गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमेटी संपूर्ण महाराष्ट्रातून नंबर एक वर काँग्रेस असलेली पार्टी होती.परंतु मागील एक दशकापासून मागासलेल्या छत्रछायात वावरताना दिसून येतोय,कारण जिल्ह्यातील काँग्रेस कमिटी गटागटात विखुरलेली असून,त्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस कमिटी मागील एक दशकांपासून नुसत्या गटा गटातील राजकारणामुळे मागासले पणाच्या छत्रछायेत वावरताना दिसून येत आहे,असं म्हणण्याची वेळ सामान्य कार्यकर्त्यांवर आली आहे.
जेव्हा गडचिरोली लोकसभा क्षेत्र निर्माण झाला,तेव्हा प्रथम खासदार होण्याचा बहुमान भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला मिळाला कारण काँग्रेस पक्षाचे खासदार म्हणून मारोतीराव कोवासे यांनी विजयश्री खेचून आणली. परंतु त्यानंतर काँग्रेसवर मात करीत भाजपाने दोन वेळा धुळ चारून विजय संपादन केला.
कदाचित जिल्ह्यातील काँग्रेस कमिटी गटागटात विखुरली नसती तर गड जिंकणे भाजपाला कठीण झाले असते. परंतु तसं न होता गटबाजीमुळे काँग्रेस मधील अदृश्य शक्ती भाजपा बरोबर हात मिळवनी करून स्वपक्षातील उमेदवारांसमोर आव्हान निर्माण केल्या गेला आणि त्याचा फायदा भाजपाला मिळाला.
काँग्रेससाठी जिल्ह्यातील वातावरण आजही अनुकूल आहे.जे काही जिल्ह्यातील मतदार आहेत ते काँग्रेस सोबत एकनिष्ठ पणाने काम करायला तयार देखील आहेत,फक्त अडचण समोर येते ती म्हणजे गटागटांची.लोकसभेची उमेदवारी कोणालाही मिळो परंतु एकमेकांचे मतभेद बाजूला सारून विश्वासाची मोट एक बांधल्या गेली तर काँग्रेस पक्षाला सुगीचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही.
गडचिरोली लोकसभा क्षेत्राचा विचार केला तर मोदी फॅक्टर फेल आहे आणि जनतेला आता बदल हवा आहे. यासाठी काँग्रेस पक्षातील नेते एकमेकांचे पाय धरून खाली ओढण्यापेक्षा,एकमेकांचे हात धरून येणाऱ्या निवडणुकांना समोर कसं जाता येईल याचे चिंतन करणे गरजेचे आहे.अन्यथा गटागटात विखरलेली काँग्रेस पार्टी भाजपाचा विजयी रथ रोखून जिल्ह्यात काँग्रेसला गतवैभव प्राप्त करता येणार नाही.
आता नाही तर कधीच नाही,या विचाराचा मूलमंत्र घेऊन काँग्रेस पक्षातील नेतेमंडळी सज्ज व्हायला पाहिजे,जेणेकरून जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे अस्तित्व टिकून राहण्यास मदत होईल किंवा भाजपाचे आव्हान स्वीकारल्याचा सिद्ध होईल.