सांगितले. एवढेच नाही तर पैसे मिळाले का, अशी विचारणाही त्यांनी फोनवरून केली.

अशा पद्धतीने लाच देण्याचा प्रयत्न हा गुन्हा असल्याने त्यांच्यावर कायदेशिर कारवाई करण्याची मागणी खरवडे यांनी केली. तसेच चातगाव वनपरिक्षेत्रात 2021 ते 2024 पर्यंतच्या कामांची व त्यावरील आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्याची मागणी विजय खरवडे यांनी केली आहे.


PostImage

Ramdas Thuse

Aug. 26, 2023   

PostImage

कोव्हीड १९ महामारीवर ग्रामीण परिसरातील मानस शास्त्रीय आणि सामाजिक मध्यस्थी …


चिमूर:-

आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमुर येथे राज्वररांरीय कोव्हीड १९ महामारीवर ग्रामीण परिसरातील मानस शास्त्रीय आणि सामाजिक मध्यस्थी या विषयावर ऑनलाईन सेमीनॉर घेण्यात आले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. चंदनसिंग रोटेले, प्राचार्य शुभांगी वडस्कर, डॉ. दिपा बालखंडे, डॉ. सुमेधा वानखेडे, डॉ. सुदर्शन खापर्डे, प्रा. शिल्पा गणवीर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी १२३ मान्यवर ऑनलाईन प्रणालीमध्ये उपस्थित झाले होते. मोठया उत्साहात सेमीनार संपन्न झाला.


PostImage

Ramdas Thuse

Aug. 26, 2023   

PostImage

व्यवसाय मार्गदर्शन आणि कौशल्य विकास या विषयावर वर्क शॉप संपन्न


 

चिमूर:-

महाराष्ट्र शासन व आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमुरच्या विद्यमाने महाविद्यालयात व्यवसाय मार्गदर्शन व कौशल्य विकास या विषयावर एक दिवशीय मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली. त्यात ११ सहभागी विद्यार्थ्यांना उपस्थित डॉ. सुदर्शन खापर्डे यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेला महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.


PostImage

Ramdas Thuse

Aug. 18, 2023   

PostImage

एक संघ लढ्यातून काँग्रेस "क्रांतीभूमीत ' तिरंगा फडकविणार - विरोधी …


 

 

16 ऑगस्ट हा देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाला कलाटणी देणारा दिवस आहे. महात्मा गांधींनी इंग्रजांना चले जावचा नारा दिल्यानंतर संपूर्ण देशात "करो या मरो' अशी परिस्थिती निर्माण होऊन स्वातंत्र्याच्या मोठया उठावास सुरुवात झाली. याच काळात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या क्रांतिकारक भजनाने प्रेरित होऊन 1942 साली चिमुरात क्रांतीची मशाल हाती घेऊन येथील वीरांनी प्राणाची आहुती देत चिमूरला सर्वप्रथम स्वातंत्र्य मिळवून दिले. हा इतिहास देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिल्या गेला. सलग दहा वर्षे या क्रांती भूमीची आमदार म्हणून सेवा करण्या करिता मिळालेल्या सेवा संधीमुळे या मातीशी माझी नाळ जुळली आहे. येथील वीर शहिदांना अभिवादन करण्यासाठी मला कोणीही रोखू शकत नाही. सोबतच संपूर्ण काँग्रेस एक संघ होऊन या क्रांती भूमी तिरंगा फडकविणार असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते आ.विजय वडेट्टीवार यांनी केले. ते चिमूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

याप्रसंगी प्रामुख्याने माजी आमदार, प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आदिवासी विभाग डॉ .नामदेव उसेंडी, चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्र निरीक्षक, डॉ.नामदेव किरसान, महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी डॉ. अविनाश वारजूकर, प्रदेश संघटक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग, धनराज मुंगले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ सतिष वारजूकर, जिल्हा काँग्रेस महासचिव गजानन बुटके, राम राऊत , संजय डोंगरे , काँग्रेस अनुसूचित जाती सेलचे प्रफुल खापर्डे,तालुका अध्यक्ष विजय गावंडे, प्रमोद चौधरी, संदीप कावरे , कृष्णा तपासे , राजू लोणारे माधव बाबू बिरजे, उमेश हिंगे,कल्पना इंदुरकर , रीता अंबाडे मंचावर उपस्थित होते.

 

यावेळी पुढे बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, आर एस एस सारख्या मनुस्मृति विचारांच्या शक्तीने देशाच्या राष्ट्रध्वजाचे महत्व कमी करण्याचा प्रकार सुरू आहे. एकीकडे देशाचे पंतप्रधान राष्ट्रध्वज फडकवीत असताना दुसरीकडे मात्र देशद्रोही मनोहर भिडे सारख्या कडून तिरंगा ऐवजी दुसरा ध्वज फडकवा असा समाजात तेढ निर्माण करणारा विषारी संदेश पसरविल्या जात आहे. देशाला जीवन समर्पित करून बलिदान देणाऱ्या महापुरुषांचा अवमान करणाऱ्या या देशद्रोही भिडेला तुरुंगात डांबण्या ऐवजी गुरुजी म्हणून सत्ताधारी विद्यार्थी सन्मान करीत आहेत. महात्मा गांधींच्या विचारांची महानता या मनुस्मृति वाद्यांना काय कळणार ? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. तर देशात पंतप्रधान मोदींनी हुकुमशाही धोरण लावण्यासाठी स्वायत संस्थांचा वापर करून पक्ष फोडाफोडींचे राजकारण सुरू केले आहे. राजकारणासाठी देवांच्या नावांचा वापर करून समाजाला जाती जातीत विभागले जात आहे यामुळे देशाची एकात्मता धोक्यात आली असून 2024 ची स्वातंत्र्याची दुसरी लढाई साठी सर्वांनी सज्ज राहून राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी करावी असेही विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार प्रतिपादन यांनी केले.

-------------------------------

 चिमूर क्रांतीचा इतिहास अजरामर - वडेट्टीवार

 16 आगस्ट चिमूर क्रांती दिनी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी चिमूर येथील हुतात्मा स्मारक येथे येऊन चिमूर क्रांतीतील शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी बोलतांना विरोधी पक्षनेते आ. सेवडेट्टीवार म्हणाले की सन 1942 साली देशातील चिमुरात क्रांतीची पहिली ठिणगी पेटली. यात शहीद वीर क्रांतिकारक बालाजी रायपूरकर व त्यांच्या साथीदारांनी हाती शस्त्र नसताना देखील शस्त्रधारी इंग्रज अधिकाऱ्यांशी लढा दिला. या लढ्यात अनेक तरुणांना वीरमरण आले. हा चिमुरचा क्रांतिकारी इतिहास स्वातंत्र्याच्या लढाईच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिल्या गेला असून तो सदैव अजरामर राहील. असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.


PostImage

Ramdas Thuse

Aug. 18, 2023   

PostImage

चिमुरात विरोधी पक्षनेते नामदार विजय वडेट्टीवार व चिमूर तालुका काँग्रेस …


 

 वाढत्या कॅन्सर आजाराला आळा घालण्यासाठी, वर्षभरात किमान ३०० रुग्णांचे प्राण वाचविण्याचे ध्येय पुढे ठेवून "जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा" हे ब्रीद घेवुन २० टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारण करीत रुग्णसेवेचा ध्यास घेतलेले माजी मंत्री तथा महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते नामदार विजय वडेट्टीवार यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात प्रथमच टेलिमेडिसीन तंत्रज्ञान युक्त फिरता दवाखाना व कॅन्सर निदान केंद्र सुमारे अडीच कोटी रुपये खर्च करून प्रगत तंत्रज्ञान युक्त राज्यातील पहीले अत्याधुनिक, कॅन्सरचे निदान करणारे फिरते हाॅस्पिटल जनतेच्या सेवेत राज्याचे माजी मंत्री तथा विरोधी पक्षनेते, नामदार विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने समर्पित करण्यात आले आहे.

या फिरत्या कॅन्सर तपासणी हाॅस्पिटलच्या माध्यमातून कॅन्सर तपासणी शिबिर गुरुवार दि. १७ आॅगस्ट रोजी चिमूर येथील हुतात्मा स्मारक येथे आयोजित करण्यात आले होते. सदर शिबीरात शेकडो रुग्णांनी आपली मोफत तपासणी करून घेतली.

सदर तपासणी शिबीराला ७४, चिमूर विधानसभा समन्वयक तथा माजी जि. प. अध्यक्ष डॉ. सतिश वारजूकर, ओबीसी प्रदेश संघटक धनराज मुंगले, कॉंग्रेस कमेटीचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी जि. प. सदस्य गजानन बुटके, चिमूर तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष डॉ. विजय गावंडे, शहर अध्यक्ष अविनाश अगडे, कृषी उत्पन्न बाजार समिती चिमुरचे संचालक भरत बंडे, देवानंद गावंडे, प्रदीप तळवेकर, नागेंद्र चट्टे, पप्पुभाई शेख, सुधीर जुमडे, रत्नाकर विटाळे, इंजि. शुभम बोबडे, इम्रानभाई शेख, बालाजी कोयचाडे, मधुकर मुंगले, शामराव अंबादे, गुरू जुनघरे, रामदास ठुसे आदी व काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. तपासणी शिबिराच्या यशस्वितेसाठी शिबीर समन्वयक तथा जनसंपर्क अधिकारी सुधिर पंदीलवार यांनी सहकार्य केले.


PostImage

Ramdas Thuse

Aug. 14, 2023   

PostImage

दरवाजे चोरी होने से 1200 हेक्टयर फसल संकट में


 

चिमुर तहसील के मासल (बु.) व नंदारा गाव के करीब 1200 हेक्टर मे धान की फसल को सिंचने वाले एकमात्र स्त्रोत से भी किसानो को इस वर्ष पानी से वंचीत रहने की नौबत आई है. मासल से सटकर बहनेवाले नाले पर बनाए गये बांध के लोहे के सभी दरवाजे चोरी हो गये है. जिससे धान की फसल पर गहरा संकट मंडरा रहा है. फसल को सिचने के लिये अब किसान बारीश का इंतजार कर रहे है. लेकीन उम्मीद का नक्षत्र कहे जाने वाले अश्लेषा नक्षत्र मे बारीश नदारद रहने से किसान हलाकान होकर फसल को तबाह होता देख बेबस नजर आ रहा है.

          वसंतराव गोडबोले कोल्हापुरी बांध नामक बांध का निर्मान इसी वर्ष ग्रिष्मकाल मे किया गया. इस बांध ने 1978 से परिसर के किसानो को सिंचाई का पानी दिया है. पुराना बांध जिर्ण हो जाने से उसे निर्लेखीत कर नये बांध का निर्माण विधायक भांगडीया के प्रयासो से किया गया.पहले के बांध मे लोहे के दरवाजे स्वयंचलीत थे जो जादा पानी जमा होने पर खुल जाते व पानी का स्तर कम होने पर बंद होते थे. इतना ही नही बांध की दिवाल मे स्थापीत किए गये थे. आधूनिक इंजीनिअरो ने मनुष्य बल से बाहर निकलने वाले दरवाजे लगाए लेकीन यह तकनिक चोरो के लिये आसान शिकार साबीत हुई. नतीजतन चोरो सभी दरवाजो पर हाथ साफ कर लिया. अब किसान विधायक की कृपा पर आस लगाए बैठा है. मामले की शिकायत पुलीस मे भी की गई है लेकीन पुलीस भी चोरो का पता लगाने मे नाकाम रही है. समय रहते बांध को रोका नही गया तो 1200 हेक्टर की धान फसल चौपट होना तय है. प्रशासन से शिघ्र कदम उठाने की मांग किसान कर रहे है.


PostImage

Ramdas Thuse

Aug. 12, 2023   

PostImage

१५ ऑगस्टला घोडाझरी पर्यटन स्थळ राहणार बंद! सुरक्षेच्या दृष्टीने वनविभागाने …


 

 प्रशासनाने सुरक्षा पुरविण्यास असमर्थता दर्शविल्याने तसेच किटाळी ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार १५ ऑगस्ट २०२३ रोजी घोडाझरीचे प्रवेशद्वार बंद ठेवण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. तसे परिपत्रक विभागाने जारी केले आहे.

 

पावसाळ्यात घोडाझरी तलावाचे अनेकांना आकर्षण असते. तलाव ओव्हरफ्लो झाला की या आकर्षणाला पारावार उरत नाही. मात्र, ओव्हरफ्लो असो की नसो, १५ ऑगस्टला पर्यटक घोडाझरीवर हमखास गर्दी करीत असतात. मात्र, या पर्यटकांच्या गर्दीने काही प्रश्नही निर्माण होत असतात. गर्दीतील पर्यटक राखीव जंगलात जाऊन प्लास्टिक आणि कचरा फेकण्याची शक्यता असून त्यामुळे वन्यप्राण्यांना इजा होऊ शकते. शिवाय या जंगलात वन्यप्राणी मोठ्या प्रमाणावर असल्याने पर्यटकांवर वन्यप्राणी हल्ला करू शकतात, असे वनविभागाला वाटत आहे. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होणार आहे.

 

 


PostImage

Ramdas Thuse

Aug. 12, 2023   

PostImage

खासदार अशोक नेते यांची ख्रिस्तांनद हॉस्पिटल ब्रह्मपुरी येथे भेट


 

 चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोक नेते हे दिल्ली अधिवेशन आटपून गडचिरोली ला येत असतांना ब्रह्मपुरी येथील माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर यांनी भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते तथा ब्रह्मपुरी विधानसभेचे सोशल मीडिया संयोजक अविनाश मस्के हे काल दिनांक ११ ऑगस्ट २०२३ ला रात्री १०.०० वा.च्या दरम्यान घरी झोपेला आराम करायला खाटेवर जात असतांना घरच्या फरशीच्या खाली अचानक पणे विषारी सापाने सर्पदंश केल्याने त्यांना ख्रिस्तांनद हॉस्पिटल ब्रह्मपुरी येथे भरती करण्यात आले. यासंबंधीची संपुर्ण माहिती माजी आमदार प्रा.अतुलभाऊ‌ देशकर यांनी खासदार अशोक नेते यांना दिली असता लगेच याविषयी तात्काळ गांभीर्यपूर्वक लक्षवेधुन खासदार अशोक नेते यांनी ख्रिस्तांनद हॉस्पिटला जाऊन भेट घेतली व त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत हॉस्पिटलचे मेन इन्चार्ज फादर यांच्यासोबत सुद्धा चर्चा करून त्यांच्या तब्येतीची काळजी व आरोग्याची काळजी घेणेसंबंधी खासदार अशोक नेते यांनी सूचना केल्या.

त्यावेळी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोक नेते,माजी आमदार तथा लोकसभा संयोजक प्रा. अतुल भाऊ देशकर,शहर अध्यक्ष अरविंद नंदूरकर, साकेत भानारकर, युवा मोर्चा जिल्हा सचिव तनय देशकर, प्रा. अशोक सळवंतकर, मोरेश्वर मस्के, धीरज पाल,उपस्थिती होते.


PostImage

Ramdas Thuse

Aug. 12, 2023   

PostImage

बुद्धविहाराच्या जीर्णोद्धारासाठी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा कडून आर्थिक मदत


अहेरी नगरपंचायत क्षेत्रातील बुद्ध विहाराच्या जीर्णोद्धारासाठी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी पुढाकार घेऊन ज्ञानप्रसारक नवयुवक मंडळाच्या सदस्यांना नवीन बुद्ध विहाराच्या बांधकामासाठी आर्थिक मदत सुपूर्द केली आहे.अहेरी नगरपंचायत परिक्षेत्रात अहेरी शहर हे खूप मोठे असून या शहरात बौद्ध समाज बांधवांची संख्या खूप जास्त असून या ठिकाणी बौद्ध समाज बांधवांतील उपासक व उपासिकांना एकत्र येऊन प्रार्थना करण्यासाठी जीर्ण झालेले खूप जुने बुद्ध विहार होते.अहेरी येथील ज्ञानप्रसारक नवयुवक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन जीर्ण झालेले बुद्ध विहार ला निर्लेखीत करून अहेरी शहरात भव्य बुद्ध विहार बांधकाम व सुशोभिकरण करण्याचे नियोजन करून काम सुरू केले आहे.या बांधकामाचा नियोजन मोठा असल्याने मंडळाचे सदस्यांनी आविसं अजयभाऊ मित्र परीवाराचे विदर्भ नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांची अहेरी येथील जनसंपर्क कार्यालय येथील भेट घेऊन सुरू असलेले बुद्ध विहार बद्दल माहिती देऊन सहकार्याची विनंती केले असता माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी तात्काळ आर्थिक मदत करून पूढे पण बौद्ध समाज मंदिरासाठी यापूडे ही आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी ज्ञानप्रसारक नवयुवक मंडळाचे अध्यक्ष तथा मंडळ अधिकारी एकनाथ चांदेकर,परशुराम दाहागावकर,शामभाऊ ओंडरे,मिलिंद अलोने,रोहित ओंडरे,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी,दिलीप मडावी सरपंच,राजेश पोरेड्डीवार,नितीन पुल्लूरवार वांगेपल्ली उपस्थित होते.


PostImage

Ramdas Thuse

Aug. 12, 2023   

PostImage

बुद्धविहाराच्या जीर्णोद्धारासाठी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा कडून आर्थिक मदत


अहेरी नगरपंचायत क्षेत्रातील बुद्ध विहाराच्या जीर्णोद्धारासाठी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी पुढाकार घेऊन ज्ञानप्रसारक नवयुवक मंडळाच्या सदस्यांना नवीन बुद्ध विहाराच्या बांधकामासाठी आर्थिक मदत सुपूर्द केली आहे.अहेरी नगरपंचायत परिक्षेत्रात अहेरी शहर हे खूप मोठे असून या शहरात बौद्ध समाज बांधवांची संख्या खूप जास्त असून या ठिकाणी बौद्ध समाज बांधवांतील उपासक व उपासिकांना एकत्र येऊन प्रार्थना करण्यासाठी जीर्ण झालेले खूप जुने बुद्ध विहार होते.अहेरी येथील ज्ञानप्रसारक नवयुवक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन जीर्ण झालेले बुद्ध विहार ला निर्लेखीत करून अहेरी शहरात भव्य बुद्ध विहार बांधकाम व सुशोभिकरण करण्याचे नियोजन करून काम सुरू केले आहे.या बांधकामाचा नियोजन मोठा असल्याने मंडळाचे सदस्यांनी आविसं अजयभाऊ मित्र परीवाराचे विदर्भ नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांची अहेरी येथील जनसंपर्क कार्यालय येथील भेट घेऊन सुरू असलेले बुद्ध विहार बद्दल माहिती देऊन सहकार्याची विनंती केले असता माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी तात्काळ आर्थिक मदत करून पूढे पण बौद्ध समाज मंदिरासाठी यापूडे ही आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी ज्ञानप्रसारक नवयुवक मंडळाचे अध्यक्ष तथा मंडळ अधिकारी एकनाथ चांदेकर,परशुराम दाहागावकर,शामभाऊ ओंडरे,मिलिंद अलोने,रोहित ओंडरे,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी,दिलीप मडावी सरपंच,राजेश पोरेड्डीवार,नितीन पुल्लूरवार वांगेपल्ली उपस्थित होते.