PostImage

विदर्भ फायर न्यूज

Nov. 26, 2024   

PostImage

ट्राक्टर ट्रॉली वरून पडून युवक मजुराचाचा मृत्यू (नागभीड तालुक्यातील सावरगाव …



तळोधी (बा)
  तळोधी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सावरगाव येथील शेतमजुरी करणारा युवक देवा कुंडलीक बोरकर (वय ३५) हा गावातील एका शेतकरी व ट्रॅक्टर मालक चालक बाबुराव ऋषी ठिकरे यांच्या मालकीच्या ट्रॅक्टर व  धानाचे पोते डुलाई करायला गेले असता शेतावरून ध्यानाचे पोते घेऊन गावाकडे येत असताना सावरगाव जवळ चंद्रपूर - नागभीड रोड वरती त्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉली क्रमांक 'एम.एच.35एफ1016' या ट्राक्टर ट्राली चा 'हीच' तुटल्यामुळे पोत्यावर बसलेला मृतक देवा हा ट्रालीच्या खाली पडला व  त्याच्या शरीरावरून ट्राक्टर ट्राली गेल्यामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना सकाळी 9 वाजता घडली. 
   विशेष म्हणजे शेतीचा हंगाम सुरू असल्यामुळे शेतातील धानाचे चूरने करून परिसरातील शेतकरी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये धानाचे बोरे किंवा धान भरून हे घरी घेऊन येतात. अशातच शेतावरून धान्याची बोरे घेऊन येत असताना ही घटना घडली. 
        मृतक हा घरातील कमवता व्यक्ती असल्यामुळे त्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या परिवारावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. त्याचे मागे वडील ,आई, पत्नी व मुले आहेत. 
   घटनेची माहिती मिळतात तळोधी पोलिसांनी घटनास्थळी येऊन मोक्का पंचनामा केला व शव विच्छेदनाकरिता नागभीड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. तळोधी पोलीस यांनी गुन्हा दाखल केलेला आहे. अधिक तपास करीत आहेत.